MULSHI - The Most Thrilling Solo Ride Through Dense Jungle!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 870

  • @Tusharrj
    @Tusharrj 5 ปีที่แล้ว +67

    थोड्याश्या तुटपुंजी साठी भविष्य विकून टाकलेलं झळझाळीत वात्सव.. दाखवणारा तुझा हा vlog मनाला थोड्या वेळा साठी सुन्न करून गेला..
    मुळशी पॅटर्न आणि हा तुझा vlog बघून तरी आपली लोक ह्या गोष्टींचा नक्कीच विचार करतील हीच अपेक्षा..

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit 3 ปีที่แล้ว +1

    जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
    तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
    त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
    आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
    पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
    खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
    हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 5 ปีที่แล้ว +37

    लोक चेष्टेने म्हणतात याला एखादा award द्या पण मित्रा तुला खराखुरा Award दिला पाहीजे...
    खुप सुंदर काम करत आहेस..

  • @anilkokare5294
    @anilkokare5294 5 ปีที่แล้ว +165

    खुप छान वाटला हा व्हीडीओ .......जीथे video संपवला ते गाव माझच आहे.....त्या काकू माझ्या मावशी अाहेत........🙏

    • @sanskruti514
      @sanskruti514 5 ปีที่แล้ว +4

      Anil Sheth me pan mulashikar aahe ( maan) bhoirwadi 🙏

    • @sanskruti514
      @sanskruti514 5 ปีที่แล้ว

      ९९२१६०३७०४

    • @MB-nr1oj
      @MB-nr1oj 4 ปีที่แล้ว +2

      Khup Changla Gav aahe tumcha Dada ani Kaku khup Humble Aahet🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sumitchincholkar698
      @sumitchincholkar698 4 ปีที่แล้ว +1

      kaku cha hotel chi location send kru shktos ka google map wr? Maza phone no : 8956399284

    • @nitinkunte2583
      @nitinkunte2583 4 ปีที่แล้ว +4

      Anil are kakuni khup help keli yar Jeevan la.....khup changle loka ahet

  • @amolchavan5774
    @amolchavan5774 5 ปีที่แล้ว +47

    काकूंना बॅग घातलेली पाहून सगळ्यात छान वाटलं😄 1नंबर व्हिडिओ

  • @nileshvaringe9748
    @nileshvaringe9748 5 ปีที่แล้ว +18

    आजचा ब्लॉग पाहून छान वाटल पण त्या दोन्ही मामानी जे सांगितले ते आयकुण मन भरुन आल.
    आणि त्या काकुच्या माणुसकीला सलाम

  • @prasadgurav8275
    @prasadgurav8275 5 ปีที่แล้ว +151

    काकू साठी एक लाईक बनतोच मित्रानो😍👍👍👍👍

    • @vishwajitlahade3800
      @vishwajitlahade3800 5 ปีที่แล้ว +1

      Prasad Gurav

    • @mbg891988
      @mbg891988 5 ปีที่แล้ว +2

      हाऊशी नवशी काकु........

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 5 ปีที่แล้ว

      काकू खरच स्मार्ट आहेत.

  • @fengseamit
    @fengseamit 5 ปีที่แล้ว +44

    14:38 त्या जनावरांचे चेहरे आणि मग ते दोन आजोबांचे चेहरे, आई शपथ काटा आला जीवन ! लेकाहो जमिनी विकू नका आणि विकल्या असतील तर परत विकत घेण्यासाठी कंबर कसा ! - मुळशी पॅटर्न

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 4 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून खूप काही शिकायला सोबतच अनुभवायला मिळत ..
    मी तर दररोज न चुकता तू अपलोड केलेले व्हिडिओज बघत असतो..
    एकदम लई भारी वाटत बघ..
    मूड एकदम फ्रेश होऊन जातो..
    नक्कीच एक दिवस तुझ्यासोबत मलाही गडभ्रमंती करायला यायला आवडेल

  • @naraynzbhaipatil3517
    @naraynzbhaipatil3517 5 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राच अनमोल ठिकान तुम्हि आम्हाला दाखविलं त्या बद्दल खुप खुप आभार

  • @ladamit
    @ladamit 5 ปีที่แล้ว +1

    Video मस्त !!! काकूंना सलाम !!!

