Navika Re Vara Vahe Re with lyrics | नाविक रे वारा वाहे रे | Suman Kalyanpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 384

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 2 ปีที่แล้ว +196

    वाटते शेवटचा श्वास घेताना सुमन कल्याणपूरकर यांचे हे गीत ऐकून प्राण सोडावा, एवढे हळुवार आणि गोड आवाजात सुमन जी यांनी गायले आहे 🥺

  • @pra_yoga108
    @pra_yoga108 3 ปีที่แล้ว +168

    भविष्याच्या काळजीने सतत धावू पाहणाऱ्या मनाला एक आल्हाददायक स्थिरता देणारे मंजुळ गीत आणि स्थिरतेने भरलेला तसाच शांत आवाज..❤️

    • @thex867
      @thex867 3 ปีที่แล้ว +4

      Absolutely.

    • @anushreeagashe7527
      @anushreeagashe7527 2 ปีที่แล้ว +2

      100%✓

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 ปีที่แล้ว +4

      Yes ,असे वाटते शेवटचा श्वास घेताना सुमन कल्याणपूरकर यांचे हे गीत ऐकून प्राण सोडावा, एवढे हळुवार आणि गोड आवाजात सुमन जी यांनी गायले आहे 🥺

    • @aniketudade4682
      @aniketudade4682 2 ปีที่แล้ว +2

      अगदी मनातल बोललास मित्रा.

    • @mukundbharote3641
      @mukundbharote3641 2 ปีที่แล้ว +1

      Akdam barobar

  • @manikjoshi5899
    @manikjoshi5899 3 ปีที่แล้ว +34

    आपण नावेत बसून जणू जलप्रवास करतो आहे असे भासते.अतिशय शांत आणि गोड स्वरातील हे गाणे म्हणजे देहभान विसरायला लावते.इतके माझे प्रिय आहे.

  • @dipalishinde2575
    @dipalishinde2575 ปีที่แล้ว +17

    समुद्राच्या लाटा प्रमाणे, स्वर मागे पुढे लयीत हेलकावे घेत आहे,तर कधी वाऱ्या प्रमाणे गिरक्या घेत आहे असे खुप सुरेख सुमधुर वाटतात ऐकल्यावर. 👌🏻👌🏻👌🏻

  • @Nik_n005
    @Nik_n005 ปีที่แล้ว +13

    लता मंगेशकर यांनी सुमन कल्याणपूर ह्यांच्या आवाजात इतके साम्य आहे की कोणाला न ओळखता येण्यासारखा

  • @laxmanpawar2620
    @laxmanpawar2620 3 ปีที่แล้ว +21

    तिन्हीसांजेला ऐकत बसण्यासारखी गाणी आहेत..
    सुमन कल्याणपूर चा स्पष्ट आवाज आहे

  • @abhaydate26
    @abhaydate26 4 ปีที่แล้ว +94

    जीव ओवाळून टाकावासा वाटतो ह्या गाण्यावर, प्रत्येक शब्द किती स्पष्टपणे ऐकु येतोय, सुरांना ना शब्दाचं ओझं नी शब्दांना सुरांचं

    • @anandjagirdar3251
      @anandjagirdar3251 4 ปีที่แล้ว +4

      अशोकजी परांजपे याचे शब्द आणि अशोक पत्की यांचं संगीत ग्रेट

    • @vasudhak7892
      @vasudhak7892 4 ปีที่แล้ว

      @@anandjagirdar3251 pno

    • @abhishekjadhav7508
      @abhishekjadhav7508 3 ปีที่แล้ว

      ❤️👍👍🙏😇🙏☺️

    • @rashmivengurlekar3574
      @rashmivengurlekar3574 3 ปีที่แล้ว

      Ho kharach

    • @rahul8auti
      @rahul8auti 3 ปีที่แล้ว

      खरंय

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 4 ปีที่แล้ว +46

    सूमन ताईंचा आवाज खूपच छान आहे 🙂🙏

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 ปีที่แล้ว +37

    सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे ..!! किती सुंदर अर्थपूर्ण शब्द रचना , वर सुंदर आवाज आणि मस्त संगीत..सारे केवळ अप्रतिम ...!!

