बार्शी तालुक्यातील एका गावात चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग, वैराग पोलिसात गुन्हा दाखल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • चॉकलेटचे आमिष दाखवून दोन वृद्धांकडून मुलीचा विनयभंग - दुकानात गेल्यानंतर लज्जास्पद प्रकार
    वैराग : चॉकलेट आणि पैशाचे आमिष ■ दाखवून दोन वय वृद्ध इस्मनी अकरा वर्षांच्या शाळकरी ■ मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे. - याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यामध्ये दोघांच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
    याबाबतची अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीचे आई- वडील रोजंदारीसाठी दररोज घराबाहेर पडतात. त्यामुळे मुले घरामध्ये असतात. दरम्यान, दुकानातील काही साहित्य लागले तर गावातच जवळ असणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन खरेदी करतात. दुकानदार अन् एकाने पीडित मुलीस तिच्या हाताला धरून ज्यादा खाऊ, चॉकलेट आणि पैसे देत होते. ही
    बाब' पीडित मुलीच्या आईला लक्षात आल्यानंतर तिने दुकानात जाऊन माझ्या मुलीचे नव्हे तर इतर कोणाच्याही मुलीस खाण्या-पिण्याच्या वस्तू किंवा पैसे देऊ नका म्हणून सांगितले होते.
    दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोलमजुरी करून आलेल्या आईसमोर पीडित मुलगी रडत आली. तिने याबाबतचे कारण विचारले असता पीडित मुलीने दोन रुपयांची चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने डावा हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले.
    दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील. ते मी देत जाईन, तू मंदिराकडे येत जा, असे म्हणत पाचशे रुपये दिले. आणि गळ्यातील मण्यांची माळ धरून कुणालाही याबाबतचे सांगू नकोस म्हणून पीडितेस सांगितले. तुला काही कमी पडू देणार नाही, आयुष्यभर तुला सांभाळतो. यापुढेही रविवारी सुटी असली की दुकानात येत जा, असे म्हणून तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ความคิดเห็น •