ममताबाई भांगरे यांची परसबाग - भाग २ | सन्मान नारी शक्तीचा | Gavakadache Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • भाग १ - • ममताबाई भांगरे यांची प...
    ममताबाईंचा अॅग्रोवन सकाळ मध्ये आलेला लेख .
    24 नोव्हेंबर 2019
    अकोले (जि. नगर) तालुक्याच्या आदिवासी भागातील देवगावच्या ममताबाई भांगरे यांची ओळख ‘परसबागेच्या गाइड' म्हणून झाली आहे. परसबाग संकल्पनेतून अकोले तालुक्यातील सुमारे पाच हजार कुटुंबाला आधार मिळाला. बचत गटातील महिलांनी शेती विकासाच्या बरोबरीने पिकांच्या देशी जातींचे जतन केले आहे. बियाण्यांच्या विक्रीतून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.
    नगर जिल्ह्याच्या उत्तरेला असलेला अकोले हा डोंगराळ तालुका. या तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस असल्याने भात हेच प्रमुख पीक. आदिवासी भागातील देवगावमधील ममताबाई देवराम भांगरे यांच्या कुटुंबाची चार एकर शेती आहे. त्यांची शेतीमधील प्रयोगशीलता पाहून बाएफ संस्थेने त्यांना शेती विकासासाठी मार्गदर्शन केले. संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ममताबाईंनी घराजवळ वेगवेगळ्या पिकांच्या देशी जातींची लागवड करत परसबाग संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. विविध पिकांच्या देशी जातींच्या लागवडीमुळे परसबाग समजून घेण्यासाठी अनेक महिला, विद्यार्थी त्यांच्याकडे भेट देतात. त्यामुळे ममताबाईंची ओळख आता ‘परसबागेच्या गाईड' अशी झाली आहे.
    देशी जातींचे जतन आणि उत्पादन
    ममताबाई भांगरे अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील पिकांच्या विविध देशी जातींचे संवर्धन करतात. ममताबाईंकडे भाताच्या रायभोग, आंबेमोहर, काळभात, घरीकोळपी, हरी कोळपी या जाती आहेत. वरई, नागली, भोपळा, डांगर, हरभरा, मसूर, वटाणा, काकडी, खरबूज, घेवडा, वाल, शेपू, कंदमुळांचीही लागवड असते. याचबरोबरीने दिवा, बावा, बडधा, पाचूट कांदा, कोळूची, डाव्याची, बरकीची, कुरडूची, भोकरीची, चिचुरडा, फांदा, चाई, सुरणकंद, फवदार, करजकंद, चाईचा मोहर, बडधा कंदा, चंदन बटवास, मेंक, काळीआळू, कोयरी, चाईचा कंद, पांढरी आंबाडी, बडधा यासह सुमारे सत्तर गावठी भाज्या तसेच देशी जातींचे संवर्धन करतात.
    महिलांना मिळाला आर्थिक आधार
    ममताबाई भांगरे यांच्या पुढाकारातून अकोले तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक गावांत परसबाग संकल्पना राबवली जात आहे. साधारण पावसाळ्यात घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत विविध देशी जातींची लागवड केली जाते. त्यातून बीजोत्पादन करून या बियाणांची विक्री केली जाते. देशी बियाणे विक्रीतून साधारण प्रत्येक महिलेला वर्षाला आठ ते दहा हजार मिळतात. बाएफ संस्थेमार्फत राज्य तसेच परराज्यात देशी बियाणांची विक्री केली जाते. ममताबाई यांच्यासह परिसरातील महिला परसबागेत विविध भाजीपाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. परिसरातील मोठ्या गावात भाजीपाल्याची विक्री केली जाते. याचबरोबरीने बियाणे उत्पादनदेखील केले जाते. त्यातूनही महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.
    गांडूळ खताच्या गोळ्या