    • @rohitgangurde7159
      @rohitgangurde7159 ปีที่แล้ว +1

      मी तर रोज देवाला सांगतो आरे सत्य युग जन्माला आनं

  • @doctor1966
    @doctor1966 2 ปีที่แล้ว +35

    सुमन कल्याणपूर एक पडद्याआड राहून, कोणत्याही प्रसिद्धीची हव्यास नसणारी गायिका आहे.

  • @blkkobra
    @blkkobra 4 ปีที่แล้ว +27

    दुःखाची बाब अशी की बहुतांशी स्त्रियांनी गायलेली गाणी हि लता मंगेशकरांनी म्हंटली आहेत असाच बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे.

    • @hanmantbhosale997
      @hanmantbhosale997 4 ปีที่แล้ว

      आई घाल्या जळल्या गांडीच्या

    • @anushreeagashe7527
      @anushreeagashe7527 5 หลายเดือนก่อน

      Kharay.. mala pan atta kalale ki suman kalyanpur yani gani gayli ahet ji mala khup avadtat..khup surel awaj

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 4 ปีที่แล้ว +52

    हा आवाज मनमोहक आणि हृदयास भिडणारा आहे. गाणे ही अप्रतिम आहे. अप्रतिम संगीत. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 ปีที่แล้ว +16

    1974 साली पहिल्यांदा ऐकलेले हे सुमनताईंचे हे गाणे जेवढी मधुर चाल तेवढाच मधाळ आवाज आजही तेवढेच अल्हादायक आहे
    अशोक पत्की व सुमन कल्याणपुर या दिग्गज कलावंतांना सलाम

  • @sariputtnikam5759
    @sariputtnikam5759 4 ปีที่แล้ว +102

    फारच आवडीचे गोड व शांत गाणे आहे व अप्रतिम निसर्ग व मनातील भावनांची काव्यरचना आहे...हे गाणे अनेक वेळा एकाग्रतेने ऐकले की त्याचे पैलु समजायला लागतात...नविन पिढीने अशाप्रकारच्या गाण्यांची आवड असून देणे गरजेचे आहे...

    • @sandhyakedare4926
      @sandhyakedare4926 3 ปีที่แล้ว +1

      फारचं छान अणि गोड गाणे आहे मनाला मोहून जाते धन्यवाद ताई

    • @rajendarparab4632
      @rajendarparab4632 3 ปีที่แล้ว

      👍👍👍👍

    • @dhanrajmule8301
      @dhanrajmule8301 3 ปีที่แล้ว

      0pppppp

    • @sunsndajanbandhu2389
      @sunsndajanbandhu2389 2 ปีที่แล้ว

      @@sandhyakedare4926 p⁰⁰

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 ปีที่แล้ว +18

    🥀आषाढाचे दिसं गेले
    श्रावणाचा मास सरे
    भादवा आला
    माझा राऊ
    मनामंदी बोलूनी गेला
    आषाढाचे दिसं गेले
    श्रावणाचा मास सरे
    भादवा आला
    माझा राऊ
    मनामंदी बोलूनी गेला
    धाव घेई बघ माझे मन
    नाही त्याला ठाव रे ......
    नावीका रे...... वारा वाहे रे
    डौलाने हाक जरा आज नाव रे 🥀

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 2 ปีที่แล้ว +46

    I recalled my childhood days when while getting ready for school this song used to be heard on radio Bombay B Station, I can smell the Gwar Aloo Sabzi getting cooked by my mom and I am getting ready for afternoon shift School.

    • @deepak11387
      @deepak11387 ปีที่แล้ว +1

      हे खरंय, ह्रदयात वसलेली गाणी पुन्हा ऐकताना आपण त्यावेळी असलेल्या भावविश्वात रमतो आणि ते सुगंध ही अनुभवतो.👍🙏

    • @pratibhauppalwar2691
      @pratibhauppalwar2691 ปีที่แล้ว

      खूप खूप सुरेख ❤

    • @kadambarm9723
      @kadambarm9723 4 หลายเดือนก่อน

      Same thing here to me👍👌😀🩷

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 4 ปีที่แล้ว +21

    सुंदर सुंदर आणि दुर्मिळ असे हे गीत आहे
    खूप छान आहे जुने दिवस डोळ्या .समोर
    दिसतात.काय बोलू
    खूप छान आहे हे गाणे मला अतिशय
    आवडते.

