Facebook Live - 2 Paddy Transplantation at Farm of Happiness Agro Tourism Homestay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • This is our second live video on Facebook on 7th July. Encouraged by the response on Facebook and youtube, we felt like sharing this fun-filled activity of Rice farming at our farm. The rains, the mud, the greenery... all of it is really fun and each element of the act has a reason, a valid reason that opens up insights for life. Loved sharing this one too!

ความคิดเห็น • 514

  • @prmodpatil2412
    @prmodpatil2412 3 ปีที่แล้ว +2

    आपण प्रत्येक वेळी आपल्या कोंकणी माय बोलीतून बियांवर, रोपांवर, जे काहीं संस्कार करून मातीला मायेचा चिऊ घास भरवता आपल्यला अप्रतिम आवडत. संपदाताई, आणि, दादा, तुम्हा दोघांना खुप खुप शुभेछा. माझ आजोळ ही रत्नागिरी जि. तिल च सडये, गावंचे आहे !!!

  • @aditiparab1625
    @aditiparab1625 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर जीवनशैली ची निवड केली आहे तुम्ही , खूप खूप अभिनंदन तुमचं 🎉🎉

  • @sanjayspacharya
    @sanjayspacharya 4 ปีที่แล้ว +1

    शेती म्हणजे अत्यंत अत्यंत कष्टाचे काम मग ते तुम्ही हौसेने करा अथवा स्वतः रोजी रोटी साठी करण असो.त्या कष्टाने पिकवलेल खायला मिळणे म्हणजे भाग्य.आणि कष्ट करूनही स्वतः च कुटुंब पालन करू न शकण म्हणजे दुर्भाग्य. आपण मनापासून करत असलेल्या कष्टाना सलाम. कारण ज्या वेळी आपण मन लावून कष्ट करतोना त्यात जीव गूंततो....आसाच आपणासरखी आयुष्य जगत आहे, व जगण्याची आवड असणारा.

  • @sujatatawde2899
    @sujatatawde2899 3 ปีที่แล้ว +2

    निसर्ग आणि तुमचे अनुभव एकायला खूप आवडतं य, छानच. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा ❤️🎉

  • @prasadfulungade4706
    @prasadfulungade4706 4 ปีที่แล้ว +8

    खूप छान...... दादा ... वर्षी सगळी शेती मी स्वतः केली आहे....आणि ती ही पारंपरिक पद्धतीने....आणि मी 11पद्धतीची वेगवेगळी पिके घेत आहे....खूप असा वेगळाच आनंद मिळत आहे....प्रत्येक गोष्टीचं शास्त्र समजून घेताना अन् ते स्वतः करताना. खूप वेगळ अन् जो शोधत होतो ते मिळत आहे..... धन्यवाद..दादा ... तुमचा TH-cam वरी ल व्हिडिओ बघून प्रेरणा मिळाली....

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 4 ปีที่แล้ว +4

    अतीशय माहितीपूर्ण अप्रतीम अनुभव 👌 कोकणाला, तिथल्या वातावरणाला खूप मिस करते. प्रत्यक्षात नाही पण मानाने तिथपर्यंत येऊन पोहोचले आहे. तिथला सुखद गारवा आणि गरमागरम वाफाळलेला चहा पुण्यात अनुभवण्यास मिळाला. खूप खूप धन्यवाद मातीशी नाळ जोडलेली असली पाहिजे या उक्तीचा साक्षात अनुभव आला. आपणास आणि आपल्या स्तुत्य उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏

  • @ashwininawale2875
    @ashwininawale2875 4 ปีที่แล้ว +4

    कुठे आपली कमाई काळ्याची पांढरी करण्यासाठी जमिनी घेणारे सावकारी वृत्तीचे , मातीबद्दल 0% प्रेम असणारे पैसेवाले आणि कुठे मातीला घास भरवताना भावुक होणारे हे अभ्यासू शेतकरी...
    खूप भावपूर्ण नमस्कार , शुभेच्छा...

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ.तुम्ही दोघंही simply great .love u both.♥️♥️🙏

  • @manjiribagkar6371
    @manjiribagkar6371 3 ปีที่แล้ว

    संपदा ताई मी खूप मोठी फॅन आहे तुमची.तुमची ही बाजू आणि हे सर्व पहिल्यांदाच मी फेसबुक वर पाहिले.आणि तुम्हा दोघांच्या जिद्दीला सलाम.खूप आवडेल आनंदाच्या शेता ची सफर करायला आणि शेतात काम करायला.

