भजन | Bhajan|राजा दळवी|भजन ऐसे गाव | भगवान लोकरे|भजनसम्राट मानवंदना |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- भजन | Bhajan|राजा दळवी|भजन ऐसे गाव | भगवान लोकरे|भजनसम्राट मानवंदना |#RajadalviOfficial #viralsong
__________________________________________________________
आज आपण महाराष्ट्रातील स्वर्गीय सुप्रसिद्ध भजन सम्राट, कीर्तनकार, दशावतार महानुभवाना भजन क्षेत्रातील मेरुमणी प्रसिद्ध गायक भगवान बुवा लोकरे यांच्या सुमधुर आवाजात आदरांजली देण्याचा प्रयत्न केला आहे... आपण रसिक मायबापांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल.. तो आपल्या अभिप्रायातून नक्की आम्हाला कळवा...
आणि राजा दळवी ऑफिसिअल या आमच्या यु ट्यूब चॅनेल ला भरभरून प्रेम द्या!
________________________________________________
Lyrics
स्वर्गीय बुवानी स्वर्गात वसविलं एक गाव ।
त्याचं भजन ऐसे नाव ॥धृ॥
जयराम कृष्ण हरी . . . . .
१)विठ्ठल रखुमाई ग्रामदैवत गावाचं ।
भक्त पुंडलिक पुजारी विठ्ठलाचं ।
जातपात नाही ना आरक्षण सारे जपती बंधूभाव(भक्तिभाव) ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
२) जनाई मुक्ताई नाव बारमाही नद्यांच ।
आषाढी कार्तिकीला स्थान भीमा चंद्रभागेचं ।
संतादिकांचे नित्य दर्शन हि हरिनामाची ठेव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
३)स्नेहल भाटकराना गावप्रमुख पद मानाच ।
बुवा शिवराम वरळीकर ट्रस्टी विठ्ठल मंदिराच ।
फुलाजी बागडे गोपाळ दांडेकर अध्यक्ष खोपकर नाव ॥ धृ ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
४) दीक्षित बुवा प्रमुख संगीत अकॅडमीच ।
परशुराम मौर्ये बुवा
सर इंग्रजी विषयाच ।
अनंत पांचाळ शिवाजी बुधकर तालवाद्यांचा घेती सराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
५)विश्वकर्मा कला केंद्र चिंतामणी पांचाळांच ।
बुवा प्रमोद सुतार संचालक त्याचl
परशुराम पांचाळ चालक बुवा त्यांचा संगीत प्रधान भाव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
६)तंटामुक्ती गाव अर्जुन तावडे पोलीस पाटलांच ।
चंद्रकांत कदम डॅडी गावाचे सरपंच ।
कृष्णा पवार तलाठी बुवा ग्रामसेवक दयाळराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
७)केशकर्तनालय महादेव न्हावी बुवांचं ।
अनंत पानवालेंच दुकान किराणा भुसारीच ।
हातिसकर बुवा कपडेवाले लेंगा सदरा टोपी पेहराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
८) नांदी भजन पोळे बुवांच ।
बाबू निपाणींच फडाच
उदय गोखले काशिरामांच । . .
