Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 06 | Sudhir Moghe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • कवितेचं पान । काव्यश्राव्य मालिका । भाग : ०६
    एक संग्रह आणि त्यातील निवडक कविता
    आजचा कवितासंग्रह : पक्षांचे ठसे
    कवी : सुधीर मोघे
    सादरकर्त्या : मधुराणी गोखले - प्रभुलकर
    Concept | Voice Over : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Graphic Design : Rujuta Kalyankar
    Editing : Deepak Kolekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

ความคิดเห็น • 103

  • @nehajoshi2496
    @nehajoshi2496 4 ปีที่แล้ว +5

    TH-cam वर एकदाच लाईक करता येतं म्हणून, नाहीतर या भागाला शंभरदा लाईक केलं असतं!

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว +10

    शब्दांना ही कोड पडांव ,एवढी गोड माणसं असतात ...... केवढं आपलं भाग्य असतं , जेव्हा ती आपली असतात !

  • @purushottam647
    @purushottam647 5 หลายเดือนก่อน

    २०१४ सालची गोष्ट! अमेरिकेतील बे एरियातील मराठी मंडळींनी सुधीरजींच्या कवितेवर २-३ तासांचा स्थानिक कलाकारांनी संगीत बद्ध नितांतसुंदर कार्यक्रम सादर केला होता.

  • @nikhilkhamkar4589
    @nikhilkhamkar4589 4 ปีที่แล้ว +3

    बापरे!! कविता इतक्या सुंदर आहेत आणि त्या तुम्ही इतक्या भावपूर्ण सादर केल्यात की माझे मन ध्यानात लागले. अक्षरशः मी एका वेगळ्याच अवस्थेत निघून गेलो होतो. डोळे बंद करून जगाला विसरून या कवितांवर आपण ध्यानस्थ होऊ शकतो!! तुमचे खूप खूप आभार मधुराणी mam!! 🙏🙏🙏😊

  • @madhuridongare4753
    @madhuridongare4753 4 ปีที่แล้ว +4

    सुधीर मोघेंच्या कविता अाणि त्यात मधुराणीचे सुश्राव्य गायन,,,,अतिशय गोड,मधाळ अावाज अाहाहा,,,दुग्धशर्करा योग,, अप्रतिम....

  • @nileshsamant81
    @nileshsamant81 4 ปีที่แล้ว +4

    तुमच्या कडून कुठल्याही कविता ऐकताना जास्त प्रभावशाली वाटतात. धन्यवाद या उपक्रमाबद्दल. जसे पूर्वी चे रेडिओ वरचे कार्यक्रम ऐकताना मजा यायची तीच मजा अनुभवायला मिळत आहे पुन्हा. 😊🙏

  • @ramesh3006
    @ramesh3006 ปีที่แล้ว

    फारच सुंदर.एकापेक्षा एक वरचढ कवी,कविता,आशय,वेळ आणि मधुराच गोड वाचन/सादरीकरण.
    मनापासून धन्यवाद.
    रमेश वालावलकर

  • @madhurisathe425
    @madhurisathe425 4 ปีที่แล้ว +8

    मधुराणीजी हा एक खूप चांगला उपक्रम सुरू केलाय. तुमच अभिवाचन अप्रतिम. मी माझ्या सख्यांना आणि माझ्या परदेशस्थ मुलीलाही आवर्जून पाठवते. पुढे तेथील मराठी मंडळाच्या गृपवर काव्यश्राव्य चे भाग पोचतात. मराठी तिथल्या मराठी मुलांसाठी , त्यांच्यात मराठी भाषेचा अभिमान जागवण्यासाठी हा सिलसिला नक्कीच मोलाची कामगिरी बजावेल.
    पुन्हा मनःपूर्वक धन्यवाद .

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว +6

    वा , मधुराणी .... खुप छान गायलीस, ❤❤❤❤❤सुधीर मोघे माझे आवडते कवी 👏👏👏👌👌👌👌❤❤

  • @mazakatta3656
    @mazakatta3656 4 ปีที่แล้ว +6

    पुन्हा पुन्हा धन्यवाद,
    दाटून आलेल्या संध्याकाळी,
    अवचित सोनेरी ऊन पडतं,
    तसंच काहीसं पाउल न वाजवता
    आपल्या आयुष्यात प्रेम येतं।
    माझी अत्यंत आवडणारी कविता.
    आणि रांगांवर आधारित कविता म्हणजे पर्वणीच
    Thank-you madam,