  • @asawarinaware31
    @asawarinaware31 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे निसर्ग सौंदर्य। तुम्हा दोघांचे निसर्ग आणि शेती चे प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे।मला व माझ्या पतीला खूप हौस आहे शेतीची। इतक्यातच आम्ही कूलर च्या टाकी मध्ये आमच्या हौशी साठी पालक व मेथी लावली आहे। खूप आनंद मिळतोय आम्हाला। तुमचा आनंद मी नक्कीच समजू शकते। खूप छान तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक आणि आभार 🙏
    आईला भरवलेला घास ****अप्रतिम 👌शब्दांच्या पलीकडे👍💐🙏

  • @sanjaygulvani4830
    @sanjaygulvani4830 4 ปีที่แล้ว +9

    We envy you. The things you have been doing is the deep down in the mind of millions . Keep it we have been enjoying this teasing.

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 3 ปีที่แล้ว

    खूपच छान संकल्पना. एक वेगळंच आणि धाडसी पाऊल उचललत. खूप शुभेच्छा

  • @Ajinkyamilindthakur2393
    @Ajinkyamilindthakur2393 3 ปีที่แล้ว

    🙏 संपदा ताई.मी पहिल्यांदा comment देत आहे.मला खूप आनंद झाला तुला पाहून ऐकून .आणि खुप मज्जा आली.हे सारे पाहून.आशा करतेकी कधी तरी आम्ही पण हे सारं अनुभव घेऊ.Thanks. गर्मी मध्ये पावसाचा आनंद घेतला.शेती पहिली.तुमचं फार्म of happiness pahile.खुप सुंदर.Thanks once again.

  • @nitinphaterpekar7424
    @nitinphaterpekar7424 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर संकल्पना आहे तुमची नैसर्गिक शेतीची. शेतीला घास भरवण्याची कल्पना तर खूपच आवडली .

  • @naynarege5146
    @naynarege5146 4 ปีที่แล้ว +9

    आज पुन्हा आनंदाचे शेत बघताना खूप आनंद झाला. संपदा जी घास भरवतना तुमचा कंठ दाटून आला आणि इथे माझाही.
    इतक्या मनोभावे तुम्ही दोघे हे काम करत आहात, जणू काही एखादं बाळ जन्माला घालून त्यावर संस्कार करत आहात. आज पासून माझ्या प्रार्थनेत तुमच्या रसायन विरहित शेती साठी , उत्तम प्रतीचे पीक येण्यासाठी प्रार्थना करेन.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  4 ปีที่แล้ว +1

      आभारी आहोत असं म्हणणं त्रोटक, अपुरं आहे तुमच्या या सहभावनेसमोर, तुमची प्रार्थना पूर्ण पृथ्वीवरील अन्नाला लागू पडो!

  • @manoharkamath8561
    @manoharkamath8561 3 ปีที่แล้ว +1

    Mr. Rahul Kulkarni and Mrs. Sampada Joglekar Kulkarni my Namaaskar and Pranaam. We are truly inspired by your mission and the hard work you and your farming team are putting in to educate global population about sustainable farming. To me its the Gurukul of farming. Western nations have seen the value. I have watched some of your videos and interviews. Most impressive one, Dil Ke Kareeb where Sulekha Talwalkar speaks with Sampada. We want to stay at the "FarmofHappiness" during our next visit to India after we are safe from this pandemic. I have questions and thoughts to share. We want to partake in your mission since it takes us back to our roots which been forgotten in the so called modern times.

  • @ashokvaidya9533
    @ashokvaidya9533 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर कोकणातील पाऊस आणि मचाण अशाच गोष्टी कोकणातील मला खुप आवडतात.

  • @prasadshetty8670
    @prasadshetty8670 3 ปีที่แล้ว +2

    Sir, Madam, I am very much impressed with the way you are showing concerns for the environment. You have inspired me to go back to the roots from where we all came from. Do keep up the good work. Looking forward to meet you one day.

  • @leenadighe218
    @leenadighe218 4 ปีที่แล้ว +4

    Waah! Great work!! Hats off to Sampada, Rahul, Sharvari and the whole team!! Really appreciate your hard work and sincere efforts to preserve nature and do such beautiful farming 💝

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 4 ปีที่แล้ว +3

    🍀🌿 संपदा ताई आणि राहुल दादा तुम्ही खूप खूप मेहनत घेत आंनद पण उपभोगत आहात...शेती चे काम करता्नां. ...कारण तुम्ही ते जे करता ते अगदी मनापासून करता..🌿🍀 तुमच्या विडिओ मधुन खूप छान माहिती दिली जात आहे.. एवढं सुंदर नियोजन करून शेती केली..तर आपल्या विदर्भातील शेतकरी बांधव आत्महत्या करणार नाही.🍀🌿
    अशी भावना मनात दाटून आली की हाच तो खरा उपाय आहे ज्यामुळे शेतकरी सुखी.. समाधानी होईल..तुमचे विडिओ प्रत्येक शेतकऱ्यानं पर्यंत पोहोचले कि ब-याच लोकांना मदत होईल अशी आशा आहे.. .. तुमच्या या मार्गदर्शक विडिओ मधुन नवयुवकानां प्रेरणा मिळेल.‌..शेतीला चांगले दिवस येतील.. भरघोस उत्पन्न मिळेल....🌿🍀

