शर आला तो धावुनी आला काळ ll एके काळी अतिशय गाजलेली मराठी कविता ll प्रत्येकांच्या ओठावरची कविता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2023
  • गीतकार :- ग. ह. पाटील
    गायक :- सूरज कुमार धनजोडे
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

ความคิดเห็น • 794

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej หลายเดือนก่อน +10

    श्रावण बाळाची कविता आईसाठी वडिलांसाठी हृदयस्पर्शी कविता मला आठवले ते बालपण मला आठवले श्रावण बाळाचे आई बापासाठी पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर दशरथ राजाने हरीण म्हणून बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाला लागला ही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहे अशाच कविता तुम्ही सादर करीत सादर करीत राहा हीच विनंती गवळी सर

    • @NmathobaPanjabi-sf4kw
      @NmathobaPanjabi-sf4kw 19 วันที่ผ่านมา

      हां प्रसंग हरताळें (चांगदेव) तलावाच्या तिरावर घडला होता त्याच तळ्याचे पाळिं एका तिर्थस्थान आहे महानुभाव पंथाचे (सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे)

  • @vijayas4945
    @vijayas4945 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद दादा
    एक वर्षापूर्वी मीच बोलली होती तुम्हाला शर आला तो धावूनि आला काळ पाठवा म्हणून
    धन्यवाद बेटा, एक आजी
    वनी खेळते बाळ ते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांची 🎉🎉
    शोधा आणि युट्युब वर पाठवा

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 หลายเดือนก่อน +8

    मी 1953साली तिसरीत जीवन शिक्षण विद्या मंदिर कोपरगाव शाळा नं दोन मधे शिकत असताना आमचे वगॅ शिक्षक कै. धामणे गुरूजी आम्हा मुलाकडून सुंदर चालीत म्हणून घ्यायचे ही आठवण आज जागरूत झाली.

  • @balirambhaske2054
    @balirambhaske2054 2 หลายเดือนก่อน +8

    मी सहा वर्षाचा असताना ही कविता वाचली होती पण आम्हाला ही कविता अभ्यासक्रमात नव्हती .फारच भावपूर्ण कविता आहे मी 1968 ला पहिली ला असताना ही कविता माझ्या मामाच्या अभ्यास क्रमातील ही कविता होती .कविता वाचताना डोळे पाणावतात .या कवितेचे संगीतमय वाचन केल्याबद्दल धन्यवाद.अश्याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम चालू ठेवावा .

  • @harishchandraparab7034
    @harishchandraparab7034 หลายเดือนก่อน +8

    माझा जन्म 1942 चा. ही कविता माझी अर्ध्याहून अधिक पाठ आहे. अजूनही एकांतात गुणगुणतो. डोळे भरून येतात.

  • @user-cd1gr8tb3i
    @user-cd1gr8tb3i หลายเดือนก่อน +7

    खूपच सुंदर कविता आहे आणि आवाज पण खूपच सुंदर आहे भाऊ आपला खूप आवडली मनापासून धन्यवाद

  • @rimalanjekar4299
    @rimalanjekar4299 5 วันที่ผ่านมา +1

    ❤🙏❤ अप्रतिम गायन बरेच वर्षांनी ही कविता यैकली .कोरड्या डोळयांनी ही कविता ऐकू शकतच नाही म्हणू तरी कसे शकणार पण आपण खूपच भावपूर्ण गायलात .👍😊❤🙌❤

  • @sakharamtangade942
    @sakharamtangade942 19 วันที่ผ่านมา +1

    दादा कोटी कोटी धन्यवाद हृदय स्पर्शी कविता आपण गायली अर्थ पूर्ण आशय आवाजातून जाणवलं नमन करतो

  • @ashokpawaskar7043
    @ashokpawaskar7043 หลายเดือนก่อน +4

    मनात कुठेतरी घर करून असलेली कविता ऐकण्याचे भाग्य मिळाले.धन्यवाद!