    • @vrishaleekulkarni2135
      @vrishaleekulkarni2135 4 ปีที่แล้ว

      मधुराणी इतकं भावपूर्ण काव्य वाचन करावं तर ते तुम्हीच अखेरच्या कवितेने खूप काही दिले जे शब्दांच्या पलीकडले आहे

  • @vaibhavjadhav4183
    @vaibhavjadhav4183 4 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर अनुभव होता. सुधीर मोघे हे माझे आवडते कवी त्यामुळे पक्ष्यांचे ठसे हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. तुमच्या मधुर आवाजात या कविता ऐकताना छान वाटलं

  • @vaishalisalunkhepatil4064
    @vaishalisalunkhepatil4064 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast kavita hotya. Pakshyanche thase nahi umatat pn antakaranat kavitanche thase nkkich umatale taisaheb

  • @sandhyaprabhudesai3782
    @sandhyaprabhudesai3782 4 ปีที่แล้ว +2

    खरच एकमेकांना भेटता येत नाही अश्या वेळेस तुझ कविता वाचन म्हणजे हिरवीगार सुखद हिरवळ वाटते.मन पुन्हा नवे होईल अस वाटतय अशी खरच खात्री वाटते

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 4 ปีที่แล้ว +4

    गदिमांचे खरे वारसदार.

  • @TheShashin
    @TheShashin 4 ปีที่แล้ว +5

    अध्यात्म्य आणि आविष्कार यांच्या संयोगातूनच अशा व्यक्ती जन्माला येतात. त्या अदभुत तर असतात आणि आहेतच परंतु अतर्क्य ही आहेत. असे मला वाटते.

  • @nitintapas4252
    @nitintapas4252 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर मालिका. पुढील भागाची आतुरतेने वाट बघत असतो मी. अभिनंदन.
    भाग 6 चे शीर्षक बघून मन खट्टू झाले, पक्ष्यांचे ठसे असे हवे, कृपया या कडे लक्ष द्यावे ही विनंती

  • @ashokhavaldar2561
    @ashokhavaldar2561 4 ปีที่แล้ว +1

    मधुराणीजी,
    या निरस एकाकी दरवाजा बंद लाॅकडाउन मध्ये या कवितेने जीवन सरस केले. कविता आणि तिचं जग किती छान उलगडता. पावसाची रीप रीप विसरूनच गेलो. रोज नेमाने हे कवितेचं पान ऐकतो.
    *" मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभर.."* या सुधीर मोघे यांच्या ओळी आठवल्या या भेसूर कोरोना काळात. मला वाटलं होतं यावरची कविता द्यावी की पावसावरची. पण अचानक असं वाटलं की मधुराणी ने अमृता प्रीतम इतर हिंदी कविता या पानावर आणाव्यात..
    अमृता प्रीतम नाव ऐकलं आणि गुगल करताच समोर पहिली हिच कविता आली.
    54/2018
    *मी तुला परत भेटेन...!*
    मी तुला परत भेटेन.
    कुठे? कशी ? माहित नाही.
    कदाचित,
    तुझ्या कल्पनांची,
    प्रेरणा बनून,
    तुझ्या कॅनव्हासवर,
    एक गूढ रेषा होऊन,
    शांतपणे तुला पहात राहिन.
    मी तुला परत भेटेन.
    कुठे? कशी? माहित नाही.
    सूर्याचं तेज बनून,
    तुझ्या रंगात मिसळून जाईन.
    किंवा रंगांच्या कुशीत जाऊन,
    कॅनव्हासवर लोळत पडेन.
    माहिती नाही कधी? कशी?
    मी तुला नक्की भेटेन.
    किंवा एक स्रोत बनून,
    जसं निर्झराचं पाणी उडतं,
    मी थेंब बनून तुला भिजवेन.
    आणि एक शीतल अनुभूती,
    तुला मिठीत देईन.
    मी तुला परत भेटेन.
    कुठे? कशी? माहित नाही.
    मला दुसरं काही माहिती नाही,
    पण एवढं माहिती आहे,
    काळ माझ्याशी जे करेल,
    ते जन्मभर पुरेल.
    हे यौवन ओसरेल,
    तसं सारंच संपून जाईल.
    पण आठवणींचे धागे.
    विश्व क्षणासारखे असतात.
    त्या क्षणांना वेचेन,
    धाग्यात गुरफटून घेईन
    मी तुला परत भेटेन.
    कुठे? कशी? माहित नाही.
    मी तुला परत भेटेन.
    अमृता प्रीतम
    अशोक हवालदार ( अनुवाद )
    बंगलोर.
    9271231344
    ashokhavaldar@gmail.com
    आज शनिपार च्या साप्ताहिक बैठकीत या कवयित्री वर चर्चा झाली. तिच्या साहित्य प्रवाहात सर्व न्हाऊन निघाले. हा अनुवाद मी सादर केला. माझा प्रयत्न प्रभावी नसेल पण या कवितेने मोहिनी घातली आणि हा अनुवादाचा पहिलाच अनुभव घेतला.
    91/2017
    *एक पाऊस....!*
    एक पाऊस,
    असा आला.
    सर्वांना एक,
    करून गेला.
    ना जात.
    ना पात.
    ना मंदिर.
    ना मस्जीद.
    एक माणूस,
    करून गेला.
    एक पाऊस,
    असा आला.
    सर्वांना एक,
    करून गेला.
    ना अमीर.
    ना फकीर.
    ना उच्च.
    ना नीच.
    सार्‍या भिंती,
    तोडून गेला.
    एक पाऊस,
    असा आला.
    सर्वांना एक,
    करून गेला.
    ना आपला.
    ना परका.
    आज वाटलं,
    एक घरका.
    प्रत्येक हात,
    होता मदतीला.
    एक पाऊस,
    असा आला.
    सर्वांना एक,
    करून गेला.
    एक पाऊस,
    मित्र झाला.
    माणूसपण,
    शिकवून गेला.
    एक समाज,
    बांधून गेला.
    एक पाऊस,
    असा आला.
    सर्वांना एक,
    करून गेला.
    अशोक हवालदार, बंगलोर.
    काही वर्षांपूर्वी मुंबईत पडलेला तो पाऊस आठवला.
    9271231344
    ashokhavaldar@gmail.com