  • @sigmatraveltour274
    @sigmatraveltour274 5 ปีที่แล้ว +54

    Can't understand your language, but i am loving your Video :)
    Love from Nepal

  • @mandarnarvekar1940
    @mandarnarvekar1940 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान होता व्हिडिओ तो रस्ता तर फारच भयानक होता पण तू जे मुळशी धरण खुप छान होते आणि त्या काकूला hats off 🙏😍😍 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 5 ปีที่แล้ว +8

    खरच खूप काही बोलून जातो हा वलोग . ऑफिस मध्ये नोटिफिकेशन आल्यापासून उतकंटा होती ... आत्ता घरी जाता जाता पाहतोय 😬 पण बघितल्यावर खरच मस्त वाटलं we love jkv because तू फक्त entertain आणि new places दाखवत नाहीस तर त्या गावातील परिस्तिथी ..राहिणीमान दाखवतो ... मग ते पाणी फाऊंडशन काम किंवा education सिस्टिम असू दे ... बाकी entertain करणारे लाखो चॅनेल आहेत 😐 खरंच गावातील म्हातारी मानस आणि त्यांचं बोलणं मनाला विचार करायला लावणारा आहे 😢
    धन्यवाद खूप सुंदर वलॉग होता
    Thanks for sharing keep it up

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 5 ปีที่แล้ว +18

    दादा ती काकू जेवन मस्त बनवते..आमचा पण तोच अड्डा आहे जेवणाचा...

  • @swapnilnikam4674
    @swapnilnikam4674 5 ปีที่แล้ว +1

    भावा तुजा वीडियो खूप आवडला मुळशी मधे फिरण्याची मज्जाच वेगळी असते त्यातल्या त्यात आदरवाडी, निवे, ताम्हीनी, इथली माडी पिण्याचा आनंद वेगळाच.....

  • @pbj5770
    @pbj5770 5 ปีที่แล้ว +8

    दरवेळेस व्हिडिओ चालू झाल्यावर व्हिडिओ मध्ये पुढे काय असेल ह्याची कुतूहलता असते पन जशी व्हिडिओ संपते मग मन नाराज होतं , मग वाटतं कि व्हिडिओ अजुन मोठी पाहिजे होती
    आणि त्यानंतर परत आम्ही तितक्याच आतुरतेने पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो...
    ग्रेट जीवन भाऊ

  • @radheshyamghadge2584
    @radheshyamghadge2584 5 ปีที่แล้ว +2

    दादा, आज निसर्गाबरोबर त्यातल्या माणसांच्या कथांनी त्या जागेचं खरं दर्शन घडवलं .❤️

  • @alpesh_tandel8675
    @alpesh_tandel8675 5 ปีที่แล้ว +2

    एक नंबर दादा, काय तो जनावरांचा घेतलेला scene आणि ते आजोबा , आणि ते बोललात ते एकच नंबर ... 👌👌 आठवण आली गावाकडची। ... लय भारी

  • @parshuramfunde2873
    @parshuramfunde2873 5 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर मुळशी धरण काय पॅटर्न काय जंगल काय च्यामायला सगळंच लय भारी

  • @sameerbugade2444
    @sameerbugade2444 3 ปีที่แล้ว

    एकदम कडक जीवन दा.. पण त्या आजोबांची कथा एकूण मन भरून आलं आणखी किती गाव नामशेष होणार आणि कधी हे थांबणार काय माहित..😐

  • @shantnubhingardeve1117
    @shantnubhingardeve1117 5 ปีที่แล้ว +59

    व्हिडिओ आवडला पण सुरक्षेच्या दृष्टीने एकट जानं सहसा टाळ खास करुन अश्या ठिकाणी जिथे माणसाची वरदळ कमी असते.... १ लाख subscribers चा टप्पा पुर्ण केलास याबद्दल अभिनंदन .,..येवढा मोठा जनसंपर्क तु तयार केला आहेस.काही लोकांनी तुझे व्हिडीओ पाहुन ट्रेक सुरु केले असतील जे तुला follow करतात . ही मंडळी सुध्दा असं धाडस करतील आणि अपघात घडू शकतो. तु खुप सुंदर उपक्रम राबवतोय ... Brand ambassador आहे या उपक्रमाचा तर थोडी काळजी घे...... जय शिवराय....

