लहान पण देगा देवा | माझ्या बालपणातील दुपारच्या वेळेतील खाणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • नमस्कार !
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सोप्या आणि चविष्ट दुपारच्या वेळेतील खाण्याचे प्रकार बघणार आहोत. हे पदार्थ बनवायला अगदी सोपे असून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते. चला तर मग करुया आपल्या दुपारच्या वेळेतील स्वादिष्ट खाणे.
    प्रकर पहिला
    तेल तिखट मीठ गोळा पोळी
    शिजवलेल तुरीच वरण (Cooked Toor dal)
    मीठ (Salt)
    तेल (oil)
    कांदा (Onion)
    काळा मसाला (Kala Masala)
    लाल तिखट (Red chilli powder)
    प्रकार दुसरा
    दाण्याची चटणी पोळी
    शेंगदाण्याची चटणी (Peanut Chutney)
    तेल (Oil)
    कांदा (Onion)
    प्रकार तिसरा
    गूळ तूप पोळी
    पोळी ( रोटी)
    तूप (Ghee)
    गूळ (Jaggery)
    प्रकार चौथा
    लोणचं भात
    भात (Rice)
    लोणच्याचा खार (Pickle)
    कोथिंबीर (Coriander)
    कांदा (Onion)
    मीठ (Salt)
    प्रकार पाचवा
    मेतकूट भात
    भात (Rice)
    तूप (Ghee)
    दही (Curd)
    मीठ (Salt)
    प्रकार साहावा
    मसाला भाकरी
    2 भाकरी (Bhakari)
    काळा मसाला (Kala masala)
    लाल तिखट (Red Chilli Powder)
    मीठ (Salt)
    कोथिंबीर (Coriander)
    तेल (Oil)
    कांदा (Onion)
    प्रकार सातवा
    तूप पोळी रोल
    पोळी (Roti)
    तूप (Ghee)
    पिठी साखर (Powdered Suger)
    आमच्या काळी दुपारच्या वेळी किंवा शाळेत मधल्या सुट्टी मध्ये खाण्या साठी पौष्टिक आणि झटपट बनवायला सोपे मुख्य म्हणजे आपण कोणाचाही मदत न घेता बनवता येणारे असे वेग वेगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट मध्ये कळवा.
    #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------

ความคิดเห็น • 311

  • @CookwithTeja
    @CookwithTeja 11 วันที่ผ่านมา +26

    मायाताई... अगं किती छान सांगितलस...खरय..मुळात आपल्या दोन्ही आज्या आणि आई सुगरण होत्या आणि कोंड्याचा मांडा करून खायला घालायची हातोटी होती....
    आपण तिघीही जणी दुपारी एकाच ताटात जेवायचो..आठवतंय?
    आजही हे आणि असे बरेच पदार्थ मी करते आणि खाते...तूप खाऊन रूप आलं का नाही माहित नाही ,पण त्यावेळी खाल्लेल्या अशा अनेक पदार्थांमुळे तब्बेत आणि मन मात्र ताजं टवटवीत आहे....

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni2409 11 วันที่ผ่านมา +57

    तांबोळकर काकू, बिनधास्त हातानं कालवून दाखवा, पिढ्यानपिढ्या आपण हातानेच सगळे पदार्थ कालवत आलोय. नखं कापलेली आणि हात स्वच्छ धुतलेले असतील तर हातानेच करावं. मायेच्या हाताची चव पदार्थांत उतरावीच लागते ...❤

  • @poonamvachhatani6109
    @poonamvachhatani6109 11 วันที่ผ่านมา +27

    किती सुंदर, पौष्टीक ,चविष्ट पदार्थ आणि तुमचे मधाळ बोलणे ❤❤❤❤❤ अशी च आजी सगळ्यांना पाहिजे💖🌟🌟🌟