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว +2

    शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुख ही नसते ! ते वाहतात ओझे ...जे तुमचे आमचे असते❤❤ही सुधीर मोघे यांची कविता मला हा कार्यक्रम ऐकताना आठवली!

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 4 ปีที่แล้ว +1

      हो अगदी.... ह्यातल्या ओळी काही घ्यायला हव्या होत्या.... फार सुंदर

  • @manjushadixit8709
    @manjushadixit8709 4 ปีที่แล้ว +1

    मधुराणी सुधीर मोघे माझे पण खूप आवडते कवी, यातल्या बऱ्याच कविता तोंडपाठ होत्या पण तरी तुझ्या आवाजात ऐकायला खूप छान वाटल्या.गाणी अप्रतिम म्हंटली..

  • @sudhirbokil
    @sudhirbokil 4 ปีที่แล้ว +3

    सुधीर मोघे यांच्या कवितेत एक आतला आवाज ऐकू येतो

    • @sudhirbokil
      @sudhirbokil 4 ปีที่แล้ว

      आवाजाबद्दल प्रश्नच नाही, सादरीकरण सुंदर!

  • @amitmali3009
    @amitmali3009 4 ปีที่แล้ว +2

    स्पृहा जोशी, क्षितिज पटवर्धन यांच्या बरोबर episode करावा ही विनंती

  • @paragsb
    @paragsb 4 ปีที่แล้ว +3

    बा भ बोरकर, सुरेश भट, ग्रेस यांच्या कविता घ्या पुढच्या वेळी जमलं तर...
    बाकी उत्तम आहे वाचन
    नदीत पाय टाकून मस्त किनाऱ्यावर बसलोय
    आणि मनात एक गुंगून टाकणारी शांतता व्यापलीये असं वाटतं शेवटी आणि मन ही त्या काव्य नदीवर तरंगत तरंगत आपल्याच जगात हरवून जातं

  • @anushreekharkar4860
    @anushreekharkar4860 4 ปีที่แล้ว +1

    तुमचं काव्यवाचन अप्रतिम .दोन कवितांमधला विराम तितकाच गरजेचा

  • @mashwini
    @mashwini 4 ปีที่แล้ว +1

    aphaaT sundar kaarykram Madhurani,phaar phaar phaarach taral vaachan kela aahet tumhi!
    khoop kaarykram karaa,khoop shubhechchhaa!!

