नारायण नागबळी आणि कालसर्पदोष || Narayan Nagbali Puja Trimbakeshwar and Kaal sarp dosh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • नारायण नागबळी आणि कालसर्पदोष || Narayan Nagbali Puja Trimbakeshwar and Kaal sarp dosh
    नारायण नागबळी आणि कालसर्पदोष
    अनेकांच्या जन्मपत्रिकेत कालसर्पदोष असतो.
    जन्मपत्रिकेत राहु व केतु या दोन ग्रहांच्या दरम्यान इतर सर्वच ग्रह असतील तर तो कालसर्प योग असतो.
    कालसर्प योगामुळे व्यक्तीला आयुष्यात सहजासहजी यश मिळत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतात.
    अनेक ज्योतिषी सांगतात की, कालसर्प योगामुळे भयंकर नुकसान होते, अनेक संकटे आणि अनपेक्षित गोष्टी जीवनात घडतात.
    कालसर्पदोष दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे नारायण नागबळी शांती केली जाते.
    या शांतीसाठी (विधीसाठी) अंदाजे सध्याच्या घडीला 10-15 हजार रुपये खर्च येतो.
    तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींसह् त्र्यंबकेश्वर येथे 3-4 दिवस राहावे लागते.
    माझ्या परिचयातील 100 पैकी 70-80 लोकांनी सांगितले की हा विधी करून त्यांना कसलाही फायदा मुळीच झाला नाही.
    त्र्यंबकेश्वर येथे पाच पाचशे लोक एकाचवेळी दाटीवाटीने गर्दीत बसवले जातात. त्याच गर्दी व गोंधळात पूजा विधी संपन्न होतो. कोणाचा कोणाला मेळ नसतो. एकाचवेळी मंत्रांचा गोंगाट चालू असतो. अशा गोंगाटात केलेल्या मंत्रोच्चारणांचा फायदा अजिबात होतं नसतो, हे तुम्ही जाणताच!
    आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले तुम्ही पाहू शकता. आणि याच सगळ्यासाठी तुमचा खिसा हजारोंनी रिता केला जातो. तुमचे अनेक दिवस या सगळ्यात मोडतात.
    ही पूजा केली नाही तर मोठे नुकसान होईल, या भीतीनेच लोक हे सगळं करतात.
    योगायोगाने 10 पैकी एखाद दुसऱ्याला फायदा होणारच! त्याचाच मोठा गवगवा केला जातो, आणि भाबडे लोक या प्रकाराला बळी पडतात.
    मित्रहो, उत्तर कालामृत या ज्योतिष विषयक ग्रंथात कालसर्प योग असा कोणत्याही योगाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.
    भारतीय ज्योतिषशास्त्रात हा कालसर्प योग कोठून आला हे सुद्धा कुणी स्पष्टपणे सांगत नाही.
    देवाला अगदी कुठूनही अंतःकरण पूर्वक हाक मारा. तो चराचरात आहे. आर्ततेने मारलेली हाक तो ऐकतोच. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा. देव त्याचीच मदत करतो, जो स्वतःची मदत स्वतः करतो.
    व्यर्थ पैसे वाया घालवण्याऐवजी ते तुमची जी समस्या आहे, ती सोडवण्यासाठी वापरा. घरासाठी, घरातील व्यक्तीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे पैसे सत्कारणी लावा.
    हिंदू धर्मात कुठेही न सांगितलेला हा विधी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील कष्ट कमी होतील की नाही माहित नाही परंतू हा विधी करणारे जे पुरोहित आहेत त्यांचा बँक बॅलेन्स मात्र आरामात वाढेल, हे नक्की!!!
    कर्मकांडात अडकू नका, कर्म करा. ज्ञानेश्वरी, गाथा यांचे सरल मराठी अनुवाद वाचा. त्यात हिंदू धर्मातील सर्व उत्तम आणि योग्य गोष्टी तुम्हाला मिळतील.
    ॐ नमो नारायणा

ความคิดเห็น • 53

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, सर्वांचे डोळे उघडले तुम्ही.😮😮 श्रद्धा ळु नी डोळस पने आस्था ठेवा, कर्म कांड पासून दूर रहा. त्या पेक्षा जीवन विद्या मिशन सद्गुरू वामन राव पै ह्यांचं प्रवचन मधून मार्गदर्शन घ्या. 🙏🙏

