SHORT NEWS 20 | बहिणी आल्या मात्र मुख्यमंत्री आलेच नाहीत..! दोन उपमुख्यमंत्र्यांनी मैदान मारले...!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde
    Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
    सोलापुरात होम मैदानावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जंगी कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नीटनेटके नियोजन आणि सर्व यंत्रणांचा योग्य समन्वय यामुळे दोनही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण असणारे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेच नाही. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर ते येणार नाहीत अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. आणि कार्यक्रमांमध्ये काहीशी मरगळ आली. सुमारे 400 ते 450 बसेस मधून आलेल्या सुमारे 40 हजार लाडक्या बहिणी समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती सरकारने आजवर केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखविला. देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. नवीन कोणतीही घोषणा न करता अजितदादांनी आजवर काय काय केले हे सांगितले. त्यामुळे हजारो लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार आहे अशी जाहिरात बाजी केली असली तरीही मुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनीच मैदान मारले आणि महायुती सरकारला निवडून द्या असेच एक प्रकारे आवाहन केले.
    सोलापुरातील कार्यक्रम स्थळी विविध गावातून येण्या जाण्यासाठी एसटीतून महिलांची सोय केल्यामुळे कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रम संपल्यानंतर शहरातील चौका चौकात गर्दीच गर्दी... एसटीच्या लागल्या भल्या मोठ्या रांगा
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात झाले होते नऊ वाजता आगमन तर अजित पवार आले बारा वाजता.. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिमतीसाठी आली होती दोन विमाने
    उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादांच्या हस्ते करण्यात आला जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा सत्कार.. अजितदादा म्हणाले कलेक्टर साहेब, तुमची उंची नेमकी सहा फुटकी सात फूट उपस्थितांमध्ये फुटले हास्याचे धुमारे
    माढा मतदारसंघासाठी मोठी राजकीय उलथा पालथ होणार.. ज्या अभिजीत पाटलांच्या कारखान्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेतीनशे कोटी रुपये कर्ज दिले ते अभिजीत पाटील शरद पवार गटाच्या मुलाखतीसाठी पुण्यात हजर
    सोलापुरात नवरात्र निमित्त पार पडले डंकापूजन
    धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातील जाळ्यावरून उड्या मारल्या, जोरदार घोषणाबाजी; आंदोलक आक्रमक
    नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा पार; ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री, फारुख अब्दुल्लांनी दिली माहिती
    कुस्तीपटू विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा केला पराभव
    महाराष्ट्रात येत्या दोन-चार दिवसात आचारसंहिता लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज
    मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून सरकारने १५०० देऊन घरी बसवली; उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला
    मराठी कलाकारांचं मुंबईतील घराचं स्वप्न साकार... गौरव मोरे, शिव ठाकरे, गौतमी देशपांडे आणि निखिल बनेला म्हाडाच्या घरांची लागली लॉटरी
    देवेंद्र फडणवीस यांनी युतीसाठी सतत फोन केलेत, मात्र उध्दव ठाकरेंनीच चर्चेची सगळी दारं बंद केली; रामदास कदम यांची प्रतिक्रिया
    आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, काँग्रेसकडून शिक्कामोर्तब
    नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात गेलेल्यांवर काळाचा घाला; बस आणि कारच्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू
    बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणचे बारामतीमधील मोढवे गावात 200 किलोचा हार आणि फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी केले जोरदार स्वागत
    भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली शंका
    रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राडा, उदय सामंतांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
    शेतकर्‍यांसाठी देशातील सर्वात मोठ्या सोलर जनरेशन योजनेचा नागपुरात झाला शुभारंभ; ५ हजारांहून अधिक जास्त नवे रोजगार निर्माण
    यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    DailyHunt News:- m.dailyhunt.in...
    Twitter:- / yesnewsmarathi
    Shivaji Survase 9881748329
    ★Contact us★
    Mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    ★★★Watch our channel's popular playlists★★★
    Social News:
    • Social News
    TOP 20:
    • TOP 20
    Crime News:
    • Crime News
    Headlines:
    • Headlines
    Ads:
    • Ads
    Special Stories:
    • Special Stories
    Political News:
    • Political News
    Sports:
    • Sports
    PRESS:
    • PRESS
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

ความคิดเห็น • 3