Goshti Ganyanchya | Part 01 | बकुल पंडित | फैयाज शेख | HD | गोष्टी गाण्यांच्या | Ep 31

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • (Part 02) • Goshti Ganyanchya | Pa...
    सहभाग - बकुल पंडित / फैयाज शेख
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 16 May 2024
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : बकुल पंडित / फैयाज शेख
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • บันเทิง

ความคิดเห็น • 85

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 2 หลายเดือนก่อน +3

    फैय्याजजी व बकुळ ताई दोघींना ऐकणे म्हणजे दुग्ध शर्करा योग आला.उत्तराताईंना धन्यवाद.. खूप छान मुलाखत घेतली.भूतकाळात मन रममाण झाले.🙏🙏💐💐

  • @aarvikul6147
    @aarvikul6147 2 หลายเดือนก่อน +16

    🎉 आदरणीय फैय्याज आणि बकुळ पंडित ताई ची गाणी ऐकताना मन चाळीस वर्षे मागे गेलं.मनपुर्वक अभिनंदन, सुंदर मुलाखत सादर केल्या बद्दल धन्यवाद.

    • @ajaymanjrekar2293
      @ajaymanjrekar2293 2 หลายเดือนก่อน +4

      फैय्याज शेख यांनी झी गौरव मध्ये चार होत्या पक्षीणी हे वीज म्हणाली धरत्रीला नाटकातील पद प्रवेशासह सादर केले होते . काय ते करुण रसातील गाण !

    • @gaurishetye4222
      @gaurishetye4222 2 หลายเดือนก่อน

      ​PSR in

    • @vijayabanhatti
      @vijayabanhatti 2 หลายเดือนก่อน

      इज् v
      M

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 หลายเดือนก่อน +3

    या दोन्ही महान गायिका ना बघून खूप आनंद झाला बकुळ पंडित म्हंटले की उगवला चंद्र पुनवेचा आणि फैय्याज जी म्हंटले की महानंदा हाच सिनेमा आठवतो खूप धन्यवाद

  • @suvarnapatwardhan8951
    @suvarnapatwardhan8951 2 หลายเดือนก่อน +5

    दोन गुणी गायिकांची मुलाखत अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. दोघींच्या आवाजातला गोडवा आजही तसाच आहे.

  • @sunildeshpande9312
    @sunildeshpande9312 2 หลายเดือนก่อน +9

    काही वर्षापूर्वी माझ्या मित्राने दूरदर्शनला मोडीत काढावे असे म्हटले होते. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. निरंजन अरविंद राव पाठक यांच्या सारखा योजक हा योजक: तत्र दुर्लभ: व फैजाज ताई आणि बकुळ ताई यासारख्या गानकोकिळा, कट्यार सारख्या नाटकावर गप्पा... दुग्धशर्करा योग

  • @JayantDhongade
    @JayantDhongade 2 หลายเดือนก่อน +4

    अंगावर शहारे आणणारी मुलाखत...बकुळ पंडीत जी व
    फैय्याज जी यांना मनापासून प्रणाम

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 2 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर कार्यक्रम दूरदर्शन ने सादर करुन जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.धन्यवाद!🎉🎉

  • @smitacjoshi8436
    @smitacjoshi8436 2 หลายเดือนก่อน +2

    फैयाज ताईंना बघत असते.बकुळ ताईंना प्रथमच बघितले .आनंदित झाले.धन्यवाद. ❤.

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम कार्यक्रम!
    फैय्याज व बकुळ पंडीत यांना सादर प्रणाम...
    थोरांच्या सहवास लाभलेले हे थोर !❤

  • @sudhirgore5239
    @sudhirgore5239 2 หลายเดือนก่อน +1

    खरचं त्या काळात नेलं.सत्तरीच्या दशकात आम्ही हा सुवर्णकाळ अनुभवलाय..आज या दोघींनी त्याच ताकतीने सादर केला.पन्नास वर्षे मागे जाऊन तो काळच समोर उभा करणे ही अद्वितीय घटना..धन्यवाद!!!!!

