Cheese garlic bread with pasta recipe | Fast food recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • अश्याच सध्या व सोप्या रेसिपी झटपट बनवण्यासाठी आतच माझ्या यू ट्यूब चॅनेल ला , subscribe करा.
    या रेसिपी साठी चे साहित्य 👇
    २ ब्रेड स्लाइस
    ३ चमचे बटर
    १ चमचा किसलेला लसूण
    १ चमचा चिली फ्लेक्स
    छोटा १/२ चमचा काळी मिरी पावडर
    छोटा १/२ चमचा मिक्स हर्ब
    कोथंबिर
    पास्ता (इथे मी मशरूम पास्ता केलेला आहे).
    या रेसिपी ला बनवायची पद्धत 👇
    सगळ्यात आधी ४-५ लसूण पाकळ्या किसून घेऊ. नंतर १ वाटी मध्ये ३ चमचे बटर घेऊन त्यामध्ये किसलेल लसूण घालू. त्या मध्ये अजून १ चमचा चिली फ्लेक्स, १ छोटा चमचा काळी मिरी, १ छोटा चमचा मिक्स हर्ब आणि कोथंबीर घालून , सगळं चांगले मिक्स करून घेऊ.
    आता हे मिश्रण ब्रेड स्लाइस ला लाऊन घेऊ आणि थोडं चीज ब्रेड वर किसून घेऊ.
    एक तवा घेऊ, त्या मध्ये १/२ चमचा बटर घालू आणि हे ब्रेड चे स्लाइस त्यावर ठेवू. नंतर झाकण लाऊन एक मिनिट गॅस वर ठेवू. एक मिनिट नंतर झाकण काढू, चीज मस्त वितळलेल दिसेल आणि ब्रेड ची दुसरी बाजू ब्राऊन रंगाची झालेली दिसेल. आता ब्रेड उतरून घेऊ आणि त्याचे स्लाइसर च्या मदतीने २ भाग करून घेऊ . तयार आहे गार्लिक ब्रेड .
    पास्ता हा मी पॅकेट वरील सूचने प्रमाणे बनवायला आहे. पास्ता बनवण्यासाठी एक तवा घेऊ, त्यामध्ये १ ग्लास पाणी घालून , पास्ता व मसाला ही घालू. ते मिक्स करून घेऊ आणि २-३ मिनिट शिजवून घेऊ. आता तयार आहे पास्ता.
    पास्ता आणि गार्लीक ब्रेड आपण सर्व्ह करून घेऊ.
    #youtubvideo #pastarecipe #garlicbreadrecipe #garlicbreadwithpasta #italianrecipe #fastfood #youtubeviral #viral #viralvido #youtubeindia #youtubeviralvideo

ความคิดเห็น • 3