राज ठाकरे यांच्या या व्हिडीओतून काहीतरी शिका|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून अनेक लोकांनी आपापली मते मांडली आहेत. राजकारण पण जोरात सुरू आहे. या सगळ्यात, मला आवडलेली प्रतिक्रिया ही :
    "पुतळे, स्मारकं ही आपल्यासाठी फक्त राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की महाराजांचं खरं स्मारक, हा कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड-किल्ले हेच आहेत..
    प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो!!"
    - राज ठाकरे
    _________________
    माझं मत पण फार वेगळं नाही :
    'पुतळा' ही पण एक कलाकृतीच असली तरी त्याला एखादं 'स्मारक' म्हणूनच पाहिले जाते, जे योग्यच आहे. हल्ली गावोगावी आणि गल्लोगल्ली लहान-मोठे पुतळे बसविले जातात, त्यांची फुल्ल झोकात डीजे-बीजे लावून आणि राजकीय कार्यक्रम घेऊन 'स्थापना' होते. याला कमीजास्त प्रमाणात सगळेच पक्ष जबाबदार आहेत. अनेकदा याच पुतळ्यांवरून मग भांडणे, मारामाऱ्या, जाळपोळ, कायदा व व्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होतात आणि काही जातीवादी राजकीय पक्ष व त्यांचे विकृत नेते समाजस्वास्थ्यच बिघडवून टाकण्यासाठी अशा पुतळ्यांना टार्गेट करतात.
    मला तर नेहमी प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांचा 'पुतळा' का? 'आराध्यदैवत', 'तेरावे ज्योतिर्लिंग' वगैरे म्हणायचं आणि 'पुतळा'? हिंदवी स्वराज्य स्थापन करून जी असामान्य कामगिरी, जो अद‍्भुत पराक्रम, जे विलक्षण कार्य महाराजांनी केले, त्याचे प्रतीक हे सोम्या-गोम्यांचे असतात तसे 'पुतळे' कसे असतील? अरे देऊळ बांधा, त्यात मूर्तीची बसवा! पुतळा म्हणजे स्मारक, तर 'मूर्ती' हे एक अधिष्ठान असते. पुतळा हा स्मरणीय असतो, तर मूर्ती ही पूजनीय असते! त्यामुळे इकडे-तिकडे पुतळे उभे करून सुरू असलेलं प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे, या राज ठाकरेंच्या मताशी तर मी 100% सहमत आहेच. पण, त्याही पुढे जाऊन मी तर म्हणतो की विधानसभेत एक कायदाच बनवून.. महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांना 'हिंदूंची मंदिरे' असे घोषित करून त्यातील प्रमुख गडांवर महाराजांची 'मूर्ती' असावी. या आमच्या मंदिरांमध्ये मग कोणतीही फालतू अतिक्रमणे, थडगी, बेकायदेशीर वस्त्या वगैरे असतील, तर ते सगळं बुलडोझर लावून जमीनदोस्त करून टाकावे.
    तसं तर अख्ख्या हिंदुस्थानाचाच सातबारा महाराजांच्या नावावर आहे, पण किमान गडकिल्ल्यांवरून जरी आपण 'घाण' काढून टाकली तरी ती महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय शिवराय!
    - वेद कुमार
    #viralvideo
    #inviralvideo
    #rajthakre
    #raj thakre live
    #raj thakre sabha,
    #raj thakre speech
    #raj thakare,
    #raj thakre bhashan,
    aaj tak videos,
    raj thakre live sabha,
    #raj thakre live today,
    raj thakre full speech,
    #raj thackeray rally, video,
    marathi batmya video,
    raj thakeray ganpati,
    #raj thackeray, thugesh videos,
    trending video,
    raj thackeray bolbhidu
    #, sushma andhare on raj thackeray,
    #raj thackeray pune visit,
    raj thackeray interview, raj thackeray vasant more

ความคิดเห็น • 391

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 12 วันที่ผ่านมา +16

    राजसाहेब खरंच चांगले विचारवंत, दूर दृष्टी असलेले नेते आहेत, पण वारंवार भूमिका बदलणे ही त्यांची कमजोरी आहे.

