वडापाव | Giveaway🤩 | एक किलोचे परफेक्ट प्रमाण | Vada Pav Recipe In Marathi | कृष्णाई गझने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2021
  • नमस्कार,
    दिवाळी निमित्त तुमच्यासाठी खास आपण giveaway ठेवला आहे त्यासाठी तुम्हा सर्वांना
    1.नवीन असल्यास चॅनेल ला प्रथम subscribe करा व्हिडीओ पूर्ण बघा तसेच व्हिडीओ ला लाईक करा कमेंट आणि शेअर करा.
    2.या व्हिडीओ वर एक युनिग अशी कमेंट करा.
    वडापाव साहित्य:
    1 किलो बटाटे
    60 ग्रॅम मिरची
    40 ग्रॅम आलं
    40 ग्रॅम लसूण
    अर्धा किलो बेसन
    कोथिंबीर
    मीठ
    खायचा सोडा
    पाणी
    फोडणीसाठी साहित्य:
    तेल
    1 चमचा मोहरी
    अर्धा चमचा जिरं
    एक मोठा चमचा उडीद डाळ
    1 चमचा हळद
    कढीपत्ता
    मिरची भजी:
    • कुरकुरीत बटाटा भजी आणि...
    पालक भजी आणि सुकी लाल चटणी:
    • अभीदादाच्या हातची कुरक...
    गोल भजी आणि गोड चटणी:
    • गोल भजी | गोल कांदा भज...
    कांदाभजी:
    • गरमागरम कुरकुरीत कांदा...
    बटाटाभजी:
    • कुरकुरीत बटाटा भजी आणि...
    झणझणीत मिसळ पाव:
    • झणझणीत मिसळ पाव | Misa...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

ความคิดเห็น • 1.2K

  • @deepakagine4366
    @deepakagine4366 ปีที่แล้ว +52

    खुप छान, तुमचे vdo पाहून माझ्या मित्राने पुण्याला हॉटेल सुरू केले आणि मला सांगितले की रत्नागिरीला त्यांना भेटून माझ्याशी बोलणे करून दे .

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  ปีที่แล้ว +3

      खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या मित्राचे अभिनंदन. रत्नागिरीत आलात की नक्की या भेटायला.

    • @deepakagine4366
      @deepakagine4366 ปีที่แล้ว +2

      मी रत्नागिरीचा आहे, तुमचा पत्ता सांगा.

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  ปีที่แล้ว +3

      नारायणमळी नाचणे येथे आम्ही राहतो.

    • @supritasarmandali8787
      @supritasarmandali8787 ปีที่แล้ว +1

      Vadyachi Suki chutni Kashi banvitat te dakhava na please okk by

    • @sushilaparkar19
      @sushilaparkar19 ปีที่แล้ว

      @@krushnaigazane921 l.

  • @anilpatil9577
    @anilpatil9577 11 หลายเดือนก่อน +9

    काकूंनी खूप तळमळीने सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने लक्ष घालून शिका खूप सुंदर दादा ❤ काकूंची अँक्शन शिक्षक सुद्धा शाळेत शिकवत नसतील अशी खूप सुंदर🎉

  • @cheta121
    @cheta121 2 ปีที่แล้ว +82

    नाही बडेजावपणा ,नाही दिखावा ,जसे असाल तसे तुम्ही रेसिपीस दाखवतात ,तुमच्या बोलण्यानेच घरचे वाटतात तुम्ही .
    कृष्णाई आणि अभि चे कौतुक वाटते ..त्यांच्या साधेपणाचे . विनयशीलतेचे .
    कृष्णाई आणि अभिला त्यांच्या पुढेही आयुष्यात कायम यश मिळो हीच सदिच्छा .

  • @anujaagashe778
    @anujaagashe778 2 ปีที่แล้ว +92

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.... ही म्हण तुमच्या कुटुंबाला अगदी साजेशी आहे.... वडापाव ची रेसिपी एकदम छान..... तोंडाला पाणी सुटले..... कोकणातलं वातावरण आणि तुमची कोकणातली भाषा मनाला खूप भावते ❤️❤️

    • @leenapatankar2044
      @leenapatankar2044 2 ปีที่แล้ว

      Kharch agadi brobr bolat....

