मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आळंदीतील गाजलेले भाषण |आयोजक - पं.दासोपंतस्वामी आळंदीकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • मृदंगज्ञान शिक्षण संस्था , आयोजित
    पं.दासोपंतस्वामी आळंदीकर भव्य संगीत महोत्सव ,आळंदी सन - २०२२
    मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पं.दासोपंतस्वामी आळंदीकर यांना
    महाराष्ट्र राज्य वारकरी कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ...
    माऊली भरभरुन देते तेव्हा..!
    वयाच्या ९ व्या वर्षी माझ्या आयुष्यातुन आई-बापाचं छत्र हारवलं. अनाथ झालो होतो. म्हणून गावकऱ्यांनी आळंदीत आणुन सोडलं. आयुष्य एकटं झालं. ना बाप ना आई. अशाकाळात माऊलींनी मला आपलसं केलं. माऊलींच्या समाधीला जेव्हा हात लावला तेव्हाच डोळ्यातून पहीली धार समाधीवर पडली. अश्रुंचा अभिषेकच म्हणा. त्यावेळेपासुन माऊलींनी मला घट्ट उराशी धरलं. पखवाजाची कला ठासून भरली. सांप्रदायातले अनेक नामवंत गुरु दिले. आणि मग काय पुढच जात राहीलो. मागं वळुन पाहीलचं नाही. जे म्हणुन मागितलं ते सारं माऊलींनी दिलं. स्वतःची ओळख मिळवुन दिली. आता हेच बघा ना..! मी पडलो एक सामान्य वारकरी. माझ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी येणं म्हंजी तशी लय अवघड गोष्ट. पण मनात ठरविलं. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला आणायचचं. गेलो भेटायला. त्यादिवशी त्यांना ताप आला होता. ते कोणालाच भेटले नाहीत. माऊलींच स्मरण केलं. म्हंटल तुझ्या दारातुन आलोयं. बघा तुम्हीच आता. म्हणुन हातात घेऊन गेलेला कागद त्यांच्या टेबलावर ठेवला आणि माघारी आलो. म्हंटल आपला भार माऊलींवर. पुढं काय होणार होतं माहीत नव्हतं. वाट बघुन-बघुन शेवटी आदल्या दिवशी काहीच निरोप नाही म्हंटल्यावर आपला कार्यक्रम साध्या पध्दतीने करुन टाकु अस ठरलं. तशी तयारी केली. पण माऊली निराश होऊ देत नाही. पहाटे सहा वाजताच फोन वाजला. आज मुख्यमंत्री तुमच्या कार्यक्रमाला येणार आहेत. पहील गेलो. माऊलीला अभिषेक घातला. मुख्यमंत्री आले. माझ्याविषयी बोलुन निघुन पण गेले. पण भल्या-भल्या लोकांना तारीख मिळत नाही. मग आपल्या कार्यक्रमाला कसे काय..? उत्तर एकच माऊली मला नाराज करीत नाही. भररुन देते. म्हणुनच मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाला आले. उपस्थित शांतीब्रम्ह मारोती बाबा कुऱ्हेकर खा.श्रीरंग आप्पा बारणे, माजी खा. शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार महेंद्रशेठ थोरवे (कर्जत) आमदार दिलीपशेठ मोहीते-पाटील,मा.आमदार शरदराव सोनवणे व समस्त ग्रामस्थ आळंदीकर मंडळी संत ज्ञानेश्र्वर म. संस्थान कमिटी,आळंदी, श्री.नृसिंह संस्थान पोखर्णीकर ग्रामस्थ ज्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले ते माझे शिष्य सुरेश म.फराट श्री.मनोहरपंत कडू व आमदार महेंद्रशेठ थोरवे, सौ.सुप्रियाताई साळुंखे (नगरसेविका खालापूर) श्री.विठ्ठल म.उंडाळकर, श्री.नागनाथ क्षीरसागर, मा.श्री.दयानंद कोळी साहेब,श्री.विकास म्हेत्रे साहेब,श्री.दत्तप्रसाद तापडिया श्री.स्वामीराज भिसे मृदंगज्ञान शिक्षण संस्थेचे आजी माजी सर्व विद्यार्थी वर्ग (महाराष्ट्र राज्य),आळंदीतील सर्व पत्रकार वर्ग आणि सर्व न्युज चॅनेल मिडिया यांनी खूप खूप सहकार्य केले वारकरी सांप्रदायातील माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण. आपला आशीर्वाद असाच रहावा. 🙏 पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांना माझ्या कडून खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी
    कळावे आपला,
    पं.श्री.दासोपंतस्वामी आळंदीकर
    अध्यक्ष- मृदंगज्ञान शिक्षण संस्था, आळंदी
    सिध्देश्वर उंडाळकर,ऋषीकेश उंडाळकर, भुवनेश्वर उंडाळकर
    रामकृष्णहरी 🙏

ความคิดเห็น • 12

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कारयकरमात बघुन मला समाधान वाटले जयहारि माऊली

  • @jayramtangade2589
    @jayramtangade2589 ปีที่แล้ว +1

    आमच्या परभणी जिल्ह्याचे भूषण श्री दासोपंत स्वामी

  • @santoshgarade-v9o
    @santoshgarade-v9o 9 หลายเดือนก่อน

    Jay shiram

  • @माऊलीचीकृपा
    @माऊलीचीकृपा 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला स्वामी कार्यक्रम असा कार्यक्रम आळंदीत प्रथमच झाला आहे आणि नंतर होईल की नाही माहीत नाही पण आपला रौप्य महोत्सव माऊलींच्या कृपेने 1 नंबर झाला 👌👌👌🙏🙏🙏

  • @tekalevitthal
    @tekalevitthal ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी स्वामी

  • @rajendragavale50399
    @rajendragavale50399 2 ปีที่แล้ว +2

    वारकरी वेशभूषेत सूत्रसंचालन झाले असते तर खूप छान झाले असते माऊली.

  • @Akshaybaburavpawar
    @Akshaybaburavpawar ปีที่แล้ว +1

    कार्यक्रम छान झाला पण सूत्रसंचालन व्यवस्थीत झालं नाही 🙏

  • @keshavkumbhar5433
    @keshavkumbhar5433 2 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @amolrautofficial8819
    @amolrautofficial8819 ปีที่แล้ว

    🙏🙏👌👌

  • @ranjanasable6253
    @ranjanasable6253 2 ปีที่แล้ว +1

    Ekach no 👍

  • @sagarzhade5793
    @sagarzhade5793 2 ปีที่แล้ว +1

    जय हो स्वामी जी🙏🙏

  • @arjunnagwe6157
    @arjunnagwe6157 2 ปีที่แล้ว +1

    आमचा गूरुपुजन सोहळा परत ऐसे होणे नाही
    जय गुरुदेव स्वामीजी🙏....!!