  • @swaragokhale5827
    @swaragokhale5827 7 วันที่ผ่านมา +4

    काकू किती सहज, सोप्या पद्धतीने तुम्ही सुटसुटीत साहित्यातील दुपारच्या वेळेतील खाणे दाखवलेत👌
    खुपचं छान

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 11 วันที่ผ่านมา +7

    व्वा! व्वा! सगळेच मेनू खूप आवडीचे आहेत. अजूनही आवडतात. ❤️👌
    काकू बिनधास्त हाताने कालवा. हातानेच नीट कालवले जाते.👍

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 11 วันที่ผ่านมา +28

    हे झालं श्रीमंतांच्या घरचं दुपारचं खाणं आमची तर एवढी गरीबी होती की दुपारी भूक लागली तर नुसताच कांदा फोडून मीठाबरोबर खायचो भाकरी दिवसातून फक्त दोन वेळा मिळायची तीही अर्धे पोट भरेल इतकीच

  • @shubhangigogate4685
    @shubhangigogate4685 4 วันที่ผ่านมา +1

    आम्ही पण लहानपणी गोडा मसाला तिखट मीठ आणि तेल असं मिक्स करून पोळीला लावून त्याचा रोल करून खाल्लेला आहे. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. थँक्यू ताई😊

  • @lalitadeshpande3612
    @lalitadeshpande3612 11 วันที่ผ่านมา +12

    आम्हाला आजी, भाकरीला पापुद्रा काढून लोणच्याचा खार चोपडून द्यायची आणि लसणीची पात टाकायची वरुन परत पापुद्रा बंद करून द्यायची ... आहाहा काय चव होती त्या पदार्थाला..... अविस्मरणीय.

    • @sanjaykadam5739
      @sanjaykadam5739 6 วันที่ผ่านมา

      Ho mi he sarv padarth खाल्ले आहेत चटनिवर काच्ची मेथी किव्वा कोबी हेही फार छान लागते

  • @swatijoshi72
    @swatijoshi72 11 วันที่ผ่านมา +7

    लहान पण आठवलं, सोबत आई, त्यावेळी घडलेली भांडणं, प्रसंग सगळे सगळे आठवलं धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @poojasapre-cu1lu
    @poojasapre-cu1lu 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वाटलं. लहान पणी चे दिवस आठवले. आम्ही पण हेच खायचो धन्यवाद तुम्ही या पदार्थांची आठवण करून दिली❤

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 11 วันที่ผ่านมา +42

    ताई तोंडाला पाणी सुटलं,मी मूळची पंढरपूर ची भात सोडून सर्व वरील प्रकार डब्यात आणि घरी पण खाल्ले आहेत,याशिवाय माझी आई कणीची खिचडी करत असे,पण हा मेनू रात्री असे शेगडी वर केला जायचा,त्याच शेगडी वर पापड भाजले की झालं,काय सुख होत ते....😭😭

    • @Kal-1711
      @Kal-1711 10 วันที่ผ่านมา +1

      सेम मी पण पंढरपूर ची.. मूळची

    • @rohinidhopavkar2728
      @rohinidhopavkar2728 10 วันที่ผ่านมา

      Khupach chchan aani gharatach upaladha asalele jinnasache padarth, dhanyawad.

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 10 วันที่ผ่านมา +2

      मी पण पंढरपूर येथील आहे

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 10 วันที่ผ่านมา

      चुरमुरे ल तेल तिखट भोले कडचे आसयच

    • @prafullatatupe5577
      @prafullatatupe5577 10 วันที่ผ่านมา

      लहानपण देगा देवा

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 11 วันที่ผ่านมา +3

    मस्त...लहानपणीचे दिवस आठवले...भाकरी सारखा पोळीचा कुस्करा,तूप गुळ पोळीचा लाडू,लोणचं पोळीचा रोल,कच्चे पोहे(मेतकूट पुडचटणी लावून) ,मुरमुरे असे असंख्य प्रकार ...आठवलं तरी तोंडाला पाणी सुटते

  • @mrunalinigadgil1962
    @mrunalinigadgil1962 11 วันที่ผ่านมา +9

    मला ter अगदी 50 वर्षे मागे गेल्यासारखे वाटले .रोज दुपारी मधल्या velela असेच असायचे खाणे
    लोणच्याच्या kharachi maja. Wa wa

    • @latachaudhari2220
      @latachaudhari2220 11 วันที่ผ่านมา +1

      मीही बालपणात शिरले!