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 หลายเดือนก่อน +7

    खुप हृदय स्पर्शी कविता.🙏🙏

  • @vijayas4945
    @vijayas4945 3 วันที่ผ่านมา +1

    बऱ्याच जणांनी गायली
    पण तुझ्यासारखा आवाज कोणाचाच नाही ✅
    आम्ही ज्या आवाजात ऐकली ,गायली तोच आवाज आमच्या गुरुजींनी शिकवलेला🎉
    👌👌🌹💐💐👍

  • @satishbhokardole6638
    @satishbhokardole6638 ปีที่แล้ว +16

    पन्नास वर्षापुर्वी आम्हास ही कवीता होती.अप्रतिम आणी आमचे शिक्षक ही आठवणीत आहेत ,त्याना मानाचा मुजरा,

  • @maulidagale461
    @maulidagale461 22 วันที่ผ่านมา +1

    हि कविता आम्हाला होती खुपच सुंदर 👌🏼👌🏼👍🙏🏽🙏🏽

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 21 วันที่ผ่านมา +1

    आम्ही चौथीत असताना ही कविता आम्हाला होती. अजूनही माझी पाठ आहे. मी नेहमी गुणगुणतच राहते. आज कविता ऐकून बालपणीची आठवण झाली आमच्या खैरनार बाई फारच सुंदर ही कविता म्हणायच्या. समजून सांगताना भावना दाटून यायच्या.

  • @ranjanakamble9221
    @ranjanakamble9221 2 หลายเดือนก่อน +7

    माझी आई आम्हाला लहानपणी ही कविता नेहमी ऐकवत असे, आजही तिच्या पंच्याहतरीत तिला ही कविता पाठ आहे व म्हणते सुद्धा. खूप छान वाटते.

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 2 หลายเดือนก่อน +8

    1नंबर धन्यवाद
    बरेच दिवसांनी चांगल काही ऐकायला मिळालं

  • @vandanaaarekar1054
    @vandanaaarekar1054 2 หลายเดือนก่อน +9

    आम्ही लहान असताना माझी आई हि कविता सुन्दर गात असे कारण आमची अक्षिशीत असून सुद्धा उत्तम गात असे आज हि कविता ऐकून माऊली ला आठवले जी या जगात नाही

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 29 วันที่ผ่านมา +4

    ही कविता मला सुध्दा होती आणि एक कविता बा नीज गडे नीज गडे लडीवाळा नीज नीज माझ्या बाळा
    रवी गेला सोडून आभाळा नीज नीज माझ्या बाळा। 🙏 🙏

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 20 วันที่ผ่านมา +1

    गायकाने चांगल्या स्वरां मध्ये ही कविता गायली लहानपणी आमच्या अगोदरचे मुले शाळेमध्ये ही कविता म्हणत असत आमच्या अभ्यासक्रमात ही कविता नव्हती परंतु आमच्यापेक्षा मोठे मुलं कविता अर्थ स्वरात गात असत धन्य ते कवी ज्यांनी श्रावण बाळाची कविता लिहिली जय श्रीराम

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar หลายเดือนก่อน +5

    हि कविता आम्हाला होती मी अजून म्हणत असतो

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 18 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा, लहानपणी ह्या कवितेत बद्दल खूप खूप ऐकले होते, परंतु संपूर्ण काव.य ऐकण्याचा योग आता आला.खुपच छान काव्यं रचना, अगदी थोडक्या शब्दांत चफकल पुणे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो,हेच या कवितेचे गमक आहे तसेच ती गेय आहे,व तिची चाल सुध्दा ठरलेलीच व ठसठशीत आहे.धन.यवाद.एक अजरामर कविता आहे...😂❤

  • @sureshkaskar8589
    @sureshkaskar8589 2 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर कविता 🙏🙏

  • @mangalgore2831
    @mangalgore2831 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला पण होती.
    खूप खूप आवडती कविता.

  • @pratibhaj4814
    @pratibhaj4814 19 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर कविता अर्थ पुर्ण आहे खुप वर्षानी ऐकली

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 23 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर आवाज खुपच छान धन्यवाद

  • @nalinigolar810
    @nalinigolar810 6 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कविता आहे आम्हाला चवथीत होती हिकविता

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 27 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद। बंधु. अप्रतिम गायलात.

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 20 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला पण एकुणीसे बासटसाली इयत्ता चौथी मध्ये कविता होती रडू येत होते अभिनंदन सर आपले फार सुंदर

  • @vaijayantikulkarni8296
    @vaijayantikulkarni8296 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम कविता मनाला भावणारी व छान सादरीकरण . खुप आवडली.

