#बैलपोळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2021
  • #बैलपोळा Bail pola 2021 - शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस - वऱ्हाडी कॉमेडी - indiansfarmer.com - YFP Film
    घेतो दमानं 𝐆𝐡𝐞𝐭𝐨 𝐃𝐚𝐦𝐦𝐚𝐧 - 𝐘𝐅𝐏 𝐅𝐢𝐥𝐦 Official Song 2021 | 𝟭𝘀𝘁 𝗩𝗮𝗿𝗵𝗮𝗱𝗶 𝗥𝗼𝗺𝗮𝗻𝘁𝗶𝗰 𝗦𝗼𝗻𝗴 💗 | Evergreen love song - • #घेतो दमानं Gheto Damm...
    शेतीविषयक संपूर्ण माहीती साठी - indiansfarmer.com/ या वेबसाइट वर जा..
    जलमभर घासलेल्या
    तुह्या खुराले-पवचाले
    आमी कितीकबी वंदन
    केलं तं कमीच हाये राज्या....
    तू घरात वासरू म्हणून
    आला अन् लानपणी घरभर, जंगलभर आमचा सोपती म्हून खेयला आमच्यासंग...
    तुह्या बाललिला पाहू पाहू आमी लायन्याचे मोठे झालो...
    तुह्यं ते निरागस असणं
    आमाले हमेशाच अचंब्यात पाडणारं हाये...
    तुह्या जल्मालेच आमी
    कष्टाचं लेबल लावून ठेवेल...
    तरी
    त्वां कवांच आमच्याजोळ तक्रार केली नायी...
    तुह्यं लानपणीच दुध तोडलं,
    तुले जंगलायनं फिरोलं,
    उपाशी ठेवलं,
    मोठा झाला तवां तुले ठेसलं,
    तुले आवतावर लावलं,
    बंडीले जुपलं,
    टोंगया टोंंगया गाट्यात
    तुले वढाले लावलं जिंदगीचं वझं..
    एका
    जबाबदार बापासारखा
    तू वाहत रायला
    कर्तव्याच्या पखाली,
    तुह्यापासून होईन तशी
    ढोरमेहनत करून घेतली,
    तरी तू हमेशा हासत खेयत...
    पोयाच्या खानमैनीले
    तुले नेतो नदीवर
    मानाची आंघोळ घालाले...
    न्हाऊ माखू घालाले...
    त्वां जसं
    आमचं आयुष्य
    रंगीत केलं ना
    तशेच रंगवतो तुह्ये शिंगं....
    लावतो तुले गुयाढेपीचा अलप...
    गयात बांधतो कवड्याची माळ...
    तुले सारेजन ओवाळून
    लावतो
    जबाबदारीचं वझं पेलणाऱ्या
    तुह्या खांद्याले
    हयद तुपाचा शेक...
    तुह्या आवडत्या महादेवाच्या
    झडत्या,
    म्हणतो एकामांगं एक...
    'आज आवतन घ्या
    उद्या जेवाले या' म्हणत....
    पोयाच्या रोजी
    तुले सजवतो रेशमी झुलीनं,
    गेरूच्या ठिपक्यायनं..
    बांधतो तुह्या डोक्याले
    बाशींग अन्
    बांधतो पायात
    घुंगरायच्या माळाले...
    घराच्या दाराजवळ,
    मारोतीच्या पारावर ठेवतो
    पयसाच्या मेडा...
    तुह्यी अन् निसर्गाची
    कृपा कायम राहावं म्हणून.
    आंब्याचे तोरण बांधेल
    गावच्या वेशीवर
    भरलेल्या पोयात
    तुले नेतो मोठ्या दिमाखानं...
    करतो उभं
    अन् म्हणतो महादेवाच्या बाऱ्या...
    अभाय गडगडे, शिंगं फडफडे...
    कास्तकाराचे खंडीभर
    पिकाचे सपान पडे...
    हरबोला हर हर महादेव.....
    घरोघर नेतो तुले,
    दारोदार नेतो तुले,
    इथुलच्या परतेक
    काळवंडलेल्या अस्वस्थ मनाले साफ करासाठी...
    आज आराम कर
    पुरणपोयीचा निवद घे,
    अन्
    हो तुह्या असाच आशीर्वाद राहू दे.....
