Short film of Alegaonkar High school, Khadki. Video made by Mr. Vikrant Argade.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान. शाळेची माहिती बघताना, एकदम भूतकाळात गेलो. सध्या साठीत प्रवेश केलेला आहे, पण शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. आलेगावकर शाळा म्हणजे फक्त खडकीच नव्हे तर पुणे परिसरातील नावाजलेली शाळा. येथे शिकायला मिळाले म्हणजे भाग्यच. मी माझा भाऊ हेमंत, सचिन तसेच माझी बहिण श्यामला ही ह्याच शाळेतून शिकलो.
    शाळेची आठवण म्हणजे सगळे शिक्षक, शाळेतील मित्र आणि शाळेत जी काही धमाल केली ती सर्व. मी 1964 साली प्राथमिक शाळेत 4थी त प्रवेश घेतला. त्या वेळी मुख्याध्यापिका श्रीमती पोळ बाई होत्या, वर्ग शिक्षक बेंडके सर. प्राथमिक शाळेत कनकधर बाई, बळीद बाई, आलेगावकर बाई होत्या. लहान मुलांना कसे वागवायचे हे त्यांना छान माहिती होते.
    5वी ते 7वी किशोर वय, आम्हांला भावे, फुगे, डुंबरे, खोपकर, चिरमुले, साब्दे, अवधूतकर सर होते. छत्रे बाईही त्याच सुमारास आल्या. मुलांच्या शाळेतील त्या पहिल्या स्री शिक्षिका.
    8वी ते 11वी आम्हांला टिळेकर, पटेकर, कोंडे, वैद्य, पुरंदरे, जोशी, इत्यादी शिक्षक होते, बेलसरे बाई, दरेकर बाई, वाडेकर बाई, खानापूरकर बाई होत्या. मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर होते, त्यांची शिस्त कडक होती. त्यांच्या हातचा मार खाल्ला नाही असा एकही विद्यार्थी सापडणार नाही. शाळेत भरपूर मारायला, भरपूर आणि पुरेपूर परवानगी होती. घरी तक्रार केली तर घरून वेगळा मार मिळायचा..
    मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानकर बाई होत्या.. त्यांनी अनेक विद्यार्थीनीना घडवले.
    शाळेचे सुसज्ज ग्र॔थालय होते, अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रे नियमित येत. पाटोळे सर ग्र॔थालय प्रमुख होते. हजारो पुस्तके आणि ग्र॔थ होते. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत. शाळेची शास्त्रीय प्रयोगशाळा ही समृद्ध होती, आम्ही अनेक प्रयोग केले..शाळेचे मैदान मोठे होते.
    आमचे शिक्षक ही आमच्या बरोबर व्हाॅलीबाॅल खेळत असत..
    शाळेचे स्नेहसंमेलन आणि क्रिडामहोत्सव फारच धमाल व्हायचे. अनेक महिने तयारी चालायची. शाळा कलास्पर्धेत ही पुढे असायची. चित्रकला शिक्षक चिंचणकर सर चित्रकलेची तयारी करून घेत. मुलींच्या शाळेला नृत्यात सातत्याने जिल्हा पातळीवर बक्षीसे मिळत. शालेय नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्यात शाळेने अनेक बक्षीस मिळवली.
    ssc झाल्या नंतर शाळेशी संबंध कमी झाला, पण आपलेपण टिकून राहिले. माझ्या वतीने आपल्या शाळेला साष्टांग नमस्कार आणि अनेक शुभेच्छा. नितीन जुन्नरकर. 1973 बॅच.

    • @charudattaalegaonkar7908
      @charudattaalegaonkar7908  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback. Please send your mobile number on my email: charu.alegaonkar@gmail.com
      I would like to talk to you.

    • @dineshkolekar5000
      @dineshkolekar5000 4 ปีที่แล้ว

      👌👌👌👌

    • @dineshkolekar5000
      @dineshkolekar5000 4 ปีที่แล้ว

      👍👍👍👍

  • @m4.11awesomeentertainmentc8
    @m4.11awesomeentertainmentc8 5 ปีที่แล้ว +3

    सर मला अभिमान वाटतो आणि गर्व ही वाटतोय, की आम्ही अश्या ऐतिहासिक भूमी असलेल्या जागेत शिकलो, खेळलो, वाढलो हे क्षण आम्ही अंततः हृदयात ठेवू ।
    श्री. सुदेश लक्ष्मण वाघमारे
    (ग्राफिक डिझाईनर)
    संपादक : साप्ताहिक पुणे अपडेट

    • @charudattaalegaonkar7908
      @charudattaalegaonkar7908  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback. Please send your mobile number on my email: charu.alegaonkar@gmail.com
      I would like to talk to you.

