KAPSHI COVID | कापशी कोविड सेंटर ठरतंय सर्वसामान्यांचा आधार..देवदूत बनून आलेत मा. शशिकांत दादा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- कोरोनानं संपूर्ण जगालाच कवेत घेतलयं. याने महासत्ताही हतबल झाल्या आहेत. त्याने माणसा-माणसांत अंतर आणलयं. उद्योगधंदे, व्यवसाय, अर्थकारण आणि आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय....उपचाराअभावी अनेकजण देवाला प्रिय झाले. भितीने माणसाच्या शरीरातला ऑक्सिजन संपतोय. आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय...! हे विदारक दृष्य आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अशा काळात येथे नेमकं उलट घडतयं... होय याला छेद देणारंच घडतयं.
हे ठिकाण म्हणजे लोकांना आपलं वाटणारं....मनोबल वाढवून कोरोनाशी दोन हात करणारं, लोकांना जीवदान देणारं हे चिकोत्रा खो-यातील सेनापती कापशीचं कोविड सेंटर...!
एक सामान्य माणूस लाथ मारेन तिथे पाणी काढेन असा बाणा असणारे सन्माननीय शशिकांत खोत यांनी 'माझा भाग.. माझी जबाबदारी...!' या व्रताने हे कोविड सेंटर उभारलं आहे.
कार्यकर्त्यांची 'साथ'आणि ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेबांची पाठीवरील 'थाप'...केवळ याच जोरावर शशिकांत खोत यांनी तब्बल 45 बेडचं कोविड सेंटर उभारलयं. हे ठिकाण म्हणजे कोविडग्रस्तांना यमालाही हाकलून देऊन जीवामृत देणारे स्वतःचे घरच वाटते आहे.
या सेंटरवर चिकोत्रा खोऱ्यातील बऱ्याचशा कोरोना रुग्णांवर उपचार झाले. आपलेपणाने आणि तेही मोफत झालेले उपचार पाहून आता मदतीचे हात समोर येत आहेत. धान्य, फळ आणि आर्थिक मदतही होऊ लागलीय. या कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत अत्यंत सेवाभावी वृत्तीने उपचार होत आहेत. रुग्णांना औषधांसोबत पौष्टिक आहार ही मिळतो. स्वतःच्या घरांपासून दूर राहणा-या या रुग्णांची मायेनं, आपुलकीने विचारपूस होते ती स्वतः शशिकांत दादा यांच्याकडून हे विशेष...!
शशिकांतदादांच्या दिवसाची सुरुवात देखील या कोरोना रुग्णांसोबतच्या चहाने होते. त्यानंतर नाश्ता, दोन वेळचं जेवण देखील ते कोरणा सेंटरवरच घेतात. दादांच काम पाहून रुग्णांच्याच नव्हे त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाहीत.
सकाळी आणि संध्याकाळी सर्वांना प्राणायाम व श्वसनाच्या व्यायामाचे धडे देखील दादा स्वतः देतात. त्यानंतर नाष्टा, चहा दिला जातो. सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी होते. या कामात शासकीय डॉक्टरांसोबत कापशी भागातील खाजगी डॉक्टरांचीही मोलाची मदत होत असल्याचे दादा आवर्जून सांगतात. रुग्णांना औषधे अगदी वेळेवर दिली जातात. यासाठी डॉक्टर, वॉर्डबॉय आणि सिस्टर रात्रंदिवस सज्ज आहेत. ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांवर अधिक लक्ष दिले जाते. जसे ‘हेळसांड’ या शब्दालाही येथे मनाई आहे.
रुग्णांना पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाणी तसेच शौचालय, स्नानगृह, चांगल्या प्रतीचा नाष्टा, फळे, अंडी, चहा मिळतो. येथे पौष्टिक शाकाहारी आणि मांसाहारी गरमागरम जेवणाचीही उत्तम सोय केली आहे. रुग्णांच्या करमणुकीसाठी चित्रपट, टिव्ही मालिका मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात. गाण्यांचा-गप्पांचा कार्यक्रम देखील होतो. यामध्ये दादा आणि कार्यकर्ते स्वतः सहभाग घेतात.
स्वतःची मुलं देखील इतकी सेवा करणार नाहीत त्याहून अधिक दादा आणि त्यांचे कार्यकर्ते आमची दिवस-रात्र सेवा करतात अशी भावना रुग्ण महिला व्यक्त करत आहेत. दहा दिवस या कोविड सेंटर मध्ये राहून बरे होवून घरी परतणा-या प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यात अश्रू तरळतात. अशा सेवेच्या आणि भावनिक क्षणांच्या आठवणी रुग्णांच्या आणि दादांच्या आयुष्यात नक्कीच चिरंतर राहतील.
सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले शशिकांत खोत यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे. त्याला कुटुंबियांचंही सहकार्य मिळालं. इतरांसाठी नेहमी मदतीची वृत्ती असल्यानेच लोकांनी त्यांच्या पदरात भरघोस मतेही टाकली. ते कागल पंचायत समितीचे सदस्य झाले. पाठोपाठ पत्नी शिल्पा खोत यादेखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. हे शक्य झालं केवळ सततच्या कष्टाच्या वृत्तीमुळे. यासाठी त्यांना पाठबळ लाभलय सुनील चौगुले यांच्यासारख्या सच्चा मित्राचं.
आताचा काळ इतका वाईट आहे की, कोरोना मुळे अनेक कुटुंबं पोरकी झाली. अशा काळात राजकारण बाजूला ठेवून ‘कोरोनाला गंभीरपणे घेणं आणि सामान्यांचा ऑक्सिजन होणं’ असं काम प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केलं, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत देश कोरोना मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही...!
'कोरोनावर मात करण्यासाठी देवदूत बनून आलेल्या शशिकांत दादांच्या या कर्तुत्वाला तमाम चिकोत्रा वासियांचा सलाम...!'
खूप कौतुकास्पद कार्य💐
Dada🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏
कोल्हापूर जिल्ह्यातील निलेश लंके ,,,,म्हणजेच शशीकांत खोत साहेब ,,,,कापशी करांचे नशीब नक्कीच चांगले आहे ,कारण तुमच्या गावामध्ये ,,शशीकांत खोत सहेबांसारखा देवमाणूस आहे ,,,
सलाम तुमच्या कार्याला
Khup khup kautuk
The king of kapshi DADA
शशिकांतदादांना सामाजिक कार्याला प्रणाम🙏 आणि शुभेच्छा 💐
देव माणूस
मस्त
👍🙏🏻🙏🏻👍
👍👍👍🙏🏻
👍🙏
You tube शिवाय देखील थेट हा व्हिडिओ व्हाट्सएपला शेअर करावा