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  5 ปีที่แล้ว +26

      हो बरोबर आहे तुमचं, पण आपण अश्याच विचारांमुळे आपण साहसी गोष्टी करायचे टाळतो...पाश्चिमात्य लोक कोणकोणत्या गोष्टींचे साहस करतात त्या मानाने तर आपण काहीच नाही आहोत....आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळानुसार लोकांना तेवढी वैचारिक बुद्धी असायला हवी की कोणती गोष्ट ते करू शकतात आणि कोणती नाही.! बाकी तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण लोक अलीकडे एकच व्हिडीओ बघून कोणती गोष्ट डोळझाकून करत नसतात ते इतरही साधनांचा वापर करतात....

    • @sonudhakane7.576
      @sonudhakane7.576 5 ปีที่แล้ว

      JeevanKadamVlogs बरोबर भावा

    • @mbg891988
      @mbg891988 5 ปีที่แล้ว +2

      सध्याच् युग पहीले सारख नाही मित्रा तुझ्या कडील शुल्लक गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक आहेत..... So b carefull next time .......Dont Go singal Any Danger place.....bye Thanks

    • @Nomad_Mountaineer
      @Nomad_Mountaineer 5 ปีที่แล้ว

      @@JeevanKadamVlogs agdi kharra bollass bhavaa... u r gr8_/\_

    • @vilaspise4043
      @vilaspise4043 5 ปีที่แล้ว +1

      @@mbg891988 बरोबर सर

  • @joshnin11
    @joshnin11 5 ปีที่แล้ว

    १ नंबर !!!! नेहमीसारख यावेळी सुध्दा अप्रतिम शुट केलेस !!! तूझ्यामुळे लोकांना महाराष्ट्रातील नवीन ठिकाणची माहिती मिळतेय , त्या बद्दल आभार !! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस हार्दिक शुभेच्छ्या !!!!

  • @yogeshkawar6639
    @yogeshkawar6639 5 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक वेळेस एक नवीन अनुभव देता तुम्ही दादा आणि locations पण इतक्या छान पद्धतीने दाखविले ते पण एकत्यात, टॅलेंट लागत राव🙏

  • @omkarkadam2755
    @omkarkadam2755 5 ปีที่แล้ว +1

    दादा ज्या ज्या ठिकाणी जाणं शक्य नाही होत त्या त्या ठिकाणी तुझ्या विडिओ द्वारे जायला मिळतं....Thnkuu dada...एक दिवस आम्हालाही तुझ्या सोबत ट्रेकिंग ला जायची संधी मिळेल अशी आशा करतो....

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 3 ปีที่แล้ว

    मला तसं नेहमी फक्त किल्ल्यांचे व्ह्लॉग बघायला आवडतात. राईड वाले व्हिडिओज पाहत नाही, पण हा व्हिडिओ खरंच खूप छान होता. 🙏🏼
    ठाणे, पुणे आणि रायगड भागातील अजून काही किल्ल्यांचे व्ह्लॉग पाहायला मिळतील अशी इच्छा व्यक्त करतो म्हणजे मार्गदर्शन होईल.

  • @prashantmalusare2479
    @prashantmalusare2479 5 ปีที่แล้ว

    दादा तू तैलबैला इथे निसर्ग सौदर्याबद्दल सांगितलस तेव्हा आमच्या गावाकडची आठवण आली असच निसर्ग सौंदर्य आहे ....तुझ्यासारखी भटकंती करायला मला सुद्धा आवडते..त्यामुळे मला खूप आवडला हा व्हिडिओ..

  • @jasper-cg
    @jasper-cg 4 ปีที่แล้ว +2

    This guy is really cool. Speaking with locals so naturally is a unique communication gift. You have made a good point about encroachment of commercial businesses, which will permanently loose the serenity and natural touch. Wonderful video. Thanks for posting!!!