    • @DipakRajput-x7j
      @DipakRajput-x7j 10 วันที่ผ่านมา +1

      Bhau sattet yenya sati Kahi tari karav lagel na aani bjp sobhat jatil tar chagali ghost aahe
      .

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 12 วันที่ผ่านมา +9

    राजसाहेब एक व्यक्ती नसून ती एक फार मोठी शक्ती आहे. ग्रेट राजसाहेब. 💪✌️✌️

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 11 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद राजसाहेब आपल्या विचारांबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🌹🙏🙏

  • @omkar0071
    @omkar0071 13 วันที่ผ่านมา +15

    ते राज ठाकरे होते❤❤.... मनसे स्थापन झाली तेव्हा अपेक्षा होती....आता फक्त आठवण राहिली....
    जिथे अमित शाह ची भेट घेतली तेव्हा संपल सगळं 🙏

  • @nageshbandekar6174
    @nageshbandekar6174 19 วันที่ผ่านมา +68

    अप्रतिम फारच छान माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण धन्यवाद ❤

  • @madanbaswat2944
    @madanbaswat2944 12 วันที่ผ่านมา +2

    आता फक्त राज साहेब ठाकरे

  • @shivabhong3432
    @shivabhong3432 17 วันที่ผ่านมา +51

    1अभ्यासू वक्ती आहेत राज ठाकरे ❤

  • @dnyaneshwarkoli2857
    @dnyaneshwarkoli2857 14 วันที่ผ่านมา +2

    खरंच खूपच छान ❤

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 11 วันที่ผ่านมา +1

    काय हरकत आहे एकदा राज साहेबाना साथ द्यायला , फक्त एकदा साथ द्या तुम्हाला तुमच्या मताचे सार्थक झाल्याचे नक्कीच वाटेल, माझे मत राज साहेबाना❤❤❤

  • @sk-up6os
    @sk-up6os 12 วันที่ผ่านมา +2

    खरच साहेब तुमचे विचार किती छान आहे .मी नक्की प्रयत्न करीन असे वागण्याचा .🙏🏻

  • @damodargaikar2743
    @damodargaikar2743 17 วันที่ผ่านมา +29

    जिव्हाळा आहे, खूप सुंदर ब्लू प्रिंट 💐💐

  • @user-vq8og3mx4o
    @user-vq8og3mx4o 10 วันที่ผ่านมา +2

    एवढी छान विचार आणि प्लॅनिंग करणे खरच कठीण आहे का? जर ही व्यक्ती एवढा सगळा विचार करुन त्याची व्यवस्था कशा प्रकारे करावी हे ही सांगु शकते तर आपल्याला पण त्यांना पाठींबा देणे गरजेचे आहे. खरच आभारी आहोत Raj साहेब.

  • @sandeep.wanage
    @sandeep.wanage 12 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम माहिती..👍👍👍👍👍👍

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 12 วันที่ผ่านมา +2

    आजच्या या विधवनसाला आपणच जबाबदार आहोत, बिनडोक स्वार्थी लोकांना निवडून देतो.

  • @GajananVale
    @GajananVale 12 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे साहेब आसे विचार बारीक पनाने करनारे असा नेता हवा आहे साहेब देशाला मग देश घडू शकतो मला खुप छान वाटलं साहेब भावी मुख्यमंत्री तुम्हीच पाहीजे राज ठाकरे साहेब ❤❤❤❤जय महाराष्ट्र

  • @agitech8080
    @agitech8080 13 วันที่ผ่านมา +1

    Nice video sir... अस झाल पाहिजेत... आणखी मांगे जात आहे आपला महाराष्ट्र😢😢😢

  • @akashmore3860
    @akashmore3860 16 วันที่ผ่านมา +14

    खरच राज साहेबांची दूरदृष्टी अप्रतिम आहे एकदा साहेबांना संधी द्या

  • @sandeepthorvat6395
    @sandeepthorvat6395 15 วันที่ผ่านมา +4

    एकदा राजसाहेबांना लोकांनी संधी दिली पाहिजे आपण सर्वांनी..