    सख्खा भाऊ इतका जीव
    लावणार नाह्यी
    जितका जीव त्वां आम्हाले लावला...
    तुले 'बैल' तरी कसं म्हणू राज्या??
    तू हायेस
    आमच्या भाग्याच्या
    पडीत वावराले
    नागरून वखरून
    साफसूफ करून
    आमचं पोट भरणारा देव...
    तुले बैल तरी कसं म्हणू राज्या? तूच सांग...
    तुह्या कर्माच्या संन्यस्त
    वाटचाली आमच्या जिंदगीत
    दिवायी आणणाऱ्या हायेत...
    हे आमले कवांच
    भूलता येत नायी रे....
    तुह्या खांद्यावर
    कितीतरी टायमाले
    देलेलं जबाबदारीचं 'जू'
    तुवां ते एखाद्या बापासारखं
    उचलून धरलं...
    आमच्यासाठी..समृद्ध जिंदगीसाठी....
    दुकायाच्या सालात
    तुले लावला
    आमी कोळ्ल्या कडब्याचा
    चारा
    तरी त्वां राग मानला नायी...
    का त्वां मागतला नाह्यी अलप..
    त्वां निलकंठावानी
    भूकीचं हलाहल पचोलं राज्या...
    एकटायमाच्या चाऱ्यावर,
    बाल्टीभर पाण्यावर...
    तू जिंदगीत आला
    अन् एकमेकाच्या जोडीन
    तुवां फुलवलं नंदनवन आमच्या उजाड जिंदगीत...
    तुह्या उपकाराची
    परतफेड रोज केली तरी
    कमीच हाये...
    पर,
    असू दे आमाले
    तुह्या कर्जखात्यात...
    उद्या तू नाह्यी जोडीनं
    कोट्यातल्या ठावाले
    तवां
    लय खराब वाट्टे गळ्या...
    लौकर कामं होते
    म्हणत ;
    पोरानं टँक्टर आणून ठेवेल
    हाये दरोज्यापूळं...(दारापुढे)
    पर,
    खरं सांगू माह्यी
    नजर आज बी भिरभिरते..
    रोज तुमाले जोडीनं
    पाहासाटी
    हा जीव तरमय तरमय करते...
    काऊन का,
    त्वां
    जलमभर घासलेल्या
    तुह्या खुराले-पवचाले
    आमी कितीकबी वंदन
    केलं तं कमीच हाये राज्या...
    ~ वैभव भिवरकर
    पोळा Bail pola 2021 किंवा बैलपोळा Bail pola हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.
    बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
    हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या Bail pola आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.
    या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.
    या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.
    गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या शेतकऱ्यांच्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.
    A concept By Shrutika Gawande
    Writer - Mugdha Pinjarkar
    Cinematography - Gunjan Raut
    कलाकार - Shrutika Gawande, Saurabh Shende, Shrilesh Pande
    Art Director- Prashant Shravan Ujjainkar
    Management Head - Sanjay Ovhal
    Marketing Head - Niket Chawale
    YFP Head - Pankaj Vanita Kaware
    विठ्ठलापुर मंडळींचे मनापासून धन्यवाद
    #pola #festival #marathifestival #बैलपोळा

