आमदार अमित गोरखे यांचे औसा विधानसभा मतदारसंघ येथे झालेल्या कार्यक्रमातील भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
- 📍 लातूर औसा मतदारसंघ | 🗓️2/10/2024
🔸भव्य नागरी सत्कार व मातंग समाज मेळावा यावेळी पार पडला. समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या जागर लोकगीतांचा हा कार्यक्रम झाला. प्रचंड असा प्रतिसाद यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित समाजबांधव व नागरिकांकडून मिळाला.
🔸इथून मागे आपला समाज हा चळवळीच्या समाज म्हणून ओळखला जायचा. कारण आपल्या विविध मागण्या प्रश्न प्रलंबित होते. परंतु आपल्या महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने आपण ज्या गोष्टींसाठी चळवळ करत होतो ती सगळी कामे या सरकारने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.
🔸आत्तापर्यंत काँग्रेस सरकारने आपल्या समाजाचा फक्त वापरच केला आहे. कारण त्यांना असं कधीच वाटलं नाही की आपल्या समाजाचा माणूस हा विधानपरिषदेवरती असावा किंवा राज्यसभेवरती असावा. परंतु माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले अभिमन्यू पवार साहेब यांच्या पुढाकाराने आज आपल्या समाजाचा आवाज विधानपरिषदेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या सरकारने केल आहे आणि याचे फलित म्हणजे आपल्या समाजाला मिळालेली आमदारकी.
🔸रशियातील स्मारकासाठी चार दिवस देवेंद्र फडणवीस साहेब हे रशियामध्ये ठाण मांडून होते. आणि स्मारकाचा विषय मार्गी लावला. याच्या आधी कुठल्याही मुख्यमंत्र्याला हे शक्य झालं नाही. कारण आपल्या समाजाविषयी दुसऱ्या कोणालाही आस्था नव्हती. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रशियातील पुतळा असेल चेंबूर या ठिकाणी होणार साडेतीनशे कोटीचं स्मारक चालू आहे आणि हे सगळं महायुती सरकारच्या काळामध्ये होत आहे. पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे 35 फुटी स्मारक होत आहे आपण पुण्यामध्ये उभारत आहोत. म्हणजे आपल्या समाजाची मान उंचावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे.
🔸समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी बार्टीच्या धरतीवरती आर्टी स्थापना व्हावी अशी मागणी आपण लावून धरली होती. आणि आपली ही देखील मागणी याच सरकारने पूर्ण केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजात आयएएस आयपीएस अधिकारी घडायला नक्कीच मदत होणार आहे.
अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून आर्टी चे विभागीय कार्यालय लातूर-औसा मतदारसंघांमध्ये आणण्याचे काम होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त अधिकारी हे माझ्या विधानसभेतून असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे लागेल.
🔸जेजुरी देवस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदडे हे आपल्याच मातंग समाजाचे आहेत आणि हे सगळे शक्य झाले आहे ते महायुती सरकार मुळेच आज आपला समाज हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये मान सन्मानांसाठी पुढे असतो. तर हे सगळं शक्य झाले आहे ते आपल्या समाजाविषयी असलेल्या तळमळीमुळे महायुती सरकारमुळे.
🔸आज मी जरी आमदार असलो परंतु यामागे सर्व भाजपाच्या आमदारांचे योगदान आहे आणि यामध्ये आपल्या अभिमन्यू पवार साहेबांचे देखील तितकेच महत्त्वाचे योगदान आहे.
🔸त्यांनी विधानसभेचा आमदारकीचा फॉर्म भरताना आपल्या समाजाचे दीपक चाबुकस्वार यांना बोलवून घेऊन सूचक म्हणून सही घेतली ही घटना आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्या समाजासाठी काम करणारा हा प्रामाणिक माणूस त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
या कार्यक्रमासाठी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार, दीपक चाबुकस्वार अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी, लहू कांबळे माजी उपनगराध्यक्ष औसा, सुनील सौदागर, भागवत कांबळे, बालाजी कांबळे, सचिन कांबळे, दत्ता पुंड, आकाश शिंदे, राजेंद्र लोदगेकर, नेताजी कांबळे, कल्पना गायकवाड, योजना ताई कांबळे, मायाताई लोंढे, काशिनाथ दादा सगट आदी मान्यवर जाता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Abhimanyu Pawar
#amitgorkheinaction #bahujansanvadyatra #devendrafadnavis #chandrashekharbawankule #vinodtavde #amitgorkhe #bjp #ausavidhansabha