  • @vinaypathre29
    @vinaypathre29 19 วันที่ผ่านมา +71

    डोळ्यात पाणी येईल असे विचार

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 19 วันที่ผ่านมา +44

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर कृपया एकदाच राज ठाकरेंना संधी देऊयात, या बाकीच्या लोकांसारखं महाराष्ट्राचं वाटोळं तरी करणार नाहीत एवढं नक्की 🙏🙏

  • @MachhindraPawar-vl8tz
    @MachhindraPawar-vl8tz 14 วันที่ผ่านมา +4

    Raj saheb tumhi ekada CM banave hi mazhi Tulajabhavhani matechya charani lakho lakho pratharana❤❤❤

  • @RajputVilas
    @RajputVilas 19 วันที่ผ่านมา +188

    जर खरंच लोकांना राज साहेब कळाले असते हे दिवस नसते महाराष्ट्र ला अजून पण वेळ गेली नाही एकदा सत्ता ध्या राज ठाकरेला बगा मग कसा जगला हेवा वाटेल तसा महाराष्ट्र दिसेल

    • @AjinkyaGavhadepatil96k
      @AjinkyaGavhadepatil96k 19 วันที่ผ่านมา +12

      बर ती सतरंजी उचला आता

    • @RajputVilas
      @RajputVilas 19 วันที่ผ่านมา +2

      हो दादा बर झालं सांगितलं

    • @sahilwagh8742
      @sahilwagh8742 17 วันที่ผ่านมา +1

      म्हणून तर मागे आहे आपण ​@@AjinkyaGavhadepatil96k

    • @sahilwagh8742
      @sahilwagh8742 17 วันที่ผ่านมา +9

      ​@@AjinkyaGavhadepatil96kमी पण मराठा आहे पण राज ठाकरे रोख ठोक बोलणारा नेता आहे एकदा निवडून तर त्या फक्त भोकु नका आज पर्यंत आपण ज्या ज्या लोकांना निवडून दिले काय केलं हो त्यांनी काही नाही मग एकदा बघा तरी मनसे ला निवडून द्या

    • @aaplamanusvm
      @aaplamanusvm  17 วันที่ผ่านมา +4

      @@RajputVilas विनंती सर्वांनी व्हिडियो जास्तीत जास्त शेअर करा

  • @ShivshankarRavat-i7r
    @ShivshankarRavat-i7r 15 วันที่ผ่านมา +3

    साहेब,माननीय बाळासाहेब असते तर...असा विचार येतो..
    परंतु इतर लोकांच्या सांगण्यावरून बाळासा हेबानी पुत्र प्रेम मनात ठेऊन तुम्हाला बाजूला ठेवले...
    राज साहेब तुम्ही साहेबाबरोबर होतात तर सगळे आपणास सॅल्यूट करत होते...
    आता मात्र आपली बडबड बडबड ही समुद्रावर टिटवी ओरडल्यासारकी होईल...
    आपली एक स्वतंत्र विचार संघटना तय्यार होने आवश्यक

  • @anilraovinchurkar3866
    @anilraovinchurkar3866 15 วันที่ผ่านมา +7

    जबरदस्त, राज साहेब, अति सुंदर व विचार करायला भाग पाडणारे भाषण, खणखणीत आवाज, आणि भविष्यातील महाराष्ट्र असाच असावा.