  • @nalinigolar810
    @nalinigolar810 6 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला पण होती हि कविता खुपच सुंदर आणि भावनाप्रधान आहे आता अशा कविता बनत नाहीत

  • @dr.sonajilandepatil10
    @dr.sonajilandepatil10 ปีที่แล้ว +23

    मी 65 वर्ष मागे गेलो.
    गायका बरोबर गाउन संपूर्ण कवितेचा पुन्हा मुग्ध आनंद घेतला.
    धन्यवाद....

    • @bhimraopatil4744
      @bhimraopatil4744 ปีที่แล้ว

      फार छान गाईली‌ जुन्या काळातील कवितांची आठवण झाली ‌धन्यवाद.

    • @user-bm2ze5fe6f
      @user-bm2ze5fe6f หลายเดือนก่อน

      जुन्या काळचे कविता ची आठवण करून दिली खूप खूप धन्यवाद सर

    • @vasantpawar2152
      @vasantpawar2152 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 8:22

  • @user-nq9vo8uy8z
    @user-nq9vo8uy8z 4 หลายเดือนก่อน +44

    माझा जन्म सन १९५३ चा. तिसर्‍या किंवा चवथ्या वर्गात शिकत असतांना ही कविता शिकवली जात होती. राजा दशरथ व श्रावण बाळ यांच्यावर आधारित ही कविता मनाला गहिवरून आणनारी ही कविता माझ्या खुपच आवडीची. ही कविता म्हणत म्हणत मी माझ्या दोन्ही मुलींना झोपवीत होतो. आता नातवंडे सुध्दा हीच कविता ऐकून झोपी जातात.

    • @vilasgurav8580
      @vilasgurav8580 2 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 2 หลายเดือนก่อน +5

      अशीच एक कविता.प्रेम स्वरूप आई
      वात्सल्य सिंधू आई बोलावु तुज आता मी कोणत्या ऊपाई.
      ही कविता आम्हाला आमच्या बाई शिकवायच्या,अन् सुंदर आवाजात तालात गात असत .व गाता गाता त्यांच्या डोळ्यात अश्रु वहात असत.
      आमच्या त्या शिक्षीका बाईंचं नांव शांता बाई होते . आणि त्यांच्या मिस्टर चे नांव केशवराव होते.
      या कवितेत मुळे त्यांचे नांव लक्षात राहीले.
      तान्हाजी मुधळे, औंढा (नागनाथ )

    • @GangaDharrao-gz4vg
      @GangaDharrao-gz4vg 2 หลายเดือนก่อน +1

      This peom was sung by all of us who are aged above sixty now.Evening time was leisure time.Then all of us were singing proms taught in school.Elder sisters or brothers too sung as extra peom.Those golden days. canno rise now.Gangadhar Kanole Nanded

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कविता ❤ हृदय स्पर्शी

  • @shashikantrdhokane593
    @shashikantrdhokane593 ปีที่แล้ว +14

    अतिशय भावपूर्ण सादरीकरण. खूप दिवसांनची इच्छा पूर्ण झाली, धन्यवाद.

  • @manishasurve9591
    @manishasurve9591 6 วันที่ผ่านมา +1

    असा जुन्या कवितांचा संग्रह

  • @ujjwalkundaikar2596
    @ujjwalkundaikar2596 7 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद!कविता ऐकवल्याबद्दल. माझी आई नातवंडांना झोपवताना ही कविता म्हणायची.आज नातवंड मोठी (30-35 वर्षाची) आहेत.तरी आजीला ही कविता म्हणायला सांगतात

  • @kirti8946
    @kirti8946 ปีที่แล้ว +17

    खूप छान ...मला चवथीला होती ही कविता खूप वर्षापासून ची इच्छा तुमच्या मुळे आज पुर्ण झाली..खूप खूप धन्यवाद..।।।

  • @hanmantbiradar1075
    @hanmantbiradar1075 2 หลายเดือนก่อน +3

    माझा जन्म 1964 चा.आमच्या अभ्यासक्रमाला ही कविता नव्हती,पूर्वी होती.परंतु लहानपणापसून कविता ऐकत आलो आहे.खुपच भावपूर्ण!अतिशय ह्रदयद्रावक प्रसंग!!
    धन्यवाद👏👏

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 ปีที่แล้ว +39

    साधारण 60वर्षा पूर्वी,ही कविता आम्हाला आमचे शिक्षक अगदी तनमयतेने शिकवीत होते, व आमच्या नायानातून अश्रूंचा बांध फुटत असे.