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 4 ปีที่แล้ว

    अरे दादूस कसला बिनधास्त एकटाच गुडूप साठी फिरतोस...मी पाहताना विचार करत होतो की एकटा आहेस की दोघे आहेत पण कसला भारी आहेस तू ... आणि मावशी एक नंबर आहेत हा ...love u all

  • @maheshdeshmukh3384
    @maheshdeshmukh3384 5 ปีที่แล้ว +1

    मुळशीतील लोक खरच प्रेमळ आहेत
    एक नंबर काकू

  • @shivannyas1540
    @shivannyas1540 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा. हे लोक जमिनी देतात, sometimes परिस्थितीमुळे द्यावी लागते. पण अस होऊ नये की एकवेळ सगळीकडे बिल्डिंग हॉटेल कंपनी होतील आणि शेती किंवा काही पिकवायच असेल तर गच्चीवर नाहीतर गॅलरीमध्ये पीक घ्याव लागेल.
    एवढा सुंदर scenery होती अणि त्यात शांतता हे लगेच तिथे construction झाल की लागली वाट.
    उरलेला मुळशीचा निसर्ग कायम असाच राहो.

  • @akshayshinde2.0
    @akshayshinde2.0 5 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा मस्त . तू सत्य परिस्थिती दाखवली. जमीन विकायची नसते राखायची असते.
    .
    .
    तुझं बघून मी पण vloging सुरू करतोय. तुझ्यासारख नाही पण जितकं जमेल तितकं करायचा प्रयत्न करेन .

  • @purvaprabhu1137
    @purvaprabhu1137 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहे व्हिडिओ
    तुम्ही जे स्वच्छता बदल बोलतात ते अगदी बरोबर आहे प्रत्येक काणे आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे पण आपल्या देशात अशी माणसं कमीच आहेत जेवढ परिस स्वछ ठेवू तेवढं आपला निसर्ग सुंदर आणि स्वच्छ राहील ना पण काही लोकांना असं काही समजत नाही आपण कोणाला असं बोल कचरा करू नका तर त्यांना राग पण येतो 🙏🙏🙏माणसाणेचं निसर्गाची वाट लावली आहे

  • @dipaksonawne7495
    @dipaksonawne7495 5 ปีที่แล้ว

    खुप खूप खूपच सुंदर दृश्य दाखवल मला आवडलं आणि काकुचे धन्य वाद मी पण एक निसर्ग वेडा. प्रेमी आहे मला निसर्ग खूप आवडतो

  • @vitthalkathambe411
    @vitthalkathambe411 5 ปีที่แล้ว +1

    कुठेही कचरा टाकून घाण करणे आम्हाला मिळालेल्या अति स्वातंत्र्याचा गैरवापर करतो😊😊 असो विडिओ छान होता.पण सलाम दादा तुझ्या साहसाला 👌🏽👌🏽

  • @vinayakvichare8862
    @vinayakvichare8862 5 ปีที่แล้ว +1

    One man show DADA....EK NO .... You give such a good awarness about our mothersoil.....Thanks .....🙏

  • @archanagore1202
    @archanagore1202 4 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ लॉकडाऊन मध्ये बघीतला खरंच खूप छान वाटले बाहेर पडू शकत नाही पण तु छान फिरवून आणलेस धन्यवाद

  • @amolpadalevlogs6693
    @amolpadalevlogs6693 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान जिवन भाऊ....
    तोड नाही तुम्हाला.........
    महाराष्ट्रचे नंबर वन vloger.....

  • @subhashshetke7532
    @subhashshetke7532 5 ปีที่แล้ว +4

    काकूंच्या माणुसकीला सलाम 🙏

  • @Joshtop_Editz.2008.
    @Joshtop_Editz.2008. 5 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अनुभव घेतला, अस वाटल की आम्ही ही मुळशी धरणाच्या परिसरात आहोत,खुप छान माहिती दिलीत, खुप मस्त वाटलं, Thanks 😊😊😊👍👍✌

  • @samadhanshinde1877
    @samadhanshinde1877 5 ปีที่แล้ว

    मस्त दादा..काकूंनी माहीती दीली खुपच छान ...आणि तुम्ही आम्हाला माहीती दीली तुमचेही आभार

