उद्घाटनापूर्वीच talegaon dabhade नगर परिषदेच्या नवीन इमारतीला आग | दैनिक मावळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • व्हिडिओबद्दल थोडक्यात - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला गुरुवारी (दि.६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. तळेगाव नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. दरम्यान, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर काही वेळात आगीने मोठे स्वरूप धारण केले, त्यामुळे इमारतीतून आग आणि धुराचे लोट बाहेर निघत होते. घटनेची माहिती मिळताच तळेगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल, तळेगाव एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी सामुहिक प्रयत्न करीत पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व पथकही याप्रसंगी उपस्थित होते. आगीत इमारतीतील वस्तूंचे बरेच नुकसान झाले असून नव्या इमारतीच्या अग्निरोधक क्षमतेवर प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, लवकरच या नव्या इमारतीचे लोकार्पण होऊन नगर परिषदेचे कामकाज येथून सुरू होणार होते, त्यापूर्वीच ही आग लागली आहे.
    दैनिक मावळचे हे व्हिडिओ नक्की पाहा -
    1. • Lonavala अंमली पदार्थ,...
    2. • मावळ केसरी घाट । गाडी ...
    3. • प्रजासत्ताक दिनानिमित्...
    About Video - The new building of Talegaon Dabhade Nagar Parishad caught fire on Thursday (6th) around 6:30 in the evening. The construction of the new building of Talegaon Nagar Parishad is currently underway. Meanwhile, the fire is believed to have started during welding work on the fourth floor of the building.
    'दैनिक मावळ'ला सोशल मीडियावर📱फॉलो करा
    📘फेसबूक 👉🏻 / dainikmaval
    🐦 ट्विटर 👉🏻 / dainikmaval
    📸 इन्स्टाग्राम👉🏻 / dainikmaval
    🌐 वेबसाईट 👉🏻 dainikmaval.com/
    For Brands & Collaborations :
    📱 7387537953
    E-Mail - dainikmaval@gmail.com
    #talegaondabhade #talegaon #maval #pune #पुणे #मावळ #तळेगाव #तळेगावदाभाडे

ความคิดเห็น •