    • @mystic1954
      @mystic1954 2 ปีที่แล้ว

      Mi jogging park la gelo asta tithe aka vruddh kakachya mobile mdhe vajat hot shabd dhyanat rahile,ghari Yeun search kele Ani kay asa Anand Ani kal punha yene nai,just jeevan jagat ahe pn tyatla Sur harlavlyasarkha

  • @satishmangale3274
    @satishmangale3274 6 หลายเดือนก่อน +5

    मी एकटाच असतो तेव्हा अशी अर्थपूर्ण गाणी सुमनताई ची येईकत बसतो. मग मन शांत होते व जुन्या आठवणी जाग्या होतात

  • @santoshpurohit9428
    @santoshpurohit9428 5 ปีที่แล้ว +67

    90 च्या दशकातील व त्या मागील संगीत नव्या पिढीला ऐकवण्याची गरज आहे अप्रतिम संगीत

    • @blkkobra
      @blkkobra 4 ปีที่แล้ว +5

      मला वाटत कि हिंदी म्हणा वा मराठी गाणी म्हणा १९७० च्या अगोदरची गाणी हि गाणी म्हणण्याच्या लायकीची आहेत बाकी सगळी थिल्लरगिरी काही अपवाद वगळता

  • @manasipawar1976
    @manasipawar1976 3 ปีที่แล้ว +12

    अशी गाणी ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.... किती श्रवणीय.... बालपणी ऐकलेली गाणी.....

  • @anjalipawar7255
    @anjalipawar7255 4 ปีที่แล้ว +61

    सकाळ सुंदर करणारी गाणीं 🤗

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 4 ปีที่แล้ว +1

      Khare aahe man bharun
      Yete

    • @pareshshaha8330
      @pareshshaha8330 3 ปีที่แล้ว

      आयुष्य सुंदर करणारी गाणी

  • @shripaddhopate2475
    @shripaddhopate2475 3 ปีที่แล้ว +42

    I am from new generation but still I thought that these songs are far better than new songs . This song is sooo soothing It refresh my mind everytimes😌 ❤

    • @vikrantmahalle1753
      @vikrantmahalle1753 3 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @bhalchandram9638
      @bhalchandram9638 3 ปีที่แล้ว

      Hoo 🤗

    • @rajendrakulkarni1027
      @rajendrakulkarni1027 3 ปีที่แล้ว +1

      It shows your classical interest in marathi bhavgeet and pure innocent voice of Sumantayi and the great music composer Mr. Ashok patki.
      You can listen many more songs comosed by Ashok Patki and sung by Sauman tayi🙏🙏🙏

    • @rajivjadhav5945
      @rajivjadhav5945 2 ปีที่แล้ว

      1972 साली जन्माला आलेले
      सदाबहार गीत धन्य ते प्रतिभावान संगीतकार पत्कीसाहेब आणि अभिजात गोड गळ्याच्या सुमन कल्याणपुर यांना त्रिवार सलाम.

  • @pallavimali7062
    @pallavimali7062 4 ปีที่แล้ว +53

    शाळेत वाचलेले आणि तिथेच पाठ झालेली कविता, आज अचानक चाल ओठावर आली म्हणून एकले खूपच सुंदर गायले 🎉👍

  • @rajendramestry1668
    @rajendramestry1668 4 ปีที่แล้ว +9

    खुपचं सुंदर. पत्की काकाचे सुंदर संगीत. आणि सुमन ताईचा गोड आवाज. परांपजे काकाचे मोती सारखे शब्द.

  • @theorder1548
    @theorder1548 3 ปีที่แล้ว +8

    नैराश्यग्रस्त भावनाओसे बाहर आनेकेलिए सुमनजी को सुनना चाहिए 💐!

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 ปีที่แล้ว +5

    🥀नवा साजल्यायले मी
    गौरीवानी सजले मी
    चांदवाल्या ला
    माझा जीव उरामंदी
    फुलुनी आला
    नवा साजल्यायले मी
    गौरीवानी सजले मी
    चांदवाल्या ला
    माझा जीव
    उरामंदी फुलुनी आला
    नाचते रे बघ माझे मन
    संग त्याच्या भाव रे
    नावीका रे
    वारा वाहे रे
    डौलाने हाक जरा आज नाव रे 🥀

  • @pralhaddhotre8157
    @pralhaddhotre8157 2 หลายเดือนก่อน

    खुप छान सुमनताई मी आपले मंजुळ स्वरातले गीत ऐकले. धन्य झाले. तुमच्या मंजुळ आवाजाने हे गीत सतत गुणगुणत राहते. धन्यवाद ❤❤❤

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 4 ปีที่แล้ว +19

    गाणे ईतके सुंदर आहे. शांता शेळकेंची कविता, सुमन कल्याणपुरांचा आवाज अप्रतिम मैफल.