ความคิดเห็น • 226

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 ปีที่แล้ว +5

    पोळ्याच्या दिवशी फक्त शाकाहारी जेवण बनवतात हे शास्त्र आहे... आपली संस्कृती जितकी महान तितकीच वैज्ञानिक हि आहे.... कारण गो वंश हा शाकाहारी वंश आहे... आणि हे सांगण्याची आधी गरज नव्हती कारण सर्व शेतकरी हे माळकरी असायचे....
    जय महाराष्ट्र

  • @aneeldeshmukh7981
    @aneeldeshmukh7981 2 ปีที่แล้ว +3

    जमंल जमंल लयभारी

  • @pranitkuthe4798
    @pranitkuthe4798 2 ปีที่แล้ว +5

    Super acting natural acting tai....super

  • @kunalsonavane8202
    @kunalsonavane8202 11 วันที่ผ่านมา

    बैल सजावट करण्यासाठी आवडते आम्हाला

  • @shitalsharma5777
    @shitalsharma5777 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त ताई तुम्ही

  • @user-iz2ul4yn8z
    @user-iz2ul4yn8z 2 ปีที่แล้ว +1

    श्रुती खूप छान एपिसोड 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌

  • @shyampatil9688
    @shyampatil9688 ปีที่แล้ว +1

    खुपच छान वहिनी

  • @manishagawali911
    @manishagawali911 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan hota video

  • @namrataingole4294
    @namrataingole4294 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला pola

  • @swapnilhirole5829
    @swapnilhirole5829 2 ปีที่แล้ว +2

    Kdk. kdk. chaan. ahe

  • @ashishpatil9384
    @ashishpatil9384 ปีที่แล้ว

    Chan kela tumhi pola

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h 2 ปีที่แล้ว

    लव फ्रॉम सातारा

  • @ottmoviesupdate5635
    @ottmoviesupdate5635 2 ปีที่แล้ว +1

    एक दम भारी

  • @atulnagpur9051
    @atulnagpur9051 2 ปีที่แล้ว +2

    मला तुमचे पूर्ण विडीओ आवडते

  • @kalashbari184
    @kalashbari184 2 ปีที่แล้ว +1

    Bhari Bhai

  • @vijayamohod4011
    @vijayamohod4011 2 ปีที่แล้ว +1

    Kar pan dakhva
    Khup mast hota pola

  • @akashudan6855
    @akashudan6855 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या गावच्या पोळ्या सारखा पोळा कुठंच नाही भरत कान्होलीबारा येथे भरते नागपूर जिल्हा

    • @niteshkale5942
      @niteshkale5942 2 ปีที่แล้ว

      बॅंड पाहिजे होता न भाऊ

  • @Kiarakulsange4548
    @Kiarakulsange4548 2 ปีที่แล้ว +2

    Happy pola❤❤❤😊😊

  • @vaibhavshende2715
    @vaibhavshende2715 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान vdo!!!

  • @rashmistitchingclasses
    @rashmistitchingclasses 2 ปีที่แล้ว +1

    Wa khup chan tai

  • @suvarnabalapure4883
    @suvarnabalapure4883 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan video, sunny ,shreelekh mst aahe.pan shruti very nice,purnpoli mst

  • @avinashsonawane3502
    @avinashsonawane3502 2 ปีที่แล้ว

    सृतिका चा अभिनय जबरदस्त.. सरप्राईज..! खूप छान.

  • @kajalaglawe3027
    @kajalaglawe3027 2 ปีที่แล้ว +1

    Khup god ahe g shruti Tu.... Chhan actor

  • @premkattalkar5883
    @premkattalkar5883 2 ปีที่แล้ว +2

    Aple Nagesh bhau aste t maja ale aste

  • @siddharthasutkar9060
    @siddharthasutkar9060 2 ปีที่แล้ว +1

    Mla badgyachi vargni chi math mst watli

  • @pravindahekar8966
    @pravindahekar8966 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @sadhanamore9460
    @sadhanamore9460 2 ปีที่แล้ว +1

    Mast video..

  • @universalstudios4831
    @universalstudios4831 2 ปีที่แล้ว

    मला तु आवडते .....

  • @07j.
    @07j. 2 ปีที่แล้ว +2

    Jay maharshtra ⛳

  • @srikrushnakaware7490
    @srikrushnakaware7490 2 ปีที่แล้ว +1

    1 number re ba 🤣🤣

  • @MyYouTube354
    @MyYouTube354 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या गावले पण असाच पोळा साजरा करतात

  • @rajanidighade6219
    @rajanidighade6219 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video bnvla supperrrrrrrr

  • @mayuranjankar2105
    @mayuranjankar2105 2 ปีที่แล้ว +1

    Ek number hota video Maja ali

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 2 ปีที่แล้ว +3

    श्रूतिका चा अभिनय एक नंबर .

