खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • खाडीत मामासोबत खेकडे पकडले - Mud Crab Catching 😍 | घरी येऊन आईने बनवला खेकड्यांचा रस्सा (Konkan) मामासोबत मी खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो. गावी खाडीत बिळातून खेकडे कसे पकडतात हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. खाडीत समुद्राच्या पाण्याला ओहोटी असते तेव्हा खाजनातले पाणी कमी होते तेव्हा खेकड्यांचा बिळातून खेकडे काढले जातात. गावाला सम्याला खास खेकडी काढायला जातात. एकादशी झाल्यावर पाणी जास्त ओहोटते त्यावेळेस खेकडी जास्त सापडतात. खाजनातली खेकडी भरलेली असतात. खेकड्यांना मेंदा चांगला असतो. खाडीतून खेकडी काढण्याची सुद्धा कला असते. माझे मामा खेकडी काढायला पटाईत आहेत. आम्ही खेकडी काढायला गेलो तेव्हा आईसुद्धा कालवा काढायला आली होती. मामा आणि मी सोबत भरपूर खेकडी पकडली. मामाच्या घरी जाऊन सर्व खेकडी एका टपात काढून दाखवली आहेत. थोडी खेकडी मामाला दिली आणि बाकीची खेकडी आम्ही घेऊन गेलो. आईने घरी जाऊन खेकड्यांचा रस्सा केला. खेकड्यांचा रस्सा खूप भारी लागतो. खाडीतली खेकडी चविष्ट असतात. भरलेली खेकडी खायला खूप मजा येते. खेकडी पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आमच्या गावाकडे अशा पारंपरिक पद्धतीने खाजनातून खेकडी काढली जातात. #MudCrabCatching #KhekdyanchaRassa #GiantMudCrabCatching #sforsatish
    तुम्हाला या व्हिडिओमध्ये खाडीतून खेकडी कसे काढतात ते दाखवले आहे आणि आईने कालवण कसे बनवले आहे ते थोडक्यात दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    www.imstagram....

ความคิดเห็น • 690