महाराष्ट्रातील एक जबरदस्त आवाज|तुकाराम जी गोसावी{वाकवकर}|देही देखिली पंढरी|Tukaram ji Gosavi|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • कर्नाटक संगीतामध्ये भजन म्हणणारे ‘भागवतार’ मृदंग, टाळ, वीणा व तंबोरा यासह भजन म्हणतात. तंजावर प्रांतात देवदेवतांच्या पालख्यांपुढे भजने म्हटली जातात. यात पुरंदर दास, बोधेंद्र गुरूस्वामी त्यागराज, सदाशिव ब्रह्मेंद्र इ.च्या रचना असतात. गुजरात मधील भजनपरंपरेचा नरसिंह मेहेता हा प्रवर्तक आहे.गुजरातमध्ये चारणभाट यांची भजनाची परंपरा आहे.ओरिसातील भजनी परंपरा ही रामकृष्ण कथांनी युक्त असते. इशान्येकडील राज्यांत अंकियानाट अशी भजनाची परंपरा आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने भजन गायनाची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी महानुभावपंथात मठसंगीत होते.भजन चक्रधरांच्या गुणस्तुतीपर कवनातून उपलब्ध होते. महाराष्ट्रात भजनाचे सोंगी भजन, दत्तपंथी भजन, नाथपंथी भजन, चक्री भजन, डबलबारीचे भजन असे विविध प्रकार आहेत.
    महाराष्ट्रात ‘भजन’ हा प्रयोगात्म लोककलाप्रकार म्हणून ओळखला जाण्याआधी तो नामसंकीर्तनप्रकार म्हणून सर्व परिचित होता आणि आहे. भजनाला आध्यात्मिक अधिष्ठान असते. त्यामुळे त्याकडे निखळ रंजनपर प्रकार म्हणून पाहता येत नाही. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय असे पाच भक्ती संप्रदाय सर्वपरिचित असून शक्ती देवतेच्या उपासकांचा शाक्त संप्रदाय आणि तंत्रमंत्र विद्येचा कापालिक संप्रदाय असे संप्रदायही भारतभर परिचित आहेत. या संप्रदायांपैकी बहुताश संप्रदायांमध्ये नामसंकीर्तन भक्ती रूढ असून या नामसंकीर्तन भक्तीचा अविष्कार भजनाव्दारे होतो. एखाद्याचा भजनी लागणे अशा स्वरूपाचा वाक्प्रचार रूढ आहे. ‘भजनी लागणे’ याचा अर्थ गुणगान गाणे. इष्टदेवतेचे नामसंकीर्तन संप्रदायानुसार भजनाव्दारे केले जाते. कीर्तन आणि भजन हे दोन्हीही प्रकार नामसंकीर्तनात मोडतात.कीर्तनात एखाद्या अभंगावर भाष्य असते. हे भाष्य कीर्तनकार करतो,तर भजनात भाष्य नसून केवळ अभंगगायन असते. कीर्तनात गायनासोबत निरूपण असते, तर भजनात केवळ गायन असते.
    संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना त्यांनी “भजन करा सावकाश” असा संदेश आपल्या अनुयायांना दिला होता. जिभले तुला काय धंदा। घडोघडी भज रे गोविंदा।। असे भजनाचा महीमा सांगणारे पद संत गाडगेमहाराज, संत तुकडोजीमहाराज यांच्या अनुयायांमध्ये लोकप्रिय आहे. भजनाने म्हणजे नामसंकीर्तनाने जन्मांतरीची पापे नष्ट होतात अशा आशयाचा एक अभंग आहे. ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची’ या अभंगासारखाच अन्य अभंग असा ‘नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले’. भजनातील नामसंकीर्तनाची महती सांगणारे असे अनेक अभंग आढळतात. भजन हे मूलतः आत्मोध्दारासाठी केले जाणारे संकीर्तन असून त्याला रंजनाची जोड अलीकडच्या काळात मिळाली. नाटक, चित्रपटांचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसे चित्रपटगीतांच्या चाली भजनातील अभंगाला लावल्या जाऊ लागल्या आणि भक्तिसंगीताने लोकप्रिय संगीताचा असा अनुनय सुरू केल्यानंतर नामसंकीर्तन भजन रंजनपरही होऊ लागले. भजनात मुख्यतः रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि अभंगपंचक अशी रचना असते. अभंगपचंकात बाळक्रीडेचे अभंग, विराण्या, उपदेशपर अभंग, देवाचा धावा, गवळणी अशा स्वरूपाचे अभंग गायिले जातात. हे स्वरूप वारकरी भजनाचे असते. वारकरी भजनात टाळ, मृदंग, वीणा असा वाद्यमेळ असतो. मुख्य गायकाच्या हातात वीणा असते. त्याला गायनासाठी साथ करणाऱ्या टाळकरयांना चाल म्हणणारे संबोधले जाते. ‘जय जय विठोबा रखुमाई’,‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ’असा नामगजर भजनात केला जातो. वारकरी भजनात काकडयाचे भजन, हरिपाठाचे भजन, एकादशीचा हरिजागर असे प्रकार पडतात. हरिपाठाचे भजन मुख्यतः सायंकाळी मंदिरात अथवा आळंदी, पंढरीला दिंडया पालख्यांच्या वेळी, गावोगावी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित केले जाते. ‘हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी’ या संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठापासून भजनाची सुरूवात होते. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ झाल्यावर आंधळे, पांगुळ, बाळक्रीडेचे अभंग सुरू होतात.हरिपाठाचे अभंग वर्षभर मंदिरात सादर होतात त्यामुळे या भजनाला नेमाचे भजन म्हटले जाते.

ความคิดเห็น • 13

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गायन.

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 11 หลายเดือนก่อน +1

    Khuapch chhan

  • @user-ym7go1co1w
    @user-ym7go1co1w 6 หลายเดือนก่อน +1

    लई छान गायले

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale8284 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूप खूप जबरदस्त आवाज 🙏

  • @user-wx1rh9cw5l
    @user-wx1rh9cw5l 9 หลายเดือนก่อน

    Khup bhari❤❤❤❤

  • @popatmahadik8624
    @popatmahadik8624 5 หลายเดือนก่อน

    Baba khupach chan

  • @sarjeravtaur880
    @sarjeravtaur880 ปีที่แล้ว +2

    भूप राग आहे

  • @jagannathshinde9790
    @jagannathshinde9790 ปีที่แล้ว +2

    खुप छान अभंग तितक्याच गोड आवाजात गायला.

  • @user-zk3js4kp2g
    @user-zk3js4kp2g ปีที่แล้ว +1

    Good 😅

  • @DattatrayKumbhar-rm1ts
    @DattatrayKumbhar-rm1ts 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण. हरि महाराज

  • @Sushantbhosale-999
    @Sushantbhosale-999 หลายเดือนก่อน

    Rag Hansdwani

  • @mahadevchavan5387
    @mahadevchavan5387 8 วันที่ผ่านมา

    😅