हवामान अंदाज १४ ऑक्टोबर २०२४ । श्री गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
    दिनांक: १४/१०/२०२४
    ⛈⛈हवामान अंदाज⛈⛈
    👉 येत्या बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर पर्यंत कोकण, खान्देश, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम या भागात दुपार नंतरच्या वादळी पावसाची शक्यता अधिक आहे, उर्वरित विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागातच दुपार नंतरच्या वादळी पावसाची ऍक्टिव्हिटी होईल.
    👉 गुरुवार पासून शनिवार रविवार पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खान्देश, उत्तर व मध्य मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प होईल फक्त कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात वादळी पावसाचे क्षेत्र सुरु राहू शकते. हीच परिस्थिति राहिल्यास २० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघार घेईल अशी शक्यता वाटते. पुढील माहिती बुधवार किंवा गुरुवारी दिली जाईल.
    👉 शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिनुसार रब्बीच्या पेरणी बद्दल निर्णय घ्यावा.
    👉 फवारणी करताना विषबाधा होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी, आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे १५ लिटरचा साधा किंवा १० लिटरच्या पेट्रोल पंपाचे आहे पंप बदल्यास त्या नुसार औषधाचे प्रमाण बदलावं.
    👉 तुरीला तीन अवस्थांमध्ये तीन फवारे देणे अत्यंत महत्वाचे आहे त्या मधील पहिली अवस्था कळी किंवा फुलाची सुरुवात या मध्ये पांडासुपर ३० मिली किंवा इमान १० ग्रॅम +झिंक edat + झेप १५ मिली +१२:६१:० १०० ग्रॅम याची फवारणी अवश्य द्यावी.

ความคิดเห็น • 60