  • @chandrakantpatil3749
    @chandrakantpatil3749 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे खूप चांगली माहिती आपण प्रस्तुत केली आपणास खूप खूप धन्यवाद

  • @anandraobansode6381
    @anandraobansode6381 ปีที่แล้ว +6

    😢 सत्य आहे आपणास धन्यवाद

  • @akashkamble8212
    @akashkamble8212 ปีที่แล้ว +1

    Dada kiti sundar shbdat sangitlat tumhi...khup sundar...🌹🌹🌹🙏

  • @sangeeta7139
    @sangeeta7139 ปีที่แล้ว +1

    ओम नमो नारायना आप्रतिम म्हाहीति सर 🙏🙏🌹👍👍

  • @sunitagawande9300
    @sunitagawande9300 ปีที่แล้ว +2

    Mazya mulala nagbalichi Pooja सांगितली

  • @SangeetaGotam-k1k
    @SangeetaGotam-k1k ปีที่แล้ว

    हे स्पष्ट अत्यंत उत्तम माहीती मार्गदर्शन आहे छान

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली🙏 धन्यवाद.

  • @AnupSingh-y2z
    @AnupSingh-y2z ปีที่แล้ว +10

    कालसर्प योग व नारायण नागबली हे दोन्ही स्वतंत्र दोष आहेत. कालसर्प योग मध्ये एक दिवसाचा विधी केला जातो. नारायण नागबली हा तीन दिवसाचा विधी त्र्यंबकेश्वर येथे राहून केला जातो.🙏

    • @ChinmayDeshpande-rv7xv
      @ChinmayDeshpande-rv7xv ปีที่แล้ว

      Right. Both are different things kalasarp dosh needs kalsarp Shanti & Narayan nagabali is for pitrudosh nivaran.

  • @pournimabaikar8458
    @pournimabaikar8458 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @shantapawar90
    @shantapawar90 ปีที่แล้ว +1

    खप खुप धन्यवाद.

  • @ratnamaladale6550
    @ratnamaladale6550 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर,अगदी बरोबर

  • @amitagupte4401
    @amitagupte4401 ปีที่แล้ว +1

    Thank you for giving good information❤

  • @Muphad-b7s
    @Muphad-b7s หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर माहिती दिली

  • @god__4447
    @god__4447 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti... 🙏

  • @anandbarhe5514
    @anandbarhe5514 ปีที่แล้ว +2

    खूप छान ❤

  • @yogeshpatil-hy6xt
    @yogeshpatil-hy6xt 6 หลายเดือนก่อน +1

    Thax

  • @GM5007yt
    @GM5007yt 17 วันที่ผ่านมา

    नारायण बली हा विधी फक्त त्यांनीच करावा ज्यांना पितृदोष सांगितला गेला आहे anytha फरक जाणवणार नाही

  • @unpreparedgaming4933
    @unpreparedgaming4933 ปีที่แล้ว +1

    Agdi barobar dhanyawad

  • @anujganthday3006
    @anujganthday3006 4 หลายเดือนก่อน

    Thank you

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे

  • @saritarnikam7221
    @saritarnikam7221 3 หลายเดือนก่อน

    Dhanywad

  • @seema7002
    @seema7002 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे

  • @sunitagawande9300
    @sunitagawande9300 ปีที่แล้ว +1

    त्र्यंबकेश्वर ल गर्दीमध्ये पूजा केल्यापेक्ष्या कुठल्याही महादेवाच्या मंदिरात मनोभावे पूजा करावी

    • @nitinpansare990
      @nitinpansare990 ปีที่แล้ว +1

      त्रंबकेश्वर हेच योग्य ठिकाण आहे

  • @ganeshbhojane2804
    @ganeshbhojane2804 ปีที่แล้ว

    Garuda Purana vacha

  • @rakhibagave5408
    @rakhibagave5408 ปีที่แล้ว +2

    Sarvani karavi aamhi pan keli jaun khup farak padto renuka holl shikare guruji

    • @avinashbhekare
      @avinashbhekare 11 หลายเดือนก่อน

      Kahi contact dya na tyancha

    • @GM5007yt
      @GM5007yt 17 วันที่ผ่านมา

      Bhetla ka contact ??​@@avinashbhekare

  • @avinashgade3119
    @avinashgade3119 ปีที่แล้ว

    Write ❤

  • @nandinishejwal9333
    @nandinishejwal9333 ปีที่แล้ว +1

    Brobar ahi 🙏

  • @tusharkulkarni1813
    @tusharkulkarni1813 10 หลายเดือนก่อน

    kalsarp yog vidhi gokarn mahabaleswar la kela tar chalele ka??????