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या भावना सुंदर आहेत, निर्मळ आहेत. फक्त लक्षात घ्या की आम्ही किंवा कोकणातले बहुतांश शेतकरी हे स्वतःचं अन्न उगवण्यासाठी शेती करतात जशी दोन पिढयांपुर्वी सगळीकडे केली जायची. आज तुम्हा आम्हाला माहीत असलेला शेतकरी हा छोट्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शेती करतो. त्यामुळे त्याला दुर्दैवाने व्यावसायिक चटकेही भोगावे लागतात. त्यासाठीच आपली सर्वांची अन्नाबद्दलची व्याख्या बदलून पूर्वीसारखी होणं आवश्यक आहे. मग 'सर्वत्रे सुखीन: संतु' होईलच.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 3 ปีที่แล้ว +1

    कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात शेती असणं हे खरंतर भाग्यवंताचं लक्षण आहे. एकंदरीत आपल्या व्ही डी ओ क्लिप मधून तिथल्या निसर्ग संपन्नतेचे दर्शन घडते. खूप छान. असेच छान छान व्हीडीओ पाठवत रहा.

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 3 ปีที่แล้ว

    Khup chan...Aanandach shet..khup chan kalpna..mast shet...Hiravgar...shant...man prasanna zal...baghun..
    He shet baghayala yayala nakki Avdel...khup shubhecha 🙏😊

  • @supriyaparab9458
    @supriyaparab9458 4 ปีที่แล้ว +3

    Amazing, Awesome! you are explaining all intricacies in much details. My native place is konkan, My mother explained these farming techniques many times however after watching your video I actually understood. I wish some day I build farm like this. Hats of to your hard work.

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 4 ปีที่แล้ว

    खूपच छान संस्कार करूनच बियाणे, माती, निसर्गाच्या सानिध्यात शेती पिकविली जातेय मस्तच अनुभव आहे संपदा ताई सुरेख विश्लेषण आहे......

  • @alkapande145
    @alkapande145 4 ปีที่แล้ว

    खूप खूप आवडला हा व्हिडिओ, तुमचं शेतीवर,त्यातील पिकांवर,तणांवर असलेलं प्रेम क्षणोक्षणी जाणवतं. माझं कोकणावर खूप प्रेम आहे,ही अशी शेती हे माझं पण एक स्वप्न होतं, ते तुमच्या रुपात पूर्ण होताना बघून खूप आनंद झाला.मी इतक्यातच One Straw Revolution वाचून पूर्ण केलंय, ते तुम्ही जगताना,आणि त्यात तुमच्या प्रयोगांची भर घालताना बघून खूप आनंद झाला.कधी एकदा जग पुन्हा रुळावर येईल आणि कधी एकदा मी तिथे येईन असं झालंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @pratschie
    @pratschie 4 ปีที่แล้ว +1

    Masta masta masta .. sweet coincidence mhanje .. metkut bhaat khaat astana ch tumhi tya bhatachya varsity cha metkut bhaat karta proper suitable variety cha ullekh kelat ... masta watla ... pawsatla kela chaha baghun khup masta ... can’t wait for next video ... it’s therapeutic to watch your videos .. do it as often as you can please 🙏🏻

  • @kundabhosle6686
    @kundabhosle6686 ปีที่แล้ว

    😂मी कुंदा भोसले डोंबिवलीवरून तुमचा आताचा चालू असलेला व्हिडीओ बघत आहे एकदम मस्त वाटते मला खूपच आनंद मिळतो कोकणात पावसात गेल्या सारखं वाटत

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 4 ปีที่แล้ว

    किती सुंदर पद्धतीने तुम्ही समजावून सांगता...पिकाला बीला घास भरवण्याची कल्पना किती छान आहे आणि संपदाताई आम्हाला जाणवलं की हे सांगताना तुमचा कंठ भरून आला, सद्गदित झालात. तुमच्या, राहुलदादांच्या जिद्दीला, कष्टाला सलाम आहे. खरंच भेट द्यायला आवडेल.

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 ปีที่แล้ว

    निसर्गसंपन्न आणि सुंदर हिरवाई ..मन प्रसन्न झाले..निसर्गाशी एकरुप झाला आहात ..खूप शुभेच्छा ...स्नेहा पोतनीस , कोल्हापूर

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว

    राहुल आणि संपदा तुमचे दोघांचे खूप खूप आभार आम्ही सादे शेतकरी युटुबवर जास्तकरून वापरतो दुसरे काहीही नाही मी स्वतः हा फक्त शेतीशी निगडीत तुमचे सारे व्हिडिओ पाहानार आहे तुमचे दोघांचे पुनश्च खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद राहुल संपदा