  • @bhavnakulkarni8700
    @bhavnakulkarni8700 2 หลายเดือนก่อน +1

    फैय्याज ताई मला तुम्हाला पाहून आणि ऐकून खूप खूप खूप आनंद झाला. मला तुम्ही इतक्या आवडता की ते तुम्हांला सांगून खरं वाटणार नाही. एकदा तर तुम्हाला मी दादर स्टेशनवर पाहिले. हाक मारली पण तुम्ही त्या गर्दीत दृष्टीआड झालात. पण मी मात्र एका आनंदात घरी परतले. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. ❤

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 2 หลายเดือนก่อน +2

    खूप दिवसांनी दोन्ही गायिकाना पाहून आणि ऐकून खुप आनंद झाला. ❤❤
    DD सह्याद्री dhanywad. 🙏🙏

  • @maneeshajoshi1502
    @maneeshajoshi1502 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर, दृष्ट लागण्याजोगा कार्यक्रम. उत्तरा, ही गाणी नुसतीच मनात राहतील असे नाही तर जन्मोजन्मी मनामनांवर गारुड करतील. या दोघींमध्ये डावं उजवं करणं अशक्य आहे. मराठी माणसाचं भाग्य की इतके निर्मळ सूर ऐकायला मिळतात.

  • @ManaSarita
    @ManaSarita 2 หลายเดือนก่อน +7

    दोन आवडत्या गायिका बऱ्याच काळानंतर. धन्यवाद.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 หลายเดือนก่อน

    🌹👌कट्यार काळजात कायम ❤️फय्याजजी कम्माल!!वा ! वा!!👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏

  • @MrINdiaEditz3267
    @MrINdiaEditz3267 2 หลายเดือนก่อน +7

    सुंदर कार्यक्रम! गत स्मृतींना उजाळा मिळाला. धन्यवाद दूरदर्शन!👏👏ं

  • @varshamankame389
    @varshamankame389 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

  • @arunnadkarni9067
    @arunnadkarni9067 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम... कट्यार मी बावीस वेळा पाहीलंय... फैय्याज ताई... अलकनंदा वाडेकर... झरीना आणि उमा... आजही आठवतात..

  • @sumedhasaraf6243
    @sumedhasaraf6243 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर अजूनही ऐकत राहावे असे संगीत👌

  • @ajaytalgeri133
    @ajaytalgeri133 2 หลายเดือนก่อน

    I offer my humblest shatkoti pranaams to Vidushi Bakulji & Vidushi Fayyaz ji. No words are enough. Shatkoti Pranaams.

  • @smitabivalkar3494
    @smitabivalkar3494 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. कान तृप्त झाले.

  • @madhavsathe8695
    @madhavsathe8695 2 หลายเดือนก่อน

    खूप आनंद मिळाला, आम्हालाही या दोघींची नाटके पाहण्याची संधी लाभली आमच्या लहान पणी

  • @sushmakawale5333
    @sushmakawale5333 2 หลายเดือนก่อน +1

    दोघींनाही साष्टांग नमस्कार खूप आनंदी,मस्त,❤

  • @SuvarnaS-wf5br
    @SuvarnaS-wf5br 2 หลายเดือนก่อน

    दोन्ही आवडते कलाकार खुप वर्षांनी दिसले .आनंद झाला.अप्रतीम कार्यक्रम .दुरदर्शनचे खुप खुप आभार .फैयाज ताईंना बघीतल आणी त्यांच्या अनेक भुममीका आठवल्या त्यातीलच एक मला आवडलेली महानंदा चित्रपटातील .मनुची.

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 2 หลายเดือนก่อน +1

    फैय्याज,ताईंच्या त्या नाटकातली सारे गाणी मी म्हणायचे,

  • @deepashribhagwat2822
    @deepashribhagwat2822 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत ❤❤

  • @sukhadakshirsagar6538
    @sukhadakshirsagar6538 2 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर कार्यक्रम.. दूरदर्शन ला मनापासून धन्यवाद

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 หลายเดือนก่อน

    🌹👌❤️निर्गुण सगुण करण्याची ताकद आवाजात❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌अप्रतिम❤️

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 2 หลายเดือนก่อน

    वाह, इतकी छान मुलाखत प्रस्तुत केल्या बद्दल धन्यवाद , बकुळ ताई आणि फैय्याज ताई आज ही उत्तम गात आहेत , आनंद झाला ! " इन दोनो को ही नजर ना लगे ! " * डा ईश्वर चंद्र रामचंद्र करकरे

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 2 หลายเดือนก่อน +1

    महानंदा सिनेमातील गाणी,आणि विक्क्रं काकांसारखे हँडसम कलाकार,काय जोडी,मळतो चित्रपट मोबाईल मध्ये बघायला मिळाला त्यातले माझे राणी हे गणे मला खूप आवडते,

  • @muktakulkarni7364
    @muktakulkarni7364 2 หลายเดือนก่อน

    Apratim .Bakul Taina prathmch pahile gani yikali hoti. Dohinahi namsakar

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 2 หลายเดือนก่อน

    धनयवाद दुरदर्शन. ईतका सुंदर कार्यक्रम आयोजित करुन तो आमच्या पर्यंत पोहचवला.बकुळताई आणि फैयाजताई दोघींच्या आवाजात अवीट गोडी आहे।धन्यवाद.

