ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

वाणी,वानु,गोगलगाई कंट्रोल फक्त 2 तासात.. Wani,wanu,gogalgai,control..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2022
  • #wani
    #waani
    #vani
    #gogalgai
    #गोगलगाई
    #wanu
    #melipade
    गोगलगाय नियंत्रण : सध्या राज्यातील अनेक भागातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. नुकतेच जमिनीतून वर आलेले सोयाबीन पिकाला गोगलगाय फस्त करीत आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
    गोगलगाय किटक सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची भीती.
    गोगलगाय ही बहुभक्षी किड असून ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे पाने खावून अतोनात नुकसान करते. गेल्या ४ ते ५ वर्षा पासून ही किड कोणत्या ना कोणत्या पिकाचे नुकसान करतांना आढळून येत आहे .
    गोगलगाईला पोषक राज्यात पोषक वातावरण थोडक्यात माहीती.
    गोगलगाय किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान अर्थात ( २० अंश ते ३२ अंश सें . ) पोषक आहे. तरी शेतकरी बंधूंनी वेळीच सतर्क राहून प्रादुर्भाव ग्रस्त भागात या किडीचे नियमित सर्वेक्षण करावे शंखी ( स्नेल ) तसेच शेंबडी ( स्लग ) हे प्राणी मालुस्का या वर्गात समाविष्ट कलेले आहेत . शंखीच्या अंगावर टणक कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते , गोगलगाय सरपटत चालते व चालतांना सतत शेंबडासारखा चिकट स्त्राव सोडते , त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते शेतात हा स्त्राव चाळल्यावर त्या जागेवर पांदुरका चकाकणारा पट्टा दिसतो त्यावरून आपण या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखू शकतो .
    रात्रीच्या वेळी गोगलगाय सक्रीय राहून पिकाचे नुकसान करते , तर दिवसा ती दगड, पालापाचोळ्याचे खाली किंवा झाडाच्या खोडाभोवतालच्या दाट गवतात , जमिनीला लागून झाडाच्या असलेल्या फांदया खाली इ. ठिकाणी लपून बसते.
    गोगलगाय नियंत्रण असे करा. ( Snail control )
    गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी रासायनिक व जैविक दोन्ही पर्याय आहे.
    १ ) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत व वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी.
    २ ) गोगलगायीच्या लपण्याच्या जागा शोधुन त्या स्वच्छ व सपाट कराव्यात .
    ३ ) प्रादुर्भावग्रस्त शेतात तूषार सिंचना ऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा म्हणजे जमिनीत ओलावा व हवेत आर्द्रता कमी राहील त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल .
    ४ ) गोगलगायीची अंडी मातीमध्ये खोडाशेजारी तसेच गवताच्या ढिगाखाली पुंजक्याने घातलेली असतात , ती शोधून नष्ट करावी .
    ५ ) गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवुन संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावीत त्यावर गोगलगायी आकर्षित होईल . गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्या ठिकाणी गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी जमा करून नष्ट करावीत असेही आपण गोगलगाय नियंत्रण करू शकतो.
    ६ ) १५ % मीठाच्या द्रावणामध्ये गोणपाट बुडवून प्रादुर्भावग्रस्त भागामधे १० गोणपाट प्रती एकर याप्रमाणे अंथराव्या . म्हणजे गोगलगायी दिवसा
    गोणपाटाखाली लपण्यासाठी जमा होऊन मिठाच्या संपर्कात येवून नष्ट होतील किंवा जमा करून नष्ट कराव्यात .
    ७ ) गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा अधिक २५ ग्रॅम यिस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात ( २०० ग्रॅम गुळ अधिक १० लिटर पाणी ) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डीहाईड ( २.५ टक्के ) ५० ग्रॅम मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे.

ความคิดเห็น • 6