Vaastu Ratan sanskar (Gemstone Remedy In Vaastu) वास्तुरत्नदिप संस्कार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • Vaastu Consultation
    Email : vastueasyway@gmail.com
    Contact number - 9421409790 /
    Astrology Consultation :
    Pravin D. Joshi
    Contact Number : 9421507847
    Video by : GS Photography 9890581905
    वास्तूतील रत्नस्थापना/रत्नसंस्कार/रत्नदीप संस्कार (रत्न पुरणे)
    वास्तूशास्त्रानुसार घरबांधणी करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरीही जागेअभावी किंवा इतर टेक्निकल कारणांमुळे काही ना काही दोष राहिल्याचा आपला अनुभव असेलच आणि पुर्णपणे 100 टक्के वास्तुशास्त्र जमले आहे अशी वास्तू आपणास क्वचितच पहायला मिळाली असेल.
    जे दोष राहिले असतील ते महादोष असोत किंवा साधे दोष पण त्याचे कमीजास्त परिणाम पुढे आपल्याला आपल्या वास्तूमधे पहायला मिळतात आणि यावर उपाय म्हणून प्रत्येकालाच आपल्या वास्तूमधे बदल करणं शक्य नसतं.
    * अशा वास्तुदोषांवर उपाय म्हणून आपल्या प्राचीन वास्तुशास्त्र विशारदांनी अनेक संस्कार विधी सांगितले आहेत जे आजही परिणामकारक, उपयोगी आणि लाभदायक सिद्ध झालेले आहेत. त्यातलाच एक महत्वाचा उपाय (विधी) म्हणजे रत्नस्थापना विधी (नवरत्न पुरणे /गाडणे) होय.
    1) ज्या वास्तुत दोष आहेत तेथील वास्तूदोष कमी करण्यासाठी आणि ज्या वास्तूत वास्तुदोष नाहीत अशी वास्तू सकारात्मक शक्तींनी भारित करण्यासाठी अशा सर्वांसाठी आपल्या प्राचीन ग्रंथकारांनी हा विधी सांगितला आहे.
    2) घरबांधणीच्या वेळेस जोत्यात (foundation) किंवा फरशी बसवताना फरशी खाली योग्य दिशेला योग्य रत्न पुरून हा विधी करावा.
    3) रत्नस्थापना विधी हा शुभमुहुर्त:शुभवार,शुभनक्षत्र,शुभयोग व शुभहोरा पाहून केल्यास विशेष लाभदायी सिद्ध झालेला आहे.
    4) या विधीमधे वास्तुतील सर्व दिशा व नेमलेल्या देवता व त्यांची पदे पाहून ,ग्रहांच्या मंत्रोच्चारासह अस्सल नैसर्गिक नवरत्नं पुरली जातात.
    5) या नवरत्नांमधे माणिक, मोती, पाचू, पुष्कराज, पोवळा, नीलम, लसण्या(केतू), गोमेद(राहू) आणि हिरा (शुक्रदेव) या नवरत्नांचा समावेश होतो. हिरा पडवडत नसेल तर त्याऐवजी ओपल ही चालतो.
    6) वास्तुशावरील अनेक प्राचीन ग्रंथांमधे रत्न जरी तीच असली तरी रत्न पुरण्याच्या दिशा व पदे यात भिन्नता दिसून येते. पण पद्धतीत जरी थोडाफार फरक असेल तरीही त्या सर्वांचा उद्देश एकसारखा आहे. त्यामुळे कोणत्याही एकाच ग्रंथानुसार रत्नस्थापना विधी करावा. फक्त दोन पद्धतींची भेसळ करु नये.
    7) वास्तूत पुरण्यासाठीची रत्न ही उच्च प्रतीची नसली तरी खोटी नसावीत. कमी दर्जाची /कमी किंमतीची पण खरी रत्न असावीत. रत्न म्हणून काचेची, प्लॅस्टिकची,खोटी रत्न, रंगीत मणी तर अजिबात गाडू नयेत.
    8) रत्नस्थापनाविधीमुळे आपले व आपल्या वास्तूतले ग्रहदोष दूर होऊन वास्तूमधे पोषक अशा सकारात्मक शक्तींची वाढ होते आणि सकारात्मक शक्तींचे कवच तयार होते.
    9) रत्नस्थापन विधी हा रहिवासी वास्तू, आॅफिस, मंदिर अशा सर्व ठिकाणी करता येतो. फक्त जागेचा आकार, cuts /extensions यानूसार रत्नांची संख्या अवलंबून असते.
    10) हा शास्त्रसंमत आणि सर्व वास्तुशास्त्र ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथात दिलेला हा विधी सर्व प्रकारच्या वास्तूंसाठी चांगला आणि दीर्घकाळ परिणाम करतो.

ความคิดเห็น • 1