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 2 หลายเดือนก่อน

    उत्तरा मोने यांनी सुंदर मुलाखत घेतली.
    किती साध्या आहेत तिघीही.🙏

  • @prabhudaschavan9530
    @prabhudaschavan9530 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर भेट सुदैवाने आज संध्याकाळी ठाण्याला सहयोग मंदिरात बकुल ताईंचा प्रोग्राम प्रत्यक्ष ऐकायला मिळेल.

  • @neelav.riswadkar.riswadkar4950
    @neelav.riswadkar.riswadkar4950 2 หลายเดือนก่อน +1

    तुमची संगीत नाटके मनात कोरली गेली आहेत.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 หลายเดือนก่อน

    ❤️👌हरवलेले मधु मुरलीचे सूर बकुळजींनी जपून ठेवले!!अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 2 หลายเดือนก่อน

    बकुळ पंडीत ना उशिरा का होईना अशा प्रकारे सादर केले ते पाहुन अनेक नाट्यप्रेमींच्या मनातील हुरहुर दुर झाली ..सह्याद्री मराठी वाहिनीचे त्याबद्दल आभार मानलेच पाहिजेत

  • @shobhakulkarni9671
    @shobhakulkarni9671 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर!!

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार दोन दिग्गजांना! कितीतरी वर्षांनी बकुळ पंडीतजी व फैयाजजी ना पाहिलं व ऐकलं- शाळेत असताना नेहमी ऐकायला मिळत असे. सुरेख !

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 หลายเดือนก่อน

    🌹👌गदिंमा शब्द शब्द बोलका,सजीव चित्र रेखांकन!!सलाम!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @sanjayb9738
    @sanjayb9738 2 หลายเดือนก่อน

    Apratim❤❤👌✌

  • @arunachafekar4058
    @arunachafekar4058 2 หลายเดือนก่อน +1

    फैयाज आमच्या सोलापूरच्या असल्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे

    • @arunachafekar4058
      @arunachafekar4058 2 หลายเดือนก่อน

      आमच्या सोलापूरचे अतुल कुलकर्णी, जब्बार पटेल शशिकला सरला येवलेकर लेखक अच्युत गोडबोले आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ही सर्व रत्ने आहेत

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 2 หลายเดือนก่อน

    दोन्ही दिग्गज गायीकेंची मुलाखत ऐकायला मीळाली सुंदर योग धन्यवाद 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @ramaasapre3412
    @ramaasapre3412 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुरेख मुलाखत, जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 2 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर मुलाखत / कार्यक्रम!

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम कार्यक्रम

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 2 หลายเดือนก่อน

    फैयाज ताईंचे आम्ही(सर्व कुटुंब) फॅन आहोत.' जोगीया '
    ऐकून निश्शब्द होतो.ही
    ताइंची किमया.आम्ही त्यांचे आणि अण्णांचे, ग. दि. मां चे ऋणी आहोत.

  • @manishakale4950
    @manishakale4950 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mulakhat

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कार्यक्रम👍👌👍👌🙏🙏

  • @bdj240965
    @bdj240965 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim !!

  • @Fatso2fitso
    @Fatso2fitso 2 หลายเดือนก่อน

    फक्त अप्रतिम!! अवीट गोडीची गाणी!! ❤❤❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 หลายเดือนก่อน

    🌹👌वा!वा!!विकल मना”क्या बात!!भावपूर्ण❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️❤️👌🙏

  • @Timakiwala
    @Timakiwala 2 หลายเดือนก่อน

    १९७७ भरत नाट्य मंदीर , अजूनही आठवते...छान‌

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 2 หลายเดือนก่อน

    ह्या वयात त्यांच्या आवाजाला नमस्कार महानंदा मधील त्या ची भुमिका अजुनही मला आठवते

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 หลายเดือนก่อน

    विकल मन आज ' हे पद बकुळ पंडित यांच्याकडून पहिल्यांदा ऐकले .तसे ही हे नाट्य पद कोणी गात नहीं .फक्त काही १५-२० वर्षांपूर्वी नागपूरच्या लक्ष्मीनगर घ्या सायंटिफिक हाॅलमध्ये नागपुरच्या प्रसिद्ध सतार वादिकेच्या संगीत मंडळाच्या वार्षिकोत्सवात त्यांच्या शिष्येने हे सरस्वती रागातील ' विकल मन आज ,झुरत असहाय ,' गायिलेले ऐकले होते . आणि आज दुसऱ्यांदा सुरेख आवाजात ऐकले .त्याबद्दल धन्यवाद !

