जागते रहो आगे खतरा है!...कॉलेज रस्त्याची एक बाजु नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • तळोदा
    शहरात कॉलेज रस्त्याच्या एका बाजुस पावसाचे पाणी आणि त्या पाण्याचे घाणपाण्यात रूपांतर झाल्याने त्या रस्त्यावरील एक बाजु नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वापरण्यास बंद झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत पाणी न गेल्यामुळे यावर पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेलाय. पाऊस सुरु असतांना या ठिकाणी 2 फुटपर्यंत पाणी साचते. परंतु आता पावसाच्या उघडीपला जवळजवळ चार दिवस झाले तरी रस्त्यावरील पाण्याचा निचरा होईना. या ठिकाणीही तेच रडगाणे नैसर्गिक उतार नाही.पावसाच्या पाण्याचे घाणपाण्यात रूपांतर झाल्याने परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका निर्माण झाला आहे.
    या रस्त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच गुरे ढोरे यांची नेहमी वर्दळ असते. वाहनचालक,पादचारी, जनावरे यांना पर्यायी एकच बाजू असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याच्या दुभाजकात चीनच्या भिंती सारखी मोठी भिंत असल्याने तसेच एक बाजु बंद असल्याने इथे डाव्या बाजुने चला रुल लागू होत नाही. केंव्हा कोण कोणत्या बाजुने आपले वाहन वळवणार याचा अंदाजा समोरच्याला घेता येत नाही.
    म्हणून मोठा अनर्थ होण्याआधी,लोकांच्या आणखी नाराजीला सामोरे न जाता पालिका प्रशासनाने त्वरित कॉलेज रोडवरील घाणपाण्याचा निचरा करुन रस्ता सुरु करावा अशी मागणी जोर धरत आहे.

ความคิดเห็น •