    • @pradeepbhadrige4420
      @pradeepbhadrige4420 2 ปีที่แล้ว +3

      खुपच छान आणि अप्रतिम 👌👌👌विषेश म्हणजे चुलीवर रेसिपी करूनही किती स्वच्छता आणि टापटीप पणा. शिवाय तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत सुध्दा किती सोपी आहे. सौ. शोभा भद्रिगे.

    • @kanishkatumne9737
      @kanishkatumne9737 2 ปีที่แล้ว +1

      एकदम भारी

    • @varshasheth1712
      @varshasheth1712 2 ปีที่แล้ว

      Khup sadhi saral manase ahat
      Tasah gharatil vastu madhech banatat baghayala aani karayala sope mi roj video baghate

    • @sujatabankar7458
      @sujatabankar7458 2 ปีที่แล้ว

      Ky sangu mla tr tumchi family ch khup avdli.... maheri gelyach fill al,🙂

  • @gouribapat5034
    @gouribapat5034 2 ปีที่แล้ว +16

    दिवाळीची मिठाई खाता खाता काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली. नेमके हेच ओळखून अभी, कृष्णाई आणि काकूंनी मस्त अशी वडापावची रेसिपी दाखवली.रेसिपी इतकी छान की तोंडातून आपोआप वाहवा निघाली. कृष्णाई तुझे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शुभ दीपावली.
    🎉🎉🎊🎊🌋🎇❇️

  • @misaianimazilifestyle2455
    @misaianimazilifestyle2455 2 ปีที่แล้ว +105

    माझे आई वडील श्रीमंत नाहीत पण त्यांनी मला सर्वात महाग वस्तू दिली ती म्हणजे संस्कार काकू तुम्ही अभी दादा आणि कृष्णाई यांना खूप छान संस्कार दिलेत मला इथे एकच सांगायचं आहे काकूंनी खूप कष्ट करून रक्ताच पाणी करून तुम्हाला वाढवले आहे आणि या माऊलीची तुम्ही जशी अता काळजी घेतात तशीच घ्याल अशी खात्री आहे तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही खूप पुढे जावेत यासाठी साई चरणी प्रार्थना .....

    • @anantpawar8427
      @anantpawar8427 2 ปีที่แล้ว

      Pjnmj

    • @nishaang1542
      @nishaang1542 2 ปีที่แล้ว +1

      आईच्या मायेने पदार्थ समजवून सांगता व खाऊ पण घालता धन्यवाद

    • @NehaDas-zf6qm
      @NehaDas-zf6qm 2 ปีที่แล้ว

      Khar bollat tai same kaku ashach ahet

    • @mk2428
      @mk2428 2 ปีที่แล้ว

      Nice Rasika madam khup chan bollat

    • @daminikarambele9939
      @daminikarambele9939 2 ปีที่แล้ว

      काकु तुम्ही सव् खुप छान आहात

  • @atharvsuryawanshivlogs5914
    @atharvsuryawanshivlogs5914 2 ปีที่แล้ว +18

    कष्टाळू आईचे कष्टाळू मुले..... रेसिपी खूपच छान 👍

  • @lalannarvekar3521
    @lalannarvekar3521 2 ปีที่แล้ว +6

    कृष्णाई, रेसिपी सांगताना ज्या भाषेत तुम्ही सांगता ना , त्यामुळे रेसिपी सहज समजून करता येते.त्याहीपेक्षा सोपं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामानातून रेसिपी करता येते.वायफळ बडबड नाही की भपका नाही.हे मला खूप भावते.आत्ता जी तुम्ही वडापावची रेसिपी दाखवली ती पाहून कोणीही सहज वडापावची गाडी टाकून आपला उदरनिर्वाह चालवू शकेल.अशाच रेसिपी दाखवा व लोकांची मने जिंका.कृष्णाई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @sukanyak8719
    @sukanyak8719 2 ปีที่แล้ว +26

    Krushnai ची आई खुप उत्तम प्रकारे समजाऊन सांगतात,
    आणि सर्वजण नेहमी छान प्रसन्न असातात

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qnDQ6IJ1EJI/w-d-xo.html

    • @Rohini_design3555
      @Rohini_design3555 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/8Xz6qEPtcZjGDzeOKcrpQg.html

    • @nisha280
      @nisha280 ปีที่แล้ว

      Chhan samjavtat

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +58

    वडा पाव - महाराष्ट्र ची शान 🙌🏼
    गरीब असो की श्रीमत् सर्वांना आवडतो 🤤
    ₹१०/- पासून ते ₹५०/- पडतो
    जेव्हा आई + अभी + कृष्णाई रेसिपी दाखवतात तर कमाल आणि धमाल असतो 😀

