गिरनार परिक्रमा माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • संपूर्ण माहिती गुगल वरून घेतलेली आहे
    नर्मदा परिक्रमा link
    • नर्मदा परिक्रमा - माहि...
    परिक्रमा
    हिंदू धर्मात नर्मदा परिक्रमा ही एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची गोष्ट मानली जाते.अनेक लोक दरवर्षी नर्मदा परिक्रमा करतात. तशीच आणखीन एक परिक्रमा हिंदुधर्मात प्रसिद्ध आहे ते म्हणजे गिरनारची परिक्रमा.मागील व्हिडिओत मी नर्मदा परिक्रमेची माहिती दिली होती आज आपण गिरनार परिक्रमेची माहिती घेऊ
    गिरनार हा भारतातील गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण असलेला पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात.
    श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. प पू श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.
    गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून हि परिक्रमा चालू आहे. गिरनार परवता भोवती पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर कुणालाही या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात अनेक जंगली श्वापदे आढळतात . पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला कसलाच त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वादा चे भाग्य आपणास लाभते.
    गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूप. रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही,पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसात करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटे-कुटे, दगडे यांनी घेरलेला आहे. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्री दत्त भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात.
    परिक्रमेला सुरुवात झाल्यावर १२ किलोमीटर वर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीसी नदी लागते 'सरनो' नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे ८ किलोमीटर वर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे ८ किलोमीटर वर बोरदेवी चे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे.
    परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीं साठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. एकूण ३८ किमी अंतर आहे परिक्रमेचे. काहीजण पहाटे ५ ला निघून संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण करतात, तर काहीजण २ दिवसात करतात. स्थानिक भक्तजन ४ दिवस परिक्रमेत सहभागी असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते.परिक्रमा फक्त पायी करता येते. डोली, वाहन या द्वारे करता येत नाही
    या क्षेत्री असे जावे
    गिरनार हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते. जुनागड या शहरापासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.
    या ठिकाणी जाण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड अर्थात गिरनार साठी नियमीत बससेवा आहे.
    रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद, राजकोट, जुनागड पर्यंत रेल्वे सेवा आहे.
    या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत

ความคิดเห็น • 75

  • @gurumauli2021
    @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

    Girnar parikrama mahiti

  • @shreyansjain8762
    @shreyansjain8762 ปีที่แล้ว

    Jai ho bhagwan aadinath ki jai

  • @Upscblog254
    @Upscblog254 ปีที่แล้ว

    Jai Ho bhagwan neminath ji jai jinendra ji jai gurudev

  • @virendrashravan9664
    @virendrashravan9664 ปีที่แล้ว

    Jai Baba Girnar

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  ปีที่แล้ว

      जय बाबा गिरनारी 🙏

  • @user-qj5rz9lm8s
    @user-qj5rz9lm8s ปีที่แล้ว

    Chan ekda nakki girnar parikrama karne garjeche aahe.

  • @saitankkar
    @saitankkar 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती

  • @sambhajibhuse7301
    @sambhajibhuse7301 ปีที่แล้ว

    Jay girnari 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 ปีที่แล้ว

    Shri Datta Guru Maharaj ki jai

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @shreekrishna113
    @shreekrishna113 ปีที่แล้ว

    🌹जय गिरनारी जय शंकर महाराज

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹

    • @kavitagawali8681
      @kavitagawali8681 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🌹🙏🌹

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @seemautekar2443
    @seemautekar2443 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shantanumote838
    @shantanumote838 2 ปีที่แล้ว +3

    🌹जय गिरनारी जय शंकर महाराज 🌹🙏🙏

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      जय गिरनारी

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 2 ปีที่แล้ว +3

    जय गिरनारी🙏

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      जय गिरीनारी 🙏

  • @narayanialshi9074
    @narayanialshi9074 2 ปีที่แล้ว +1

    Shree avdhut chitan shree gurudev datt🙏🏼🌺🌺🇮🇳🚩🛕😃

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      गुरुदेव दत्त 🙏

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 2 ปีที่แล้ว +2

    जय गिरनारी

    • @ramdaskonde4291
      @ramdaskonde4291 2 ปีที่แล้ว +2

      खुप छान माहिती धन्यवाद

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      जय गिरीनारी 🙏

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 ปีที่แล้ว +2

    जय गिरी नारायण......🚩🚩💐💐🙏🙏

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत. आभार.

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरू देव दत्त

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @satishgolatkar7402
    @satishgolatkar7402 2 ปีที่แล้ว +2

    ग्रेट

  • @OfficialRB2021
    @OfficialRB2021 2 ปีที่แล้ว +4

    Nice 👍👍

  • @KapilKumar-qe3ot
    @KapilKumar-qe3ot 2 ปีที่แล้ว +2

    प्यारे प्यारे भक्तों हर हर नर्मदे हर हर नर्मदे

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर 🙏

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏जय जय गूरूदेव दत्त माउली🙏🙏

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त q

  • @vineetataware7629
    @vineetataware7629 2 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव दत्त

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kishorpurule438
    @kishorpurule438 2 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
    🌺🌺🌺🌺💐💐

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @swatisalkar9869
    @swatisalkar9869 2 ปีที่แล้ว

    JAY BABA GIRNARI

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      जय गिरनारी

  • @kaluramkadam1671
    @kaluramkadam1671 2 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती आहे.

  • @sanjaysalkar4583
    @sanjaysalkar4583 2 ปีที่แล้ว

    gurudevdutta

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dattatraykrishnanathpatki4731
    @dattatraykrishnanathpatki4731 2 ปีที่แล้ว +1

    Hari om pranam babaji all parikrama vasi and people
    Get meals snacks free at parikram
    Best way no fear anybody can do
    Enlightening and vibrant padyatrA

  • @archanapawar5200
    @archanapawar5200 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻💐

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @aakashparekh2862
    @aakashparekh2862 2 ปีที่แล้ว +1

    Bhai is shal parikrma kya newz hai kisi ko kuch pata ho to batana plz jay girnari

  • @sulbhadarade8588
    @sulbhadarade8588 ปีที่แล้ว

    Barchi vrun nahi ka gadi

  • @prafullaarjun5630
    @prafullaarjun5630 2 ปีที่แล้ว

    बारामती मधून गिरनार ला येण्याचा प्रवास कसा आहे रेल्वेचा

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว +1

      पुणे येथून गुजरात ला जाणाऱ्या ट्रेन पकडव्यात

    • @prafullaarjun5630
      @prafullaarjun5630 2 ปีที่แล้ว +1

      पुण्यातून कितीला ट्रेन असते व गुजरात मधून कोठे जायचे

    • @gurumauli2021
      @gurumauli2021  2 ปีที่แล้ว +1

      पुणे येथून 5 ट्रेन आहेत वेळापत्रक पाहावे..... अहमदाबाद,किंव्हा राजकोट ला उतरून बसने गिरनार ला जाता येते 🙏

    • @surajvjoshi1
      @surajvjoshi1 ปีที่แล้ว

      Pune to Junagadh la janari Pune Veraval express Pune station varun fakt dar guruvari aste... Junagdh pasun 7 km ahe Girnar...

    • @sulbhadarade8588
      @sulbhadarade8588 ปีที่แล้ว

      Mi tuljapur chi ahi dada mla tren kutun milnar dada