  • @khushism5069
    @khushism5069 วันที่ผ่านมา

    लहानपणीच्या खुप छान गोड पौष्टिक आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻💐🌹
    आताच्या पिढीचं दुर्दैव म्हणजे त्यांना पिझ्झा, बर्गर, चायनीज इत्यादी आरोग्याला घातक असलेले प्रकार त्यांना मनापासून आवडतात, घरचे पदार्थ डाउन मार्केट वाटतात

  • @chandaranikhamkar8408
    @chandaranikhamkar8408 3 วันที่ผ่านมา

    खूप छान मावशी....❤आमची आजी पण आम्हाला असेच पदार्थ करून खायला घालायची....खूप मज्जा होती तेव्हा...अजूनही आठवण आली की आम्ही हे पदार्थ करून खातो...

  • @latajoshi5235
    @latajoshi5235 11 วันที่ผ่านมา +3

    आम्ही लहानपणी असंच खात होतो. काकू तुमच्या पदार्थांमुळे लहानपणीची आठवण झाली 😊

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 11 วันที่ผ่านมา +4

    ताई धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल खरोखरच लहानपणीची आठवण झाली

  • @gargiandshubhra6373
    @gargiandshubhra6373 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤🎉🎉sampoorn video ....ek na ek🎉lahanpanachi aathwan ....Anuradhatai khoop khoop.🙏...Parabhanikar ...

  • @smitadamle849
    @smitadamle849 6 วันที่ผ่านมา +1

    तुमचे व्हिडिओ आणि तुमचा आवाज ऐकणे ही माझी आवडती बाब असते!

  • @aparnahemant
    @aparnahemant 11 วันที่ผ่านมา +2

    वा मावशी, मस्तच❤❤❤❤
    याबरोबरच गुळ दाणे, गुळ खोबरं, जोंधळ्याच्या लाह्यांचा चिवडा , पोळीचा लाडूही आठवला

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 10 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान. मन भरुन आले .लहानपणात रमताना आईच्या आठवणीनी मन भरुन आले.खुप खुप धन्यवाद.

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 6 วันที่ผ่านมา +1

    काय मस्त दाखवलेत .. आजही खरंतर मुलांनी हे खायला हरकत नाहीये.

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 วันที่ผ่านมา

    कीती छान लहानपण आठवल आम्ही पण डब्यातून हेच सगळे पदार्थ नेत होतो वरणाचा गोळा आणि भाकरी तर अगदी आवडीचा पदार्थ होता

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 11 วันที่ผ่านมา +2

    आम्हीही हे सगळं खाल्ले आहे . आताच्या रंगतदार snacks पेक्षाही खुप स्वादिष्ट खाणं असे हे .... धन्यवाद आपण त्या काळात घेऊन गेलात .

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 10 วันที่ผ่านมา +1

    खरंच काकू लहान पणी आठवण झाली.आमही वरणात गूळ आणि तूप पण घालायचं सुट्टी तर चुलत भावंड आत्ये भावंड एकत्र जमायचे कैरी च फुट म्हणजे तात्पुरतं केलेलं लोणचं . लाहयापीठ कालवून लहानपणीची आठवण झाली

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 11 วันที่ผ่านมา

    सुंदर व पौष्टिक सांगितलेत ताई तुम्ही धन्यवाद

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व सुंदर लहानपणीच्या आठवणी धन्यवाद काकू

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 8 วันที่ผ่านมา +5

    खरंच बालपणीचे दिवस खूप आठवले आणि आई बाबां ची खूप आठवण आली 😢

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 11 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आणि हृदयस्पर्शी..!!!!

