ग्रामदेवता म्हणजे काय? : भाग ०२ | Gramdevata | Bhairavath | Janai | Waghjai | Mumbadevi | Kasaba

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • ही ग्रामदैवते स्थान आणि जातिजमातींपरत्वे भिन्न भिन्न नावाची आहेत व त्या प्रत्येक नावामागे काही दंतकथा आणि आख्यायिका आहेत. त्यांची स्थाने गावाबाहेर किंवा गावातील एखाद्या कोपऱ्यात कुठे तरी डामडौलाशिवाय असतात. त्यातही त्यांची मूर्ती असतेच, असे नाही आणि असली तरी ती अत्यंत ओबडधोबड असते. एखाद्या वृक्षाखाली, निसर्गरम्य ठिकाणी, जलाशयाजवळ, साध्या फांद्यांच्या मांडवाखाली किंवा एखाद्या चौथऱ्यावर ही ग्रामदैवते विराजमान झालेली असतात.
    एखादा दगड, खुंट, वृक्षाची जमिनीबाहेर आलेली मुळे किंवा दगडाचा ओबडधोबड मुखवटा अथवा एखाद्या मडक्यात
    कडुलिंबासारख्या एखाद्या वृक्षाची डहाळी, असे ह्या दैवतांचे स्वरूप असते.

ความคิดเห็น • 18

  • @vikasmathe9455
    @vikasmathe9455 2 หลายเดือนก่อน

    ग्रामदेवता ह्या कुलदेवता आसु शकतात का ❓

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 หลายเดือนก่อน

      सैद्धांतिकरीत्या एकच असण्यास काही हरकत नाही साहेब. परंतु असे अपवादानेच आढळून येते किंवा येऊ शकते. कारणे अनेक आहेत. सर्व कारणे सांगण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल.

  • @tkva463
    @tkva463 6 หลายเดือนก่อน

    प्रत्येक गावात ग्रामदैवत असते! ग्रामदेवतांची उपयुक्त माहिती दिली! धन्यवाद!

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @dipakgurav6895
    @dipakgurav6895 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त व छान माहीती...मनापासुन धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @jagdishgawade3703
    @jagdishgawade3703 2 หลายเดือนก่อน

    बरच खर आहे. धन्यवाद!
    चांगला अभ्यास.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @vivekjadhav5740
    @vivekjadhav5740 หลายเดือนก่อน

    काळूबाई देवी ग्राम देवता आहे कि ? कुलदेवी आहे?

    • @KimantuLive
      @KimantuLive  หลายเดือนก่อน

      गावात असेल तर ग्रामदैवत

  • @vishvanathkhot3016
    @vishvanathkhot3016 6 หลายเดือนก่อน

    सर, काही गावांमध्ये देवी आणि देवताची ग्रामदैवत म्हणून पुजा होते.त्याब. थोडे बोलावे ही विनंती.

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 หลายเดือนก่อน

      ठीक आहे साहेब. 🙏

  • @sunitigothoskar220
    @sunitigothoskar220 หลายเดือนก่อน

    माझ्या गावात लिंगाचे मंदिर असून त्याला लागूनच हा भावई मंदिर आहे जी ग्रामदेवता सांगीतली जाते. पण दुसर्या एका गावात शंकर हे ग्रामदैवत व मागच्या बाजूस भावई आहे, पण भावई सोबत वेताळ आहे. तीथं ग्रामदैवत शंकर आहे. हे असं का असेल, कृपया मार्गदर्शन करावे

    • @KimantuLive
      @KimantuLive  หลายเดือนก่อน

      शोधावे लागेल साहेब. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 6 หลายเดือนก่อน

    छान, माहिती दीली, नवीन, पीढीला, हे,समजून, घेतल ,पायजे,आपल्या, जुन्या पद्धती, कश्या, होत्या,सर, आसे पण,विडिओ, तयार,करा प्रतेक, गावच्या, ग्राम दैवतेच,पुर्वी पासुन चे,महत्व, प्रत्येक, गावातील लोकांना, खुप, छान, वाटेल,मी, ऐक, कोल्हापूरकर,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 หลายเดือนก่อน

      ठीक आहे साहेब. 🙏

  • @ganeshvlozz2159
    @ganeshvlozz2159 6 หลายเดือนก่อน

    Gr8 work

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 หลายเดือนก่อน

      Thank You Sir. 🙏