Jalgaon Jilha Vidhansabha Elaection 2024 | जळगाव जिल्हा विधानसभा निवडणूक 2024 लेखाजोखा Satta news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ส.ค. 2024
  • #sattanews #सत्ता #हल्लाबोल #Jalgaon_Vidhansabha
    #jalgaon #जळगाव #जळगाव_जिल्हा
    जळगाव जिल्हा येथे ११ विधानसभा मतदारसंघ येतात.
    जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा , भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, जामनेर, चोपडा हे विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये येतात.
    जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त करून कापूस म्हणजेच पांढरे सोने व केळी असे पिके जळगाव येथे घेतली जातात.
    केळीच्या पिकासाठी भारतात प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आता राज्याच्या राजकारणातही गाजताना दिसतोय.
    जळगाव जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भुसावळ.
    भुसावळ विधानसभा मतदारसंघाची एक ओळख आहे ते म्हणजे येथे एक रेल्वे जंक्शन आहे येथून परराज्यात केळीची मोठी वाहतूक केली जाते.
    तसेच भुसावळ येथे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड म्हणूनही भुसावळ ओळखले जाते.
    हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
    भुसावळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक 12 आहे.
    भुसावळ मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याचा समावेश होतो.
    भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC उमेदवारांसाठी राखीव आहे.
    भारतीय जनता पक्षाचे संजय वामन सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
    2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे संजय वामन सवकरे 81,689 मते मिळवून विजयी झाले.
    अपक्ष पक्षाचे डॉ. मधु राजेश मानवतकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यांच्या विजयाचे अंतर 53,014 मत एवढी होत.
    2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सवकरे संजय वामन 87,818 मते मिळवून विजयी झाले.
    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळते राजेश धनाजी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 34,637 मते एवढे होते.
    भुसावळ येथे संजय वामन सावकारे हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत.
    त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महा युतीकडून भाजपचे संजय सावकारे यांना उमेदवारी भेटेल तर महाविकास आघाडी कडून येथे कोणाला उमेदवारी भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रावेर
    मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध, गुर्जर, धनगर, माळी, कोळी, आदिवासी अशा विविध समाजांच्या मतदारांचा समावेश असलेला रावेर विधानसभा मतदारसंघ.
    या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राजकीय समिकरणं विरुद्ध टोकाची पाहायला मिळतात.
    एकनाथ खडसे, गिरीश महाजन असे भाजपचे तगडे नेते या मतदारसंघात प्रभावी ठरतात.
    हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
    रावेर विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११ आहे.
    रावेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल, भालोद, फैजपूर ही महसूल मंडळे आणि यावल, फैजपूर ही नगरपालिका आणि रावेर तालुक्यातील रावेर, खिरोदा, खानापूर ही महसूल मंडळे आणि रावेर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो.
    रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
    2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी अशी लढत होती.
    यामध्ये काँग्रेस पक्षाचे चौधरी शिरीष मधुकरराव 77,941 मते मिळवून विजयी झाले.
    भाजपा पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
    यांच्यातील विजयाचे अंतर15,609 मते एवढे होते .
    2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी झाले.
    त्यांनी काँग्रेस पक्षाच्या शिरीष चौधरी यांचा पराभव केला.
    2014 चा झालेला पराभव काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरून काढला होता.

ความคิดเห็น •