  • @rakeshdakhane2349
    @rakeshdakhane2349 2 ปีที่แล้ว +2

    Marbat asete .. amchya Kade .. from Gondia

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 2 ปีที่แล้ว +9

    8:35 बापा बापा श्रुतीकाले खरचं वरच्या वर पुरणपोया झेलता येते..हुशार आहे पोरगी..😁

  • @sangramghodke7374
    @sangramghodke7374 2 ปีที่แล้ว +2

    Awesome 👍👍

  • @ganeshumbarkar4336
    @ganeshumbarkar4336 2 ปีที่แล้ว

    १ च नंबर पोळा साजरा केला तुमि मला हिडिओ आवडला

  • @kishorpardhi1024
    @kishorpardhi1024 2 ปีที่แล้ว +2

    Lai bhari

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 2 ปีที่แล้ว

    YFP film ....best one...लवकर करत जा व्हिडिओ अपलोड

  • @minalole2641
    @minalole2641 2 ปีที่แล้ว

    Kupach Chan👌

  • @kailasjadhav4396
    @kailasjadhav4396 ปีที่แล้ว

    खूपच छान ,ताई खुपचं व्हिडिओ बनवला

  • @ratantajane870
    @ratantajane870 2 ปีที่แล้ว

    Jabardast jabardast har har Mahadev Jay Vidarbha

  • @gauravthaware5138
    @gauravthaware5138 2 ปีที่แล้ว +1

    भाऊंचा गणित मस्त आहे .😝

  • @gulabshivankar8209
    @gulabshivankar8209 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या गोंदिया मध्ये मारबद सर्वात बडी जोराची होते श्रुती ताई 😝😄

  • @santoshswami8884
    @santoshswami8884 2 ปีที่แล้ว

    नंबर एक पोळा झाला

  • @ashishpatil9384
    @ashishpatil9384 2 ปีที่แล้ว +2

    Very nice video shruti acting you best 👌

  • @baluachari6245
    @baluachari6245 2 ปีที่แล้ว +2

    Shrutika👌

  • @shubhamkatore3590
    @shubhamkatore3590 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🚩🚩👌✌

  • @gajendrawanjari486
    @gajendrawanjari486 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @amanvarma5263
    @amanvarma5263 2 ปีที่แล้ว +7

    Khup chan sister 🙏

  • @vasantaupund3755
    @vasantaupund3755 2 ปีที่แล้ว

    अरे बाप्पो भाऊचा हिशोब

  • @govardhanbobade9901
    @govardhanbobade9901 2 ปีที่แล้ว +1

    Zakkasssss.....

  • @pradiprathod935
    @pradiprathod935 2 ปีที่แล้ว +11

    shrutika you just amazing ...like your acting

  • @swapnilkadao4474
    @swapnilkadao4474 2 ปีที่แล้ว +2

    पोया रे पोया सुनी घोया ,🤣🤣🤣🤣🤣

  • @dirajkawle867
    @dirajkawle867 ปีที่แล้ว +1

    पुरण पोळी आवडते

  • @shrutikamotghare1342
    @shrutikamotghare1342 2 ปีที่แล้ว

    Chan...

  • @ankushsabale149
    @ankushsabale149 2 ปีที่แล้ว +1

    Yfp walyana gaw ek number bhetla vithalapur videosathi 😂😂

  • @pankajgupta173
    @pankajgupta173 2 ปีที่แล้ว +1

    Tai mast video 👌👌👌

  • @Fantasycricket_sachin
    @Fantasycricket_sachin 2 ปีที่แล้ว +2

    Nice😊😊😊👍👍

  • @shrutikagawande4156
    @shrutikagawande4156 2 ปีที่แล้ว +8

    आले का रे बा व्हिडीओ पाहाले..😍

    • @krishnalilhare5702
      @krishnalilhare5702 2 ปีที่แล้ว +1

      Ho 😊

    • @palash010
      @palash010 2 ปีที่แล้ว

      .mstach shruti 👌🏻👌🏻

    • @shravanijogi4673
      @shravanijogi4673 2 ปีที่แล้ว

      Chan dist ahe tu

    • @sunitavairale6699
      @sunitavairale6699 10 หลายเดือนก่อน

      ​@@krishnalilhare5702😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @07j.
    @07j. 2 ปีที่แล้ว +1

