Shivneri Foundation | Sharad Tandale | Sandeep Mohite Patil | Shekhar Mohite Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • संवाद प्रेरणा व्यासपीठ - पुष्प 15 वे
    "मोटिव्हेशनल स्पीकर" चा सुळसुळाट असलेल्या,आजच्या बाजारात खोट्या स्वप्नांची दुकानदारी मांडून ‘बेडकालाही फुगवून बैल होशील'असं सांगणारे अनेक दुकानदार आज या बाजारात आहेत,
    परंतु प्रत्येक तरुणाच्या "डिग्री पास झाल्यापासून ते (नोकरी किंवा व्यवसायात) आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या" प्रवासातील मजेशीर वास्तविकता स्वतःच्या अनुभवातून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शरदजी तांदळे यांनी मांडली.
    शिवाजी महाराज आणि आपले वडील यांना आपला गुरु मानलं तर आयुष्यात कधीच अपयश येणार नाही. पण त्यासाठी पाचवीच्या पुस्तकापलीकडचे शिवाजी महाराज तुम्हाला समजून घ्यावे लागतील.
    आयुष्यात जितकं मोठं आणि यशस्वी व्हाल तितकं विनम्र राहा, आज जगातील श्रीमंत आणि यशस्वी लोक तेच करत आहेत.
    स्वतःशी प्रामाणिक राहा, ज्या क्षेत्रात आपल्याला रुची नाही ते वेळीच बदला. आज रात्री झोपताना उद्या सकाळी उठल्यावर कोणतं काम करण्यात आनंद रोज मिळतो; तेच काम तुमच्या करियरसाठी निवडा, मग ते नोकरी असो किंवा व्यवसाय.
    मराठवाड्यातील शिक्षक कुटुंबाची पार्श्वभूमी असणारे तांदळे सर त्यांच्या आयुष्यातील पैलू उलगडत असताना प्रत्येकाला ते आपल्या जीवनातील त्या त्या काळात घेऊन गेले. इंजिनीरिंग ची डिग्री घेतलेला तरुण ते "रावण- राजा राक्षसांचा" व "The Entrepreneur" या प्रचंड लोकप्रिय पुस्तकांचे लेखक हा प्रवास खूप मजेशीर आणि भावनिक पद्धतीने तांदळे सरांनी उलगडला.
    आजवर 300 हुन जास्त ठिकाणी त्यांनी मोफत मार्गदर्शन केले आहे,
    भरकटलेली व निराशेच्या गर्तावस्थेत जाणारी तरुणाई हे देशापुढचं सर्वात भयंकर संकट आहे.
    असे तांदळे सरांनी सांगितले.
    शिवनेरी फौंडेशनच्या "संवाद प्रेरणा व्यासपीठ" या कार्यक्रमासाठी श्री. Sharad Tandale सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले खरं तर हि खूप भाग्याची गोष्ट आहे. तांदळे सरांना भेटून "शरद" नावाची माणसं खरंच विलक्षण ध्येयवेडी, कठोर परिश्रम घेणारी, तितकीच यशाच्या शिखराला गवसणी घालताना पाय जमिनीवर ठेवून सर्वांशी विनम्र असतात याची खात्री पटली.

ความคิดเห็น • 2

  • @28prashant
    @28prashant 2 ปีที่แล้ว

    Once again nice event.. Strong bond strong union 👍👍

  • @vishaldhakane9617
    @vishaldhakane9617 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir✌️✌️✌️