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 ปีที่แล้ว

    वा. मघुरणी...❤
    मला तू खूप आवडतेस...❤❤

  • @shabdalu
    @shabdalu 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर ताई... कण भर चुकून ही आभाळभर सजा असते.... 👍

  • @shwetakarlekar122
    @shwetakarlekar122 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर... अप्रतिम ... पक्षांचे ठसे..शेवटची कविता तर फारच सुंदर

  • @prajaktajadhav7350
    @prajaktajadhav7350 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद!!
    विविध कवींशी ओळख करून देण्यासाठी..🌸

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 ปีที่แล้ว +1

    सखी मंद झाल्या तारका... उत्कट 👌

  • @sushamajumade1233
    @sushamajumade1233 4 ปีที่แล้ว +1

    कवितावाचन फक्त तूच करावं.......सुंदर केवळ

  • @sunildeshmukh1202
    @sunildeshmukh1202 4 ปีที่แล้ว +1

    कवितेची निवड आणि प्रस्तुती अप्रतिम. वाचनातून प्रसंग नरजरेसमोर उभा करतेस हे तुझ्यातील अभिनेत्रीचे यश. दोनदा ऐकून ही परत ऐकावेसे वाटते.

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว +3

    पावसाचं बॕकग्राऊंड म्युझिक ऐकू येतयं गं! काव्यश्राव्याचा हा ओलावा भावून गेला गं मधुराणी!

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว +1

    सदाबहार यमन!...हे ..मन!वा!

  • @ganeshshelar6210
    @ganeshshelar6210 4 ปีที่แล้ว +1

    कवितेचे पान आणि काव्य श्राव्य या लडिवाळ कार्यक्रमाने मराठी साहित्यप्रेमी रसिकांवर माेहिनी घातली.....

    • @kamleshhajare6314
      @kamleshhajare6314 2 ปีที่แล้ว

      आई कुठे कुठे काय काय करते ? खुप अप्रतिम

  • @Sk-zy5mx
    @Sk-zy5mx 3 ปีที่แล้ว

    Mam khupch chhan 😊😊😊😎😎😎😎

  • @nikhilkulkarni1317
    @nikhilkulkarni1317 4 ปีที่แล้ว +1

    वा खुपच छान...कवितही आणि काव्यवाचनही

  • @pragatikadu4747
    @pragatikadu4747 4 ปีที่แล้ว +2

    मधुराणी ताई सर्व कविता तुम्ही उत्तम निवडल्या....मला वाटतं यातील जास्तीत जास्त कविता मुक्त छंदातील आहे . बरोबर आहे का माझा?

  • @neelatare9755
    @neelatare9755 4 ปีที่แล้ว

    मधुराणी , तुझे काव्यश्राव्यचे सगळे एपिसोडस मी आवर्जून बघितले. पुढची series करशील तेंव्हा शांता शेळकेंच्या काव्यसंग्रहातील कविता तुझ्या आवाजात ऐकायला खूप आवडतील.
    मी, माझी मैत्रीण विद्या आणि तिची आई इकडे New Jersey मध्ये एक वेळ ठरवून I pad वरती एकत्र ऐकतो आणि खूप enjoy करतो. तुला खूप शुभेच्छा!

  • @VilasSali
    @VilasSali 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌
    कवि, त्यांच्या कविता
    आणि तुमच काव्य वाचन,
    सर्व काही अप्रतिम 👌

  • @shraddhaburle5224
    @shraddhaburle5224 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @sanjaychaudhari8437
    @sanjaychaudhari8437 4 ปีที่แล้ว +6

    पक्ष्यांचे ठसे ... तुम्ही अधिकच गडद केले
    कवितेसाठी कविताच ... !

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 4 ปีที่แล้ว

    खूप छान उत्तम कविता व उत्तम वाचन.
    खूप आनंद झाला आहे.
    ❤🌹❤🌹❤🌹❤

  • @HarshadKalbhor
    @HarshadKalbhor 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan........

  • @latachavan4277
    @latachavan4277 3 ปีที่แล้ว

    Aprtim ...

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +5

    कवितांचं अभिवाचन करताना तुमच्या expression दिसल्यात तर कवितांच्या आस्वादात खूप मोठी भर पडू शकते !

  • @ameya9372
    @ameya9372 11 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @akashows7655
    @akashows7655 4 ปีที่แล้ว +1

    Khup jast sundar .. this episode made my date ..

  • @anandianand
    @anandianand 4 ปีที่แล้ว +1

    वाह. क्या बात..

  • @surajjadhav8705
    @surajjadhav8705 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान ताई ... तुमच्या बोलनची पद्धत ताकद देते... आपल्या लेखकांना तर 🙏🙏सलाम आहे.