    • @meghachandorkar2611
      @meghachandorkar2611 4 ปีที่แล้ว +2

      हे गीत अशोक परांजपे यांचे आहे.

    • @vijayarajkarne1154
      @vijayarajkarne1154 3 ปีที่แล้ว

      Happy birthday

    • @prashantdeshpande1966
      @prashantdeshpande1966 3 ปีที่แล้ว +1

      कवी अशोकजी परांजपे
      संगीत अशोकजी पत्की
      गायीका सुमनजी कल्यापुर

    • @sanjivanikurhade1877
      @sanjivanikurhade1877 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏👍👍👍khup chan June divas aatevle .

    • @sanjivanikurhade1877
      @sanjivanikurhade1877 2 ปีที่แล้ว

      June divas aatevale .,.🙏🙏🙏🙏🙏

  • @snehalPatil-cb4dc
    @snehalPatil-cb4dc 6 หลายเดือนก่อน +1

    सुमन कल्याणपूर ताई या लता ताई च्या तोडीच्या गायिका होत्या परंतु काही लोकांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही परंतु खरे नाणं चमकल्या शिवाय राहत नाही हे मात्र खरे

  • @trishasambherao3410
    @trishasambherao3410 2 ปีที่แล้ว +5

    मन शांत करणारे सुंदर गाणे शुभ प्रभात श्री स्वामी समर्थ

  • @vijaymohite2274
    @vijaymohite2274 3 ปีที่แล้ว +4

    सुमनताई आपण खरच ग्रेट आहात यात शंका नाहीच, पण vinamrata, सोज्वळ पणा, आनि आपलेपणाची भावना फक्त तुमच्या गाण्यातून येते 🙏🙏

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 4 หลายเดือนก่อน +1

    गोड गळ्याच्या सुमनताई आणि अशोकजी यांचे संगीत, खूपच सुरेल गाणे 👍🏻👌🏻❤️

  • @bhushanghag9103
    @bhushanghag9103 5 ปีที่แล้ว +32

    माझा आवडता गाणं आहे
    अप्रतिम
    Tnx sa re ga ma marathi

  • @pankajubale9047
    @pankajubale9047 4 ปีที่แล้ว +7

    काय गोडवा आहे गाण्यामध्ये... वा

  • @aparnaagnihotri8250
    @aparnaagnihotri8250 6 หลายเดือนก่อน +1

    काय अप्रतिम गायले आहे हे गाणे सुमनताई कल्याणपूर यांनी! अगदी मधापेक्षाही गोड वाटते.

  • @theartistindiacompany7478
    @theartistindiacompany7478 3 ปีที่แล้ว +5

    बाहेर पाऊस सुरु असताना हे गाणं ऐकण्याची धुंदच वेगळी आहे

  • @RameshwariDavari
    @RameshwariDavari 5 หลายเดือนก่อน +1

    शाळेत असताना मनाला भावलेले गाणं मी म्हणायचे आज मित्राने कित्येक वर्षांनी आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा मन भरून आले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @nikipanchal4791
    @nikipanchal4791 4 ปีที่แล้ว +10

    खुप सुंदर गाणं आहे आणि गायिकेचा आवाज देखील खुप छान मंजुळ आहे

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 2 ปีที่แล้ว +1

    Sumantain chya aawajat shitlata namrta janvun yete... ..thanku tumi ivdi aapratim gani aamchyasathi gaylit...

  • @ganeshkumbhar6873
    @ganeshkumbhar6873 3 ปีที่แล้ว +4

    हे गीत खरंच मंत्रमुग्ध करणारं आहे. गाणं ऐकतानाच आपणही जणू त्या नावेत बसून सांजवेळेच्या वाऱ्यात कुठेतरी वाहत गेल्यासारखं वाटतं.
    नाविका रे, वारा वाहे रे,
    डौलाने हाक जरा आज नाव रे
    सांजवेळ झाली आता,
    पैल माझे गाव रे..
    निसर्गसुंदर श्रावण संपून भादव्यात पैलतीराला जाण्यासाठी तिचं मन आसुसलं आहे. त्या आर्त चालीमुळे गाण्यातील गोडवा वाढला आहे. अशोक पत्कींची सहजसुंदर चाल व संगीत लाभल्यामुळे हे गाणं फारच अप्रतिम झालं आहे.
    सुमन कल्याणपुरांनी इतक्या गोड आवाजात ते गायलं आहे की आपल्यासमोर ती तरुणी जशीच्या तशी उभी राहते. जणू खरोखरच नवा साज लेवून गौरीसारखी सजलेली लावण्यवती नावेत बसली आहे. ती नाविकाला डौलात नाव चालवण्याची सूचना करत आहे, असंच वाटतं. असं हे सुंदर गाणं कधी अलगदपणे स्वप्नातल्या नावेत नेऊन ठेवते ते कळतच नाही. त्यामुळेच हे गाणं सतत गुणगुणावंसं वाटतं.

    • @jmjm1772
      @jmjm1772 2 ปีที่แล้ว

      Marathi bhashevar Chan pakad ahe tumchi 👍

  • @vijayapatil7675
    @vijayapatil7675 ปีที่แล้ว

    लहान पणी हे गाणे 11 वाजता रेडिओवर ऐकू यायचे तेव्हा पासून हे गाणे कुठे तरी ह्रदयाला भिडे आज ही गाणे एकूण खूप छान वाटते

  • @Bodymission1
    @Bodymission1 5 หลายเดือนก่อน

    किती सुंदर आवाज आहे. अशी गाणी आणी अशी माणसं होणं पुन्हा नाही. वाह अप्रतिम ❤️

  • @sandeepshinde5756
    @sandeepshinde5756 2 ปีที่แล้ว +1

    शब्दच नाहीत....लहानपणापासून ऐकतोय आता वय ४२ आहे अजून तृप्ती नाही...किती सुंदर मखमली आवाज ❤️

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 ปีที่แล้ว +1

    मनात ह्रदयाच्या तारा छेडणारे निसर्गरम्य असे शांत, सुमधुर गीत असून कोकणातील निसर्ग सौंदर्य दाखवल्याने ते अजरामर झाले आहे.माझे हे सर्वात असे आवडते गीत असून मी वारंवार याचा आस्वाद घेत असतो.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड

  • @nikunj6070
    @nikunj6070 3 ปีที่แล้ว +2

    ham to new generation se he par ye saare gaane jab bhi suno....dil ko jod dete he....khudki sanskruti se rubaru kara dete he

  • @pramodkadam5018
    @pramodkadam5018 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम !!! सुमन ताई तुम्ही ग्रेट 👍

  • @nirmalanagle6232
    @nirmalanagle6232 3 ปีที่แล้ว +2

    खूब छान
    काबिले तारीफ,,,गाने
    स्वागत है आपका जी
    धन्यवाद जी आपको
    निर्मला नागले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍⚘⚘⚘

  • @sachindukhande6589
    @sachindukhande6589 4 ปีที่แล้ว +16

    पालकांनी हे सुवर्णयुग अनुभवलंय, पण मुलांना पण आवर्जून ऐकवायला हवं

  • @yaminidangare3560
    @yaminidangare3560 10 หลายเดือนก่อน +1

    असे गाणे पुनः होणे नाही .अप्रतिम .

  • @sushmachavat2265
    @sushmachavat2265 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय गोड आणि मधूर स्वर ,सुमनताई ....खूप आवडीचे गाणे आहे माझ्या ...खूप खूप धन्यवाद

  • @vikasjadhav4298
    @vikasjadhav4298 5 หลายเดือนก่อน

    मला हे गाने दिवसातून दोनदा तरी ऐकावेसे वाटते, किती मधुर संगीत, आणि आवाज आहे।

  • @theorder1548
    @theorder1548 3 ปีที่แล้ว +1

    सुमन कल्याणपुर जीके सारे गीत ह्रदयस्पर्शि भावस्पर्शी भी 👍!

  • @ramakantnerurkar8822
    @ramakantnerurkar8822 2 ปีที่แล้ว +1

    Sumantai Kalyanpur ek utkrusht gayika ani titkech uttam sangitkar Ashokji Patki

  • @shailendravarthe7265
    @shailendravarthe7265 3 ปีที่แล้ว +2

    सुमनजींची आर्त हाक .... अप्रतिम .

  • @dilipchimbate7585
    @dilipchimbate7585 ปีที่แล้ว

    हे गाणं ऐकताना लहानपणाची आठवण येते खूप सुंदर आणि मंजुळ आवाज आहे सुमन ताईंचा

  • @anilshelke6268
    @anilshelke6268 2 ปีที่แล้ว

    कितीही वेळा ऐका, गाणी खूपच प्रसन्नदायक.
    पार्श्व फोटो हे या संगतीस आणि तो जो मूड आहे, त्याला धरुन नाहीत, ते फोटो काँर्पोरेट पध्दतीचे आहेत, त्यात रस नाही.

  • @shalakhajoshi848
    @shalakhajoshi848 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आवाज खूप गोड आवाज ऐकत रहावी अशी गाणी सुमन ताई तुम्हांला खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sunilgobure
    @sunilgobure 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गीत, संगीत व गायन. बासरी खुद्द पं.हरीप्रसाद चौरसिया साहेबांची..!!

  • @prabhatraut6206
    @prabhatraut6206 ปีที่แล้ว

    आवडत्या गाण्या मधील एक...सुमन ताईंचा आवाज सुरेख

  • @vaishalivelapurkar1326
    @vaishalivelapurkar1326 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आवाज....किती वेळा ऐकले गाणे, तरी मन भरत नाही....

  • @kishorpatil2308
    @kishorpatil2308 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम अतिशय सुंदर आवाज सुपष्ट , अनमोल रत्न अशी संगीत रचना गाण्याचा वेग वेगळ्याच प्रकारात मोडणारी भेट घेण्यासाठी प्रेयसीच्या काळजाची धडपड ती ओढ प्रियकराच्या भेटीची , एका वेगळ्याच विश्वात घेऊन रमणारे सुरेख आणि सुंदर संगीत , खरच खूप खूप छान सुंदर गोड आहे , सर्व कलाकारांना आणि सहकारी यांना मनापासून प्रणाम, खुपच सुंदर कलाकृती निर्माण झाली असून मलाही खूप आवडली ,, धन्यवाद आणि शुभेच्छा ,,,

  • @kiranbhore1857
    @kiranbhore1857 10 หลายเดือนก่อน

    ❤ मनाला भुरळ घालणारा आवाज आणि काळजाला स्पर्श करणारं गाणं अप्रतिम ...❤❤❤❤❤

  • @savitakandalkar5300
    @savitakandalkar5300 5 ปีที่แล้ว +9

    Waw khupch sundar khup khup dhanywad. Mazya aavadiche gaane tar aahech.pn gaaika dekhil tevadhyach aavdichya aahet.dhanywad sumantai.salam tumachya aavajala.kiti swoft, kiti maadhury aahe tumachya aavajat.

    • @sanjeevborse2827
      @sanjeevborse2827 3 ปีที่แล้ว

      Sanjeev S Borse Wawa faracha sundar Aavajatla godva madhurya Aartrata Aani vaglya Vishyat Gheunjanarya FAKAT SUMAN KALYANPUR SAKSHAT SWAR SUR LAYA AANI AANI AKA GHUDH SUNDARVISHWAT NENARI SUNDAR BHUVANESHWARI DEVICH KAY KAY MAHANU NETI NETI SHABDHCH AAPRE PADTAT RADHAY SPANDINI AANI KAY MAHNU

  • @kunalshimpi3603
    @kunalshimpi3603 5 ปีที่แล้ว +21

    खुप छान!! अप्रतिम.. साक्षात सरस्वती गाणे गात आहे असा भास होतो...

  • @RajeshreeSawant-n1u
    @RajeshreeSawant-n1u 4 หลายเดือนก่อน

    नवा साजल्याले मी
    गौरीवानी सजले मी
    चांदवाल्याला ....
    माझा जीव उरा मंदे फुलूनी आला
    नाचते रे माझे मन संग त्याच्या भाव रे

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 4 หลายเดือนก่อน +1

    Beautiful lovely melody romantic song lajwab fantastic amazing wows singing

  • @nileshpardhe2319
    @nileshpardhe2319 หลายเดือนก่อน

    Near by "Ram kare Aisa ho jaye, Teri nidiya mohe mil jaye mai jaag tu so jaay..."great composed .

  • @MayaGarud-vi7hz
    @MayaGarud-vi7hz 4 หลายเดือนก่อน

    खुपसुंदर गीत आहे हे मन अगदी भरून आले माझे आवडते गीत अप्रतीम

  • @Libra6
    @Libra6 2 ปีที่แล้ว +1

    Latadidi, suman kalyanpuryasarkhe pratibhavant singers shatakatun ekadach janma ghetat. Doghina pranam, miss you latadidi.👈🙏

  • @vishalbiramane3259
    @vishalbiramane3259 4 ปีที่แล้ว +5

    वेगळ्या जगात गेल्याची अनुभूती..

  • @jagjitisher
    @jagjitisher 3 ปีที่แล้ว +10

    Wow replete with honey sweet melody, so beautifully sung by Suman ji.

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 ปีที่แล้ว

    Mast pasand aya apka song aur aap bhi sahyog ke liye thanks khush raho essi muskan acchi hai aur sun ne mile yahi prathana kar rahe hai 💐🎉 congratulations 🎉 thanks again 🙏❤

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख सुमधूर गायकी सूरेख प्रेम गीत 🙏💐

  • @tusharamrule8527
    @tusharamrule8527 3 ปีที่แล้ว +1

    खूप वेळा ऐकले, नेहमी ऐकावे वाटते, अप्रतिम गाणे, लहानपणापासून ऐकतोय, खूपच सुंदर..

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 3 ปีที่แล้ว +5

    Apratim Song by Suman Kalyanpur. What a lyrics, what voice quality, what a tranquility in the song. Hats off to Sumantai.

  • @prof.kuldeepwaidya8186
    @prof.kuldeepwaidya8186 3 ปีที่แล้ว +1

    Itke god gane eikyawar man itk prassan hot na ki kuthalyahi meditation chi garaj nahi....fakt khant ek ki itke sunder gane gayanarya gaikela pahije to sanman deshane dila nhi....pn we r all thanks to you suman ji..maza mulaga zoptana he gane daily eikato..very sweet song

  • @manishasonawane700
    @manishasonawane700 2 ปีที่แล้ว

    सुंदर अती सुंदर गाणे. काही तोड नाही या गाण्याला . मनाची स्थिरता ❤️❤️❤️❤️ शांतता अप्रतीम

  • @NiteenKulkarni
    @NiteenKulkarni 3 ปีที่แล้ว +4

    this composition will never get old, Suman Tai - deserves lot of respect

  • @spiderdhanu6352
    @spiderdhanu6352 6 หลายเดือนก่อน

    रचना विद्यालय, नाशिक येथे इयत्ता पाचवी शिकत असताना माझ्या वर्गातील कदाचित विना देशपांडे असे नाव असावे त्या मुलीने वर्गात हे गाणं गायले होते, त्यावेळी पहिल्यांदा हे गाणे ऐकले होते, आजही कधीकधी गुणगुणत असतो, खूपच छान 🎉

  • @anupamatalgeri666
    @anupamatalgeri666 3 ปีที่แล้ว +6

    It's so melodious. Even after hearing it so many times u like it to hear it again and again. So beautiful lyrics and tune and Suman Kalyanpurji has sung it so beautifully

    • @hrramprakashrao3057
      @hrramprakashrao3057 2 ปีที่แล้ว

      Mrs. Talageri be proud for belonging Chitrapur Saraswath Brahmin community. Though our community is too small, our people are there in every field. Thanks to God as I am born in same community.

    • @asmitashende2074
      @asmitashende2074 2 ปีที่แล้ว

      Actually
      More sweet than lata

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 3 ปีที่แล้ว +2

    Ashokji Paranjape yanche geet. Ashok Patkinche Music and Sumanjincha madhur swar va va great combination🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 ปีที่แล้ว

    खूप छान खूप छान मनाला भावलं
    आवाजात छान गोडवा आहे

    • @prashantgamre7979
      @prashantgamre7979 ปีที่แล้ว

      ना भूतो ना भविष्य ती. आणखी काहीं बोलू शकत नाही

  • @satishmore9384
    @satishmore9384 3 ปีที่แล้ว +2

    हिच खरी गाणी.... अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @rajchavhan97
    @rajchavhan97 4 ปีที่แล้ว +10

    This one song beats every song of 2020 best marathi song ever....😍😍😍

  • @virendrajaveri1569
    @virendrajaveri1569 4 ปีที่แล้ว +9

    I want to listen again and again.
    Sumanji tussi great ho.

