घनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा | ghanu waje ghunghuna| बाळकृष्ण महाराज वसंतगडकर |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥
चांदवो चांदणें । चापेवो चंदनु ।
देवकी नंदनु । विण नावडे वो ॥२॥
चंदनाची चोळी । माझें सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें ।
कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥
दर्पणीं पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसें केलें ॥६॥
संत ज्ञानेश्वर माऊली
#abhang #अभंग #वारकरी #संत_ज्ञानेश्वर_माऊली #मराठी_अभंग #trending