  • @user-de3wn8sk8w
    @user-de3wn8sk8w 19 วันที่ผ่านมา +27

    अप्रतिम छान माहिती जय महाराष्ट्र

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 11 วันที่ผ่านมา +1

    हा फक्त राजकिय भ्रष्टाचार आहे नागरिकानी काय करायच कायदा सुधारयला पाहीजे शहर स्वच्छ होणयासाठी तसा कायदा नाही कोणही कुठेही घाण करतोय राज ठाकरे साहेब तुमचा विचार नक्कीच सुधारक आहे धन्यवाद साहेब काही ऊद्ट नागरिक आहेत अशा लोकाना आपला विचार पटला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @user-fq8xe1zn4t
    @user-fq8xe1zn4t 17 วันที่ผ่านมา +4

    एकदा खरच ,,राज साहेबांनच्या हातात द्या हा महाराष्ट्र,

  • @ravirane2308
    @ravirane2308 14 วันที่ผ่านมา +1

    खूपच अभ्यासू आणि दूरदृष्टीकोण असणार व्यक्तिमत्व माननीय श्री राज ठाकरे साहेब खरोखरच महाराष्ट्रातल्या जनतेने एकदा साहेबांना संधी द्यायला हवी. खूपच छान ब्लूप्रिंट आहे जर या महाराष्ट्राच्या जनतेने साहेबांना संधी दिली तर ते त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही.❤ जय महाराष्ट्र.❤

  • @mangeshrautrao256
    @mangeshrautrao256 14 วันที่ผ่านมา +2

    ऐकायला खूप भारी वाटलं सत्यात अन्न हे आपल्यापासून सुरू करा

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j 16 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब खरच मन भरून आले तुम्हाला माझ्या वारकरी परिवार कडून सलाम

  • @manmathware2979
    @manmathware2979 14 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर ❤❤

  • @स्टूडेंटलाइफ
    @स्टूडेंटलाइफ 14 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤❤❤

  • @sunilshinde-fy8qn
    @sunilshinde-fy8qn 14 วันที่ผ่านมา +1

    Great राजसाहेब

  • @sunilborse9795
    @sunilborse9795 14 วันที่ผ่านมา +3

    आधी अतिक्रमण काढावे लागेल त्यातच अर्धे काम होईल गावात जास्त अतिक्रमण वाढत आहे

  • @ashishdeshpande9088
    @ashishdeshpande9088 14 วันที่ผ่านมา +9

    काय नेता आहे राव..
    खरंच मानलं या माणसाला हा माणूस खरच महाराष्ट्राचा मुखमंत्री झाला नाही तर आपली शोंकटिका आहे

  • @nathabhimraosawant1563
    @nathabhimraosawant1563 15 วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्राची अशी परिस्थिती बघून, मला सुद्धा सतत खूप दुःख होत असतं . माझ्याकडून नेहमी मी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आपला महाराष्ट्र आणि देश स्वच्छ आणि सुंदर कसा दिसेल याच्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे सगळ्यांनी प्रयत्न करावे. एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडावे. महाराष्ट्राची अशी दयनीय परिस्थिती बघून काळजात आग पडते. खरंच राज साहेब एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले राज नेते आहेत. स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र, जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @shyammanjrekar2902
    @shyammanjrekar2902 15 วันที่ผ่านมา +7

    फारच छान. असे घडले तर आपल्या सर्वांचं आणी पुढच्या पिढीचे आयुष्य सुखकर होईल.

  • @PurushottamMahure
    @PurushottamMahure 17 วันที่ผ่านมา +4

    रज साहेबाना मनाचा मुजरा 🌹🌹🌹👍👍👍🌹🌹🌹

  • @user-yp4yo5kj6y
    @user-yp4yo5kj6y 15 วันที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे सर्व नेता मंडळी बिल्डर्स ला हाथा खाली घेऊन प्रॉपर्टी आपल्या फॅमिली चा नावे किती तरी रूम आहे. कोहिनुर मिल ची जागा ही पण कुठल्या तरी नेत्याची आहे. तिकडे गोर गरीब लोकांन साठी झाले असते. माझ्या हाथा मध्ये सत्ता असती तर सर्वना नेता मंडळी यांना घरी बसवले असते

  • @jagrutichaudhari2083
    @jagrutichaudhari2083 15 วันที่ผ่านมา +7

    राज साहेब तुमच्या सारखे नेते लाभले तर महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशाचा कायापालट होईल .जय महाराष्ट्र🚩🚩