  • @sunitasonavane925
    @sunitasonavane925 11 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर व्हिडिओ याची गरज होती

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 11 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे जुन्या आठवणींना उजाळा माझी आजी असे प्रकार करत होती

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 11 วันที่ผ่านมา +1

    Agdi nostalgic....maazhya ajole chi athvan....dhanyawaad Anuradha Madam

  • @priyakulkarni3315
    @priyakulkarni3315 11 วันที่ผ่านมา +1

    Khup cha junya aathvani jaagya zalya

  • @kalpanakulkarni8694
    @kalpanakulkarni8694 11 วันที่ผ่านมา

    लहान पणीची खुप खुप आठवण आली चेहेर्यावर गोड हसू आले, खुप खुप धन्यवाद

  • @SandeshaPalve-qt2vp
    @SandeshaPalve-qt2vp 11 วันที่ผ่านมา

    Khup sunder recipes ani balpanichya athvani jagya zalya ajjichi athvan tumhala pahun zali

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 11 วันที่ผ่านมา

    Khupch chhan video aahe.

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 9 วันที่ผ่านมา

    सगळ्या आठवणी ताज्या केल्यात बहुधा तुम्ही व मी एकाच वयाच्या असू असे वाटते कारण या सर्व गोष्टी लहानपणी आई देत असे डब्यातून किंवा मधल्या वेळचे खाणे असे आता मी आजी भूमिकेतून नातवाला करून देते त्याला सर्व आवडते परत हेल्दी फूड पोटात जाते धन्यवाद छान आठवणींना उजाळा दिल्या बद्दल

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. 11 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan aaji amhala asech Jevan milat hote maja yet hoti

  • @sonaliupadhye813
    @sonaliupadhye813 11 วันที่ผ่านมา +1

    Wa wa kya baat hai .Agdi kharay❤❤

  • @nitashah5544
    @nitashah5544 11 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan 👌👌

  • @sunitakudle8108
    @sunitakudle8108 11 วันที่ผ่านมา

    खुप छान लहानपणी चीआठवणकरूनदिलीपल्लवीतुझेव्हीडीओछान 🙏🙏👌👌👍

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 11 วันที่ผ่านมา +2

    मावशी लोंच्याच्या खारात भिजलेली भाकरी किवा चपाती इतक सुंदर लागत आमही ही जिन्नस आई कदून करुन खाल्ली आहे😊😊

  • @shouryathakur6960
    @shouryathakur6960 9 วันที่ผ่านมา

    आप के वीडियो इतने अच्छे रहते है ना
    और सब से अच्छा आप का बात कर ने का तरीका बहुत ही मिठास है ।
    बहुत अच्छा लगता है ।

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 6 วันที่ผ่านมา

    खूप छान अप्रतिम

  • @sampadashirodkar4617
    @sampadashirodkar4617 11 วันที่ผ่านมา

    Direct मधल्या सुट्टीत जाऊन पोचले. खूपच छान.

  • @user-ej5qe2ky2r
    @user-ej5qe2ky2r 11 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर सांगितले मला फार आवडले❤ नमस्कार

  • @darshanaraut2390
    @darshanaraut2390 11 วันที่ผ่านมา

    Thank you Kaku lahanpani chi aathavn aali ha video baghun

  • @vrushalideosthali5783
    @vrushalideosthali5783 11 วันที่ผ่านมา

    खूप छान video .

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 11 วันที่ผ่านมา

    वा खूपच छान जुन्या आठवणी 👌

  • @komalkashikar5444
    @komalkashikar5444 9 วันที่ผ่านมา

    Saglya athwaniche padarth dakhawle aaji. Thank you so much 😊. Khup anand zala pahun

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 8 วันที่ผ่านมา

    फार सुंदर video....

