संकासुर I गुहागरचं सांस्कृतिक वैभव जगासमोर ठेवणारा माहितीपट I Shankasur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2024
  • जिथे जगभर, लोक स्वतः देवदर्शनाला जातात, तिथे कोकणात मात्र साक्षात देव लोकांच्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे. गावोगावच्या सोपस्करात विविधता पाहायला मिळते. शंकासुर, देवखेळे, गोमूचा नाच, पालखी सोहळा, होम या शिमगोत्सवातून मिळणारी ऊर्जा घेऊन प्रत्येक कोकणवासी पुन्हा परततो आपल्या दैनंदिन जीवनात आणि त्याक्षणापासून वाट पाहतो ती पुढच्या वर्षी येणाऱ्या शिमग्याची. आज जिथे आपला मानसिक स्वास्थ्य हरवलेला असताना या आनंदी पर्व सोहळ्यात आपण मग्न होतो भौतिक जगातून अध्यात्मिक वातावरणात प्रवेशतो अध्यात्माची ही ताकदच आजच्या जगण्याची प्रेरणा आहे ही संस्कृती या लोककला हेच आमचं जगणं आहे.
    इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडली समुद्राच्या निळाईची, ताज्या माश्याच्या मेजवानीची, नारळीपोफपळी च्या ऐसपैस बागांची, एकांतात वसलेल्या पुरातन देवळांची. इथल्या मातीच्या कणाकणात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने जपलाय तो कोकणातील जिव्हाळा. शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिव्हाळ्याचं प्रतीक आहे.
    मग येताय ना शिमग्याला !!!

ความคิดเห็น • 54

  • @rakeshsurve3417
    @rakeshsurve3417 4 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर माहिती दिली आहे म्हणून आम्हाला आमच्या कोकणची एक आवड आणि माज आहे. शेवटी गाव ते गाव आहे आमचं.

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 4 หลายเดือนก่อน +4

    आजन्म मिळालेली सुवर्णभेट - कोकण आणि कोकण संस्कृती ❤❤

  • @shashikantghag6320
    @shashikantghag6320 4 หลายเดือนก่อน +2

    छानचं सुंदर लोककला पारंपारिक नृत्यविष्कार जपलय या गुहागर गावाने आणि कोकणीकार्टी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून संपुर्ण तालुका जिल्ह्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ही कला पहायला मिळतेय धन्यवाद मंडळी.

  • @sagartankar6208
    @sagartankar6208 4 หลายเดือนก่อน +2

    आमच्या पेवे गाव ची आई झोलाई मातेचा महिमा आपल्या व्हिडिओ मार्फत जगभरात पोचवत आहात त्याबद्दल धन्यवाद,,,, अशीच आपल्या गुहागर तालुक्यातील कला, लोककला, पोचवा कोकणामध्ये गुहागर तालुक्याला मिळालेले वेगळेपण हि आपल्या थोर मोठांकडून मिळालेली पुण्याई आहे....

  • @balasaheb68
    @balasaheb68 4 หลายเดือนก่อน +2

    वाह खुप चांगल्या प्रकारे गुहागरच्या संस्कृतीचे जतन होतेय दिग्दर्शन सादर करणारे कलाकार निवेदन संगीत सगळेच कसे जीवंत आणि जातीवंत आहे मनामनातला संकासूर आणि शिमगोत्सव

  • @SadashivPatil-yu7on
    @SadashivPatil-yu7on หลายเดือนก่อน

    1000 वी लाईक माझी.
    पालघर
    वाडा तालुका.

  • @rakeshpardale959
    @rakeshpardale959 4 หลายเดือนก่อน +4

    श्री केदारनाथ झोलाई देवी(पेवे)

  • @maheshpawar441
    @maheshpawar441 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माहीती.. सगळ्या शंका दुर झाल्या.. आमच्या कडे पेवे गावचा तमाशा येतो.. अशीच माहीती देत रहा❤

  • @keshavpadyal9746
    @keshavpadyal9746 4 หลายเดือนก่อน +1

    गुहागर तालुक्यातील शिमगा उत्सव हा कोकणातील आनंदी सोहळा आहे त्याला आपण जगभर प्रसिद्ध केलात त्याबद्दल खोत सर आपले आभार

  • @rajendrashigwan7919
    @rajendrashigwan7919 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻छान माहिती दिलीत सुधीर मामा 👍🏻 आमच्या धोपावे गावात पण तुमचा तमाशा येतो आणि आमच्या घरी खेली थांबतात चहापाणी, जेवण करतात.

  • @adityagoreat9978
    @adityagoreat9978 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan❤️

  • @asimsalhe64
    @asimsalhe64 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, खोत सर, अमोल आणि अमित..❤❤❤

  • @chetankhandekar680
    @chetankhandekar680 4 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत उत्तम प्रकारे कोकणातील संस्कृती आणि शिमग्याची माहिती दिली आहे. असेच सादरीकरण केले तर इथला पर्यटन व्यवसाय वाढेल आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा याची माहिती पोचेल. शिमगा सणाची माहिती देणारा उत्कृष्ट व्हिडिओ . धन्यवाद सर

  • @suyogbhuwad
    @suyogbhuwad 7 วันที่ผ่านมา

    Khup mast aahe video ❤🍂🙇‍♂️👍

  • @akileshpawaskar
    @akileshpawaskar 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान❤🙏🚩

