मुद्रांक शुल्क शिथिलता येणार! 📑💶
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- मुद्रांक शुल्क शिथिलता येणार! 📑💶
शैक्षणिक योजनांच्या, नव उद्योगांच्या लाभांसाठी मुद्रांक शुल्क आकारण्यात येतो. या मुद्रांक शुल्कात वाढ झाली असल्याने महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील व सभागृहासमोर या मुद्रांक शुल्क विषयी माहिती मागितली. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व इतर शैक्षणिक व औद्योगिक महामंडळांच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असताना नवउद्योजक महिला, गरीब महिला किंवा विधवा महिला अशांना ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क परवडणारे आहे का? हा प्रश्न यावेळी सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देताना मा. महसूल मंत्री यांनी मुद्रांक शुल्काद्वारे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार दिला जाणार नाही असे स्पष्ट केले. मुद्रांक शुल्काच्या बाबतीत कोणी हयगय केल्यास अपवादात्मक परिस्थितीत अथवा समज देण्याच्या दृष्टीने ५०० रुपये शुल्क आकारले जाईल अशी माहिती दिली. #hiwaliadhiveshan2024 #DevendraFadnavis #StampDutySavings #AmitGorkhe #maharashtra #apalsarkar