    • @HambirraoWalunj
      @HambirraoWalunj 9 หลายเดือนก่อน

      खूप छान होती कवीता

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 6 วันที่ผ่านมา

      आता अशा आशयपूर्ण कविता नाहीत.

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद कविता लीहणाऱ्या कविना इतका करुण रस भरलेली कविता लिहिली व गायकानेही त्याच भावनेतून गायली धन्य वाद . जय श्री राम.

  • @umadankh3723
    @umadankh3723 ปีที่แล้ว +9

    खुपच छान कविता बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली धन्यवाद

  • @rameshsaindane2022
    @rameshsaindane2022 ปีที่แล้ว +7

    छान मी लहान असताना ही कविता पाठ केलेली होती आज पुन्हा एकदा मिळाली खूप खूप आभार

  • @ujjwalajadhav1094
    @ujjwalajadhav1094 ปีที่แล้ว +16

    खुप सुंदर कविता आहे माझ्या खूप आवडीची कविता आज पुर्ण ऐकायला मिळाली. खूप खूप आभार.

  • @popatraopatil1739
    @popatraopatil1739 16 วันที่ผ่านมา +2

    आज माझे वय 68 वर्षे आहे.आजही माझी कविता पाठ आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आजही मी माझ्या नातवंडांना झोपणे वेळी ही पूर्ण कविता म्हणून त्यांनाझोपवतो तशीच अजून एक कविता आहे ती ज संगीतमय केली तर बर होईल . पोर खोटेवर मृत्यूच्या दारा कुणा गरीबाचा तळमळे बिचारा दूर आई राहीली कोकणात सेविकेचा आधार एकचतो . धन्यवाद

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p หลายเดือนก่อน +11

    माझी आई ही कविता खूपच छान म्हणायची गळा छान निघायचा आईचा आज आई नाही जगात पहिल्या सगळ्या कविता कविता च वाटायचे आता तर काही ठिकाण नाही आईसाठी आठवण राहून गेली सशिल आई होती माझी जुनी सातवि झाली होती विडिओ मुळे आठवण जागी झाली धन्यवाद

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम च...करुणामय ...😓😢

  • @Sukramsavkare_1991
    @Sukramsavkare_1991 หลายเดือนก่อน +3

    मी लहान असताना मी आमचे पुस्तकातील कविता म्हणत असताना माझी आई त्यांचे काळातील ही कविता मला नेहमी म्हणून दाखवायची. त्यावेळी ही कविता व कवितेची चाल मला खूप आवडायची.
    आता मी जरी मोठा झालो असलो तरी माझी आई मला सोडून गेली आहे.....😢😢😢
    ही कविता ऐकली तेव्हा जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. पार भूतकाळात निघून गेलो आई जणू माझ्या जवळ बसून ही कविता म्हणत आहे असा जिवंत भास झाला आणि माझे डोळे अश्रू नयनांनी केव्हा ओले होवून ओघळले कळालेच नाही......

  • @pratidhnyamahajan6049
    @pratidhnyamahajan6049 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर.आम्हाला.ही कविता.होती पूर्ण.आठवत नव्हती.त्याबद्दल आभार

  • @chhayajoshi1867
    @chhayajoshi1867 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर कविता लहानपणी माझा भाऊ गायचा ही कविता

  • @darshanasawant4786
    @darshanasawant4786 7 หลายเดือนก่อน +5

    मला माझ्या शाळेची आठवण झाली मनापासून धन्यवाद डोळ्यातून पाणी आले धन्यवाद

  • @mangalrawal876
    @mangalrawal876 หลายเดือนก่อน +1

    कविता ऐकून मन गहिवरून आले डोळ्यात पाणी आले.खूपछान लहान पण आठवले.😂 8:22

  • @sanjaykhairnar4965
    @sanjaykhairnar4965 21 วันที่ผ่านมา +1

    आमचे वडील शिक्षक होते ते आम्हाला रात्री झोपताना ही कविता ऐकवयाचे जे आज आमच्या त नाही कविता ऐकूण जुनी आठवण मात्र तुम्ही जागे केली धन्यवाद दादा 😢😂

  • @samarthsankpal3279
    @samarthsankpal3279 29 วันที่ผ่านมา +1

    आज सुद्धा ही चाल जशीच्या तशी सगळीकडे आहे.