    🙏ram ram

  • @user-uv3yl3zq6r
    @user-uv3yl3zq6r 2 ปีที่แล้ว

    एक च नंबर ताई

  • @lakhanbodade7077
    @lakhanbodade7077 2 ปีที่แล้ว +1

    छान भाऊ

  • @kgf5433
    @kgf5433 2 ปีที่แล้ว +1

    Keep it up video nice

  • @chandrashekharbhonde9539
    @chandrashekharbhonde9539 2 ปีที่แล้ว

    Don bailachi Jodi 😁😁😁😁

  • @m.chandramani3187
    @m.chandramani3187 2 ปีที่แล้ว

    Must...... 🤔

  • @sushantbhore353
    @sushantbhore353 2 ปีที่แล้ว

    1 च. न

  • @gajanandeshmukh2142
    @gajanandeshmukh2142 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @patelalim788
    @patelalim788 2 ปีที่แล้ว +1

    Bhut bhari

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 ปีที่แล้ว

    शेतकरी राजा सुखी तर सगळे सुखी

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 10 หลายเดือนก่อน

    Kubh sundar comedy

  • @onlynoobgaming5727
    @onlynoobgaming5727 2 ปีที่แล้ว +1

    so nice video

  • @bhashkardhumane6306
    @bhashkardhumane6306 2 ปีที่แล้ว +1

    Tum kya kar Changla Dhara that is hurtti vah bhai

  • @ganeshedits6256
    @ganeshedits6256 2 ปีที่แล้ว

    एक दम भारी विडिओ ahe

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @allroundfact4905
    @allroundfact4905 ปีที่แล้ว

    भयानक आहे पोळा

  • @mahendragid3564
    @mahendragid3564 2 ปีที่แล้ว

    You are great

  • @akashbawane1785
    @akashbawane1785 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम पोळा साजरा केलाय तुम्ही त्यात पुरन पोळी तर मस्तच बनवते तू☺️☺️☺️

  • @bharatbadewale3808
    @bharatbadewale3808 2 ปีที่แล้ว +2

    गावाची मज्जाच वेगडी राहते सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा yfp टीम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 2 ปีที่แล้ว +4

    Where had you been guys....i was waiting for video so long no videos uploaded... finally u came back

  • @jaiaadiwashi.one..3742
    @jaiaadiwashi.one..3742 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👍👍👍

  • @dipakpatil4107
    @dipakpatil4107 2 ปีที่แล้ว

    चांगले विडिओ, होता

  • @kishorraut9606
    @kishorraut9606 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @kajalkadu5430
    @kajalkadu5430 2 ปีที่แล้ว +1

    पोया त पोया सूनीले घोया 😂😂

  • @nitinumale4241
    @nitinumale4241 2 ปีที่แล้ว +2

    At 9.10. Min....😃😃👍

  • @tanmaygawande7864
    @tanmaygawande7864 2 ปีที่แล้ว

    Ho amacha kada asata

  • @stutaszone3646
    @stutaszone3646 2 ปีที่แล้ว

    mst bhau

  • @kavitamane1523
    @kavitamane1523 2 ปีที่แล้ว +3

    1 ch no.tumcha ganit pan 1 no bhau

  • @akchannel6844
    @akchannel6844 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast..! Gavtale diwas athavle n bhau lokanche counting ekdum bhari hot 😅

  • @prashantbhagat9081
    @prashantbhagat9081 2 ปีที่แล้ว +2

    Bail polyachya hardik shubhechha ....

  • @pujanikose9890
    @pujanikose9890 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @sunitasawant2116
    @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/uVNy22z5cGc/w-d-xo.html

  • @devidasbankar5419
    @devidasbankar5419 2 ปีที่แล้ว +2

    Pan puneri bhasha thodi mix hote

  • @vaibhavmadavi4186
    @vaibhavmadavi4186 2 ปีที่แล้ว

    Awesome

  • @pratikshag6323
    @pratikshag6323 2 ปีที่แล้ว +2

    👍

  • @vaishur8323
    @vaishur8323 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @mayursarde4888
    @mayursarde4888 2 ปีที่แล้ว +1

    Nagesh bhai missing

  • @bhushanjaveer3274
    @bhushanjaveer3274 2 ปีที่แล้ว +1

    Shrutika rocks!!!