  • @tanajishinde9696
    @tanajishinde9696 5 ปีที่แล้ว +1

    एक नंबर आहे आपली मराठी माणसं मदत करता very nice

  • @chetanomle1991
    @chetanomle1991 5 ปีที่แล้ว

    छान विडीयो मित्रा खुप खुप चांगला संदेश दिलास शेतकऱ्यांना
    खुप चांगल काम आहे प्रत्येक वीडियो मधुन जनजागृति करतोस सलाम तुझ्यासाठी

  • @abhijittankar5702
    @abhijittankar5702 5 ปีที่แล้ว

    दादा लय भारी एकदम खतरनाक आणि खुप काही शिक्षण्यासारखे पण आहे या विडिवो मधे. धन्यवाद दादा असच नविन विडिवो येऊ देत आणि हो काळजी घे घनदाट जंगलात एकट्या ने प्रवास करणे खुपच भितीदायक आहे.

  • @anujakulavmode836
    @anujakulavmode836 4 ปีที่แล้ว +1

    निसर्ग विषयी प्रेम खूप आवडलं

  • @maheshmahajan1711
    @maheshmahajan1711 4 ปีที่แล้ว

    JIVAN KADAM
    , LAYI BHARI MULASHI TRACK.
    YOUR TALKING IS FEELS VERY REAL.

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 4 ปีที่แล้ว

    खूप छान हा video, पाहूण फार सुंदर वाटलं. खरच मित्रा तु खुप चांगले काम करत आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @swarangikumbhar3963
    @swarangikumbhar3963 5 ปีที่แล้ว +1

    ताे जंगल तर खूप खतरनाक हाेता .मी घाबरली बाकी video झकस ,1.no हाेती भावा 😍😍😍👌👌👌🏻ani kaku tre bharich

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 5 ปีที่แล้ว

    Khup bhannat aani bhari video sir. Khup samajik sandesh dilet tumhi. Kharach lok aaj Kal Nokri, paisha sathi shahrakade yetat pan kuthe na kuthe Tari savta chya gavacha suddha vichar Kela pahije. Tyamulhe jangla surakshit rahtil n prani suddha. Aani paryatan sthalh svaccha thevnyacha sandesh suddha uttam hota. Nehmisarkhacha harvun vhayla zal video baghtana. 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @prashantvarak6015
    @prashantvarak6015 5 ปีที่แล้ว +5

    जिंकलास तू जीवन दा नादच खुळा लय भारी euuu जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @sharadsk9124
    @sharadsk9124 5 ปีที่แล้ว

    त्या काकूचे मनमोकऴ झाले.. तूज्यामूळे त्यानाही पून्हा जगन्याचा आनंद मीऴाला बग ...खूपच छान

  • @siddheshpanajkar1273
    @siddheshpanajkar1273 4 ปีที่แล้ว

    दादा हा एकदम मस्त व्हिडिओ आहे मुळशी धरणाच्या पाण्यात मिसळून गेलो असेच वाटले

  • @pankajnevase3405
    @pankajnevase3405 5 ปีที่แล้ว

    'जिवन' जगणे म्हणजे हे. Mitra geli 20 varsh mulshi madhe rahat ahe. Khup Chan vatl ki tu mulshi explore karnyasathi alas. Mi Magil 3 year pasun trekking karat ahe. Sataryamadhil Ajinkytara pasun suru zalela pravas ajun tasach chalu ahe. Tuze videos he mazya trekking sathi khup upyogi astat. Ekhadya mohime vr nakki bhetu.