    ममताबाई भांगरे चार एकरांपैकी दरवर्षी साडेतीन एकरांत भात लागवड करतात. गेल्या काही वर्षांपासून बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ममताबाईंनी सुधारित पद्धतीने सेंद्रिय भात शेती सुरू केली. भात पिकाला त्या गांडूळ खताचा वापर करतात. मात्र बहुतांश जमिनी उताराच्या असल्याने दिलेले गांडूळ खत पाण्यासोबत वाहून जाते. त्यामुळे एक दिवस त्रासून ममताबाईंनी गांडूळ खत टाकताना चिखलाचा गोळा उचलला आणि जोरात आपटला. हा गोळा मातीत तसाच रुतला. यातून त्यांना मोकळे गांडूळ खत देण्याएवजी गांडूळ खताच्या गोळ्या करून त्या भात पिकाला वापरण्याची संकल्पना सुचली. गेल्या सहा वर्षांपासून चारसूत्री पद्धतीने भात लागवडीमध्ये ममताबाई गांडूळ खत गोळ्यांचा वापर करतात. भात लागवडीच्या आधी महिनाभर त्या गांडूळ खताच्या गोळ्या तयार करतात.
    पूर्वी त्यांना भाताचे एकरी दहा क्विंटल उत्पादन मिळायचे, परंतु सुधारित तंत्राने त्यांनी गेल्या आठ वर्षांत २० क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. गेल्यावर्षी त्यांनी दीड एकरावर एसआरटी तंत्राने भात लागवड केली होती. यंदापासून सर्वच क्षेत्रावर एसआरटी पद्धतीनुसार भात लागवडीचे नियोजन आहे. ममताबाई थेट ग्राहकांना सेंद्रिय तांदळाची ८० रुपये किलो दराने विक्री करतात.
    गांडूळ खत युनिट
    अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना बाएफ संस्थेचे तांत्रिक सहकार्य केले आहे. संस्थेने ममताबाई भांगरे, शांताबाई धांडे यांच्यासह सातशेहून अधिक महिला शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मिती युनिट दिले आहे. ममताबाई आणि शांताबाई दर वर्षी प्रत्येकी पंधरा टन गांडूळ खत निर्मिती करतात. या खताचा वापर त्या स्वतःच्या शेतीत करतात.
    बचत गटातून देशी बियाण्यांची विक्री
    देवगाव, आंबेवंगणसह परिसरातील महिलांनी एकत्र येऊन संतोषीमाता महिला बचतगट स्थापन केला. परसबाग संकल्पना बाएफ संस्थेने पुढे आणल्यानंतर आतापर्यंत सुमारे अडीच हजार महिलांच्या दारात परसबाग उभी राहिली आहे. ममताबाई भांगरे तसेच गटातील महिला विविध पिकांच्या देशी जातींचे संवर्धन करतात. गटाच्या माध्यमातून देशी बियाणाचे कीट तयार करून मागणीनुसार बाएफमार्फत विविध ठिकाणी पुरवठा केला जातो.
    पाच हजार लोकांनी दिल्या भेटी
    ममताबाई भांगरे यांच्या संकल्पनेतून देवगाव परिसरामध्ये पावसाळ्यात लागवड केलेल्या देशी जातींच्या परसबागेला आतापर्यंत पाच हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत. चारसूत्री भात लागवड आणि गांडूळ खताच्या गोळ्यांचा वापर करून चांगले उत्पादन मिळविणाऱ्या ममताबाई भांगरे यांचा बाएफ संस्थेने २०१५ मध्ये आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला होता, असे बाएफचे कार्यकर्ते राम कोतवाल यांनी सांगितले.
    परिषदेत सहभाग
    कोलकता येथे नुकतीच (७ नोव्हेंबर) महिला शास्त्रज्ञ आणि उद्योजक परिषद झाली. त्यामध्ये देशभरातून महिला शास्त्रज्ञ सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील ममताबाई भांगरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांनी गांडूळ खताच्या ब्रिकेटचा भात शेती आणि परसबागेसाठी वापर याबाबत माहिती दिली. ममताबाई भांगरे यांनी आतापर्यंत २०० कार्यक्रमांतून परसबागेची माहिती दिलेली आहे.
    गावागावांत साकारतेय परसबाग...
    जतीन साठे, ९४२३०२०१३६ ( बाएफ, नाशिक )

