श्री दत्तजयंती २०२४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
  • II श्री दत्त विजयोस्तु II
    II श्रीदत्त जयंती उत्सव २०२४ II
    १९७५ पासून आपल्या श्री दत्तमंदिर, दत्तवाडी, कुरार, मालाड येथे श्री दत्तजयंती साजरी केली जात आहे. पण काळानुरुप उत्सव पद्धती, उपासना पद्धती यामध्ये बदल होत गेला. उत्सव सण यापेक्षा अधिकाधिक अध्यात्माकडे सर्वांची ओढ लागावी यासाठी प्रयास चालू झाला. म्हणूनच १४/१५ वर्षांपूर्वी चालू झालेला २७ तासांचा नामस्मरण कार्यक्रम हा ७/८ वर्षांपूर्वी अखंड "हरिनाम सप्ताह" यात परावर्तित झाला. याच नामस्मरणाची अधिक अनुभूती घेण्यासाठी यावर्षी आपल्या श्री दत्त मंदिरात ५ ऑगस्ट पासून "श्री गुरुदेव दत्त" या एक कोटी नामजपाचा संकल्प सोडण्यात आला. भक्त आपापल्या वेळेप्रमाणे त्यात सहभागी झाले आणि कुणी दिवसाला १ माळ, कुणी ११-२१ तर कुणी ५१ -१०१ माळा जपू लागले आणि नामगजराचे "श्री गुरुदेव दत्त" रुपी नाममय वलय आपल्या मंदिरात निर्माण झाले. आज काही भक्ताना त्याची नित्याची सवय झाली हाच आमचा प्रसाद.
    श्री दत्तजयंतीच्या सप्ताहा निमित्त श्रीगुरुचरित्र पारायण मंदिरात केले जाते आणि यावर्षी एक नवीन प्रयत्न म्हणून "द- कारादी" "श्रीदत्त सहस्त्र नामावली अर्चन" सेवा आपल्या मंदिरात केली गेली. श्रीदत्त नामाचा सात दिवस आनंद घेण्यात आला आणि त्यातही भक्तांनी अगदी आवर्जून सहभाग घेतला.
    दिवसेंदिवस वाढणाऱ्या या ऊर्जेमूळे ३ वर्षांपूर्वी एक नवीन संकल्प विचारात घेतला दत्तमहाराजांच्या कृपा आशीर्वादाने या वर्षी तो साध्य झाला तो म्हणजे - मंदिरातील श्री दत्त महाराजांच्या मूर्तीमागील प्रभावळ. सोनं चांदी यांनी मढलेली प्रभावळ याहीपेक्षा अधिक म्हणजे दत्त महाराजांचे १६ अवतार त्यात विराजमान झाले आहेत. त्यासर्वांचा अनुभव, एक संक्षिप्त आढावा या व्हिडिओडोतून आपण पाहू शकता.
    श्री दत्त गुरू सेवा समिती
    स्थळ :- श्रीदत्त मंदिर, दत्त वाडी, मालाड- पूर्व मुंबई - ९७.
    I I श्री गुरुदेव दत्त I I
    #dattatreya #dattaguru #datta #spiritual #dattajayanti2024 #bhakti #bhaktisong #bhaktisongs #bhaktibhajan #दत्तगुरु #दत्त #digambara #दत्तजयंती

ความคิดเห็น •