  • @shri_jyotirlingdevtrust_padali
    @shri_jyotirlingdevtrust_padali 5 ปีที่แล้ว

    जीवन एक नंबर वलोग झालाय.. खूप पैलू आहेत याला...
    तू ज्या वाऱ्यात सापडला त्याच वादळात आम्ही सापडलो प्रचीतगडवर. शनिवारी रात्री

  • @jaymaharashtra4965
    @jaymaharashtra4965 5 ปีที่แล้ว

    Kharch khup changla Kam aahe tuz .......outstanding.... tulakharach award bhetayla pahije

  • @abhinaynaik5168
    @abhinaynaik5168 5 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी विडिओ आहे
    ही सर्व ठिकाणं इतकी आपल्या जवळ असून सुध्दा आपल्याला माहीत नाही आणि जाता सुध्या येत नाही😢😢

  • @Mahesh_naik100
    @Mahesh_naik100 5 ปีที่แล้ว

    खूप छान ठिकाण दाखवले आणि थरारक धाडस केल्याबद्दल धन्यवाद 😁😎

  • @surajbhor8524
    @surajbhor8524 5 ปีที่แล้ว +2

    Kharokhar Dhokyachi Ghanta aahe re.....Khup mast....

  • @kishorkhot4622
    @kishorkhot4622 5 ปีที่แล้ว +1

    Dada kadak.....1no.....
    Vavar hay tar power hay.......

  • @akshatakochrekar3532
    @akshatakochrekar3532 4 ปีที่แล้ว

    खूपच छान..........काकूंचं मनापासून कौतुक

  • @nandkishorpawar2964
    @nandkishorpawar2964 4 ปีที่แล้ว

    नैसर्गिक सुंदरत। ...........
    धन्यवाद .....

  • @shirishmokale2263
    @shirishmokale2263 5 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आपण फॅन झालो राव...💐💐💐💐

  • @jaykadam8474
    @jaykadam8474 5 ปีที่แล้ว

    खरं आहे.. निसर्गाच्या..श्रीमंती पेक्षा.. दुसरी कोणतीच श्रीमंती नाही .शहराकडे...किती.कमवा..घर,car , 💰 तरीही मनुष्य.. निसर्गात शांतता आणि देव शोधायला .जातो🌍🌎समुद्र-वसने देवि, पर्वत-स्तन-मंडिते ।
    विष्णु-पत्नि नमस्तुभ्यं, पाद-स्पर्शं क्षमस्व मे ॥

  • @gauravbirar5328
    @gauravbirar5328 5 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रा ची शान जीवन कदम love u Bhau

  • @kshitijpatil8139
    @kshitijpatil8139 5 ปีที่แล้ว

    जबरदस्त video भावा.. बुशी dam ला मी 2015 मध्ये visit मारली होती. काकूंना सलाम मदत केल्याबद्दल. कोणता रस्ता कुठे जातो हे सर्व काही माहीत पडले. बाकी video एक नंबर.👌👌👌

  • @avinashkhedkar1640
    @avinashkhedkar1640 5 ปีที่แล้ว +2

    I have been to Lonavala and Mulshi number of times; and always wanted to take that route from Mulshi to Lonavala. Many local people suggested not to go because of terrible roads and so I never dared to go.
    Now after watching your vlog I am motivated to go for drive on that route. I should DARE!! Thanks for such a nice vlog.

  • @vishnusalgaonkar1578
    @vishnusalgaonkar1578 5 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे.. एकच नंबर 👌👌 आणि अश्या काकू भेटल्या पाहिजे राव कधीतरी 😅

  • @sonalirawade7970
    @sonalirawade7970 5 ปีที่แล้ว +36

    भाऊ आमच्या गावाला आल्या बद्दल धन्यवाद I LOVE MULSHI

    • @chandrakantgurav1305
      @chandrakantgurav1305 5 ปีที่แล้ว +3

      gao chi manasa jamin vikun challet tyanna thambva jara magacha mhana amcha gao

    • @sagarhulawale6922
      @sagarhulawale6922 5 ปีที่แล้ว +1

      @@chandrakantgurav1305 tu bagayla ala hota ka kiti jamini viklyat ajun pn 90% shetkari mulshi madhic ahet ane sheti kartat yeun bg jra nit

