पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेला वेग भगीरथ भालकेनी घेतली शरद पवारांची भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • पंढरपूर मंगळवेढा विधानसभेला वेग भगीरथ भालकेनी घेतली शरद पवारांची भेट
    विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आला असून भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केलेले आणि माजी आमदार कै.
    भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे. भालके हे महविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले होते. अभिजीत पाटलांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर भालके पवारांच्या भेटीला असून महविकास आघाडीकडून भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारत राष्ट्र समितीमध्ये भगीरथ भालके यांनी प्रवेश केला होता. शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज भालके हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. पोटनिवडणुकीत भगीरथ भालकेंचा झाला होता पराभव
    दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे समाधान आवताडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके यांनी संधी दिली होती. तर भाजपने समाधान आवताडे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, या निवडणुकीत जनतेनं भगीरथ भालकेंना नाकारले आणि समाधान आवताडे यांना विजयी केले होते. त्यानंतर भगीरथ भालके यांनी वेगळा मार्ग धरत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता. त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनं सर्वच राजकीय नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. भगीरथ भालके हे देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น • 1