  • @PandurangKhandegal
    @PandurangKhandegal 15 วันที่ผ่านมา +6

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी माझ्या बाजूने शक्य तितके प्रयत्न करेन. जय महाराष्ट्र आणि सुंदर महाराष्ट्र

  • @anantashinge5392
    @anantashinge5392 13 วันที่ผ่านมา +1

    Raj Saheb... Aapalya Sarkhe Vyaktimatva hone, Milane Kathin ahe... Aamchya Bhavishachi Chinta gheta hich mothi Gosht ahe Aamchya Sathi 🚩🚩🌹🌹🙏🙏 Jai Maharashtra Jai MNS ✊✊🌹🌹🙏🙏

    • @vinayaksalunkhe1617
      @vinayaksalunkhe1617 12 วันที่ผ่านมา +1

      राजसाहेब आपण खरंच खुप सुंदर सौंदर्य शहराचे गावांचे स्मारक यांची प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ठेवता येवू शकते हे दाखवून दिले आहे.सुंदर आणि संपन्न महाराष्ट्र

  • @satishpsi799
    @satishpsi799 19 วันที่ผ่านมา +17

    एकदा सत्त्तेत आना राज साहेबांनी खूप गरज आहे आपल्या महाराष्ट्राला..खूप बदल घडून आणतील फक्त एक संधी द्या हीच वेळ आहे सगळ्यांना आजमावून बघितलं एक संधी साहेबाना द्या आपला महाराष्ट्र बदलेल

  • @vijaynikam7777
    @vijaynikam7777 18 วันที่ผ่านมา +4

    फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं करू शकते. आणि आपण यांना सतेत आणू शकतो.बघा विचार करा,विधानसभा,महानगरपालिका इलेक्शन च्या रूपाने संधी येत आहे चालून.

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 15 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरेंनी काय केलं... मुबई.साठी.. राजसाहेब शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र ला

  • @virajjoshi9316
    @virajjoshi9316 19 วันที่ผ่านมา +2

    The Veteran Voice & perfect meaning of Democracy..Leaders are always with us..🙏🙏🙏

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 19 วันที่ผ่านมา +29

    जय मनसे साहेब ❤️🔥

  • @santoshyashwantrao3395
    @santoshyashwantrao3395 13 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राच्या जनतेला राज साहेबां सारखा हिरा पारखता आला नाही हे संपूर्ण महाराष्ट्राचे दुर्दैव...

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 18 วันที่ผ่านมา +19

    सौंदर्याची कास धरणारी संस्कृति शालेय जीवनापासून रुजवली तर हे सर्व शक्य होईल.

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 15 วันที่ผ่านมา +5

    राजसाहेब आपली मनोकामना लवकर यशस्वी होवो. आणि महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफलाम होवो. हीच सदगुरू चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @shilpahajare6104
    @shilpahajare6104 16 วันที่ผ่านมา +3

    Kharach Raj sahebana sandhi devu

    • @aaplamanusvm
      @aaplamanusvm  16 วันที่ผ่านมา

      Video ज्यांना आवडला त्यानी जास्तीत जास्त शेअर करा

    • @aaplamanusvm
      @aaplamanusvm  16 วันที่ผ่านมา

      Video ज्यांना आवडला त्यानी जास्तीत जास्त शेअर करा

  • @vaishalisawant9805
    @vaishalisawant9805 14 วันที่ผ่านมา +1

    सर्व समस्याचे जनसंख्या विस्फोट हेच कारण आहे

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 14 วันที่ผ่านมา +1

    हा विडिओ जुना आहे खूप वर्षांपूर्वी पाहिला आहे. बिनशर्त पाठिंबा देण्यापूर्वी चा पण छान आहे आपल्या शहरा बद्दल प्रेम दर्शवणारा. धन्यवाद 🙏

