किल्ले ढवळगड | पुरंदरमधील दुर्लक्षित किल्ला | Fort Dhavalgad Purandar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2024
  • पुरंदर तालुक्यात सासवड घाटरस्त्याचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे 'ढवळगड.' या गडाला फारसा इतिहास नसल्याने अनेक वर्षे इतिहासकार आणि किल्लेप्रेमींकडून तो दुर्लक्षितच राहिला. सासवड जवळ आंबळे नावाचे गाव आहे. या गावात असलेल्या ढवळगडावर ढवळेश्वर नावाचे शंकराचे मंदिर आहे. पंचक्रोशीत हे मंदिर प्रसिद्ध आहे. परंतु, या मंदिरावर येणाऱ्या भाविकांना किंवा येथील ग्रामस्थांना या जागी आधी किल्ला होता, याची कोणतीही माहिती नव्हती. या परिसरात लांडगे आणि कोल्ह्यांचा वापर मोठ्याप्रमाणावर आहे. शिवाय अनेक पक्षीनिरीक्षकांसाठी हा परिसर म्हणजे नंदनवन आहे. डोंगरावर पाण्याच्या टाक्या, तटबंदीचे काही अवशेष, अर्धवट अवस्थेत उभी असलेली तटबंदी, एक बुरूज, झिज होऊन अर्धे झालेले प्रवेशद्वार, दरवाजाच्या आत सैनिकांना राहण्यासाठी असलेली देवडी, मेटाची ठिकाणे अशा गोष्टी आढळून येतात. इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या 'किल्ले पुरंदर' या संदर्भपुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला असून त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले आहे.पेशव्यांच्या दफ्तरात पुरंदरसह आजूबाजूच्या किल्ल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यातही ढवळगडाचा उल्लेख आहे. दफ्तरातील मोडी कागदपत्रांचा अभ्यास करूनच पुरंदरे यांनी किल्ले पुरंदर हे पुस्तक लिहिले आहे. या किल्ल्याप्रमाणेच मल्हारगड. भुलेश्वरच्या डोंगरावर असलेला दौलतमंगळ हे किल्लेही शिवकाळात गस्त ठेवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जात होते. अशी इतिहासात नोंद आहे.
    #dhavalgad, #purandar #marathimatter

ความคิดเห็น • 13

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    Khoop. Sundar

  • @bhausahebshingade5863
    @bhausahebshingade5863 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 ปีที่แล้ว +1

    gavat dekhil ढवळेश्वर मंदिर aahe ka?

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      गावामध्ये मंदिर आहे, पण नाव नाही सांगता येणार

  • @satishshinde2793
    @satishshinde2793 2 ปีที่แล้ว

    शिवाजी एक्के सर व सचिन जोशी सरांचेही उल्लेख देता आले तर पहा .

  • @satishshinde2793
    @satishshinde2793 2 ปีที่แล้ว

    कडेपठारातील एवढी सर्वोत्तम माहिती देत अहात तर चॅनेलचे नाव क-हा पठारास साजेसे का नाही ठेवले आपण ?

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      There is a reason behind that. I don't want this channel to be specific for Karhepathar. But it also includes book summaries and videos on some other topics. In Marathi of course 🙂