  • @latabhurangi6668
    @latabhurangi6668 11 วันที่ผ่านมา

    Kharch aamhi pan he sarv padarth lahNpani khup khalee kaku khup chhan Vdo lahanpan aaj enjoy kele dhanyavaad

  • @snehaaa6018
    @snehaaa6018 9 วันที่ผ่านมา

    Khoop chan lahanpanachi aathvan aali❤❤

  • @ashwwinipimputkar4540
    @ashwwinipimputkar4540 11 วันที่ผ่านมา +1

    Khup mast

  • @user-gt3pb9xu6r
    @user-gt3pb9xu6r 6 วันที่ผ่านมา

    खरचं तेच जास्त पौष्टिक होते आज पुन्हा एकला बालपण आठवले धन्यवाद

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 11 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर ❤❤

  • @swaminirege8211
    @swaminirege8211 11 วันที่ผ่านมา +1

    Khupach sunder

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 11 วันที่ผ่านมา

    खुप छान पदार्थ

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 11 วันที่ผ่านมา

    Khup suuundar video ajji aajcha 👍👍👍👍👍

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 11 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान

  • @supriyabhurke6946
    @supriyabhurke6946 3 วันที่ผ่านมา

    Khup khup chan

  • @suvarnakulkarni7665
    @suvarnakulkarni7665 6 วันที่ผ่านมา

    फार सुंदर। आम्ही आज पण हे खातो

  • @nehasangle5055
    @nehasangle5055 6 วันที่ผ่านมา

    खूप छान पापड ची चटणी पण मस्त होते

  • @aliceraphael9342
    @aliceraphael9342 6 วันที่ผ่านมา

    Ekdum chhan

  • @vaishaliik683
    @vaishaliik683 วันที่ผ่านมา

    खूपच छान 👌👌

  • @ivonapereira2499
    @ivonapereira2499 11 วันที่ผ่านมา

    खुप छान ताई 👌🏻सुंदर

  • @seapharmacy2413
    @seapharmacy2413 11 วันที่ผ่านมา

    लहानपणी व आता ही मी माझ्या घरात बनवते पण दुपारी घरी कोणीही नसतं म्हणून रात्री करते .मस्त आणि पौष्टिक आहार.🤗धन्यवाद काकी.🙏🙏😊

  • @leenarege136
    @leenarege136 4 วันที่ผ่านมา

    Khup Chan

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 10 วันที่ผ่านมา

    Excellent 👌 Traditional Recipes 😋. Nutritious + healthy.

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 9 วันที่ผ่านมา

    लहान पणीच्या आठवणी जाग्या झाल्या.सुंदर

  • @ketuue5333
    @ketuue5333 7 วันที่ผ่านมา

    Khuup chhan! Nakkich tumchya energy cha rahasya he khaana asnar. Tyat khup prem disun yeta.. ❤

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 10 วันที่ผ่านมา

    खुप मस्त.

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 4 วันที่ผ่านมา

    आजी फक्त रेसिपी च नाही तर तुम्ही तुमच्या लहानपणीचा काळ, तेव्हाच्या गोष्टी आम्हाला सांगा प्लीज. तुम्ही खूप छान सांगता..

  • @manjushakivade1140
    @manjushakivade1140 10 วันที่ผ่านมา

    मी ह सगळे अजूनही खाते आवडीने.. किती छान दाखवल तुम्ही आज

  • @nehapatil8553
    @nehapatil8553 11 วันที่ผ่านมา

    जुनं ते सोनं काकू.
    खूप छान छान पदार्थ.

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 11 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤

  • @ingolikarvishakha
    @ingolikarvishakha 11 วันที่ผ่านมา

    Ek no. kaku . Me pan khalle ahet he sagle prakar. Aathvan aali aaj.
    Ata parat khave asa vattay.

  • @manjiriinamdar85
    @manjiriinamdar85 10 วันที่ผ่านมา

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. छान व्हिडिओ.