  • @manojdivate9614
    @manojdivate9614 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @sakshiwaghere6078
    @sakshiwaghere6078 ปีที่แล้ว

    Madurani tai.... Please navin episode uplod kara. Khup aaturtene wat pahtoy.....

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว +1

    भैरव,मालकंस,भैरवी!वा

  • @harshad24
    @harshad24 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर

  • @user-re7xs9rq5z
    @user-re7xs9rq5z 4 ปีที่แล้ว

    फक्त एकच शब्द.... निःशब्द.... अप्रतिम कविता संग्रह...

    • @deepapujari112
      @deepapujari112 4 ปีที่แล้ว

      निशब्द; खरच हा अनुभव माझ्या जीवनातील सुवर्णक्षणच.

  • @suvarnanigudkar5088
    @suvarnanigudkar5088 3 ปีที่แล้ว

    मधुराणी म्हणजे...मधुर आवाज...एक आपलेपणा...सुंदर च...

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 3 ปีที่แล้ว

    Khupch chan sunder ❤️👌👍💐

  • @VidyaNarwade
    @VidyaNarwade 3 ปีที่แล้ว

    👌👌अप्रतिम..... Nice Madhu Mam😘😘

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade6012 4 ปีที่แล้ว

    तुझं काव्यवाचन अप्रतिम
    नेहमीप्रमाणे

  • @anuradhadani3873
    @anuradhadani3873 4 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @kavitapatil-xb3sq
    @kavitapatil-xb3sq 4 ปีที่แล้ว +1

    Kai sundar aavaj ahe madhurani tuza !!

  • @nareshmahajan7628
    @nareshmahajan7628 4 ปีที่แล้ว

    सुधीरचा काहीसा सहवास प्रत्यक्ष मिळाला....कविता तर सोबत आहेच...पुन्हा कवितेचं पान हाती दिलच आहे....आणखी काय हवंय...

  • @ashokhavaldar2561
    @ashokhavaldar2561 4 ปีที่แล้ว +1

    कोरोना नंतर कसं असेल? सांगणं कठीण आहे. पण आपण सकारात्मकतेने पाहता. आणि हे जरुरीचे आहे. पण का कुणास ठावूक मला उदासी येते. पुर्वीचा तो मोकळे पणा आपल्यात असेल. पण काही दिवसांपूर्वी मी हे लिहिले होतं. कदाचित असं नसेलही पण मन चिंती ते वैरी ना चिंती.
    खूप काही नवीन असेल नवीन वर्गात गेल्या सारखे...तो पर्यंत तरी आपल्या कविता ही उदासी घालवतील. आता वाटतंय मी लिहिण्यापूर्वी *" कवितेचं पान "* का पाहिलं नाही? कदाचित ही कविता वेगळी झाली असती?
    155/2020
    *कोरोना नंतरचं जग....!*
    आता भेटू,
    पण हरवल्या हरवल्या सारखे.
    एक संशय,
    मनात राहिल घर केल्या सारखे.
    एक ओढ,
    असेल पण दूर दूर नेल्या सारखी.
    एक मैत्री,
    जमेल पण न समजण्या सारखी.
    ती नाती,
    संपतीलही उद्याच्या नव्या जगात.
    ती उबही,
    थंडच होत जाईल का कदाचित?
    *आपण पुन्हा भेटू तेव्हा काय होईल?*
    *कोरोना नंतरचं जग बदलून जाईल.*
    *अशोक हवालदार,बंगलोर*
    🌿

  • @gautamdange8668
    @gautamdange8668 4 ปีที่แล้ว +1

    Beautiful. Thank you

  • @gautamishirwalkar1455
    @gautamishirwalkar1455 4 ปีที่แล้ว

    Far faar sunder

  • @Pradnya201
    @Pradnya201 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुदंर

  • @abhijitkedar7353
    @abhijitkedar7353 4 ปีที่แล้ว +1

    Thanks di..

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 3 ปีที่แล้ว

    प्रबळ सदभावणाची सांगड

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว +1

    तीव्र मध्यम आणि कोमल रिषभची किती छान गुंफन!

  • @bharatimulik2700
    @bharatimulik2700 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan ya Kavita me pan wachte mazhya maitrininsathi

  • @deepalinehete4071
    @deepalinehete4071 ปีที่แล้ว

    Missing kaviteche pan series

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 4 ปีที่แล้ว +1

    😇

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 4 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🙏🙏🌹

  • @user-vh7in4yr5n
    @user-vh7in4yr5n 3 ปีที่แล้ว

    Khupach chan 👌🏻👌🏻

  • @दआगुडूप
    @दआगुडूप 3 ปีที่แล้ว

    Wow very sweet !