  • @sachinjunnarkar2895
    @sachinjunnarkar2895 4 ปีที่แล้ว +2

    अचानक माळ्यावर पडलेला एखादा जुना अल्बम हातात पडून तो पहाताना आठवणींचे पट उलगडतात तसे काहीसे हा माहितीपट पहाताना वाटले आणि मन भूतकाळात गेले. खरंच किती सुंदर दिवस होते ते.......
    आयुष्यातला फार दीर्घकाळ शाळेत गेला नाही उणीपुरी नऊ वर्ष शाळेत गेली परंतू शाळेतल्या आठवणींची शिदोरी मात्र संपूर्ण आयुष्यभर सोबत राहील. शाळेची इमारत, तिथले शिक्षक, शिपाईवर्ग यांच्याशी एक भावबंध अल्पावधितच निर्माण झाला. शाळेतूनच शिस्तीचे धडे, वाचनाची आणि खेळांची आवड, सभाधीटपणा यांचे बीज शिक्षकांनी उत्तमरित्या रुजवले. प्रसंगी कडक असणारे शिक्षक तितकेच मायेने भरलेले असत. पटेकर सरांचा मुलगा माझा वर्गमित्र पण सरांनी कधी शिकवण्यात व शिक्षेत कधीही भेदभाव केला नाही.
    वर्गात झालेल्या शिक्षेबद्दल घरी बोलण्याची सोय नव्हती ! वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक क्रिडामहोत्सवाची तयारी उत्साहात व्हायची. शाळेत मिळालेली आठवणींची, मित्रांची, शिक्षकांची व संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरेल. शाळेच्या पुढील वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा !
    सचिन जुन्नरकर (१९७५-१९८३)

    • @charudattaalegaonkar7908
      @charudattaalegaonkar7908  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback. Please send your mobile number on my email: charu.alegaonkar@gmail.com
      I would like to talk to you.

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 3 ปีที่แล้ว +4

    Yasmeen Sayyed madam tumchy school cha abhiman vat to ki tumhi ya school Chy aadarsh teacher cha maan patkavala hota,abhinanadan🙏👍

  • @mrs.rupalimadrewar8108
    @mrs.rupalimadrewar8108 4 ปีที่แล้ว +3

    मला अभिमान आहे.. कारण मी ही याच शाळेत शिकले 🙏🚩

    • @charudattaalegaonkar7908
      @charudattaalegaonkar7908  4 ปีที่แล้ว +1

      Thanks for the feedback. Please send your mobile number on my email: charu.alegaonkar@gmail.com
      I would like to talk to you.

  • @ishwarshete2620
    @ishwarshete2620 4 ปีที่แล้ว +3

    मी इश्वर शेटे १९ ८३ ते १९९३ - ९४ पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले आणि पुढे ११व१२ वी टीकाराम कॉलेज ला माझे शिक्षण झाले. मला माझ्या शाळे विषयी फार फार अभिमान आहे.

    • @charudattaalegaonkar7908
      @charudattaalegaonkar7908  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback. Please send your mobile number on my email: charu.alegaonkar@gmail.com
      I would like to talk to you.

  • @rameezshamalik6735
    @rameezshamalik6735 3 ปีที่แล้ว +3

    Yasmin sayyed Madam🙏🏼

  • @iliyaspatel486
    @iliyaspatel486 9 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला घड़ावनारे शिक्षक यांचा उपकार आम्ही कधी विसरु शकनार नाही.
    1985-86 माने बाई
    1886-87 घोरपडे बाई
    1987-88 तोरेकर बाई
    1988-89अध्यापिका बाई
    1989-90 अव्हाड बाई
    1990-91 झवर बाई
    1991-92 झवर बाई
    1992-93झवर बाई - बगाड़े सर
    1993-94 घाड़गे सर
    1994-95 भिसे सर
    माझे आवडते शिक्षक - घोरपडे बाई,जवर बाई, शिंत्रे बाई, डोनकर सर, बगाड़े सर, भिसे सर.
    आणि माझे एडमिशन करुण देणारे एडवोकेट चंद्रकांत छाजेड साहब🙏🏻

    • @charudattaalegaonkar7908
      @charudattaalegaonkar7908  9 หลายเดือนก่อน

      श्री लियास पटेल साहेब,
      मी चारुदत्त आलेगावकर, आपल्या खडकी शिक्षण संस्थेचे संस्थापक, महादेव रामकृष्ण आलेगावकर यांचा नातू. मी आणि आमचे काका डॉ पद्माकर आलेगावकर यांनी ही शॉर्ट फिल्म संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 2013 मध्ये तयार केली होती.
      शाळेबद्दलच्या आणि शिक्षकांबद्दलच्या आपल्या भावना मला लगेच समजल्या.
      24 जुलै हा संस्थापक दिन अजून आपण मराठी शाळेत साजरा करतो. आपला फोन नंबर दिला तर आपण लवकरच शाळेत त्या दिवशी भेटू आणि बोलू.
      परत एकदा आपल्या भावना कळविल्याबद्दल धन्यवाद.
      चारुदत्त आलेगावकर.
      मोबाईल: 9503740662