  • @anaghachavan3909
    @anaghachavan3909 10 หลายเดือนก่อน

    खुप छान शेती करताय आणि शेती करताना तुम्ही पण खूप आनंदी आहात आई कशी आपल्या बाळाची काळजी घेते किंवा करते तशी तुम्ही काळजी घेताय खूप छान असेच उपक्रम करत रहा आणि लोकांना नेसर्गिक जेवण जेवायला घालत रहा आणि तुमचा सारखी नैसर्गिक शेती बाकीच्यांनी पण करावी अशी देवाजवळ प्रार्थना

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว

    *"Farm of happiness agro" प्रथम आपले खूप खूप अभिनंदन ! आणी आभार ! कारण आपल्यामूळे हा प्रोग्राम आम्हा सर्वाना पहाता आले ! "कृषिक्षेत्र" हे असे आहे की प्रत्येकाला भूरळ पडते ! आणी निसर्गरम्य दृश्य पाहून मन शेतात रमते!*

  • @manjuchikteabhyasjatra2468
    @manjuchikteabhyasjatra2468 2 ปีที่แล้ว

    Great task, really proud of you, Shri Swami Samarth, Shree Gurudev Datta

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale08 4 ปีที่แล้ว +1

    कोकणातील सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले. तुम्ही दोघांनी खूप छान माहिती दिलीत.

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale08 4 ปีที่แล้ว +14

    आई आपल्याला घास भरवते...आणि आता आपण तिला भरवतोय...किती सुंदर कल्पना...वाह सुरेख...😊

    • @rekhakhade447
      @rekhakhade447 3 ปีที่แล้ว

      आई आपल्याला घास भरवायची , आणि आता आपण तिला भरवतो खूप सुंदर विचार सुचला

    • @rekhakhade447
      @rekhakhade447 3 ปีที่แล้ว

      आम्हाला भेट द्यायची आहे वाट पाहत आहोत तिथे येण्याकरिता

  • @MrJAGDISHCHAVAN
    @MrJAGDISHCHAVAN 3 ปีที่แล้ว

    Rahul ji & Sampada ji You are amazing. It is Devine blessings showering on you. Please keep the good work . Almighty is speaking through your mouth.

  • @geetapandit3106
    @geetapandit3106 3 ปีที่แล้ว

    खुपच छान! ह्या एवढ्या शब्दात भावना व्यक्त होणे शक्य नाहित. पाहू तुमच्या आनंदाच्या शेताला भेट देण्याचा योग लवकर कसा आणता येईल. तुम्हा दोघांचेही खुप कौतुक...

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 ปีที่แล้ว

    नमस्कार म्यम, मी सौ. विजया. गृहिणी, मी तुमची धी ना धी धा. पासूनची फ्यान आहे. भविष्यावर बोलू काही. आधुनिक शेती बद्दल छान माहिती दिली. माझे बाबा शेती करत असे. धन्यवाद

  • @satishbhise8321
    @satishbhise8321 4 ปีที่แล้ว +3

    Very informative and interesting ! We can experience the joy and satisfaction this wonderful concept of farming can give !

  • @shamkumar1960
    @shamkumar1960 3 ปีที่แล้ว

    फारच चांगला विचार आहे. हे सगळ बघून खूप समाधान आणि आनंद मिळतो आहे. खूप छान माहिती पण तुम्ही त्याबरोबर समर्पक शब्दात मांडता ते ऐकत रहाव अस वाटत.

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 4 ปีที่แล้ว +1

    छान!!...दाढ ओढण खास रत्नागिरी चा शब्द ..सासरी सिंधुदुर्ग याला तरवा म्हणतात ..nostalgia !!मस्त stay blessed..धरीत्रीच्या कुशीत बीय बीजाण रुजल..very noble work.

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 10 หลายเดือนก่อน

    Khoop chhan sampada rahul ! Tumcha shabdankan etaka sajiv asata ki bhougolik anter asunahi koknatil sheticha aanand gheta yeto .

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 4 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर! सुखावलेला निसर्ग आणि तो पाहून तृप्त होणारा आत्मा ! खूप दिवसांनी हा तृप्तीचा स्पर्श झाला. शेती करण्याचं भाग्य नाही पण ट्रेकिंगच्या वेडामुळे अनेक शेतकर्‍यांशी संवाद साधता आलेला आहे. त्याचा एक आभासी का होईना पुनर्प्रत्यय मिळाला.

  • @sandeepkamble2688
    @sandeepkamble2688 3 ปีที่แล้ว

    Sheti karan manje khup kasht aahet. Tum Acha prayatna changle aahet. Shetakari hatbal hot astana tum Acha nava drurushtikon navya pidhila nakkich preranadayak!!! Khup shubhechya!!

  • @tonguetwisters7319
    @tonguetwisters7319 ปีที่แล้ว

    खूप छान निर्णय घेतला संपदाने
    शहरातील धूळ, प्रदूषण, विषारी अन्न, लोकांचे हेवेदावे, फ्लॅट chya भींती सोडून निर्मळ कोकणात स्थिरावली🙏🏼 आमचाही भविष्यात असाच विचार आहे.. फुल्ल to oxigen and organic.शेतात औषधी वनस्पती ही लावायचा विचार करावा.

