केसांमध्ये उवा / लिखा झाल्या आहेत ? काय उपाय करावा ? | Lice Treatment

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • उवा (Lice)
    लहान मुलांमध्ये किंवा क्वचित मोठ्या माणसांमध्ये आढळून येणारी समस्या आहे. या उवांच्या इन्फेक्शन (Lice infection)वर कोणी फारशी ट्रीटमेंट घेताना दिसत नाही काहीतरी घरगुती उपाय करतात त्यामुळे हा संसर्ग लगेच आटोक्यात येत नाही. अजून इन्फेक्शन पसरत जाते. यामुळे बाहेरच्या लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागते आणि कित्येकदा संसर्ग जास्त झाला असेल तर डोक्यातून उवा फिरतांना दुसऱ्या व्यक्तींना दिसतात त्यामुळे अवघडल्यासारखं वाटू लागत.
    या समस्येसाठी उपचार उपलब्ध असून देखील फारसे कोणी इलाज घ्यायला येत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे संकोच...
    लहान मुलांच्या बाबतीत एवढा संकोच नसतो मात्र मोठ्या मुली किंवा बायका या वयोगटात संकोच खूप जास्त असतो मला लोक काय म्हणतील डॉक्टरांना काय सांगू मला हसतील असे प्रश्न येतात व रुग्ण संकोच करू लागतात. एवढा संकोच बाळगण्याचे काही कारण नाही जशी शरीरातील इतर इन्फेक्शन असतात तसेच हे देखील एक आहे आणि यावर इलाज केल्यावर ते पूर्णपणे जाऊ शकतं.
    उवा म्हणजे काय??
    उवा किंवा लिखा हा एक परपोषी जीव Parasite आहे जो दुसऱ्यांच्या जीवावर वाढतो आणि दुसऱ्यांच्या पोषणावर जगतो आणि त्या त्यांना इजा करतो.
    व या केसांच्या मुळाशी आढळून येतात त्या माणसाच्या शरीरातील रक्तावर जगतात आणि केसांमध्ये अंडी घालतात क्वचित वेळा त्या आजाराचा प्रसारही करू शकतात.
    कुठे आढळतात उवा??
    १. डोकं - Head lice
    २. पूर्ण शरीर - Whole body
    ३. जनेंद्रिय - Genitals
    कारणे -
    १.अस्वच्छता अनियमित अंघोळ हे प्रमुख कारण आहे.
    २.वसतिगृह शाळा यांमध्ये संसर्ग जास्त वेगाने पसरतो.
    ३.लांब केस ओले केस राहणं आणि केसांची निगा न राखणे यामुळेही उवा होतात
    ४.जे लोक रोजच्या रोज अंघोळ करत नाही तेच तेच कपडे न धुता दिवसेंदिवस वापरतात अशा लोकांच्या अंगावर वा दिसून येतात.
    ५.जे लोक अंतर्वस्त्रे म्हणजेच अंडरगारमेंट्स न धुता तीच तीच पुन्हा पुन्हा वापरतात त्यांना genital lice होऊ शकतात.
    वयोगट
    १. शाळेमधील मुलं-मुली
    २. क्वचित कॉलेजमधल्या मुली आणि मध्यमवयीन बायका
    लक्षणे
    १.उवा भांगाच्या बाजूला केसात दिसतात.
    २.त्यांची अंडी म्हणजेच लिखा केसाच्या मुळाशी दिसतात
    ३.सतत डोक्याला खाज येते
    त्या दर तीन ते सहा तासांनी रक्त पितात. एक उ साधारण महिनाभर जगते आणि रोज सात ते दहा अंडी घालते त्या अंड्यांपासून आठ ते दहा दिवसात नवीन उ तयार होते.
    ४.लिखा या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि केसांच्या मुळांशी असतात बऱ्याचदा कोंडा आणि लिखा यातला फरक पेशंटला समजत नाही.
    ५.कधीकधी इन्फेक्शन फारच झालं असेल तर डोळ्याच्या पापण्यांच्या केसांवरही उवा दिसून येतात त्यामुळे Blepharitis होऊ शकतो पापण्यांना खाज येते व कोरडेपणा येतो.
    उपाय
    १.रोज स्वच्छ आंघोळ करावी व धुतलेले स्वच्छ कपडे घालावे.
    २.केसांची नीट निगा राखावी ३.वेळच्यावेळी केस कोरडे करावे.
    ४.जर डोक्यात उवा झाल्या असतील तर काही शाम्पू बाजारात मिळतात ते वापरण्यास हरकत नाही पण त्याबरोबर डोक्यातील सर्व लिखा बारीक दाताच्या फणीने काढणे आवश्यक आहे.
    ५.या शाम्पू मुळे इन्फेक्शन तेवढ्यापुरतं कमी होऊ शकत पण जर फार प्रसार झाला असेल तर त्याला तोंडाद्वारे घेण्याची औषधे देखील लागू शकतात
    ६.आठवड्यातून एकदा बारीक दाताच्या कांगव्याने केस विंचरायला हवेत.
    ७.जर एकामुळे दुसऱ्याला इन्फेक्शन झालं असेल तर एकाच वेळी दोघांना इन्फेक्शन साठी उपाय करणं गरजेचं आहे नाही तर इन्फेक्शन पुन्हा पसरू शकत.
    ८.हल्ली पार्लर मध्ये उवांसाठी ट्रीटमेंट उपलब्ध आहे पण ती तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि त्यामुळे केसांचा पोत खराब होतो आणि केसांचा बरेच नुकसान होतो कारण ती हीट ट्रीटमेंट असते.
    उवांच्या इन्फेक्शन साठी डॉक्टरांकडे प्रभावी उपचार असतात जर इन्फेक्शन खूप जास्त पसरला असेल तर जवळच्या त्वचेच्या डॉक्टरांकडे गेल्यास ते नक्कीच उपचार करतील. काही तोंडावाटे घेण्याची देखील प्रभावी औषधे आहेत त्यामुळे या उवांच्या प्रकरणापासून कायमची सुटका होऊ शकते.
    हे सगळं लक्षात ठेवून केसांची काळजी घ्या आणि जर समजा इन्फेक्शन आधीच झाल असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करा. संकोच वाटून घेऊ नका .
    धन्यवाद
    डॉ. अमृता कदम
    पुणे

ความคิดเห็น • 22