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 ปีที่แล้ว +9

    खरंच तू खूप हुशार आहे कृष्णाई, अभी खूप शांत आहे, दोघी नाण्यांच्या दोन बाजू आहेत

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 2 ปีที่แล้ว +9

    ओ अभि शेठ, तुम्ही नादच केलात थेट. वडापाव दुनीएतील नम्बर वन फ़ूड आहे, जो गरीबा पासून श्रीमंत हि आवडीने खातात. धन्यवाद तिघांना ही.

  • @sujatachavan8901
    @sujatachavan8901 2 ปีที่แล้ว +15

    माझीही एक वडापावची टपरी आहे. आज मला तुमच्या वडापावची रेसिपी पाहून अजून उत्तम प्रकारे वडापाव बनवण्याची प्रेरणा मिळाली. माझ आणि माझ्या कुटुंबाच त्यावरच पोट भरत. काकु तुम्ही खुप समजून सांगता. तुमच्या बोलण्यातच खुप आपुलकी आहे. तुम्हाला पाहीले की मिच मला दिसते. मला ही एक मुलगा व मुलगी आहे. धन्यवाद काकु

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +5

    ताई, बाब्या आणि अभि, माझी कमेंट ही बक्षीस पात्र नसेलही कदाचित पण मनातलं जे लेखणीतून उतरवतोय ते मात्र तंतोतंत खरं आहे.1) जेव्हापासून तुमच्या रेसिपीज पाहायला लागलो तेव्हापासून रेसिपी दाखवायला एक सुंदर मोठं आणि सर्व सुखसोयिंनी समृद्ध असं स्वयंपाकघरच असायला हवं हा समज दूर झाला 2)रेसिपी दाखवयाच्या म्हणजे कॅमेराला सामोरं जायच्या आधी स्वतःला तयार करायचं अर्थात मेकअप वगैरे हाही भ्रम फोल ठरला 3)राहणीमान अगदी साधं अगदी सर्वसामान्य पण पदार्थ दाखवणाऱ्या हाताची चव आणि त्याचा वाणीतील गोडवा हे आणि हेच सर्वात माहित्वाचं असतं तरंच तो बनवलेला पदार्थ अवीट गोडीचा आणि करणाऱ्याच्या प्रेमाने ओतंबून भरलेला असतो हे तर प्रखर्षाने जाणवलं. आणि त्यासाठी किंमती क्रॉकरी जेवायला आणि डायनिंग टेबल बसायला नसेल तरी चालेल फक्त पुढ्यात आलेला आणि ताटात वाढलेला पदार्थ हा प्रेमाचा आणि आपुलकीचा असला पाहिजे.ही तुमच्या रेसिपीची सर्वात महत्वाची बाजू आहे आणि ती तुम्ही कायम टिकवाल अशी आशा करतो.. अनेक शुभेच्छासह 🙏

  • @amargazane6788
    @amargazane6788 2 ปีที่แล้ว +33

    गरीबांच पोट भरणारा पदार्थ म्हणजे वडापाव जो
    लहान मुलापासून ते मोठ्याण परंत सर्वाना आवडतो 👌👌👌

  • @vinayakodare1762
    @vinayakodare1762 2 ปีที่แล้ว +4

    रेसिपी इतकी perfect कधीच मिळाली नाही म्हणून बाहेर चा वडापाव खायचे, पण आता घरीच बनवून खाणार व बाहेर चा वडापाव खायला तुमच्या गाडीवर येणार 👌👌

  • @Mugdha1111
    @Mugdha1111 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान! Most awaited recipe..
    होय, ती unique, झटपट गोड चटणी आठवतेय भजीच्या व्हिडिओ मधे दाखवली होती...🙂👌

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 2 ปีที่แล้ว +6

    वा एकदम परफेक्ट माहिती दिल्याबद्दल पहिले आपले मनापासून आभार आज पर्यंत मला हे माहित नव्हते की ठेचा पहिला बनवून घेऊन मग बटाट्याच्या मध्ये मिक्स करायचा आज कळले बटाटा फोडणी ला नाही घालायचा आता तुमच्या मुळेच माझे बटाटे वडे परफेक्ट होतील तुमच्या मुळेच आता माझा शिरा सुद्धा छान होतो ❤️

  • @epicanimation5671
    @epicanimation5671 2 ปีที่แล้ว +13

    Kaku Kiti Premane bolata tumhi …khap chan asatat tumchya recipe ….kanda bhaji tar khup sundar Zail Sarvana khup aavadli gharat …..thank you very much to you all …. Happy Diwali

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहात तुम्ही सगळे .किती छान सांगता आपलेपणा नी .जराही मोठेपणा नाही .कष्टाळू व प्रामाणिक आहात. तुमहा ला खूप खूप शुभेच्छा.