    • @sagarhulawale6922
      @sagarhulawale6922 5 ปีที่แล้ว

      Rawdya madhi rahatis ka sonali tu

    • @djsofficialstudio724
      @djsofficialstudio724 5 ปีที่แล้ว +1

      👑आम्ही मुळशीकर👑

    • @Jitin123_Raftaar
      @Jitin123_Raftaar 5 ปีที่แล้ว

      तुमी मूडशकार पण ९५ %जमीनी विकल्या आणी सगले यूवान सहरात

  • @vijaykedari6433
    @vijaykedari6433 5 ปีที่แล้ว

    भावा एकचं नंबर .जंगल ठिकाणी जायच असेल तर ऐखादा मित्र जोडीला घ्यावा .❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 4 ปีที่แล้ว

    खूपच छान जीवन. तू माहिती चांगली सांगतोस 👌👌👌

  • @Chetansawant609
    @Chetansawant609 5 ปีที่แล้ว

    खूप छान मस्त ब्लॉग होता खूप सुंदर आहे तुझा मुळशी पॅटर्न ...

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 5 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त भाऊ ✌️✌️✌️ मुळशी पॅटर्न आवडला तुमचा ,😇👨‍👩‍👦‍👦

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 5 ปีที่แล้ว

    मस्तच....पण प्रवास अर्धवट झाला तुमचा ...पुढचे खूप मस्त नजारे मिस केलेत...तुम्ही मुळशी(ताम्हिणी घाट) -लोणावळा रोड पर्यंतच आलात...बाकी तुमचा ब्लाँग नेहमीप्रमाणे भारी...

  • @ojastarkase3935
    @ojastarkase3935 5 ปีที่แล้ว

    खूपच छान जीवन कदम भाऊ 👌👌 तू ज्याप्रकारे न घाबरता vlogging करतो त्यासाठी तुला सलाम 👍👍 मि मुंबईकर निखिल चे पण राइडिंग वीडियो बघतो पण तुझा हा वीडियो बघून आपलेपण् वाटले .. कोणीतरी आपल्यामधला वीडियो बनवत आहे असे वाटले 👌👌👌

  • @NITESHPATIL-ue8us
    @NITESHPATIL-ue8us 5 ปีที่แล้ว +1

    आज एकटं वयं!खरंच खूप मस्त विडिओ.🕺🏃🕵️🙏

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog 5 ปีที่แล้ว

    जीवन साहेब ट्रेकच्या माध्यमातून स्वच्छता संदेश, खूप छान जीवन साहेब

  • @dipakshelake3245
    @dipakshelake3245 5 ปีที่แล้ว

    स्थानिकांच्या वेथा तुम्ही छान बध्धतिने मांडल्या. हे वास्तव आहे ग्रामीण भागातील...

  • @shaileshkadav2637
    @shaileshkadav2637 5 ปีที่แล้ว

    Nice bhai.khup chan.... tuzyamule kahi navin paryatan sthalanchi mahiti milte thanks aani kakula hi thanks

  • @nitinpatilvlogs8703
    @nitinpatilvlogs8703 5 ปีที่แล้ว

    1 no जीवन भावा
    आजचा वलोग्स खूपच सुंदर होता.
    अस वाटत होतं की प्रत्यक्षात मीच आज तिथे.
    🤘🤘🤘ईऊउ.....

  • @nooneedd7656
    @nooneedd7656 5 ปีที่แล้ว +1

    Mr. Jeevan , khup chhaan vlog aahe. Tumchi pratyek frame khup Sundar Hoti. And you are lucky that you could spot the Shekaroo. Few days back, I read an article about you in Loksatta. Congratulations to you for becoming a successful TH-camr.

  • @gaupadwal1
    @gaupadwal1 5 ปีที่แล้ว +1

    नमस्कार जीवन भाऊ, लवकरच एक हेल्मेट माऊंट लावाच... बाकी व्हीलॉग अप्रतिम... पनवेल ते लोणावळा आणि पुढल्या प्रवासातल्या पर्यटन स्थळांची ओळख ही उत्सुकता वाढवणारी आहे. जंगल सफारी खूप म्हणजे खूप भयावह वाटली... आणि त्यापेक्षाही गावकऱ्यांची दयनीय कथा..😢
    मुळशी धरण इस जस्ट अमेझिंग!!!💐
    आता फक्त एक कमी जाणवत आहे... ड्रोन!!!