  • @swapnapurandare1938
    @swapnapurandare1938 3 ปีที่แล้ว

    Khup chan nisrag Ani tumhi doghni detail mahiti sunder sagitali ahe,aplaya Aai la ghas bhravne kiti sunder kalpna ,Antancha vas amhala ala itka sunder nisrag tumhi dakhvla baddl tumche khup khup abhar,tumche nevedan khupch manala bhaval🙏🙏

  • @sonaliundare1298
    @sonaliundare1298 4 ปีที่แล้ว +1

    Tai aani bhau khupach sundar ashi sheti keli aahe ,mala hi khup aavad sheti karayala ,mazya navaryane mala video pathala aani sarakh sangital ki ha video bagh ,tula khup aavadel ,aani kharach khupach sundar sheti keli aahe mala tumacha video khup aavadala thanks

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 3 ปีที่แล้ว

    Sampada,Rahul,machan khup sunder,shet chhanch,paus kiti chhan padtoy,tumchya kashtana salam ,

  • @prajugujar285
    @prajugujar285 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan concept ahai sir ani mam tumcha...konkan khup sundar ahai...Maze shikshan he chiplunchya agri culture clg madhe zalay...so I can feel this..and also miss this greenery and nature of konkan...nakki yeichay amhala Farm of Happiness la bhet dyala😊😊

  • @rutujasawant3110
    @rutujasawant3110 3 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब तुमच शेती संदर्भातले सर्व व्हिडिओ आम्ही सहकुटुंब पाहतोखूप छान वाटतं आम्ही पण गावाला आल्यासारखं वाटतं तुम्ही दोघे एवढे मोठे स्टार आताच्या तरुण अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना शेतीसाठी नवीन आदर्श ठेवलाय अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान लोकांपुढे ठेवून शेतीमध्ये बरच काय करू शकतो नी दाखवून जागतिक दर्जाचा असा हा तुमचा उपक्रम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोकणातले तरुण आणि तरुणी तुमचा आदर्श ठेवून आपापल्या गावी आपल्या वडिलोपार्जित शेती मध्ये कौशल्य दाखवतील कोकणातल्या लोकांच्या शेती संदर्भातल्या स्मृती तुम्ही जाग्या केल्यात आहात तुम्हाला लाख लाख धन्यवाद कोकणातले पुढची पिढी तुमच्याकडून बरच काही शिकेल तुमच्या या प्रवासात पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद साहेब आणि मॅडम

  • @jaywantlimaye1213
    @jaywantlimaye1213 4 ปีที่แล้ว

    छान
    निसर्गाच सुंदर दर्शन घडवलत
    मनाला ही खुप प्रसन्न वाटतय
    आपल्या या रंजक शिक्षणाद्वारे आपण अनेकांना निसर्ग व शेती या विषयी साक्षर बनवताहात
    आपणास अनेक शुभेच्छा
    असच कार्य आपणाकडून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @powerofsharemarket7801
    @powerofsharemarket7801 4 ปีที่แล้ว +1

    This is incredible. You always looks refreshing while you are on your farms. Thats refresh me also. Good, enjoying farming & educating us. Thanks for everything.

  • @akshaykhole1744
    @akshaykhole1744 2 ปีที่แล้ว

    हे सगळं वातावरण बघून ,हा पाऊस, हे हिरवेगार झाडं, एकच वाटतं की तुम्ही स्वर्गात राहता . कोकण एक स्वर्ग.

  • @ramanayak352
    @ramanayak352 4 ปีที่แล้ว +4

    We r seeing the nature through ur eyes.... loving it to the core..stay blessed

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 3 ปีที่แล้ว

    खुप विस्तृत माहिती..खुप चांगला प्रयत्न
    ...खुप खुप शुभेच्छा

  • @mrudulanarkhede877
    @mrudulanarkhede877 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे हा तुमचा प्रयत्न. मागचा व्हीडिओ पाहिल्यावर बरीच उपयोगी माहिती मिळाली . असेच चांगले निसर्गाजवळ नेणारे व्हीडिओ बघायला आवडतील आम्हाला

  • @vijayakarnataki7293
    @vijayakarnataki7293 4 ปีที่แล้ว +1

    किती अप्रतिम दृश्य आहे...धांवत यावंस वाटत आहे....पाहू कधी योग येतो ते... धन्यवाद मनापासून

  • @kailaschaugule1202
    @kailaschaugule1202 4 ปีที่แล้ว

    खूप छान, जे आम्हाला अशक्य वाटते ते तुम्ही शक्य करून दाखवला आहे. तुमचा जीवन प्रवास आणि हा व्‍यवसाय हे बघितले की याच कुठ लॉजिकल जुळत नाही. एवढ्या हाय-फाय जीवन जगणाऱ्या लोकांच्या मनामध्ये मध्ये एवढे चांगले विचार आणि एवढी साधी राहणी असू शकते यावर विश्वास बसत नाही खरंच हा व्हिडिओ आम्हाला दाखवल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे.