  • @pranaygadge9905
    @pranaygadge9905 11 วันที่ผ่านมา

    काही मना पण राज साहेब महाराष्ट्राच्या हिताच खुप बघतात...❤

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 17 วันที่ผ่านมา +21

    राज साहेबांना एक वेळ सत्ता द्या,नक्कीच महाराष्ट्र सुधारेल, आतूरतेने सांगतो,प्रत्येकाला सत्ता देऊन अनुभव घेतलात,पुढचे अनुभव घेण्यासाठी राज साहेब यांना नक्की सत्तेवर बसवा ही विनंती( अलिबाग रायगड)

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 12 วันที่ผ่านมา +3

    यावेळेस सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांना बहुमताने निवडून द्यावे

  • @gp.100
    @gp.100 10 วันที่ผ่านมา

    राज साहेब खरच खूप महत्त्वाची बाब सांगितली.

  • @indgaming3008
    @indgaming3008 15 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्राला आज राज साहेबांची गरज आहे😢

  • @anilkhadake3454
    @anilkhadake3454 19 วันที่ผ่านมา +27

    Kharacha raj saheb hyanna yek sandhi deu

  • @user-eu5qx3tj1v
    @user-eu5qx3tj1v 11 วันที่ผ่านมา

    राज साहेब छान गोष्ट आहे
    मनाफासून धन्यवाद

  • @AmolJadhav-yy2ed
    @AmolJadhav-yy2ed 16 วันที่ผ่านมา +2

    छान खरचं साहेबांना येक दा महाराष्ट्र हातामधे द्यायला हवा.

    • @aaplamanusvm
      @aaplamanusvm  16 วันที่ผ่านมา

      Video ज्यांना आवडला त्यानी जास्तीत जास्त शेअर करा

  • @Aniket_Dighe
    @Aniket_Dighe 16 วันที่ผ่านมา +13

    लाचाराना नाही समजणार राज साहेब ठाकरे काय आहेत 🙌

  • @ishwarparkar2754
    @ishwarparkar2754 13 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सर❤❤❤

  • @stomachcuuncheskini2241
    @stomachcuuncheskini2241 14 วันที่ผ่านมา +2

    Khup chan well explained, this looks like dream project. Can be completed under good leadership and support of all individuals, source of resources tax money to be utilized with transparency and accountability

  • @Rajveer-lb3ze
    @Rajveer-lb3ze 15 วันที่ผ่านมา +1

    Dil jeet liya mere favourite neta Mr. Raj Thackeray ne 👌🏻🙏🏻😊 main puri koshish karunga mumbai ko saaf sutra rakhne mein aur jaisi soch inki hai☝🏼tik waisa hi soch vichaar mera b hai so, clean & green Mumbai, maharashtra 🌱 I love this video ❤ aisa laga South ki Aparichit movie dhek raha tha 👌🏻

  • @0077025
    @0077025 12 วันที่ผ่านมา +2

    अमेरिकेचे सेंट्रल पार्क व मुंबईचे नॅशनल पार्क यांची तुलनाच होऊ शकत नाही कारण अमेरिकेचे सेंट्रल पार्क हे सपाट जमिनीवर असून, मुंबईचे नॅशनल पार्क हे उंच, सखल तसेच डोंगराळ भागात आहे, त्याला सेंट्रल पार्क सारखे विकसित करणे व त्याचे संगोपन व देखभाल करणे हे मोठे जिकीरीचे काम आहे,शिवाय अमेरिकन राज्यकर्ते व जनता यांच्या मधे जी एक स्वयंशिस्त आहे ती भारतातील राज्यकर्ते तसेच सर्वपक्षीय आमदार, खासदार, नगरसेवक व जनते मधे अजिबात नाहीये, त्यामुळे अमेरिके सारखे पार्क मुंबईत होणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे!

  • @user-bm7xe3nb3i
    @user-bm7xe3nb3i 13 วันที่ผ่านมา

    Saheb Mala tari asa vattay, ha video roz television var play zala havach. Thank you Raj dada saheb...