जयराम नानू मर्गजांच
बाळासाहेब प्रवेशव्दार ।
मच्छिंद्र कांबळी तलाव ॥ धृ ॥
९ ) .एकादशीला कीर्तन बाबा महाराज सातारकरांच ।
वार्षिकाला नाटक बाबी नालंग कलिंगणांचा ।
क्रिकेट मॅचच आयोजन विलास पाटिल बुवानी कराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
१०) पुण्यआत्मा पूर्वजांच गाव भजनीकलावंतांच ।
चित्रगुप्ताच्या चोपडीत नाव भगवान खानावळीचं ।
भावना लोकरे सुगरणीच्या हाताला न्यारी चव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
_______________________________________________
संकल्पना - जयवंत राऊळ
गीत / संगीत - राजा दळवी
गायक - भजनसम्राट बुवा श्री भगवान लोकरे
किबोर्ड - रुपेश जाधव
ढोलकी / पखवाज - विजय सावंत
तबला - सर्वेश पांचाळ
साईट रिदम - विक्रम कोयंडे
एडिटींग - शशांक कोंडविलकर
कोरस - चंद्रकांत जाधव गोपी हारचेकर विक्रम कोयंडे आणि वृंदा लोकरे
वि सहाय्य - वर्संत बाणे सुयश काराणे आणि सुनिल लब्दे
विशेष आभार - जेष्ठ पखवाज वादक श्री .माऊली सावंत आणि व्यंकटेश उर्फ भाई राणे
रेकॉडिंग - अरविंद रेकॉर्डिंग स्टुडियो भांडूप
मिक्सिग -अविनाश बाईत
________________________________________________________________________
Famous Tags :
#भजन, #Bhajan|, #राजादळवी, #भगवानलोकरे, #सुप्रसिद्धभजनसम्राटमानवंदना, #RajadalviOfficial, #ViralSong2024, #स्नेहलभाटकर, #बुवाशिवरामवरळीकर, #मारुतीबागडे, #गोपाळदांडेकर, #वामनखोपकर, #प्रमोददीक्षित, #तुळशीरामदीक्षित, #परशुराममोर्ये, #अनंतपांचाळ, #परशुरामपांचाळ, #शिवाजीबुधकर, #चिंतामणीपांचाळ, #विलासपाटील, #चंद्रकांतकदम, #काशीरामपरब, #मच्छिंद्रकांबळी, #बाबामहाराजसातारकर, #बाळासाहेबठाकरे, #सुधीरकलिंगण, #बाबीनालंग, #शांतीकलिंगण, #उदयगोखले, #नानूमर्गज, #भजनऐसे गाव
______________________________________________________________________
Do watch this Also:
• पाच रंगाच्या गौळणी|Off...
पाच रंगाच्या गौळणी|Official Music Video| Sant Eknath|Marathi Gavlan|Raja D|पारंपारिक गवळण
• गुळ सांडोनी गोडी घ्याव...
गुळ सांडोनी गोडी घ्यावी ( अभंग ) | संत तुकाराम महाराज| भजन सम्राट श्रीधर मुणगेकर । संगीत राजा दळवी
• धुंडीराज मोरया- अभंग |...
धुंडीराज मोरया- अभंग | राजा दळवी | श्रीधर मुणगेकर #trending #viral #ganeshchaturthi #kokan #ganpati
• Happy Birthday Bappa|म...
Happy Birthday Bappa|माघी गणेश जयंती विशेष गीत|#rajadalviofficial|Sameer K|#trending song
• ट्वेटी ट्वेटी फटाके ||...
ट्वेटी ट्वेटी फटाके || बुवा श्री समीर कदम
__________________________________________________________
अशाच नवनवीन संकल्पना आणि वैशिष्ठपुर्ण गाण्यांसाठी Like आणि Subscribe करा "Rajadalviofficial" TH-cam channel धन्यवाद 🙏
_________________________________________________ - เพลง
मस्त गायनबुवा अप्रतिम
फार छान अप्रतिम ❤❤
भजनाचे पंडीत.,भजन महर्षी,भजन सम्राट, कोकण रत्न, लोकरे बुवा ❤❤खूप खूप सुंदर ,नवीन असे भजन गावं सकल्पना खूप आवडली राजा दळवी खूप छान
Apratim shabda rachana tyala sajeshi chal nivad Guruvarya BHAGAVANJI Lokare buvancha matured Avaj Buvanache spastha shabdochar kharach ek ucchadarjachi kalakruti niraman zali
Sahayyak kalakar hi uttam vadan hi pramanat sajese vajandar sarvana manapasun DHANYAWAD❤🙏🤝 दिल जीत लिया❤
भजन हे मान सन्माच्या पलीकडे असत,, ते शुद्ध भक्ती भावाचं प्रतीक असत
Raja Dalvi Lay Bhari Bowa Chandrkant Kadam From Devkond Aare
राजा दादा एक अप्रतिम संकलपना ,
स्वर्गीय सुख अनुभवताना मान्यवर बुवांचे स्मरण व त्यांचे कार्य यांची मोजक्या अशा शब्दात सांगड घातली आहे.