  • @rohiniithape3231
    @rohiniithape3231 3 ปีที่แล้ว

    हा व्हिडीओ बघूनच मनाला आलेली सगळी मरगळ झटकली गेली , खूपच सुंदर, छान उपक्रम , शब्द अपूरे पडतील ,हा व्हिडीओ बघून काय वाटतं ते सांगायला

  • @kunaljadhav4202
    @kunaljadhav4202 4 ปีที่แล้ว +1

    A beautiful sight.. मेहनत आणि प्लँनिंग खुप आहे पण त्यातून मिळणारा आनंद ही तेवढाच आहे.. May be That's why you named it Farm of Happiness..

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 3 ปีที่แล้ว

    खरंच किती भारी आहे हे सगळं अनुभवणं।।। शब्द नाहीत ..... कामाची तारीफ करावी की अजून काही..….. खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सगळं share करताहात।।।

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 4 ปีที่แล้ว

    किती छान वाटलं म्हणुन सांगु मी तिथे प्रत्यक्ष कोकणातच आहे असं वाटलं. अगदी ताजंतवानं हिरवंगार मखमली निसर्गसौंदयाने डोळे आणि मन विसावले. नेमकं शब्दात नाही मांडता येत .मस्तच

  • @ashwinivjoshi
    @ashwinivjoshi 3 ปีที่แล้ว

    खुप छान आयुष्य, कष्ट तर भरपूर आहेत यात, पण निखळ आनंद अवर्णनीय!
    तुम्ही जी ही सशक्त बियाण मिळवता, ती पुन्हा तयार झाली तर इतरांनाही लागवड करायला देता का? असेल तर मी माझ्या नातेवाईकांना जरूर सांगेन की ही नैसर्गिक बियाणे घ्या तुमच्याकडून.

  • @sudeepnetke001
    @sudeepnetke001 4 ปีที่แล้ว

    छान आणि प्रांजळपणा मान्य केलंय तुम्ही की तुम्ही शिकणारे शेतकरी आहात.. लोक मान्य च करत नाहीत... कित्येक लोकांचं खासकरून खेड्यातून नोकरी निमित्त शहरात स्थायिक झालेल्यांना त्यांचा गाव त्यांची शेती खुणावत असते.. पण नोकरी सोडता येत नाही.. खूप guts लागतात तुम्ही जे काही करत आहात ते करायला.. सदा सर्वकाळ शुभेच्छा.. सगळं आमच्यासोबत share करत रहा.. तुमच्या माध्यमातुन आमची अधुरी स्वप्ने पूर्ण केल्याचा आणि जगल्याचा आनंद घेऊ देत आम्हाला..

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 4 ปีที่แล้ว

    तुमचा विडियो बघून असं वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात.ज्याला निसर्गाच्या शेतीच्या कुशीत राहता येत व बांगडता येत.फारच सुंदर आहे.निसर्गाची हिरवाई तुमच्या निवेदनात जाणवते. खूप सुंदर.

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez 4 ปีที่แล้ว

    खूप छान आपला विडिओ आवडला. या व्हिडीओ मधून बरीच चांगली आणि दुर्मिळ माहिती मिळाली. या आणि अश्या अनेक व्हिडीओ मधून काही मोजक्या लोकांना शेती करण्याची स्पुर्ती मिळाली तर नवल नाही. आम्हा पवार परिवाराकडून आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 4 ปีที่แล้ว

    आत्ताच्या ह्या परिस्थिती तुम्ही आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन गेलात. पावसाच्या सरींचा, पक्ष्यांचा आवाज, बहुतेक मधूनच येणारा केकारव. तुम्ही दोघांनी सुंदर सांगितलेली भातशेतीची माहिती. खूप खूप छान. आम्ही आमच्या शेतात असेच फिरलो होतो त्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळ्यांना धन्यवाद.

  • @nirupamanaik2628
    @nirupamanaik2628 3 ปีที่แล้ว

    Tumachi pratyek babtitli mahiti uttam v samjavnyachi padhhat hi khup chhan.

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 3 ปีที่แล้ว

    Waaa... Santa wani khup chan..... Kirtan sohala..... Asa fill hotey

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 3 ปีที่แล้ว

    खूप मोठे काम करत आहात. शेती या व्यवसायाला तुम्ही मोठे केले लोकांच्या नजरेत.कारण शेती हा व्यवसाय सर्वात मोठा आहेच

  • @rupeshjadhav3686
    @rupeshjadhav3686 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mast ......mi kokanatil ahe paan sadhya punyat asto mi final kelay sheti karayachi...maza kokanat shet ahe ......grate

  • @sunillakhe3634
    @sunillakhe3634 4 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त.. कधी यायला मिळेल माहीत नाही.. .. फारच छान वातावरण