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 14 วันที่ผ่านมา +4

    एक संधी आणि सोन महाराष्ट्राचं ❤❤❤ राज साहेब ❤❤

  • @PravinWagh-lq8ow
    @PravinWagh-lq8ow 10 วันที่ผ่านมา

    एकदा तरी संधी दिली पाहिजे . आता नाही तर कधीच नाही . छान विचार आहेत तुमचे साहेब

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 11 วันที่ผ่านมา

    एकदम खर आहे. अस आणी ह्याच मुद्द्यावर ठाम असेल मनसे तर आम्ही राज ठाकरे यांच्या बरोबर ठाम पणे उभे राहू.

  • @satishbelapurkar1031
    @satishbelapurkar1031 15 วันที่ผ่านมา +4

    राज ठाकरे यांचे विचार खूप छान

  • @pradeeprewale6089
    @pradeeprewale6089 15 วันที่ผ่านมา +3

    राजसाहेबांना शतशः प्रणाम 🙏
    आपले विचार पुर्वीपासून च् महाराष्ट्रा बद्दल हिंदू प्रेमी आहेत. बाळासाहेब ठाकरें नंतर महाराष्ट्र खिळखिळा झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यासारखे बाळासाहेबांची भाषणे काळजाला भिडतात.महाराष्ट्रीयनांची
    ताकत मराठ्यांनीच् कमी केलीय. पैशासाठी ५०-१०० एकराच्या जमीनी परप्रांतीयांना विकून स्वत: ५-१० गुंठ्यात घरे बांधून बसलेत. राहिलेल्या क्वालीस-सफारीत फिरणा-या शेतक-यांना-बागायतदारांना जरांगेंनी आदिवासी कुणब्यांची जात लावून रस्त्यावर बसवलय! असो...
    राज साहेबांनी स्वच्छ कारभार करणा-या, तळमळीच्या हिंदूप्रेमींना उभे करून कडक शासनाने स्त्रीया सुरक्षित करून बुलडोझर इंजिन वापरावे.
    हिच श्रींची ईच्छा। जय भवानी। जय शिवराय।
    जय महाराष्ट्र 🚩

  • @SantoshGurav-s4d
    @SantoshGurav-s4d 15 วันที่ผ่านมา +2

    👌 खुप सुंदर हे.,........सायबांचे विचारावर आपण खरंच सगळ्यांनी आमलात आणले पाहिजे
    एकदा सायबांना सतेत्त आणायला हवं 🙏

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi 11 วันที่ผ่านมา +1

    👑Only MNS Raj saheb Thakre 🚩👍

  • @programmingway3625
    @programmingway3625 15 วันที่ผ่านมา +3

    राजकारणा तील लोकांनी आणि सर्वांनी मिळून सौंदर्याची शपथ घ्यायला हवी..... सध्याची महाराष्ट्र राजकारण स्थिती चिंताजनक 🙏🏻

  • @saurabhmalvi2241
    @saurabhmalvi2241 16 วันที่ผ่านมา +3

    👌किती छान पद्धतीने रचना व्यक्त केली आहे साहेबांनी...पण आपल्या इथल्या राजकारणी लोकांन मुळे हे शक्य होणार नाही...सत्यम शिवम सुंदरम...🙏

  • @santoshgurav7938
    @santoshgurav7938 14 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या मुळेच भक् भूमिका घ्या आता मोदी नंतर मी आसे नको saheb❤

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 8 วันที่ผ่านมา

    🙏राज साहेब, हा विचार आपणापासून
    खूप दूर जात आहे...... असे आम्हांला
    वाटायला लागत आहे हो..... 🙏

  • @MrAmt84
    @MrAmt84 19 วันที่ผ่านมา +10

    Ha video forward karat ja pratek group var

  • @TRIADTONES03
    @TRIADTONES03 11 วันที่ผ่านมา

    Kay awaj ahe ,Kay Vakya shabdancha. Prayog, maze awadte Raj Thakrey Saheb ❤🙏

  • @manishvhatkar4193
    @manishvhatkar4193 14 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर व्हिडिओ साहेब खूप मोठा संदेश 🙏🙏🙏