  • @pritamwalgude4917
    @pritamwalgude4917 4 ปีที่แล้ว

    ह्या लॉक डाउन मध्ये तुझे व्हीलॉग बघून स्वतःच्या आत लपलेल्या भटक्याला तूर्तास शांत करतोय 👍👍👌👌

  • @sanmaynaik2094
    @sanmaynaik2094 5 ปีที่แล้ว +1

    जीवन दा आज चा वलॉग्स माझा आवडता वलॉंग होता आणि मी तुझा खूप मोठा फॅन आहे

  • @sandeepjape4825
    @sandeepjape4825 5 ปีที่แล้ว

    सादरीकरण खूप उत्तम आहे मित्रा तुझे.

  • @kiranchorage8929
    @kiranchorage8929 5 ปีที่แล้ว

    व्हिडिओ एकच नंबर झाला आहे 👌Full on राडा राडा राडा ✌निसर्गाचा एक वेगळे सुंदर दुश्य पाहिला मिळाले 👌नुसता ईउऊ.....⛳

  • @sagar_kadam
    @sagar_kadam 4 ปีที่แล้ว

    Mulashi maj gao...... Mulashi cha naad karayacha nhi bhau.... No overtaking please..... Mulashi gramast tumache swagat karate...👍👌😍😍

  • @lokeshjain761
    @lokeshjain761 5 ปีที่แล้ว

    Dada tuza video ala ki ekdam bhari wat. Diwbhar kitihi Tension asla tar tuza video phahila tar tension ekdam dur hota ani mood ekdam positive hota... ani bharich .... asech video banwat ja dada...... we love you.................

  • @prasadj3388
    @prasadj3388 5 ปีที่แล้ว +11

    जीवन भाऊ चा पॅटर्न च वेगळा आहे

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 5 ปีที่แล้ว +3

    जीवन दादा महाराष्ट्र सरकार निसर्ग रम्य असे जे ठिकान आहे तिथे कोणतेही रोड मोठे करु नका ज्याणी कोनी जमीनी घेतल्या असतील त्या फारेस्ट मधे टाका

  • @shankarjoshi7578
    @shankarjoshi7578 4 ปีที่แล้ว

    Dada ek no yr ......khuuuup mast vatala ha vlog bghun.... 😊👌🏻👌🏻

  • @akshaytaywade218
    @akshaytaywade218 5 ปีที่แล้ว

    Khatrnak... खूप छान दादा लोकेशन अगदी खूप सुंदर आहे....

  • @random_minds
    @random_minds 4 ปีที่แล้ว +1

    Bhavaaa...tu kharokhar vlogs krun, ewdhe "kadam kadam" chalun, aplya nature la "jeevan" detoy...we truly appreciate ur hobby and efforts..keep it up bro

  • @barbarik1942
    @barbarik1942 4 ปีที่แล้ว

    काकू लय जोरात... मस्त वाटलं बघून

  • @nitinkunte2583
    @nitinkunte2583 4 ปีที่แล้ว

    Jeevan ha video khupach Thriler n mastt hota ani Risky pan hota kalji ghet ja....kakuni khup help keli so thanks kaku

  • @pravikale7826
    @pravikale7826 5 ปีที่แล้ว

    जबरदस्त 👌👌
    Keep it Up bro.....!

  • @omkarsathe9097
    @omkarsathe9097 5 ปีที่แล้ว

    कडक भाऊ पुढच्या वेळी वांद्रे गावापाशी दरी आहे मोठी ती बग भारी आहे ती पण

  • @pankajmandale9100
    @pankajmandale9100 5 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त video...खूप आवडला.

  • @FanOfHeatedDebates
    @FanOfHeatedDebates 5 ปีที่แล้ว

    भाऊ नेहमी सारखी एकदम कडक होता चित्रपट😘.... आणि काकूंना आमच्या कडून पण धन्यवाद 🙏

  • @atulalhade496
    @atulalhade496 5 ปีที่แล้ว

    खुप छान ब्लॉग होता हा ...असेच नवनवीन वीडियो बनवत जा

  • @Nomad_Mountaineer
    @Nomad_Mountaineer 5 ปีที่แล้ว

    lay bhari lay bharii aapla Jeevan bhau jaggat bhariiii......!!!