  • @sachinmhaprolkar6021
    @sachinmhaprolkar6021 4 ปีที่แล้ว +1

    You both are great... Lots of hard work did... Salute ... Thanks

  • @GurudeoKaware
    @GurudeoKaware 4 ปีที่แล้ว

    नमस्कार संपदा ताई व राहुल दादा...
    सर्वात पहिले तर खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे,माझ्या जुन्या कंमेंट ला रिप्लाय दिल्या बद्दल🙏
    It is always said that all the great people's are great communicators first...
    तुमच्या दोघां कडे बघून हे खरं आहे अशी खात्री मनाला होते😅...
    नेहमी प्रमाणेच हा व्हिडिओ पण खूप खूप छान होता खूप आवडला ...संपदा ताई तुम्ही सांगितलेली ती आपण मातीला घास भरवायची कल्पना खरच भावुक करणारी होती ...
    Best wishes to both of you and your great work👏

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद गुरुदेव, अहो तुम्ही इतक्या आवडीने आमचं काम 30-40 मिनिटं बघता, त्यावर आमचं कौतुक करता, आमच्यापर्यंत ते पोहोचवता... आणि आम्ही त्याला साधं उत्तरही द्यायचं नाही असं कसं चालेल? आम्हाला आवडते ही देवाणघेवाण!

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 3 ปีที่แล้ว

    Nice view and Hatts off to yr HARDWOK AND VERY GOOD WORK

  • @anandipatil9329
    @anandipatil9329 ปีที่แล้ว

    खूप सुंदर शेती कष्ट भरपूर घेत आहात

  • @shaileshgujar3075
    @shaileshgujar3075 4 ปีที่แล้ว

    या लाॅकडाऊनच्या काळात अशी काही सफर घडवून आणणे हीच एक मुळात भन्नाट कल्पना आणि ती यशस्वी झालीय, आपल्या कल्पक प्रात्यक्षिकं आणि सहज-सुंदर बोलण्याने.
    त्रिवार धन्यवाद!
    हा भाग बघते वेळी एकदा असे वाटून गेले की - गावठी भाताच्या रोपांना अन्य तणांच्या स्पर्धेत वाढवायच्या प्रयोगाच्या प्रसंगाची सांगड समाजातील अशा मुलांशी करता आली असती जी प्रतिकूल परिस्थितीतून झगडत वर येतात आणि सबळ होतात. याउलट चांगली support system असूनही काही Hybrid रोपट्यांप्रमाणे नाजूक रहातात, सकस वाढ न होता.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  4 ปีที่แล้ว

      नमस्कार शैलेश आणि धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल! आपला मुलांचा मुद्दे अगदी आमच्याही मनातलाच आहे. आणि अगदी सत्यही आहे. लाईफ स्किल्स असल्यामुळे ही मुलं अत्यंत कठिण परिस्थितीतही तग धरून ठेवू शकतात हे सत्य आहे

  • @yashashrigore9927
    @yashashrigore9927 4 ปีที่แล้ว +2

    Aprateeemmm gg.....vedddd lagtay pahun...yayche ahe lavakr Ch tithe.....tumche bolne Suddha kiti nirmal ani sahaj ahe!!!
    Tithli hirvaai ani varyachi gaaj keval bhannaatttt!!!!
    Machanavar tar swarg ch asel....
    Ek swapn tumhi prattyaksh jagtaay !!!
    Stay blessed !!!
    Anant , bakuli ani prajakt jeev ki pran !!!! Anantacha bahar pahun dole nivle!!

  • @anirudhaphadke582
    @anirudhaphadke582 4 ปีที่แล้ว +4

    very interesting technique of building natural resistance to weeds into rice saplings 'genetic encoding' of sorts. will love to know more about this. Nice initiative and thought process. Hybrid seeds destroy everything indigenous.

  • @nileshpatil1605
    @nileshpatil1605 9 หลายเดือนก่อน

    खुप छान सर आणि मॅम याचबरोबर तुम्ही गावठी कोंबड्यांचे फार्म चालू करा खुप छान आहे

  • @anaghanaik4011
    @anaghanaik4011 3 ปีที่แล้ว

    Sampada doghanche abhinandan malahi hay khup aavdte really tumcha ha nirnay dhadsi ani koutukaspad aahe mumbai ani tv Sarkhe madhayam sodun gavakade rahata kharch khup abhiman vatto mi aavdine videos baghte

  • @JayantDVagha
    @JayantDVagha 3 ปีที่แล้ว

    Kaay huwa, nusti majja, nusta aanand
    . Phaar yogya dishene tumcha chaallay sagla. Bara, ha aanand tumhi dissipate kartaay aamhaala, tyaala tod naahi.
    Khoop khoop shrimant aahaat tumhi. Kharya arthaani.