  • @namratashinde8649
    @namratashinde8649 2 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर मुलाखत

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l 2 หลายเดือนก่อน +1

    सगळे पुर्विचे दिवस आठवले.🙏

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 2 หลายเดือนก่อน

    बकुल ताईंचा ' क्षण क्षण ' अप्रतिम.

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कार्यक्रम 🎉🎉❤❤

  • @ashalatabhingare9985
    @ashalatabhingare9985 2 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌
    Aaj Aamhala Ganyachi Mejavanich Milalali
    Dhanyavad 🙏👌

  • @pankajkilledar
    @pankajkilledar 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तुंग कलाकार सगळ काही जबरदस्त होते त्यामुळे कट्यार ही अजरामर कलाकृती निर्माण झाली

  • @neerakelwadkar1917
    @neerakelwadkar1917 2 หลายเดือนก่อน

    मला पण फैय्याज म्हणजे कट्यार आणि महानंदा हेच समिकरण माहिती आहे. महानंदा माझ्या सासर्यांचे जवळचे मित्र माधवराव देशपांडे यांनी काढला होता.आम्ही प्रिमियम शोला गेलो होतो.सर्व गाणी गाजली होती अजून लक्षात आहेत.🎉🎉❤

  • @sunandakulkarni3824
    @sunandakulkarni3824 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏❤️

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🌹🌹

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान मुलाखत देणारे आणी
    मुलाखत कार

  • @NRPatil-sh2xl
    @NRPatil-sh2xl 2 หลายเดือนก่อน

    संत गोरा कुंभार हे नाटक मला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखान्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात बघायला मिळाले होते. निश्चित साल आठवत नाही, परंतु 1988 /89 साल असावे. हा कार्यक्रम पहाताना मला प्रकर्षाने त्याची आठवण झाली

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 2 หลายเดือนก่อน

    फैय्याज यांचे आणेकदा दर्शन झाले आहे,पण bakultainnaprathmach पाहिले,आणि बकुल्टनचा आवाज फैय्याज ताईंच्या आवाज पेक्षा किती गोड आहे,

  • @pradnyaphadnis3146
    @pradnyaphadnis3146 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉🎉

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 2 หลายเดือนก่อน +1

    Bakul tainnchi hi gani dekhil mlakhup aawadaychi ti dekhil mi नेहमी म्हणायचे,अजून एक की mangalanaath,ह्या tainnchi सुध्धा sarw gani mi म्हणायचे त्यांची देखिल मुलाखत घ्या आणि त्यांची देखिल गाणी आयकायची आहेत,

  • @geetakulkarni5361
    @geetakulkarni5361 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @sureshalate8069
    @sureshalate8069 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर, मन भरून पावले.

  • @alkakolhatkar6996
    @alkakolhatkar6996 2 หลายเดือนก่อน

    Doghi chan gatayet godva apratim katyaar unforgettable aple Mitra hi vegle hote apanganpatipulacha athav kelat mi vasudev kolhatkaranchi chulat sun kollhatkarana likha vadan abhinayache vardan ahe apan konkanchapahunchar ghetlat Anand zala bakyltainche ek bhavgeetvisarta yet nahi

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 2 หลายเดือนก่อน +1

    दोघींनाही साष्टांग नमस्कार,

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 2 หลายเดือนก่อน

    संत गोरा कुंभार मधला फैयाज यांच्या अभिनयाची तुलना कुणाशी करायची झाली तर मला फक्त सुलोचना हेच नाव आठवतं

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 2 หลายเดือนก่อน

    Mi he gan आमच्या,गल्लीतील देवळांमध्ये,काकडा आरती झाली सकाळची ,की तेव्हा म्हणायचे,तो sarw mahol खूप आठवतोय,

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 หลายเดือนก่อน

    हा कार्यक्रम पाहतांना + ऐकताना अंगावर शहारे येणे म्हणणे चूक आहे.कारण भीतीमुळे शहारे येतात . रोमांच अंगावर आले / उठले हे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल .