Dr.Shrimant Kokate - गौतम बुद्ध म्हणाले "मुलगी देखील वंशाचा दिवा आहे".

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 2

  • @dhammapalsarode7904
    @dhammapalsarode7904 3 ปีที่แล้ว +1

    🤱 आज जागतिक कन्या दिन आहे. भारतात व एकूणच आशिया खंडात ज्या महान प्रज्ञावान व्यक्तीचा प्रभाव आहे असे तथागत गौतम बुद्ध हे मुलगा व मुलगी यांत भेदभाव करत नसत. वाचा हि सुंदर बुद्ध कथा...
    ● एकदा गौतम बुद्धांची श्रावस्ती मध्ये भिक्खू संघ व अनुयायांसोबत धम्मसभा सुरू होती. यावेळी कोसल देशाचा राजा प्रसेनजीत हा देखील उपस्थित होता.
    ● झाले असे की धम्मसभा सुरू असतानाच राजा प्रसेनजीतचा एक सेवक आला आणि राजाच्या कानात काहीतरी पुटपूटू लागला. क्षणार्धात राजाचा चेहरा पडला व तो दुःखी झाला.
    ● गौतम बुद्धांचे सर्वांवरच बारीक लक्ष होते. तथागतांनी ओळखले की प्रसेनजीत राजाला असे काहीतरी समजले की तो दुःखाच्या सागरात बुडाला आहे. तथागतांना ती गोष्ट आत्मज्ञानाने माहीत ही झाली होती.
    ● पण बुद्धांना ती गोष्ट राजाचाच तोंडून ऐकायची होती व एकूणच धम्मसभेतील सर्वांना ते समजावे असे बुद्धांना वाटत होते. कारण गौतम बुद्ध आता खूप मोठा संदेश देण्याच्या तयारीत होते.
    ● बुद्धांनी राजा प्रसेनजीतला विचारले, महाराज तुमच्या निराशेबद्दल समजू शकेल काय? तुमच्या सेवकाने तुमच्या कानात नक्की काय सांगितले?
    ● राजा प्रसेनजीत म्हणाला, तथागत! मला मुलगी झाली, महाराणी मल्लिका हि गर्भवती होती. मला मुलगा होईल असे वाटत होते व तशी स्वप्नेही रंगवून ठेवली होती. पण मुलगी झाल्याने मला फार दुःख झाले आहे.
    ● गौतम बुद्धांनी राजाच्या मनाची घालमेल ओळखली व वेगवेगळ्या उदाहरणांसह आपला संदेश देण्यास सुरुवात केली.
    ● बुद्धांनी राजाला विचारले, महाराज मला एक सांगा की मनुष्य जातीची उत्पत्ती कोणापासून होते? तुम्हाला जन्म देणारी कोण आहे? स्त्री की झाडे, फुले?
    ● प्रसेनजीत म्हणाला, महाराज हे तर सर्वांनाच माहीत आहे की निसर्ग नियमानुसार प्रत्येकाचा जन्म स्त्री देते. व मला देखील माझ्या आईने म्हणजेच एका स्त्री ने जन्म दिला आहे.
    ● तथागत स्मित हास्य करत पुढे म्हणतात, महाराज तुम्ही स्वतः मान्य करत आहात की मनुष्यजातीची उत्पत्ती स्त्री करते, आपणासही एका स्त्रीनेच जन्म दिला. महाराणी मल्लिकाने ज्या जीवास जन्म दिला आहे हि घटना निसर्गाची अनमोल गोष्ट आहे.
    ● महाराज विचार करा की महाराणी मल्लिकाने ज्या बालिकेला जन्म दिला आहे ती उद्या मोठी स्त्री होईल व संतोत्पती करून हि सृष्टी चालवेल.
    ● महाराज, हे होऊ शकते की ती बालिका पुत्रापेक्षाही आईवडिलांना चांगला मानसन्मान देईल. त्यांचा सांभाळ करेल.
    ● बुद्ध पुढे म्हणतात, महाराज तुम्ही कोसल देशाचे प्रिय सम्राट आहात, बुद्धिवंत आहात, शीलवान आहात, एक हुशार शासक आहात. मग पुरुष व स्त्रियांमध्ये भेदभाव कशासाठी करता?
    ● तुमची बालिका मोठी झाल्यानंतर ज्या पुत्राला जन्म देईल कदाचित तिचा पुत्र एखाद्या देशाचा चक्रवर्ती बनू शकतो, मोठे राज्य चालवू शकतो. जर स्त्रीचा जन्मच होऊ देणार नसू तर आपणासारखे महान मनुष्य कसे जन्माला येतील.
    ● निसर्ग हा पुरुष व स्त्रियांना समान लेखतो. निसर्गाने दिलेल्या असंख्य गोष्टींचा आस्वाद दोघेही समान घेऊ शकतात. मग निसर्ग जर त्यांच्यात भेदभाव करत नाही तर आपण का करता आहात?
    ● हे ऐकून राजा प्रसेनजीतच्या चेहऱ्यावर आनंदाचा रंग चढला. त्याला बुद्धांची वाणी मनोमन पटली. उपस्थित सर्वच अनुयायांच्या चेहऱ्यावरदेखील तेज उत्पन्न झाले.
    ● राजा प्रसेनजीतने सेवकाला बोलावले व आपल्या देशात मुलीच्या जन्मानिमित्त मोठे सोहळे, गोर-गरिबांना भोजनदान, तसेच इतर कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला. व बुध्दांचा आशीर्वाद घेऊन राजा प्रसेनजीत आनंदाने तेथून महाराणी मल्लिकाला व आपल्या बालिकेला भेटायला निघाला.

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 ปีที่แล้ว

    Hi mahiti kontya book maddhye ahe?
    Book che naav kai?