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 ปีที่แล้ว +6

    खूपच छान! ताई किती छान समजावून सांगतात... एवढया प्रेमाने आणि परफेक्ट प्रमाणात कोणीच नाही सांगत... धन्यवाद बाबे, अभिषेक आणि ताई. 👌👌

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 2 ปีที่แล้ว +21

    आग्रा व इंदुरी बटाट्याला फरक पहिल्यांदाच समजला अतिशय उपयुक्त माहीती

    • @priyam9717
      @priyam9717 2 ปีที่แล้ว

      Ho

    • @snehapolji2251
      @snehapolji2251 2 ปีที่แล้ว

      खूपच छान! तुम्ही प्रत्येक पदार्थ अगदी समजावून सांगता,त्यामुळे खाण्याची लज्जत तर वाढतेच, आणि तो पदार्थ बनवण्याची उत्सुकताही वाढते. वडापावची रेसिपी तर अफलातून .
      कोणाच्याही आवडीचा, तसेच श्रीमंत गरीब हा भेद नाहीच. सर्वांनाच परवडणारा. 👌

    • @mandakhairmode7948
      @mandakhairmode7948 2 ปีที่แล้ว

      @@priyam9717 o8 ii 888888ii8i ii i8i88lj ekH hi

  • @ushabari2512
    @ushabari2512 2 ปีที่แล้ว +3

    काकु वडे बघुनच इतके समाधान झाले आणि ते म्हणजेतुमचे समाधानी चेहरे बघुनखुप र्तुत्प वाटते तुमच्या सगळ्या रेसीपी खुप सुंदर होतात कुष्णाई काकु अभि दादाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा💐💐

  • @sunandathakare5535
    @sunandathakare5535 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुमचे बोलणे सुध्दा खूप छान आहे अजिबात तुमच्या बोलण्यात वागण्यात दिखावा नाही कुणीही तुम्हाला ओळखावं अशाच तुम्ही आहेत तुमच्या रेसिपी बघितल्या बरोबर करव्या वाटतात.तुमची सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे.मी नेहमी करून बघते.

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 ปีที่แล้ว +2

    ताईंच्या ह्यच प्रेमळ स्वभामुळेच ताई आज दादांच्या मागे दोघे मुलांना वेवस्थीत संस्कारी घडले आहेत..छान मेहनती आहेत आई मुले... नक्की ताई ...छोटा मोठा कार्यक्रम असला घरी तर तुम्ही शिकवले ले वडे नक्की नक्की करणार ...।

  • @sonalchandawale6947
    @sonalchandawale6947 2 ปีที่แล้ว +12

    कृष्णाई, तुझ्या आई आणि दादा नी एकदम भारी रेसिपी दाखवली..आम्ही घरी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पर्यंत केलेल्या "वडापाव रेसिपी" मधे ही एकदम A One Recipe !!! खूप भारी झाला वडा ☺️☺️👍👍

  • @mansigorhekar3385
    @mansigorhekar3385 2 ปีที่แล้ว +6

    Aaj chi vada pav chi recipe perfect hoti. Because ashi perfect measurement chi recipe mala youtub var milali nahi. Me nakki try karen👍👍
    Tumhi tighehi navshikyansathi khup mehanat gheta. Talmaline, aaturtene samorchyane shikave yasathi khup prayatna karata tyasathi tumhala salam. Hech sarv tumhala ek n ek divas khup unch yashachi payari gathayala madat karel hichi aamha sarvanchi ganapati bappa charani prarthana. Tumache lavakarat lavkar 100k subscribers hotil ashi mala aasha aahe. Tyach barobar tumhala silver, golden, diamond play button nakki milnar, because you definitely deserves this.
    Asech aamha sarvanche prem aani support tumhala kayamach asel.
    Best of luck for your journey👍👍❤❤.