  • @rameshbhoye4982
    @rameshbhoye4982 10 วันที่ผ่านมา

    राज साहेब च पुढचे महाराष्ट्र नवनिर्माण करतील ...हे खरे आहे... त्यांना आपण एक हाती सत्ता देणे काळाची गरज आहे...मग बघा नक्कीच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या शिवाय राहणार नाही...जय महाराष्ट्र साहेब

  • @SonaliSane
    @SonaliSane 16 วันที่ผ่านมา +1

    Khupch सुंदर information आहे...pn हया सुधारणा झाल्या पाहिजेत.

  • @rahulbramhane9864
    @rahulbramhane9864 14 วันที่ผ่านมา

    Khup chan ❤

  • @amitmahadik8408
    @amitmahadik8408 17 วันที่ผ่านมา +3

    दूरदृष्टी असलेला एकमेव नेता ❤

  • @BhagwanSonawane-m1l
    @BhagwanSonawane-m1l 10 วันที่ผ่านมา

    हा व्हिडिओ राज साहेबांचे भाषण चालू होण्याअगोदर तेजवरून सर्वांना दाखवला पाहिजे

  • @sureshketan154
    @sureshketan154 19 วันที่ผ่านมา +7

    ,अप्रतिम माहीती फारच छान

  • @rameshpawar5521
    @rameshpawar5521 15 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली राज साहेब 🎉

  • @gauravshegaonkar6964
    @gauravshegaonkar6964 9 วันที่ผ่านมา

    साहेब तुमचे मनाने बरोबर आहे तुमच्या बोलण्याची पद्धत बाळा साहेबान सारखी वाटते

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 14 วันที่ผ่านมา +2

    3:55
    विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @maheshrathod4148
    @maheshrathod4148 15 วันที่ผ่านมา +1

    Kharch khup chhan asa aarakhada ahe saheb

  • @vishnujadhav63
    @vishnujadhav63 14 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan 🎉

  • @michaeldsouza1605
    @michaeldsouza1605 12 วันที่ผ่านมา +1

    Raj saheb. You are the best.

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 14 วันที่ผ่านมา +3

    सर्व मतदारांना एक नम्र विनंती राज ठाकरे ह्यांना एक संधी देऊ या

  • @TejasKadam-j8g
    @TejasKadam-j8g 13 วันที่ผ่านมา

    Raj saheb tumchi garj aahe aata maharatrala❤ jy manse saheb

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754 14 วันที่ผ่านมา

    जो एका मताचा नाही आणि महाराष्ट्रात गुंडगिरी मध्ये पहिल्या स्थानी आहे त्यांचा वर लोक कसकाय विश्वास ठेवतील....फक्त चांगले बोलण्याला महत्त्व नाही तर ते साक्षात ते जमिनी वर उतरवा तेव्हाच राज ठाकरेंना लोक समजतील.. कडू आहे पण सत्य आहे.

  • @SmartSchoolInfolips
    @SmartSchoolInfolips 13 วันที่ผ่านมา

    Khup varsha pasun asalei manatil ichha, Raj sahebani mandali. Kharach ase zale kiti chhan hoil.

  • @user-iv9tt3iy6t
    @user-iv9tt3iy6t 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @Ssonawane890
    @Ssonawane890 12 วันที่ผ่านมา

    Nakich mukhyamantri mhnun Raj sahebani yogyta sidh keliy tyani. Abhyas, vision ani khambir netruvv nakkich tyanchya kade ahe. Balasahebanche khare varasdaar shobhta Raj saheb. Up t yogi ani ikde Raj saheb. 👍👍👍

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 15 วันที่ผ่านมา +1

    The only difference between India and developed countries is the " lack of DISCIPLINE ".
    We don't lack talent and resources.
    We lack application.
    Only if we apply ourselves with dedication, determination and perseverance, then nothing is impossible.