  • @jyotiraul1395
    @jyotiraul1395 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर शाळेतील कवीता ऐकुन धन्य झाले कान तृप्त झाले

  • @namdeoraosdhanwate2271
    @namdeoraosdhanwate2271 ปีที่แล้ว +14

    60 वर्ष झाली शाळेत असताना ही कविता वाचताना डोळ्यात पाणी यायचे ,अशीच दुसरी कविता, क्षणोक्षणी पडे उठे परि फळे उडे बापडी या दोन्ही कविता आजही ऐकताना डोळ्यात पाणी येते.

  • @darshanaathavale237
    @darshanaathavale237 ปีที่แล้ว +4

    खूपच छान कविता. अगदी ऐकून डोळ्यात पाणी आआले.

  • @siddharthmore6110
    @siddharthmore6110 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर कविता
    माझे वडील नेहमी ही कविता गायन करायचे. सर्व जण आम्ही मनःपूर्वक ऐकायचे. तुम्ही माझ्या वडिलांना माझ्या समोर आणले. जे आज हयात नाहीत. डोळ्यात पाणी आले. 🙏

  • @rameshkavalanekar8571
    @rameshkavalanekar8571 วันที่ผ่านมา +1

    Farach chhan paddhatine aapan hi Kavita gayli aamahala hi Kavita 4thi eaytet hoti KHUP chaan Kavita aahe hi tumahala KHUP KHUP dhanyavad sundR gayli

  • @ashokkamble8571
    @ashokkamble8571 28 วันที่ผ่านมา +2

    ही कविता 1960ला मला 4थी ला होती खूप छान कविता होती

  • @user-pl6vc3ck2q
    @user-pl6vc3ck2q 2 หลายเดือนก่อน +6

    मला तिसरी ला ही कविता होती। आज पर्यंत ही मुखोदगत होती।

  • @sunandadixit9474
    @sunandadixit9474 ปีที่แล้ว +8

    मला ही कविता फार आवडते, अगदी रडू येते, खुप छान आवाज आहे तुमचा

  • @namdevilhe4977
    @namdevilhe4977 ปีที่แล้ว +4

    जय शिरोमणी संत रविदासजी महाराज..धन्यवाद. ...फारच छान....

  • @SubhashLaulkar
    @SubhashLaulkar 2 หลายเดือนก่อน +9

    1957 -58 मध्ये मी इयत्ता चौथी असताना ही कविता आमच्या पाठ्यपुस्तकात होती ही कविता शिकवताना गुरुजी आणि आम्ही सर्व विद्यार्थी अतिशय भावविवश होत होतो मातृ - पितृ प्रेमाचे खोल संस्कार विद्यार्थ्यांवर होत होते ते अजून पर्यंत आमच्या मनात घर करून आहेत आई बाप हे दैवत दोन्ही असं का माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी हा भाव त्या कालच्या मुलांमध्ये आयुष्यभरासाठी कोरला जायचा 🙏

  • @shubhangijadhav2990
    @shubhangijadhav2990 ปีที่แล้ว +5

    फार सुंदर कविता. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. कवितेचा अर्थ असा आहे की रुदय भारावून गेले. कवीला सुधा सलाम.

  • @makarandlingayat9862
    @makarandlingayat9862 ปีที่แล้ว +4

    लहानपणी ऐकलेली कविता, शब्दरचना अप्रतिम ‼️ चाल पण अप्रतिम ‼️ ऐकताना अंगावर काटा उभा राहिलाच पाहिजे ‼️🙏🙏🙏

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 หลายเดือนก่อน +1

    This sravanbal.kavita.was.studing.in.my.chield.hood.outstanding.very.nice.lots.of.thanks.for.prenteion.of.this.poem

  • @manishavaze5782
    @manishavaze5782 หลายเดือนก่อน +2

    Pratham kavi patil hyna salute aani gaykana dhanyvad

  • @amitavaidya427
    @amitavaidya427 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गायन ऐकून मन हेलावून गेले.

  • @hemantkshirsagar1139
    @hemantkshirsagar1139 ปีที่แล้ว +6

    सर खूप सुंदर कविता गायली आहे आणि आपला आवाजही खूप सुंदर आहे. कविता ऐकून खरंच मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी सुद्धा आलं. राम कृष्ण हरी.