संगीत व माऊलींचे गायन अप्रतिम.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤
सुंदर रचना, सुंदर सादरिकरण, श्रवणीय 👌👌👍👍
छान संकल्पना! उत्तम सादरीकरण!
सुंदर सादरीकरण उत्तम कोरस मन भरून आलं
कोकण रत्न बुवा श्रींमान भगवानजी लोकरे यांच्या गोड वाणीतून महान दिग्गज कलाकारांना आदरांजली..🙏🏻💐
वा...राजा बुवा... अश्या वेगळ्या संकल्पना तुम्हीच साकार करू शकता
सुंदर रचना, वादन आणि खास करून संकलन खुप भारी...👌🏻🌹❤️
उत्तम उत्तम रचना, सर्वाना शुभेच्छा 💐🙏🌹❤️
छान शुटींग केले दळवी साहेब 🙏🌹💐❤️
🙏🚩 *राम कृष्ण हरि* 🚩🙏
राजा दळवी !
राजा दळवी !!
राजा दळवी !!!*
.... स्वत: भजनकार, पखवाजवादक, तबलावादक म्हणून मिरवत नसतानाही भजन क्षेत्राविषयी भरीव अन् ओतप्रोत ओढ व प्रेम असलेलं निखळ, तरल व्यक्तिमत्व !! .... आणि विशेष म्हणजे एक सर्वोत्कृष्ट कवनकार आणि नाविन्यपूर्ण रचनांचा निर्माता !!
तसेच आमचे परमस्नेही श्रीमान लोकरे बुवा आणि सहकारी यांनीही राजा दळवींच्या या कवनाला सुंदर रीत्या सादर करुन पूर्णत: न्याय दिल्याचंही आवर्जून जाणवतंय !! अर्थात सुंदर सादरीकरण म्हटल्यावर त्यात तालवाद्यांची उत्तम साथसंगत हे ओघाने आलंच !! असो ..... श्रवण करताना एकूण आपणां सगळ्यांनाच वंदनीय, पूजनीय अशा स्वर्गस्थ गुरुतुल्य भजनकारांचं *भजन* हे गावच साक्षात डोळ्यांपुढं उभं राहिल्याचं मात्र प्रकर्षानं नक्कीच जाणवते !! 😊👍
भूतलांवरुन अंतर्धान पावल्यानंतर सध्या स्वर्गस्थ असलेल्या आपल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्गज भजनकारांनी स्वर्गीच एक मांदियाळी तयार करुन त्या ईहलोकी पुन्हा तोच भजन / नामस्मरणाचा परमानंद लुटण्याकरिता *"भजन"* या नावानंच एक गाव वसवावं, ही संकल्पनाच मुळात किती आनंददायी अन् आपल्या जीवाला सुखावणारी आहे .... नाही का ? अर्थात हे सुचण्याकरिता देखील *"भजन"* या विषयाबद्दल तेवढीच आसक्ती असणे हेही क्रमप्राप्त आहेच आणि तीच *भजन-आसक्ती,* आपल्या समस्त भजनरसिकांच्या ह्रदयांत स्थानापन्न झालेल्या *श्री. गोविंद दळवी उर्फ राजा दळवी* यांच्या ठायी ठासून भरलेली आहे. त्यास्तवच अशी सर्वोत्तम कलाकृती आज त्यांच्याकडून घडून आली आहे, हेही नाकारता येणार नाही.
तरीही कोणतीही उत्तम कलाकृती एखाद्या कलावंताकडून घडवून आणताना भगवंत देखील त्या कलाकाराच्या डोक्यात हवा जाऊ नये म्हणजेच त्याचे पाय जमिनीवरच राहावेत याकरिता काही न काही उणीव शिल्लक ठेवतोच आणि तद्वतच काही दिवंगत भजनी कलावंतांचा नामोल्लेख राहून गेला असावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. एक सच्चा कलाकार हेतुपुरस्सरपणे असं करेल, असं मात्र कधीच वाटणार नाही. मानवाच्या प्रत्येक कृतीमागे त्याच्या संचित आणि प्रारब्ध यांच्या मूल्यमापनाबरोबरच भगवंत देखील आपल्या परीनं मूल्यमापन करीत असतोच !! म्हणूनच या उणीवेस आपण मोठ्या मनानं समजून घेऊया !! भविष्यात अशा या उणीवा राहू नयेत, याची ते नक्कीच काळजी घेतील !!