  • @timely868
    @timely868 7 หลายเดือนก่อน

    मी कालसर्प योग शांती केली तरी ..त्रास होतो
    किती वेळा कराचा असतो मी सेप्रेट केलंय विधी थोडी वर्ष चांगली गेली...

  • @prashantkarande3559
    @prashantkarande3559 11 หลายเดือนก่อน +1

    माझ्याबरोबर हे झाले आहे 8 महिने झाले कुठलाही फ रक पडला नाही. नाशिकमध्ये केलाय विधी.

  • @narayankhiladkar4989
    @narayankhiladkar4989 8 หลายเดือนก่อน

    Agdi barober

  • @meenakshiawaghade2338
    @meenakshiawaghade2338 ปีที่แล้ว +2

    माझी सुद्धा कालसर्प शांती केली आहे नृसिंहवाडी येथे काहीही उपयोग झाला नाही हे सगळे थोतांड आहे.

  • @daljitsinghjohar5482
    @daljitsinghjohar5482 ปีที่แล้ว

    Tu jay sangto Tay pura ring information hay shastra vavha ....

  • @NarayanVas-nt6rz
    @NarayanVas-nt6rz 6 หลายเดือนก่อน

    Nahi kelays Kay Hote

  • @Ishikayadav-k4e
    @Ishikayadav-k4e 4 หลายเดือนก่อน

    guruji ples. phon no dhya

  • @sushantnarlawar4909
    @sushantnarlawar4909 5 หลายเดือนก่อน

    Kahich nahi ya kalyugat trasach tras ahe

  • @siddhukivines1147
    @siddhukivines1147 หลายเดือนก่อน

    Kon aahe re tu shanya

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 4 หลายเดือนก่อน +8

    साहेब
    तुम्हाला नारायण नाग बळी या बद्दल काही निट् माहिती आहे असे वाटत नाही
    साजुक पना चां आव अणूंन, हिंदू धर्मातील कोनत्याहिं गोष्टी वर् टीका करून हुशारी दाखविणे असा प्रकार दिसतोंय, खरा प्रकार असा आहे -
    १. काही जुन्या जान् त्या ब्राम्हणा कडे हा विधि अजूनही योग्य ख़र्च करुन् होतो
    २. हिंदू मंदिरात जशि साफ़ सफ़ाई आस्ते तशिच परिस्थिती आस्ते
    ३. हा विधि मि स्वता २ वेळा केला आहे आणि त्याचे उत्तम फ़ल मला मिळाले आहे
    ४. हिंदू लोक् हे विचारी आणि अनुभवा तूंन शिक्नारे अस्ल्या मुळे , अजूनही लाखो च्या संखेने लोक् हा विधि करुन् त्याचा उत्तम लाभ घेत आहेत्
    ५. हा विधि करताना ब्राह्मण जे कष्ट घेतात व जेव् ढि साधन सामुग्री वापर तात् ते बघुन त्या साठी जी दक्षिना घेतात ति कमीच आस्ते
    ६. निट् विचारपुस करुन् योग्य ब्राह्मणा कडे हा विधि केला असता तों योग्य किमतीत आणि योग्य प्रकारे होऊ होतो, शेवटी फ़सवनुक सर्वत्र होऊ शकते

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 4 หลายเดือนก่อน

      Number dya

    • @GM5007yt
      @GM5007yt 17 วันที่ผ่านมา

      ​@@vipulpatil8876bhetlay ki deu,??

  • @Bhhushan__555
    @Bhhushan__555 9 วันที่ผ่านมา

    Bhau garud puran cha ekda study kara... Trimbakeshwar baddal chukicka bolu naka. Tumhi hindu dharma baddal bolta ahat yevdha bhan theva... narayan ne je garud devala gupta gyan dila hota te ekda tumhipan ghya. Garud puran ekda vacha sagle purave bhettil

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂 बरोबर आहे घंटा काही फरक पडत नाही 😜😂

  • @pratikdandekar1854
    @pratikdandekar1854 ปีที่แล้ว +1

    फालतू खोटी माहिती

  • @shitalbangar8795
    @shitalbangar8795 ปีที่แล้ว

    ॐ नमो नारायणा 🙏 पण ज्योतिष का अस सांगतात नारायण नागबली करा , म्हणून मला पण सांगितले आहे,