  • @pratibhadagale6727
    @pratibhadagale6727 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 खूप छान आम्ही सुद्धा लहानपणी ऐकलेली आहे ही कविता

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 หลายเดือนก่อน +1

    खुपचं सुंदर अभिनंदन,

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 ปีที่แล้ว +3

    आमचे लहानपणी माझी आई अतिशय सुंदर म्हणायची. शब्दच असे आहेत की श्रावण बाळ आणि ते दृश्य समोर उभी होतात. आम्ही सगळे भावंडे देखील ऐकताना रडत असायचो.

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 ปีที่แล้ว +9

    ही कविता 1967_68 मध्ये मी अभ्यासली आहे. किती हृदयद्रावक आहे ही कविता! अजुनही आठवते आणि डोळ्यात अश्रू तरलतात.

    • @kausalyamhatre9407
      @kausalyamhatre9407 ปีที่แล้ว

      सहावीला होती ही कविता. माझी पूर्ण पाठ आहे.

    • @NachiketKocharekar
      @NachiketKocharekar ปีที่แล้ว

      No bhi vo ft vo

  • @hiramanjadhav5580
    @hiramanjadhav5580 หลายเดือนก่อน

    अतिशय भावपूर्ण सादरीकरण.आमच्या पाठ्यक्रमात ही कविता नव्हती परंतु थोरल्या बंधू कडून ऐकलेली👌👌👌

  • @gajanandeshpande4173
    @gajanandeshpande4173 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम, खूप छान❤आम्हाला होती ही कविता 🌸 धन्यवाद 👍🌹⭐⭐

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर व अर्थपूर्ण कविता, सादरीकरण अतिशय सुंदर, माझी आई हि कविता नेहमी म्हणायची.

  • @Milestoneekart
    @Milestoneekart 2 หลายเดือนก่อน +2

    हृदय स्पर्शी गीत सादर केले धन्यवाद

  • @gajanansarjerao5402
    @gajanansarjerao5402 ปีที่แล้ว +6

    👌 खरोखरच काळजाला भिडणारी कविता.धन्यवाद 🌹🌹🙏🙏🌹🌹खुपच छान 👍🚩

  • @user-cd1gr8tb3i
    @user-cd1gr8tb3i หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर कविता गायली भाऊ .आवाज पण खूपच सुंदर आहे तुमचा.

  • @suryakantmulye6205
    @suryakantmulye6205 หลายเดือนก่อน +1

    माझा जल्म 7/4/1951 चौथी.. साहव्या वर्षी मला मुन्सिपलतीच्या शाळेत घेतलं पहिली इयत्ता मध्ये व चौथी मध्ये ही कविता पाठ करून घेत... आज त्यानंतर मी ही श्रावणबाळाची कविता वयाच्या 74 वर्षी मला ऐकायला मिळाली... खूप आनंद झाला आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या बाळ तूला खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunamore3848
    @arunamore3848 23 วันที่ผ่านมา +1

    खूप छान बाळा तू मस्त गायली ही कविता

  • @bhagavatbhoge7123
    @bhagavatbhoge7123 หลายเดือนก่อน +1

    हृदयाला स्पर्श करणारी कविता खूप आवडते मला ही शिकतांना होती

  • @shamaljoshi9877
    @shamaljoshi9877 หลายเดือนก่อน

    तुम्ही छान च गाता खूप आवडल्या कविता. ( किती सांगु गडे तुजसी याच्या खोड्या आहेत तश्या का थोड्या) हि कविता नक्की एकदा.

  • @lalitthenge2634
    @lalitthenge2634 ปีที่แล้ว +6

    बापरे,किती वर्षानी कविता ऐकली, अंगावर काटा आला, कविता शिकवणाऱ्या आमच्या बाई संपूर्ण डोळ्यासमोर उभ्या राहिल्या 😢😢😢😢

  • @SunilKhandekar-gn7bb
    @SunilKhandekar-gn7bb 25 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा आईची ताईची आठवण करून दिली

  • @prabhawatiwable1915
    @prabhawatiwable1915 หลายเดือนก่อน +1

    अतिशय भावपूर्ण कविता आपण सादर केली.खुप खुप धन्यवाद. १९७२-७५ च्या काळात मी ही कविता शिकवताना मी आणि वर्गातील विद्यार्थी देखील एका अनामिक भाव विश्वात जात. तास केव्हा संपला आहे हे कळत नसे.कविता, कवी आणि आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद.