*राजा* 🩷😊 आपल्या या उत्तम कलाकृतीस खरंच अगदी मनापासून अभिवादन !! 🌹💐🪷👍😊
आपला स्नेहांकित,
व्यंकटेश राणे (भाई बुवा)
दि. ६ सप्टेंबर, २०२४
😊👍🚩🙏्
अप्रतिम श्री राजाजी दळवी साहेब खूप छान वर्णन करून भजन कलेला एक सर्व दिग्गजंची आठवण देऊन संगीत संयोजन खूपच श्रवणीय सर 🙏🙏🙏महर्षी आदरणीय श्री लोकरे बुवांनी त्याला मस्तच साज चढवलीय आणि संगीत संयोजन सुद्धा अप्रतिम झालेय सर्व टीम चे अभिनंदन 🙏🙏🙏🥰🥰🥰🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
अप्रतिम एकदम ❤
सन्माननीय श्री राजा दळवी साहेब (कवी) यांची सुंदर रचना एकदम अप्रतिम गायन आणि कोरस सहित वादनही चांगलं शिवाय ज्येष्ठ बुवांचे आणि पखवाज वादकाचं सुंदर वर्णन करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम केले आहे.
अप्रतिम !
👍खुप छान माऊली गायन,वादन,आणि कोरस अप्रतिम संगीत ❤❤❤🙏🙏
खरंच हे गीत ऐकल्यावर मन भारावुन जात की गावाच्या नावाची प्रशंसा करणार गीत आहे एवढे कलावंत या गावांमध्ये होऊन गेले
ज्येष्ठ भजन बुवांच्या आठवणी अप्रतिम जागृत केल्या गुरुवर्य लोकरे बुवांच्या आवाजाची जादू आणि कोरास पण खूप छान आहे
सन्माननीय श्री. लोकरे बुवा आपल्या सुमधुर वाणीने गीत सादर केलात. खूप आनंद झाला.
गीताची रचना देखील अप्रतिम आहे.
आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्या गावचे सरपंच आमचे कोकणकलाभूषण स्वर्गीय चंद्रकांत कदम बुवा 👏👏👏👏
बुवा, खूपच सुंदर सादरीकरण. 🙏
माऊली अप्रतिम सादरीकरण उत्तम कोरस जुन्या बुवांची बऱ्याच वर्षाने तुमच्या मुखवाणीतून नाव ऐकायला मिळाली ❤ मन भरून आलं
अतिशय सुंदर संगित, अप्रतिम गायन- साथसंगित आणि विशेष सरव बुवांची आठवण झाली.
श्री. लोकरे बुवा,
।।भजन ।।
धन्य ते, स्वर्गीय बुवांनीवसवलेल
" भजन गांव "
जिथे ग्रामदैवत विठ्ठल रखुमाईच्या
पूजेसाठी स्वतः पुंडलीक आहे
जिथे सगळे बंधुभावाने आणि भक्ती -भावान रहातात.
त्या गावातील प्रत्येक कलाकाराचं, व्यावसायिकाच गीतकारान, गद्य स्वरुपात केललं वर्णन गायकानं पद्य स्वरूपात अगदी समजेल अशा शब्दांत म्हटलं अगदीच 👌👌
चित्रगुप्ताच्या नोंदीतील
'लोकरे खानावळ' आणि त्यात सद्भभावनेन, प्रेमाने चविष्ट अन्न बनवणारी भावन/सुगरण, नव्हे तर साक्षात "अन्नपूर्णा" तिला तर
माझा दंडवत!! 👏👏
भजन सम्राट भगवान लोकरे यांचे स्पष्ट उच्चार,आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ छानच कळतो.
तसेचत्यांच्या गोड गळ्याची स्तुती करावी तेवढी कमीच होईल
तसेच गीतकार, संगीतकार आणि त्यांच्या साथीदारांनी दिलेली साथ
तर छानच वाटली.
या सर्वांनी त्यांच्या भजन क्षेत्रातील महानुभवानाआणि मेरुमणींना दिलेली
"आदरांजली " तर
अवर्णिय वाटली !!