  • @pranotiredij
    @pranotiredij 4 ปีที่แล้ว +4

    Water harvesting used in your farms is very interesting and inspiring. Would love to know more about the various water harvesting techniques you have used.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  3 ปีที่แล้ว

      Namaste Pranoti. Thank you for your query. To understand the subject better, you will need to visit the farm in person.

  • @medhadeshpande3396
    @medhadeshpande3396 3 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघही खूप भारी आहात. नम्र आहात, मनापासून छान काम करत आहात आणि त्याचा आनंद इतराना देताय. खूप मजा आली बघताना. पुढच्या भात पेरणीच्या वेळी यायचा प्रयत्न करु. एखादा कामगार कमी सांगा. ☺

  • @urmilavaidya4529
    @urmilavaidya4529 3 ปีที่แล้ว

    Khup chan
    Kokancha hirva nisarga pahun man Prasanna zale .
    Tumhala khup khup shubheccha

  • @benaturalbacktonature3408
    @benaturalbacktonature3408 4 ปีที่แล้ว +1

    Great....really very practical...you are both very great

  • @rashmimorey4622
    @rashmimorey4622 4 ปีที่แล้ว +1

    So much of hard work you all are doing..

  • @sujataerande6887
    @sujataerande6887 4 ปีที่แล้ว

    Tumhi doghahi khup gaud ahat.Khup chan vatata mahiti karun ghetana ani tumchya barobar apratyeksha pane shetatun bhatkayala.God bless you both.

  • @shubhangisatose9963
    @shubhangisatose9963 4 ปีที่แล้ว

    छान वाटले तुमचे शेत पाहून. या वर्षी गावी जाता आले नाही याची रुखरुख होती. ती थोडी भरुन आली. हिरवगार वातावरण व तुमचे उपक्रम बघायला आवडेल.

  • @jagdishpednekar2527
    @jagdishpednekar2527 4 ปีที่แล้ว

    हे आनंदाचे शेत माझ्या गावाच्या जवळ आहे, मी लवकरच इथे भेट देणार आहे आणि राहुलजी आणि संपदाजी यांना भेटणार आहे.
    हे दोघेही खूप प्रेरणादायी आहेत.
    💐💐

  • @akkhare7642
    @akkhare7642 3 ปีที่แล้ว

    You all are enjoying work. Nice to see that

  • @amphadnisfly
    @amphadnisfly 3 ปีที่แล้ว

    Very Talented move Sampada and Rahul This can be used as study material to show to the students.👍🙏🙏

  • @shashikantvaze6242
    @shashikantvaze6242 3 ปีที่แล้ว

    आपण जे कार्य करत आहात ते खूपच प्रेरणा देणारे आहे. आपण नक्कीच नवीन भारत घडवू शकतो. भारत नक्कीच विश्व गुरू बनू शकतो.

  • @sandeshdalvi471
    @sandeshdalvi471 4 ปีที่แล้ว +3

    Khup mast dada... Incredible Konkan ....!!!!

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 3 ปีที่แล้ว

    खरच खूप सुंदर बोललात ही धरणी आपली आईच आहे जी आपले पोट भरते....

  • @vrushalijoshi8701
    @vrushalijoshi8701 3 ปีที่แล้ว

    खूपच छान, हिरवेगार शेत पाहून मन प्रसन्न झाले

  • @manojmanchekar
    @manojmanchekar 4 ปีที่แล้ว

    खूप छान.
    या लॉक डाउन च्या काळात निवांत वेळ मिळाला आणि आनंदाचं शेत चे बहुतेक विडिओ मी पाहीले.
    असं वाटतंय कि मी प्रत्यक्ष त्या शेतात उभा आहे आणि मीच हे सर्व करतो आहे.
    शेती करण्याची सुप्त इच्छा पुन्हा जागृत झालीय .
    कारण शहरी चाकोरीतून बाहेर पडायला हवं असं सारखं मनात येतंय .
    गेले काही महिने मी TH-cam च्या माध्यमातून शेतीविषयक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे.
    सगुणा बाग तसेच इतर अनेक विडिओ मी पाहिले आहेत.
    आपण सुध्दा शेती करू शकतो असा एक आत्मविश्वास या तुमच्या विडिओ मधून माझ्यात निर्माण झालाय.
    अर्थात कष्ट खूप आहेत याची मला जाणीव आहे पण त्यात तेवढाच आनंद व समाधानही आहे.
    आपण काही सृजनात्मक काम करू शकतो हा विचार वेगळा आनंद देणारा आहे.

  • @satyavanparab6399
    @satyavanparab6399 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत आकर्षक.

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 4 ปีที่แล้ว

    फारच सुंदर,संपदा व राहुल तुम्हा दोघांचे अभिनंदन, संपदा ची ेघास भरवण्या ची उपमा अतिशय भावली, मी मुंबइकर असुनही शेतकरी झाल्या सारख वाटल.🙏🙏

  • @kanchanrambade7408
    @kanchanrambade7408 4 ปีที่แล้ว +2

    Mast ahe farm of happiness......Khup changla vichar ahe.....🤗