    • @prabhawatiwable1915
      @prabhawatiwable1915 หลายเดือนก่อน

      श्री. प्रकाश वाबळे. सेवा निवृत्त मुख्याध्यापक.

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 ปีที่แล้ว +4

    हो, मलाही ही कविता प्राथमिक शाळेत असताना पाठ केल्याचे स्मरते.
    आपल्या मराठी भाषेत अशा किती तरी कविता आहेत जी ज्यातून समाज शिक्षण आणि आरोग्य, अर्थ कारण आपल्याला शिकविले गेले.
    माला आठवतात त्या, घेवूनी आरती हाती, पातल्या नर्मदेकाठी,
    छन खळखळ धूम पट धूम लेझिम चाले जोरात, वसंत वनात जनात हासे, सृष्ठी देवी जणू नाचे उल्हास,
    गातात संगीत पृथ्वीचे भाट.
    या आणि अशाच कितीतरी कविता, उत्तमोत्तम धडे, प्रवास वर्णने, निबंध, रसग्रहण या गोष्टी आठवतात.
    पण हे सगळे ७७+ वयो गटातील लोकांच्या करीता एक विरंगुळा.
    धन्यवाद, या श्रावण बाळ कविते निमित्त थोडा वेळ छान गेला हेही नसे थोडके.
    जमल्यास या माध्यमातून परत परत भेटूही.

  • @SubhadraTarate
    @SubhadraTarate 25 วันที่ผ่านมา +1

    आज सहजपणे ही कविता

  • @seemadeshmukh8500
    @seemadeshmukh8500 หลายเดือนก่อน +1

    खूपच ह्रदय स्पर्शी गायन केले

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 2 หลายเดือนก่อน +2

    1970 ला मी चौथीला होती धन्यवाद सर आज सुरात गायली खुप सुंदर

  • @vasudeoification
    @vasudeoification ปีที่แล้ว +5

    खूप वर्षांनी संपूर्ण कविता ऐकायला मिळाली. मी ही सत्तरीचा आहे. पण त्यावेळी सर्वानाच ही कविता पाठच होती.

    • @sonaji4226
      @sonaji4226 2 หลายเดือนก่อน

      Kayande sir very nice.

  • @kumudiniaasodekar3095
    @kumudiniaasodekar3095 2 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर🎉
    लहान पणीची आठवण झाली. घरोघरी हे गाणं ऐकायला यायचे. आमची आजी तर गाणं म्हणतांना खुप रडायची तीला रडतांना पाहून आम्ही भावंड तीला घट्ट बिलगून रडायचो

  • @mitasave8119
    @mitasave8119 ปีที่แล้ว +6

    अजून ही ऐकताना डोळ्यात पाणी येते धन्यवाद

  • @sulochanasalunkhe4744
    @sulochanasalunkhe4744 หลายเดือนก่อน +1

    Khoopach chhan.I am now 66years old. Mala ajun path ahe.

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 20 วันที่ผ่านมา +2

    very good congratulations

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 หลายเดือนก่อน +2

    मी शाळेत, चौथ्या वर्गात असताना,माझा, मित्र फार छान चालीवर, सुंदर आवाजात म्हणायचा,

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 ปีที่แล้ว +5

    शाळेची आठवण झाली
    सुंदर कविता

  • @ashwinilanjekar4772
    @ashwinilanjekar4772 ปีที่แล้ว +8

    अतिशय उत्कट, हृदयस्पर्शी काव्य.. शालेय जीवनात मराठी च्या शिक्षकांनी मनापासून उत्तमरीत्या सादरीकरण करून शिकविल्या मुळे इतक्या वर्षांनंतरही ती मनात तशीच झालेली आहे.. अजूनही कविता ऐकताना डोळे भरून येतातच..

    • @sharadpipare1272
      @sharadpipare1272 ปีที่แล้ว

      सर जी कृपा करून आपण आई ही कविता एे कवावी

    • @prasadchitale6589
      @prasadchitale6589 ปีที่แล้ว

      बाळ जातो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून ही कविता उपलब्ध झाल्यास कृपया गाण्याचा प्रयत्न करावा

  • @tatyarindhe3574
    @tatyarindhe3574 4 หลายเดือนก่อน

    फार सुंदर कविता सादर केली आभारी आहे

  • @asha212
    @asha212 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर गाईली कविता