Vidushi Shobha Gurtu l Interview l विदुषी शोभा गुर्टू l संगीत पत्रिका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024
- Vidushi Shobha Gurtu
संगीत पत्रिका : उपशास्त्रिय, सुगम संगीत, नाट्य संगीत, पार्श्वगायिका. उपशास्त्रीय संगीत सम्राज्ञी शोभा गुर्टू.
अल्प परिचय:
सुश्री शोभा उर्फ भानुमती रमाकांत शिरोडकर : सौ. शोभा विश्वनाथ गुर्टू.
जन्म : बेळगाव
राज्य : कर्नाटक.
जयंती: 8 फेब्रुवारी 1925.
निधन: वरळी मुंबई. राज्य महाराष्ट्र.
पुण्यतिथी : 27 सप्टेंबर 2004.
निवास : बेळगाव , कोल्हापूर,
मुंबईत- गिरगाव, वरळी.
मातोश्री : संगीत सम्राट अल्लादिया खाँ यांच्या शिष्योत्तम, गायिका नृत्यांगना. मेनकाताई रमाकांत शिरोडकर.
पिताश्री : रमाकांत शिरोडकर उद्योजक.
पती-विश्वनाथ नारायणनाथ गुर्टू.
श्वसुर: सुप्रसिद्ध सतार वादक पंडित नारायणनाथ गुर्टू.
सुपुत्र : त्रिलोक गुर्टू, नरेंद्र गुर्टू, रवी गुर्टू.,
स्नुषा: प्रिया नरेंद्र गुर्टू.
गुरू : मेनकाताई शिरोडकर.उस्ताद भुर्जी खाँ, उस्ताद नत्थन खाँ. उस्ताद घम्मन खाँ, आदर्श बेगम अख्तर, बडे गुलाम अली खाँ, मास्टर दीनानाथ गणेश मंगेशकर. बेगम अख्तर त्यांना शारदा म्हणायच्या तर अल्लादिया खाँ बेबी म्हणायचे. मराठी पार्श्वगायन : चित्रपट : धन्य ते संताजी धनाजी.
संगीत : वसंत देसाई.
गीत: पाहुनी प्यार भरी मुस्कान, तुझ्यावर जान करीन कुर्बान. चित्रपट : कलावंतीण. संगीत: राम कदम. गीत : दरबार जुना ह्यो, पिकल्या पानांचा देठ बाई हिरवा.आणि इतर. मराठी, हिंदीत: संगीतकार दशरथ पुजारी, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे यांच्या आणि उपशास्त्रीय संगीताच्या अनेक आधूनिक ध्वनिमुद्रिका.हिंदी पार्श्वगायन चित्रपट : पाकिझा, फागून, मै तुलसी तेरे आंगन की, प्रहार आणि इतर, पुरस्कार : संगीत नाटक अकादमी, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राजश्री शाहू महाराज पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार आणि इतर . आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्वोच्च श्रेणीच्या मान्यता प्राप्त कलाकार. देश विदेशात अनंत संगीत मैफली.