गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर खरंतर अमृताचा कुंभच आहे पण हा माझा छोटासा प्रयत्न, आवडलं तर नक्की लाईक करा😊🙏 गौतम ऋषींच्या शापामुळे देवी अहल्या शिळेत रुपांतरीत झाल्या परंतु त्रेतायुगात जेव्हा विश्वामित्रांच्या सांगण्यावरुन मिथिलेला जाताना रामाने त्या पाषाणाला स्पर्श केला तेव्हा शिळेची पुन्हा एकदा अहल्या झाली.रामाच्या चरणधुळेने कृतकृत्य होवून ती विदुषी रामाला म्हणू लागली... मुक्त जाहला शिंपल्यातला शापित हा मोती रघुपती,आज शापमुक्ती नवीन दृष्टी, नवीन आशा आज मुक्त मी तोडून पाशा राघवचरणे आज स्पर्शूनी,माझी मज जागृती पतिश्रापातूंन आज मुक्तता चरणधुळा ही शिरी लागता शिल्प जणु की माझ्या तनुचे,घेई नवं आकृती स्वर हा पुनरपि आत जागला आज धरेवर स्वर्ग पाहिला धन्य अहल्या आज पाहुनी, रघुकुल शेखर द्युति शिळा भेदूनी तू रघुराया फुलं उमलले, पुलकित काया आज गवसली उक्ति मौना,कृपासरी बरसती पीयुषार्णव जणु राघव भाषण चापधरा,तुज माझे वंदन अखंड गातील स्वर्गी चारण,रामा तुझी सत्कृति काय देवू मी तुला अनंता मानव देही तूच देवता पुर्नजात हा श्वास लाभला,कर याची स्वीकृती
गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर खरंतर अमृताचा कुंभच आहे पण हा माझा छोटासा प्रयत्न, आवडलं तर नक्की लाईक करा😊🙏
गौतम ऋषींच्या शापामुळे देवी अहल्या शिळेत रुपांतरीत झाल्या परंतु त्रेतायुगात जेव्हा विश्वामित्रांच्या सांगण्यावरुन मिथिलेला जाताना रामाने त्या पाषाणाला स्पर्श केला तेव्हा शिळेची पुन्हा एकदा अहल्या झाली.रामाच्या चरणधुळेने
कृतकृत्य होवून ती विदुषी रामाला म्हणू लागली...
मुक्त जाहला शिंपल्यातला शापित हा मोती
रघुपती,आज शापमुक्ती
नवीन दृष्टी, नवीन आशा
आज मुक्त मी तोडून पाशा
राघवचरणे आज स्पर्शूनी,माझी मज जागृती
पतिश्रापातूंन आज मुक्तता
चरणधुळा ही शिरी लागता
शिल्प जणु की माझ्या तनुचे,घेई नवं आकृती
स्वर हा पुनरपि आत जागला
आज धरेवर स्वर्ग पाहिला
धन्य अहल्या आज पाहुनी, रघुकुल शेखर द्युति
शिळा भेदूनी तू रघुराया
फुलं उमलले, पुलकित काया
आज गवसली उक्ति मौना,कृपासरी बरसती
पीयुषार्णव जणु राघव भाषण
चापधरा,तुज माझे वंदन
अखंड गातील स्वर्गी चारण,रामा तुझी सत्कृति
काय देवू मी तुला अनंता
मानव देही तूच देवता
पुर्नजात हा श्वास लाभला,कर याची स्वीकृती
@Kekeh 😇🙏
अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ🎉
@@yashmuley7995 धन्यवाद 🌷
फारच छान 👌👍
@@Sur_Taal_Lay 🙏😊
कान तृप्त झाले💐❤
किती सुंदर रचना, शब्द आणि त्यावर मोहोर म्हणजे बाबूजींचा मधुर स्वर!!
Chaan Geet 👍 Old is gold 👍
Jai shree ram 🙏🙏🌹🌹
जय श्रीराम🙏
Thanks for geet रामायण
Jay shree Raam🙏🙏🙏❤️