वेरुळ लेणीतील अदभूत किरणोत्सव...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มี.ค. 2024
  • वेरूळ येथील १० क्रमांकाच्या लेणीतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर रविवारी सूर्यास्ताच्या वेळी किरणोत्सव अनुभवता आला. दरवर्षी १० मार्च रोजी संध्याकाळी ४:३० ते ४:४५ दरम्यान तथागतांच्या चेहऱ्यावर काही काळ सूर्यकिरणे स्थिरावतात. येथील बौद्ध लेणी या विहार आणि चैत्यगृह अशा प्रकारात मोडतात. बहुतांशी हीनयान काळातील लेणीमध्ये केवळ स्तूप तर महायान काळातील लेणीत तथागतांची मूर्ती कोरलेली असते. १० क्रमांकाच्या लेणीत स्तूप आणि मूर्ती दोन्ही बघायला मिळतात. तथागतांची मूर्ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील आहे. यांच्या एका बाजूला पद्मपाणी तर दुसऱ्या बाजूला वज्रपाणी हे बोधिसत्त्व आहेत. लेणीच्या भिंतींवर तथागतांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग कोरले आहेत. ज्या झरोक्यातून सूर्यकिरणे लेणीत प्रवेश करतात तो पिंपळाच्या पानाच्या आकाराचा असून त्याच्या बाहेरील बाजूने सहा गंधर्व आहेत. स्थानिक लोक या लेणीला सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा लेणी असेही म्हणतात.
    #elloracaves #goutambuddha #sun #संमही #तथागत #chatrapatisambhajinagar #aurangabad

ความคิดเห็น •