भजन ऐकून कान👂👂 तृप्त झाले .
जय जय रामकृष्ण हरी।
धन्यवाद।
🙏
आपला चहिता
/
श्री. पावसकर
खूप सुंदर 👌👌
खूप छान 👌 ♥️
राजा दादा
एक सुंदर संकल्पना घेऊन छान रचना केलीत... संगीत तर उत्तमच, त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे सन्माननीय लोकरे माऊलींचा भारदस्त आवाज ... अत्यंत सुंदर श्रवणीय गीत ऐकल्याचं समाधान मिळालं. विजय सावंत यांचं वादन आणि कोरस उत्तम.
तुमच्या या गावात ज्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेही नाही अशा दिग्ग्ज कलाकारांचं दर्शन सुद्धा झालं.
मनापासून धन्यवाद दादा
खूप छान बुवा नमस्कार करतो
वा दादा छान आहे गाणं आणि चाल सुद्धा फार सुंदर आहे
अति सुंदर राजा सर्व बुवांची आठवण करून दिली
सुंदर रचना, सुंदर गायन तितकाच कोरस उत्कृष्ट सर्वाना नमस्कार
जशी संकल्पना लयभारी*
तसच गीतही *असावं*
आपली उत्तम अदाकारी*
त्याने वाढलाय *प्रभाव*
आहे फार परीणामकारी
वाटेल सुंदरच *म्हणावं*
धन्य भजनसेवा बारी बारी
सर्वाना कृतिने *स्मरावं*
नुतन पिढीची जबाबदारी
भजन अशापरी *करावं*
मी तर गेलो शब्दा आहारी
वाटलं प्रती गीत *रचावं*
*धन्यवाद* !🙏
खूप श्रवणीय 👍👌
पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे श्रवणीय गीत.
khup chan gana aahe baba aani saglya team la pan well done👍🏻❤
वा खूप छान
सुंदर गीत
भजन क्षेत्रात, ज्यांनी आपला देह हरीनामासाठी अर्पणच केला, अश्या जेष्ठ बुवा, वादकांच स्मरण या गाण्यातून झालं, नेहमी प्रमाणे सुंदर काव्य रचना, संगीत, वादन, कोरस, बुवांच गायन सर्वच छान 👌🏻👌🏻
खूप सुंदर माऊली शब्द रचना संगीत आणि गायन अप्रतिम सर्व बुवांचा उल्लेख ही एक पोच पावती.... खूप दिवसांनी ऐकायला मिळाले ❤❤
वा, मस्त, आपल्या नावात भजन 🌹❤️🙏💐
याची रचना खूप छान केली आहे.खूप छान गुरु माऊली👌👌👌👌👌
राजा भाऊ नमस्कार खूप सुंदर सादरीकरण आणि हरी भजाच एक उत्तम अस गांव वसवलात....
खूप छान 🎉🎉
वा खूप छान संगीत व भजन सम्राट श्री भगवान लोकरे बुवांचा आवाज ही दैवी देणगी ती या गीतास लाभली आहे . श्री मान राजा दळवी यांचं लेखन संगीत नेहमी प्रमाणे अति सुंदर खूप खूप शुभेच्छा या नवीन गीता साठी ❤
अप्रतिम रचना, सुमधुर गायन
सर्वांना मन: पूव्रक शुभेच्छा
जप तप नाही आरक्षण
सारे जपती बंधुभाव।
त्याचे भजन भजन
भजन ऐसे नांव। ❤
खुप छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Apratim
राजा दादा खूप सुंदर शब्दरचना आणि चाल तितकेच सुंदर गुरुजींचे गायन 🥰👌🏻❤️
कोरस पण भारी 😊
बुवा, अप्रतिम आवाज 👍👌
एक आगळी वेगळी कल्पना दादा
नेहमी प्रमाणे नाविन्य
तुझी शब्दरचना नेहमी सुंदरच असते
भजन सम्राट भगवानजी लोकरे बुवा यांच्या आवाजाने चार चांद लागले या गीताला
वाद्य अप्रतीम झाल आहे
