महिमा गातो गुरुभाऊंचा- सतत विनत होई मन- गायक व संगीतकार - श्री. अजितकुमार कडकडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • परमपूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज उर्फ निळकंठ अनंत करंदीकर
    (१९३१ - २००४)
    जयंती- ७ सप्टेंबर * पुण्यतिथी - ८ मार्च (तुकाराम बीज)
    संस्थापक - ओम सद्गुरु प्रतिष्ठान
    बोरीवली - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पादुकास्थान (१९८४)
    खोपोली - प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मूर्तीस्थान (१९९०)
    परमपूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज करंदीकर (निळकंठ अनंत करंदीकर) म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त आणि स्वामी महाराजांच्या || नमो गुरवे वासुदेवाय || ह्या सिद्ध नाममंत्राचे उद्गाते...! स्वामी महाराजांच्या नामाच्या आणि कार्याच्या प्रचारार्थ त्यांनी अविरत परिश्रम घेतले. नित्य आरती, उपासना, स्वामी महाराजांच्या स्थानावर विविध उत्सव, गुरुचरित्र पारायण, हजारो भक्तांना वैयक्तिक मार्गदर्शन, अध्यात्म आणि विज्ञान ह्यांची सांगड दैनंदिन जीवनात कशी घालावी हे समजावून सांगणारी विवेचनं आणि स्वामी महाराजांच्या ||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||, ||हे दत्त योगेश्वर वासुदेव, श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह|| तसेच ||नमो गुरवे वासुदेवाय|| ह्या नाममंत्रांची सामुदायिक आणि वैयक्तिक साधना प्रकर्षाने करवून घेतली.
    ‘अलम दुनियेला मी माझ्या सद्गुरूंची ओळख करून देईन !’ ह्या ध्यासाने त्यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांचे पादुकास्थान बोरीवली, मुंबई येथे १९८४ साली स्थापन केले. तर १९९० मध्ये स्वामीमहाराजांच्या पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना खोपोली, जिल्हा रायगड येथे करवली. हजारो भक्तांच्या वैयक्तिक, भौतिक आणि आध्यात्मिक अडचणींचे निवारण करीत ‘श्वासे श्वासे वासुदेव नाम स्मरामि’ असं म्हणत मार्च २००४ साली त्यांनी देह पंचत्वात विलीन केला. त्यांच्या पश्चात त्यांच्या आज्ञेनुसार सद्गुरु श्री वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांनी दोन्ही स्थानांची आणि सर्व भक्तांची जबाबदारी उचलत सद्गुरु कार्याची धुरा समर्थपणे पेलली. सर्व समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सतत कार्यरत राहण्याचं, नामस्मरण करण्याचं आणि अखंड सेवारत राहण्याचं शिवधनुष्य प्रत्येक भक्ताच्या हाती सोपवणाऱ्या आणि ते पेलण्याची ताकद देणाऱ्या सद्गुरुंना शतशः नमन..!!
    नमो गुरवे वासुदेवाय ! नमो गुरवे नीळकंठाय !

ความคิดเห็น • 2