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 11 หลายเดือนก่อน

    देवराया रे, लवकरी ये
    डौलात हाकण्या नाव माझी ये
    तुझी वाट वादळवाट, वन्हीचीही वाट
    अग्निशिखा तुझी कन्या तिचीही लाट
    तुझी वाट पाहते मी, लवकरी धाव
    अरे किती उशीर केला जगबुडी आण रे||१||
    तुला कसे विनवावे प्रार्थना कशी करू
    अति मानव चुक ती येथे शिक्षा त्यांना करू
    तूच कर सजा त्यांना शांततेत मग राहू
    अति तेथे माती होई सांग तूच रे ||२||
    तुझी डोलकाठी पृथ्वीचा आस
    असा कसा डळमळला मेरू नग आज
    तुला नाही का ऐकू आला ढोलताशांचा जल्लोश
    अचानक बाधित झाले पशू मानवी रे ||३||

  • @mayuripusadkar6588
    @mayuripusadkar6588 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर गाणं आहे आणि आवाज सुध्दा

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 4 ปีที่แล้ว +3

    कल्याणपुरकर ताई ची aart hak.🤔🙏

  • @Jacksparrow0212
    @Jacksparrow0212 2 ปีที่แล้ว +1

    Hya ganyat basri majhya gurujinni vajvli ahe. Lakshman kavte mama

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 2 ปีที่แล้ว

    पटतच नाही हे तर लताजींचे वाटते. सुमनजींना मुजरा

  • @kenjalgundecha5870
    @kenjalgundecha5870 3 ปีที่แล้ว +1

    Khhopach Chaan...Suman tai tumcha aawaz khoop sweet aahe!!!!

  • @jyotisangamnere5403
    @jyotisangamnere5403 8 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मुलीला गायनाचा क्लास लावला " वाट इथे स्वप्नातील" हे गाणे सराव करतांना नेहमी हे गाणे आधी ऐकते मग रियाज करते जेव्हा पहिल्यादी ऐकले तेव्हा मी या आवजाच्या प्रेमात पडले तेव्हा तिने " सुमन कल्याणपूर" यांच नाव सांगितले तेव्हापासून माझ्या घरात फक्त यांचेच गाणे ऐकायला येतात एवढेच नव्हे तर माझा 3.5 वर्षाचा मुलगा पण यांची गाणे गुणगुणत असतो खुप अप्रतिम आवाज आहे शब्दच नाहीत वर्णन करयला🙏🙏🙏

    • @raksheatul
      @raksheatul 2 หลายเดือนก่อน

      नशिबवान आहात

  • @jayshreesupekar7243
    @jayshreesupekar7243 5 ปีที่แล้ว +10

    Apratim gana that sumanji Cha Madhuri avaj .mast .

  • @Deepakchavan7495
    @Deepakchavan7495 2 ปีที่แล้ว +1

    हे गाणं मला पावसाची आठवणी करून देते , दारात बसून हे गाणं आयकायच खूप खूप छान आहे गाणं गावाची रानातील आठवण करून दिते,,,,,,

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 ปีที่แล้ว

    वेरी नाइस अनमोल वचन विचार भावगीत।।🙏🌷💐

  • @kirankulkarni7408
    @kirankulkarni7408 ปีที่แล้ว

    लाखो वेळा हे गाणे ऐकले पण अजून अजून अजून अजून . . . . . ऐकत रहावेसे वाटते. गाणे फार छोटे आहे असे वाटते.
    पुनः पुनः ऐकावेसे वाटते.

  • @sharmilykashyap8316
    @sharmilykashyap8316 4 ปีที่แล้ว +10

    Suman ji my fav
    She is too good rather great

  • @ranjanaadsul4153
    @ranjanaadsul4153 3 ปีที่แล้ว

    Adsul ravi.... Khoopach sunder game ,, ani sumantaicha awaaj janu gandharv swarg lokache ¡👌👌👌👌👌👌😌😌😌

  • @sanjayshendage8200
    @sanjayshendage8200 5 หลายเดือนก่อน

    अशी गाणी ऐकताना शब्दच सुचत नाहीत की किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे

  • @amitaprabhakar2152
    @amitaprabhakar2152 3 ปีที่แล้ว +6

    Beautiful song and Suman ji sang it so sweetly .