संगीत नियोजन फार फार सुंदर आहे
या गण्याचा व्हीडीओही छान झाला आहे दादा
एकंदरीत तुझी concept खुप आवडली अशीच नवनवीन गाणी तु़झ्याकडुन लीहीली जावोत आणि आम्हाला त्यांचा आनंद सदैव मिळत राहो
एकच वादा आमचा राजा दादा 🙏🙏🙏
खूप छान वाटत ऐकायला
अतिशय सुंदर
दादा साहेब खूप छान ,
Khup chan vatty eaikayla mast Raja dada 👌🙏
खुपच सुंदर
मस्त
अप्रतिम ❤❤
Khup chan mauli ❤🎉😊
Bowa Shri Chandrakant Kadam and Shri Kashiram Parab from Malvan Sindhudurg
राजा दादा अतिशय सुंदर गीत रचना ✍🏻 महाराष्ट्रात ज्यांच्या भजनाची अवघी गोडी असा आवाज भजनसम्राट लोकरे गुरुजी ❣️👌🏻👌🏻 उत्तम संगीत आणि कोरस 👌🏻👌🏻💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर गायन गुरुजी तसेच राजा दादा ❤❤❤ अशोक बर्गे महाबळेश्वर
राजा दादा 1नंबर चाल
अप्रतिम झालं आहे
आणि लोकरे बुवांचे
गायन बात न्यारी
आहे
धन्यवाद ❤
अप्रतिम रचना आणि दमदार सादरीकरण माऊली......🙏🙏🙏🙏
सुंदर माऊली भजनाच्या पंढरीतलं सुंदर असे भजनाचे नांव
कोकणातील सुमधुर गायनाने मंत्रमुग्ध करणारे माझे आवडते बुवा श्रीमान लोकरे बुवा खूपच छान सादरीकरण❤❤❤
👌👌💥💥
मंत्रमुग्ध झालो...सर्व भजनसम्राटानां मानाचा मुजरा.
अप्रतिम रचना माऊली ❤
राजा दादा, लोकरे बुवा, चंदू बुवा खूप छान ❤👌👌
खूप खूप सुंदर लोकरे बुवा आणि कोरस....
खूप सुंदर माऊली
राजा खूप खूप छान सुंदर गाणं झालं
खुप छान संकल्पना दादा
अप्रतिम शब्दरचना
उत्तम वादन
श्री. भगवान लोकरे बुवांनी चार चांद लावले🙂👍🎵🎹🚩 छान गायन🎹
एकदम भारी झालंय गाणं बुवा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
फार छान अप्रतिम🎉🎉🎉
अतिशय सुंदर सादरीकरण
❤❤
उत्तम शब्दरचना उत्तम चाल उत्तम संगीत वांह क्या बात है.
भारी राजा दा...ह्या तुच करू शकतय...❤❤❤ अप्रतिम 🎉🎉🎉
खूप छान गुरू माऊली 👌🙏
खूप सुंदर माऊली 🙏
गुरूदास परिवार लाय भारी 👏👌😘❤️
श्रीमान राजा दळवी साहेब, या अप्रतिम रचनेतून आपला भजन संप्रदायाचा अभ्यास किती गाढा आहे याची प्रचिती येते. वैकुंठवासी समस्त पूर्वसुरिन एकप्रकारची हि श्रद्धांजलीच आहे. लोकरे बुवांचा गोड आवाज आणि साजेशी साथसंगत यामुळे खूपच श्रवणीय झाले आहे हे गीत.❤❤❤
अतिसुंदर भजन
खूप छान राजा दादांच गीत लिखाण आणि संगीत आणि आमच्या माऊलींच्या गोड आणि भारदस्त आवाजात आणि उत्कृष्ट साथसंगती मुळे श्रावणीय गीत❤❤❤❤❤
खुप सुंदर रचना श्री दळवी साहेब आणि त्याच पध्दतीने अप्रतिम गायन आदरणीय भगवानजी लोकरे बुवा आणि अप्रतिम कोरस
Atachya recording मध्ये त्या bhajnachi मजा नाही
संस्कृती लोप पावत चालली आहे
खुप खुप सुंदर माऊली 🙏💐
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर सादरीकरण
Khup chan vatty eaikayla mast Raja dada 👌🙏