लातूर जिल्हा पाणीटंचाई : भाग 2 - दापकातांडा, लामजना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • लातूर जिल्हा पाणी टंचाई
    हा रिपोर्ट लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आहे. प्रत्यक्ष त्या त्या गावात जावून तिथली खरी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. हे रिपार्ट काही भागात पुढेही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाचीही बाजू न घेता नेमकी झळ कोणाला बसते आहे, हे लोकांसमोर आणणे हा या हामागील हेतू आहे.
    पाणीटंचाईची माहिती घेताना एक बाब प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे समाजातील तळागाळातील, गोरगरीब व मोलमजूरी करणारे यामध्ये जास्त भरडले जात आहेत. उर्वरित लोक बाटलीबंद पाणी विकत घेवून आपली गरज भागवतात. पाणीटंचाईला पाण्याची कमी उपलब्धता हे असे एक कारण आहे. पण ते काही एकमेव कारण नाही.
    अयोग्य पीक पद्धती, पाण्याचे असमान वाटप, सिंचनासारख्या महत्वाच्या विषयाचे राज्यकर्त्यांना नसलेले गांभीर्य, परिणामी जलव्यवस्थापनाचा अभाव ही कारणेही जोडीला आहेत. यावर सर्वांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
    #latur #water #waterscarcity

ความคิดเห็น • 4