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 ปีที่แล้ว +1

    कवितेच्या ओल्याआसरीवर सरी ...भिजत नाही ,चिंब भिजलो तरी!
    ऐकावसंच वाटतं.....👍👌🙏

  • @AviTotade
    @AviTotade 4 ปีที่แล้ว

    मधुराणी,
    कवितेचे पान आणि काव्यश्राव्य हे दोनही कार्यक्रम उत्कृष्ट आहेत. बहुत खूब. असे उत्तरोत्तर छान कार्यक्रम करीत राहा.
    अनेक वर्षे परदेशात घालवून आता मी पुण्यास निवृत्त काल घालवीत आहे. मला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) ग्रेस यांच्या कविता आवडतात पण समजत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कवितांचे रसग्रहण करणारा कार्यक्रम करावा अशी विनंती आहे.
    अविनाश तोतडे 9421790773

  • @jaykrushnaingale241
    @jaykrushnaingale241 4 ปีที่แล้ว

    सुरेश भट यांच्या कविता नक्की घ्या....

  • @pradnyadaware8255
    @pradnyadaware8255 4 ปีที่แล้ว +3

    मधुराणी वाचून हसायला येईल कदाचित तुला पण खरंच मला जर कधी कोणी विचारले तुला एक संध्याकाळ hritik बरोबर marine drive ला फिरायला जायचंय की मधुराणी बरोबर निसर्गाच्या सानिध्यात बसून कविता ऐकायच्यात ...म्हणायच्यात ...मधुराणी बरोबर गप्पा मारायच्यात ...तर खरं सांगू मला तुज्याबरोबर वेळ खालवायला आवडेल .. एकदा तरी तुला भेटण्याची ईच्छा आहे..
    तुला एकदा ऐकायला सुरुवात केले ना की अस वाटत बस्स पुढे आता हे थांबुच नये ...जादू आहे तुज्या बोलण्यात ... निरागसता आहे वेगळीच

  • @arundhateelaghate8644
    @arundhateelaghate8644 4 ปีที่แล้ว

    खूप दिवस झाले...काव्य श्राव्य मालिकेचा पुढचा भाग आला नाही....आम्ही वाट बघतोय....

  • @srushtishirwadkar1617
    @srushtishirwadkar1617 3 ปีที่แล้ว +1

    "सांज ये गोकुळी सावळी सावळी" हे Evergreen गाणं लिहीलयं कविवर्य सुधीर मोघेंनी.
    th-cam.com/video/K-ifcoixY3I/w-d-xo.html
    ऐकूयात ह्या कविबद्दल आणि त्यांच्या कवितांबद्दल.😃

  • @yogeshashwini
    @yogeshashwini 4 ปีที่แล้ว

  • @mrunalinibarve665
    @mrunalinibarve665 3 ปีที่แล้ว

    बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन व्हावे

  • @vidyamarathe1274
    @vidyamarathe1274 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, पण एक सूचना. तुमच्या विडिओ वर 'पक्ष्यांचे ठसे' असे असायला हवे.

  • @janardhanbiradar1514
    @janardhanbiradar1514 ปีที่แล้ว

    पुन्हापुन्हा ऐकावं असं गाता मधु राणी

  • @surekhakokad6218
    @surekhakokad6218 4 ปีที่แล้ว

    नमस्कार मधुराणी,
    मी सौ सुरेखा संजय कोकड.
    मला तुमच्या कवितेचं पान खूप आवडतं. तुमचं सादरीकरण मनाला खूप भावतं. माझं पण कवितेवर खूप प्रेम आहे आणि मी पण कवयित्री आहे. परवाच माझं पुस्तक प्रकाशित झालं 'मनतरंग'.
    मला पण तुमच्या कवितेचं पान मध्ये येण्याची खूप इच्छा आहे प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या.

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 4 ปีที่แล้ว +1

    Volume जरा अजून मोठा हवा

  • @yashkhillare9590
    @yashkhillare9590 4 ปีที่แล้ว

    Ajun narration kara na...khup divas jhale episode nahi ala .. Please...

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 2 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @nilimapohane7900
    @nilimapohane7900 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @archanaraut6655
    @archanaraut6655 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम