माढा आणि पंढरपूर विधानसभेसाठी 8 दावेदार; पाहा कुणाची ताकद किती? शरद पवार कुणाला देऊ शकतात 'तुतारी'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • S PRIME NEWS
    माढा आणि पंढरपूर विधानसभेसाठी 8 दावेदार; पाहा कुणाची ताकद किती? शरद पवार कुणा-कुणाला देऊ शकतात 'तुतारी'
    2014 ला भाजपची देशासह महाराष्ट्रात सत्ता आली. अन् लगेचचं काँग्रेस सोबतच राष्ट्रवादीतील नेतेमंडळी पक्षांतर करून भाजपसोबत जाऊ लागली.. तरी 2014 पासून 2019 पर्यंत हे पक्षांतर थोडयाफार प्रमाणात सुरू होती.. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला देशामध्ये अभूतपूर्व असं यश मिळालेलं होतं. भाजप सह एनडीए ने तब्बल 350 च्या वर जागा जिंकलेल्या होत्या.. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच तीन महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होती. या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजप सह माहितीमध्ये जाणं पसंत केलं.. त्यावेळी भाजपने अगदी मेगाभरतीचे बोर्ड लावून आपल्या पक्षांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेमंडळी सामावून घेतली... मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची देशभरासह महाराष्ट्रात देखील मोठी पिछेहाट झाली... महाराष्ट्र मध्ये भाजप सह महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं.. तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मात्र महाराष्ट्रामध्ये 30 जागा जिंकता आल्या.. यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उलटी राजकीय गंगा वाहत असल्याचे दिसून येते... सध्या भाजपमधून अनेक नेतेमंडळी ही बाहेर पडत असून या नेतेमंडळीचा ओढा महाविकास आघाडीतील पक्षांकडे आहे... तर माढा विधानसभा तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील शरद पवारांच्या तुतारी कडून लढण्यासाठी माहिती मधील अनेक मोठी नेते मंडळी सध्या इच्छुक आहे... सध्या महाडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी तुतारी कडून लढण्यासाठी अभिजीत पाटील हे इच्छुक आहेत त्यासोबतच रणजीत सिंह शिंदे हे देखील तुतारीवर लढण्यासाठी इच्छुक आहेत... त्यासोबतच मोहिते पाटील घराण्यातील एक तरुण उमेदवार शिवतेसिंह मोहिते पाटील हे देखील माढा विधानसभेसाठी मोठी तयारी करत आहे... त्याचबरोबर शेजारच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील तुतारीला मोठा डिमांड आल्याच दिसून येतंय.. या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते असलेले प्रशांत परिचारक तसेच गेल्या वर्षी बी आर एस मध्ये प्रवेश केलेले भगीरथ भालके आणि परिचारक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वसंतनाना देशमुख तसेच नागेश भोसले यांनीदेखील सध्या पंढरपूर मंगळवेढामध्ये तुतारीकडून लढण्यासाठी तयारी सुरू केलीय.. मात्र या सर्व नेत्यांमध्ये शरद पवार नेमकी कोणाला संधी देऊ शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत..
    #maharashtra #politics #solapur #pandharpur #madha #sharadpawar #devendrafadnvis #prashantparicharak #bhagirathbhalke #abhijeetpatil #mohitepatil

ความคิดเห็น • 102