ความคิดเห็น • 94

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 ปีที่แล้ว

    भांगरे ताई नी खुप एक छान माहिती दिलीतयाच कार्य खुप मोठे आहे

  • @latabule6436
    @latabule6436 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली आहे या ताईंनी छान व्हिडिओ.

  • @ananda3166
    @ananda3166 4 ปีที่แล้ว +5

    Mauli kay mhanu aplyala. Kiti kiti sundar, mala na kahi suchat nahi kasa vyakt karu aple evdhe Sundar kaam.🙏 Dev tumhala khup khup yash devo.😊🙏
    Ati sundar 😊😊 khup khush jhalo me sagla pahun

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 ปีที่แล้ว +3

    किती तांईचा मनमोकळेपणा छान माहिती दिली

  • @satishshengalephotography5153
    @satishshengalephotography5153 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली
    व्हिडिओ पण मस्त आहे
    असे उपक्रम सुरू ठेवा 🙏

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      नक्कीच चालू ठेवायचे आहेत.🙏
      पण कोरोना काही करू देईना😭😭

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 4 ปีที่แล้ว +4

    भांगरे मावशीच्या कार्याला सलाम...आदीवासी संस्कृती जतन करण्यात मोलाचा वाटा...ते मनापासून करते मावशी.... ✊✊✊

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 ปีที่แล้ว +1

    Proudly of my mother ❤️❤️👌👌💐💐💐👌👌

  • @rajeshwarkalge632
    @rajeshwarkalge632 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏
    Bhau khup chhan v navin mahiti bhetli.
    Tumchya karyas khup shubechha.
    Taiche karyas pranaam.

  • @vaishaligite5667
    @vaishaligite5667 4 ปีที่แล้ว

    नमस्कार ममताताई,अप्रतिम काम करताय,किती निरलस ,सहज माहिती दिलीत ,तुम्हाला अवश्य भेटायलाच येऊ

  • @mahesh-mm6ni
    @mahesh-mm6ni 4 ปีที่แล้ว +1

    प्रशंसनिय कार्य

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 4 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर विडीयो बनवला आहे. ताई ने ज्या गांडूळ खताच्या गोळ्या बनवल्या आहेत. त्या गोळ्या मुंबई मध्ये उपलब्ध करा. खुपच फायदा होईल आम्हाला चांगले खत मिळेल गावी रोजगार उपलब्ध होईल

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว +2

      त्यांच्या घरी पुन्हा एकदा जावेच लागेल वाटतंय🙏😊

    • @shambhavidesai7349
      @shambhavidesai7349 4 ปีที่แล้ว

      @@gavakadchevlog धन्यवाद

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 4 ปีที่แล้ว +1

      Hya golya n sathi ani tyana khas bhetayla have Mamta bai na amcha namskar.

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 3 ปีที่แล้ว

    Salute

  • @colourful12300
    @colourful12300 3 ปีที่แล้ว

    खुप खुप मनापासून कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आम्हाला अभिमान आहे तुमचा 🤗🙏

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 4 ปีที่แล้ว +2

    Mamtabai is grate.👌

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar 4 ปีที่แล้ว +1

    Inspirational,,,,! खूपच छान ,माहितीपूर्ण !

