शेतकरी नाद करतात आणि बैलांच्या शर्यतीत लॅम्बोर्गिनी चालवतात जुना व्हिडिओ 2010
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- महाराष्ट्रातील खिल्लार बैलांच्या शर्यती
महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पहिले जाते. बैलगाडा शर्यतीमुळे देशी जनावरांचे (गाय-बैल) संगोपन चांगल्या पद्धतीने होते. महाराष्ट्रात विविध भागात बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार असून, त्या भागात वेगवगळ्या नावाने ही शर्यत साजरी केली जाते.
किनारा शर्यत हा शर्यत प्रकार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर म्हणजेच समुद्रकिनारी खेळला जातो. यामध्ये बैल गाडीला दोन बैल जुंपले जातात व समुद्रकिनारी रेती वर एकाच वेळेस अनेक गाड्या सोडल्या जातात. जी बैलगाडी पुढे निघेल, त्या बैलगाडीला प्रथम क्रमांक दिला जातो. कोकणामध्ये शर्यतीसाठी सपाट मैदानांची संख्या अपुरी असल्यामुळे ही शर्यत समुद्रकिनारी खेळले जाते. अलिबाग, किहिम, रायगड, अशा किनारपट्टीच्या भागात या शर्यती होतात.
#bailgadasharyat #alibagh #bailgadapremi #bailgadapremi #maharashtra #trending #bailgadisharyat #bullrace #bhelpuri