  • @trishalasabale2661
    @trishalasabale2661 4 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय डॉ खोत सर खूपच छान अभ्यासपूर्वक प्रयत्न. या व्हिडिओतून मला वैयक्तिक खूप गोष्टी नव्याने उमगल्या. खूप खूप धन्यवाद.😊

  • @deepalisuryavanshi7799
    @deepalisuryavanshi7799 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती!कोकण बद्दल आकर्षण आहेच, आता त्याची संस्कृती ही खोत सरांच्या प्रयत्नाने माहिती झाली

  • @user-de3wn8sk8w
    @user-de3wn8sk8w 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विचार

  • @ajitghanekar8857
    @ajitghanekar8857 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली नवीन पिढीला धन्यवाद आपले

  • @shubhamgosavi4798
    @shubhamgosavi4798 4 หลายเดือนก่อน +1

    Dada खुप छान ❤❤❤❤❤❤❤ ty

  • @sheelapadval4316
    @sheelapadval4316 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे

  • @akshayrahatwal
    @akshayrahatwal 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ❤

  • @surekhapawar9412
    @surekhapawar9412 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान👏✊👍

  • @mbcreation99
    @mbcreation99 4 หลายเดือนก่อน +1

    ❤️ गुहागर ❤
    खुप छान माहिती

  • @pranaypimparkar7846
    @pranaypimparkar7846 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम..... खूप छान..... खोत सर आणि
    अमोल नरवणकर of TWJ सह्याद्री वेडा

  • @aratijanvalkar8125
    @aratijanvalkar8125 4 หลายเดือนก่อน +1

    सर खुप छान माहिती मिळाली... 👌👌👌😊

  • @sanketmandavkar3234
    @sanketmandavkar3234 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ❤

  • @sanjaydhavade2467
    @sanjaydhavade2467 18 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @shraddhasangare24
    @shraddhasangare24 4 หลายเดือนก่อน +1

    मस्त खूप भारी आहे 😍🥳❤😊

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर सर 😇🤗❤🚩🌴🌊

  • @watchandplay4185
    @watchandplay4185 4 หลายเดือนก่อน +1

    Peve
    ... blessed🙏🏻🙏🏻

  • @vishalphalasamkar
    @vishalphalasamkar 4 หลายเดือนก่อน +1

    जन्म कोकणातला गतजन्मी ची पुण्याई

  • @vishalsalunkhe1588
    @vishalsalunkhe1588 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahit sir 🙏🙏

  • @user-sw9vf2fb5e
    @user-sw9vf2fb5e 4 หลายเดือนก่อน

    JANMANE KHANDESHI ,PRATHAMIK SHIKSHAN KOKANCHO ,NAMASTE SERVANA .

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @santoshnikam7664
    @santoshnikam7664 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @pratikshamene9618
    @pratikshamene9618 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @srushtipalshetkar1469
    @srushtipalshetkar1469 4 หลายเดือนก่อน

    #आमची गावदेवी

  • @vishalhalye5051
    @vishalhalye5051 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🙌

  • @rahulalnikar
    @rahulalnikar 3 หลายเดือนก่อน

    Nice🎉

  • @dr.sattendraraje8259
    @dr.sattendraraje8259 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहितीपट

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @roshanpachakudave1927
    @roshanpachakudave1927 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏👌👌👌

  • @amittanajibhuwad
    @amittanajibhuwad 4 หลายเดือนก่อน

    Adur mazhi sasurwadi

  • @rajsalvi098
    @rajsalvi098 4 หลายเดือนก่อน +1

    🙌🙏🙏

  • @SnehalGonbare
    @SnehalGonbare 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @shashikantghag6320
    @shashikantghag6320 4 หลายเดือนก่อน

    या कलेमध्ये भास्कर जाधव कुठेच दिसले नाहीत किंवा ओळखताच आले नाहीत

  • @amittanajibhuwad
    @amittanajibhuwad 4 หลายเดือนก่อน

    Adur aahe ka

  • @dalviamu99
    @dalviamu99 2 หลายเดือนก่อน

    Fkat swatchi Jameen Parpatiyana viku Naka

  • @user-bf3ys2vk6h
    @user-bf3ys2vk6h 4 หลายเดือนก่อน

    सर संकासुर बाबत जरा माहिती अजून द्यावी.. संकासुर कोण होता? त्याचे अस्तित्व काय? त्याची पूजा कोकणातच का केली जाते? संकासुर कोकणातच का आला ?त्याचे अस्तित्व कोकणातच का दिसते? त्याचा वध कसा झाला ? खरं तर ही माहिती अपेक्षित होती? आपण जी माहिती दिली त्यातील 50% माहिती already संकासुर या डॉक्युमेंट्री मध्ये आहे.त्यामुळे जी गोष्ट माहिती नाही ती दिली असती तर खूप छान वाटले असते..आपण दिलेली माहिती चांगलीच आहे पण त्यात संकासुर बाबत खूप कमी माहिती आहे. आणि तुम्ही जो संदर्भ दिला श्री कृष्णाने वध केला व तो समुद्र मध्ये लपला होता पण तो लपला होता कशासाठी लपला होता हेही सांगितले असते तर बर झालं असते.. आपण जी माहिती दिली ती कोणत्या ग्रंथात आहे त्याचे नाव नक्की सांगावे. आमच्या माहिती साठी.. आवडेल अजून त्याचा अभ्यास करायला..

  • @SP....9611
    @SP....9611 4 หลายเดือนก่อน

    Sir tumcha nomber milel ka