  • @ushashirole3102
    @ushashirole3102 11 วันที่ผ่านมา

    Thank you june divas aathawale, aanandane aayushya jaglo ❤❤❤

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye5736 7 วันที่ผ่านมา

    Khup chan vdo / asech vdo send karat ja / Thank you Anuradha tai 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ik1mi1mz6u
    @user-ik1mi1mz6u 11 วันที่ผ่านมา

    Khup chan

  • @sumitshelar6868
    @sumitshelar6868 9 วันที่ผ่านมา

    यातल्या काही रेसिपी आमच्या लहानपणापर्यंतही होत्या. 😊 आजही अधून मधून खातो.👌

  • @bageshrigongale1986
    @bageshrigongale1986 11 วันที่ผ่านมา

    Khupch chhan Anuradhatai❤

  • @sunitasalunkhe5164
    @sunitasalunkhe5164 2 วันที่ผ่านมา

    Ho amhi hi he khup aavadine khaycho...❤❤😊😊

  • @suchitapohare2354
    @suchitapohare2354 11 วันที่ผ่านมา

    खूपच छान काकु . आम्ही पण हे सगळे पदार्थ खाल्ले आहे

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 11 วันที่ผ่านมา

    I also remembered my Childhood and these Things.

  • @rajasyellapurkar1816
    @rajasyellapurkar1816 6 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 11 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर रेसिपीज..आम्हालापण आमची आई शाळेत खूप वेळा गुळ तूप चपाती द्यायची.आम्हा भावंडाचा आवडता पदार्थ..

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 11 วันที่ผ่านมา

    For Reminds thanku❤🎉

  • @sangeetajoshi5925
    @sangeetajoshi5925 10 วันที่ผ่านมา

    Few very important messages given in this video! Best :)

  • @Ramdas-wp1eg
    @Ramdas-wp1eg 11 วันที่ผ่านมา

    Mi Pn Khalle He Pdarth. mast lagtat.

  • @sushmakulkarni8260
    @sushmakulkarni8260 11 วันที่ผ่านมา +3

    खुप छान. Kaku
    अजून एक प्रकार. माझ्या सासूबाई करायच्या. ते म्हणजे शिल्या भाकरी कुस्करून त्यात taak आणि मीठ थोडी साखर घालून. मिरचीची फोडणी टाकायची. अप्रतिम लागतो

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 9 วันที่ผ่านมา

      माझ्या कॅालेजमधल्या मुलीला मी अनेकदा अशी कुस्करलेली भाकरी देते. दह्यात/ताकात कालवून. बाकी सर्व अस्साच. तिच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा खूप आवडायची. म्हणून मी जरा जास्तच द्यायची. चवदार आणि पोटभरीचं खाणं.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe❤😂🎉❤

  • @manjiriargade4388
    @manjiriargade4388 10 วันที่ผ่านมา

    Sunder❤❤

  • @RuchitaShinde-xb9wn
    @RuchitaShinde-xb9wn 7 วันที่ผ่านมา

    Khupach bhari👌👌😋😋😋

  • @BENDRE49
    @BENDRE49 10 วันที่ผ่านมา

    So true. I remember those days

  • @varshachandekarb1315
    @varshachandekarb1315 11 วันที่ผ่านมา +3

    मी पण असच खाल्ले आहे आणि आता पण आम्ही आवडीनी खातो.

  • @vrushalipawar767
    @vrushalipawar767 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान लहानपण आठवलं

  • @mrmadhao
    @mrmadhao 11 วันที่ผ่านมา

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही पण हेच पदार्थ खात असू. खूप छान वाटले. तसेच काही वेळा गोडा मसाला व त्यावर भरपूर तेल घालून पोळी खात असू.

  • @manjulalokanathan3252
    @manjulalokanathan3252 11 วันที่ผ่านมา

    Thanks aunty