पुरंदरचा तह ! शिवाजी महाराज तहात हरले की जिंकले ? शिवबाराजे भाग 08 Treaty of Purandar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • पुरंदरचा तह ! शिवाजी महाराज
    Battle of Purandar
    शिवाजी महाराज तहात हरले की जिंकले ?
    तहाची बोलणा करण्यासाठी जयसिंहाने उदयराज आणि उग्रसेन कच्छवाह अशा स्वत:च्या मर्जीतील कारभाऱ्यांना नेमले. दिलेरखानाला पुरंदरच्या आघाडीवरून वाटाघाटींसाठी अजिबात बोलावले नाही.मिर्झा राजेंनी शिवाजीला पुरंदरच्या पायथ्याशी निशस्त्र शरण आणले. यामुळे जयसिंहाला तहाची बोलणी करण्यास सर्वाधिकार देणे स्वाभाविक होते. आणि महत्वाचे म्हणजे तहाबाबतीत अंतीम निर्णय औरंगजेब स्वत: घेणार होता. तहात शिवाजी महाराजांकडून २३ निझामशाही किल्ले काढून घेण्यात आले. एका वाटाघाटीत इतके किल्ले मुघलांना मिळणार हा मोठा विजय होता.परंतू त्या २३ किल्ल्यांमध्ये पुरंदर, कोंढाणा , लोहगड यांसारखे ५ ते ६किल्ले महत्वाचे होते व इतर किल्ले पुन्हा ताब्यात घेणे विशेष जिकिरीचे नव्हते. आणि जे १२ निझामशाही किल्ले शिवाजी महाराजांकडे राहिले त्यात राजगड, तोरणा आणि रायगड ह्या महत्वाच्या डोंगरी किल्ल्यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या कौशल्याने आणि बुद्धीचातुर्याने हे किल्ले स्वत:कडे राखले. यावरून महाराजांच्या मनामधील स्वातंत्र्य भावना विझली नव्हती. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न भंगले नव्हते हे स्पष्ट होते. शिवाजी महाराज स्वत: मुघलांचे मनसबदार झाले नाहीत. तशी अट बांधून न घेण्यात ते यशस्वी झाले. नऊ वर्षाच्या संभाजीराजांना ५ हजारी मनसबदारी देण्यावर भागवले. संभाजी राजांना अगदी कमी वयात इतक्या मोठ्या मनसबाची जबाबदारी मिळणे , ती भलेही शत्रूपक्षाची असो पण प्रशिक्षणासाठी आणि अनुभवासाठी मोठी जमेची बाजू होती. इतक्या अल्पवयात आलेला अनुभव स्वराज्याच्य रक्षणाकरीता पुढे उपयोगी पडणार होता.
    तहात गमावलेले किल्ले बरेचसे पुन्हा जिंकता येण्याजोगे होते. कोंढाणा, पुरंदर वगळता इतर किल्ले जिंकताना शिवाजी महाराजांना विशेष प्रयास लागले नसते. तह मान्य करून शिवाजी महाराजांनी उद्याची आशा जिवंत ठेवली. एकीकडे तहाच्या अटीवर शिक्का मोर्तब होत असताना मानहानी वाटली असेल परंतू महाराजांनी मन पराभूत होऊ न देता विजीगिषू वृत्ती जिवंत ठेवली. ‘शीर सलामत तर पगड्या पन्नास’ हा माघारीचा परंतू व्यवहार्य मार्ग पत्करला. पुरंदरचा तह ही भविष्यात फार मोठी झेप घेण्यासाठी दोन पावले मागे घेण्याची कृती ठरली. हे नंतरच्या काळात महाराजांच्या स्वपराक्रमाने सिद्ध झाले.
    राष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री चारुदत्त आफळे गुरुजी यांनी शिवचरित्राची अतिशय अप्रतिम अशी माहिती दिलेली आहे. श्री चारुदत्त आफळे गुरुजी यांनी या व्हिडिओ मध्ये पुरंदरचा तह ? या प्रसंगाचे सुंदर वर्णन केले आहे ,चारुदत्त आफळे गुरुजीणां या अप्रतिम माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय रुद्र शंभुराजे
    Battle of Purandar
    Shivaji Maharaj v/s mirjha jaysing
    May Instagram Link
    / dpatil.p11
    Facebook Link
    www.facebook.c...
    #swarastrarakshak
    #Battle of Purandar
    #Shivaji Maharaj v/s mirjha jaysing
    My Other Video
    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चरित्र
    • shiv charitra श्रीमान ...
    #swarastrarakshak
    शिवचरित्र हे प्रत्येकाने वाचलच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात असलच पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय जय रुद्र शंभु🚩
    ➤शिवचरित्र पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
    -श्रीमान योगी (ज्येष्ठ इतिहासकार रणजित देसाई ) amzn.to/3nkOSyP
    -संभाजी (डॉ विश्वास पाटील ) amzn.to/3xZwPmO
    All Images in the video are for representation purpose only.
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

ความคิดเห็น • 8

  • @swarastrarakshak
    @swarastrarakshak  2 ปีที่แล้ว +4

    चॅनलला subscribe करायाला विसरू नका मित्रांनो🙏
    पुरंदरच्या तहाने धुळीस मिळालेले राज्य
    परत त्याच धुळीतुन उचलून
    त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य
    ज्या एकमेद्वितीय युगपुरुषाला साधले ते म्हणजे
    राजा शिवछ्त्रपति🚩
    लाखों मराठी बांधवांना जोडण्याचा संकल्प आहे.
    जय शिवराय❤️🚩🙏

  • @gopalpatil6224
    @gopalpatil6224 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय

  • @rajashreesalagare7264
    @rajashreesalagare7264 2 ปีที่แล้ว +4

    जय शिव शंभू हर हर महादेव
    पहिली ते दहावी पर्यंत इतिहास मध्ये शिव छत्रपती चे संपूर्ण धडे शिकवलं पाहिजे

    • @swarastrarakshak
      @swarastrarakshak  2 ปีที่แล้ว

      जय शिवराय....
      हो राजेंचे संपूर्ण चरित्रच शुन्यातून जग निर्माण करण्याची प्रेरणा देते...
      शिवराय असे शक्ति दाता

  • @goodmarie6329
    @goodmarie6329 2 ปีที่แล้ว +2

    Harun jiklaleli baju.....jay shivray

  • @bourbonline0614
    @bourbonline0614 2 ปีที่แล้ว +3

    पुरंदरचा तह जरी बाहेरुन हारलेला वाटतो...पण आतून तो मात्र राजांनीच जिंकला
    राजांनी त्या तहाला आतून पोकड करुण....
    पुन्हा स्वराज्य नव्याने उभ केल
    शिवराय असे शक्तिदाता🚩