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      Thanks Sirji🙏🙏

    • @tanujapatil7455
      @tanujapatil7455 4 ปีที่แล้ว

      Tai tumhala mala bhetaiche aslyas tumcha patta kalval ka pl

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction 4 ปีที่แล้ว

    Mala, खूप आवडत झाडे लावायला, शहारा पेक्षा अश्या वातावरणात राहण्याची मज्जाच वेगळी आहे

  • @prasadpardeshi3482
    @prasadpardeshi3482 3 ปีที่แล้ว

    Wa kup chan watl begetl tar

  • @surekharajput6872
    @surekharajput6872 3 ปีที่แล้ว

    कृषी पर्यटन चालु करा म्हणजे पुढील पिढी ला माहिती होईल तसेच तुमच्याकडे माहितीचा खजिना आहे मला वाटते तुमच्या रेसीपी पण छान असणार त्याच चॅनेल चालु करा खत तयार करताना एक व्हिडिओ बनवा खुप अभिनंदन

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली यांचा उपक्रम खूप सुंदर आहे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏☺️

  • @vijayashrikade5573
    @vijayashrikade5573 4 ปีที่แล้ว +1

    छानच माहिती आहे. माझ्याकडे पण देशी वाण आहेत .मला आपल्याकडचे हवे आहेत.

  • @rajshreepingale6143
    @rajshreepingale6143 4 ปีที่แล้ว +2

    Thank You 🌷

  • @sunitabambale4635
    @sunitabambale4635 4 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त अभिनंदन

  • @balubhaurale1539
    @balubhaurale1539 3 ปีที่แล้ว

    मला हे बियाणं पाहिजे कसे मिळेल तुमचा contact न मिळेल ka

  • @brd8764
    @brd8764 4 ปีที่แล้ว

    Thanks so much.

  • @ushamane9264
    @ushamane9264 4 ปีที่แล้ว +1

    Must

  • @suvarnametakari9262
    @suvarnametakari9262 4 ปีที่แล้ว +1

    👌

  • @manjirijoshi6019
    @manjirijoshi6019 4 ปีที่แล้ว

    Kiti aoushadhe ahet yachyakade.. Great... Ani pure vaan kiti chan jatan keley... Mast vdo

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई

  • @vidyatendulkar5550
    @vidyatendulkar5550 4 ปีที่แล้ว +2

    Nice work..

  • @shankargujar4683
    @shankargujar4683 4 ปีที่แล้ว

    खुपछान माहीती ताई

  • @MaskaChaska23
    @MaskaChaska23 4 ปีที่แล้ว

    Nice video 👌👌 stay connected 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @db_edit_dattabhangare8999
    @db_edit_dattabhangare8999 4 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा🙏🙏

  • @arvindshukla8244
    @arvindshukla8244 4 ปีที่แล้ว

    योडा चांगलं व्हिडिओ बनवले पण ताईचा नंबर नाही दिले . आम्हाला बीया पाहिजे असेल तर कसं काय भेटणार.

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 ปีที่แล้ว

    आपण गोळ्या कशा पद्धतीने तयार करता?

  • @gaikwadranjit2990
    @gaikwadranjit2990 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर ताई

  • @nishashirke4296
    @nishashirke4296 4 ปีที่แล้ว

    छान! मावशी खूप हुशार आहेत..

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      हो. खुपच. 🙏🙏☺️

  • @dattatraybelkar6341
    @dattatraybelkar6341 4 ปีที่แล้ว

    KHUP CHAAN.

  • @dipaknikam898
    @dipaknikam898 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sonalkadam878
    @sonalkadam878 4 ปีที่แล้ว

    Nice work

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 3 ปีที่แล้ว

    niswarthi mamachi lok

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 ปีที่แล้ว +2

    आम्हाला बी कसे मिळेल?

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      कृपया
      देवराम भांगरे (देवगाव) - +919529365687
      या क्रमांकावर संपर्क साधावा🙏🙏😊

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 4 ปีที่แล้ว +2

    आम्हाला फोन नंबर किंवा पत्ता पाहिजे मिळेल का

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      नक्कीच🙏
      देवराम भांगरे - +918007114309
      देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर

  • @prathameshdborhade4103
    @prathameshdborhade4103 4 ปีที่แล้ว

    Chan

  • @swapnali123
    @swapnali123 4 ปีที่แล้ว

    व्हिडिओ कॉलिटी थोडी चांगली हवी होती ,,,बाकी खूप छान आहे ,,,,,👌👍

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      क्वालिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करू🙏🙏
      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ushamane9264
    @ushamane9264 4 ปีที่แล้ว

    Khoop chaan

  • @kusumrawool4181
    @kusumrawool4181 4 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 4 ปีที่แล้ว

    चाँकलेटी वाला ला नासिक भागात तीन वर्षी वाल म्हणतात,कारण एकदा लावला तर कमीतकमी तीन वर्षे राहतो.तुम्ही जमा केलेले बी बियाणे एकदा जमाकरुन ठेवल्यावर किती दिवस चालते?

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      तीन ते चार वर्ष टिकू शकते.🙏🙏
      परंतू तशी वेळ शक्यतो येत नाही. पुढील वर्षी वापर केला जातो. 🙏🙏☺️

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว

    माहिती बद्दल धन्यवाद

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      🙏🙏🤗

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว

      @@gavakadchevlog 🙏.
      काही वर्षांपूर्वी tv var बातमी होती की पेठ सुरगाणा (नाशिक) भागातील काही शेतकऱ्यांनी कणेर नावाची एक आंब्याची जात विकसित केली आहे. या झाडांना लागणारा प्रत्येक आंबा साधारणपणे एक किलोचा असतो.
      आपणास जर या बद्दल अधिक माहिती असेल तर कृपया त्यावर व्हिडिओ बनवा . Lockdown mule shaky होईल की नाही सांगता येत नाही, तरीपण आपल्याला विनंती.

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      @@prasadjoshi7373 प्रयत्न करतो. पण शक्य होईचल याची खात्री देता येत नाही. 🙏🙏

  • @suvarnabhangare3055
    @suvarnabhangare3055 4 ปีที่แล้ว

    मोहाची फुलं पासून दारू सुधा बनवता येते पूर्वीच्या काळी बनवत होतो लोक

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      आता पण बनवतात😀😀🙏🙏

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction 4 ปีที่แล้ว

    कुठे आहे आपल गाव

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर 🙏🙏☺️

  • @sharadbarde3854
    @sharadbarde3854 4 ปีที่แล้ว

    मी नंबर मिळवलाय त्यांचा फोन करून भांगरे ताईंना नक्की भेटणार

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      अवश्य🙏
      पण फोन करुनच जा. कारण सध्या परसबाग भेटी बंद केलेल्या आहेत.🙏🙏😊

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 ปีที่แล้ว

    Hello दादा

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 2 หลายเดือนก่อน

    👌🌿👌🌿🙏🌿👌🍀☘🌱🌴👌🙏

  • @sushamapatil8291
    @sushamapatil8291 4 ปีที่แล้ว +1

    आंम्हाला हे सगळे बियाणे मिळेल का?या ताई कोणत्या गावात राहतात?भेट घेतल्याची ईच्छा आहे.

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      नक्कीच मिळतील पण सध्या थोडेसे थांबावे🙏🙏😊

  • @rushikeshbhalekar5333
    @rushikeshbhalekar5333 4 ปีที่แล้ว

    पत्ता काय आहे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  4 ปีที่แล้ว

      देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर 🙏

  • @shitalpadwal4730
    @shitalpadwal4730 4 ปีที่แล้ว

    Mavshi tumch govch naav kay aahe

  • @shitalpadwal4730
    @shitalpadwal4730 4 ปีที่แล้ว

    Tumi bee vikat deta ka?

  • @mayurighane2884
    @mayurighane2884 4 ปีที่แล้ว +1

    Ak scientists avda kam Karu nahi shakat avde hi akti Mauli kart ahe

  • @shilpayelye8103
    @shilpayelye8103 4 ปีที่แล้ว

    qaak-a

  • @rajveerbhangare877
    @rajveerbhangare877 4 ปีที่แล้ว +3

    nice work