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 2 ปีที่แล้ว +1

    ताई , तुमचा स्वभाव खुप मनमिळाऊ आहें, हेच रहस्य आहे तुमची रेसिपी चांगली होण्यामागे. खुप छान ! अशीच जनसेवा करीत राहा.

  • @akalpitaathavale6293
    @akalpitaathavale6293 2 ปีที่แล้ว +1

    परफेक्ट वडापाव रेसिपी सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ,आपली संस्कृती जपणारे अस्सल मराठी पदार्थ तुमच्याकडून शिकताना खुप आनंद होतो .अतिशय थोड्या साहित्यात तुम्ही अतिशय लज्जतदार पदार्थ कसे होतील ह्याचे प्रात्यक्षिक दाखवता,आणि कुठल्याही प्रकारचे सिक्रेट न ठेवता तुम्ही सगळे पदार्थ शिकवता ह्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. तुमच्या कडून नेहमी छान छान पदार्थ शिकायला मिळावेत यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @anujadeshpande386
    @anujadeshpande386 2 ปีที่แล้ว +14

    You guys are so professional and humble .. excellent..thank you for perfect recipe.

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 2 ปีที่แล้ว +3

    सांगितल्या प्रमाणे अभि ने वडापावची रेसिपी दाखवली धन्यवाद कृष्णाई आणि काकू.आणि तुम्हाला खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्या

  • @aparanmore2662
    @aparanmore2662 ปีที่แล้ว +2

    लयभारी 👌👌
    समजवण्याची पद्धत पण खूप छान
    वडापाव बद्दल बोलायचे म्हणजे गरीब श्रीमंताना एकत्र आणणारा पदार्थ 😋

  • @pranitapanchal4661
    @pranitapanchal4661 2 ปีที่แล้ว +2

    ताई , तुमच्या रेसिपीज खूप छान असतात , तुमची पदार्थ करताना सोपे करून सांगण्याची पद्धत , नुकसान , इजा होऊ नये म्हणून घ्यायची काळजी , साधेपणा , स्वच्छता इत्यादी पाहून छान वाटते , तुमचे videoes पाहून नवशिक्या व्यक्तीला सुध्दा पदार्थ बनवण्याची इच्छा होईल , अभी , krushnai , त्यांचीही पदार्थ करताना समजवण्याची पद्धतही खूप छान आहे , दीपावलीच्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा ,

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 2 ปีที่แล้ว +5

    दादा,आई आणि कृष्णाई तिघेही खुप छान समजवून सांगतात.👌👌👌👌👍😝😛😘

  • @sudhapatole1580
    @sudhapatole1580 2 ปีที่แล้ว +6

    वाह एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे एक्दम नंबर वन खूप छान नक्की करून बघणार आहे 👍👌👌😋😇🙏🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qnDQ6IJ1EJI/w-d-xo.html

  • @pravinkulkarni523
    @pravinkulkarni523 2 ปีที่แล้ว +1

    रेसिपी तर भरपूर पाहायला मिळतात, पण तुम्ही मनातून बारकाव्यासह आपुलकीने शिकवली. धन्यवाद. देव तुम्हाला सुखी ठेवो.

  • @supriyamalap6372
    @supriyamalap6372 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप सुंदर वडापावची रेसिपी होती आणि तुम्ही तिघांनी ती रेसिपी खूपच सुंदर रित्या समजावून सांगितली एवढ्या लहान वयात खूप स्वयंपाक करण्यात पारंगत आहेस आम्ही तुझ्या वयाचे असताना आम्हाला काहीच येत नव्हते तुझे असे नवीन नवीन व्हिडिओ बघून नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड निर्माण होते आणि जेव्हा तुझी रेसिपी चालू असते तेव्हा आमच्या तोंडाला अगोदरच पाणी सुटलेले असते धन्यवाद

  • @akshayshedge5420
    @akshayshedge5420 2 ปีที่แล้ว +12

    तुमचे सगळेच पदार्थ खूपच छान असतात... खूप सुंदरपणे समजाऊन सांगता.... आणि वडापाव म्हणजे धम्मालच..♥️

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 2 ปีที่แล้ว +6

    Super vada pav very well explained. Really I love your receipes because they are budget friendly. Thank you sis, Babe n Abhi.

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 2 ปีที่แล้ว +2

    वड्याचा कुरकुरीत पणा डिश मध्ये काढतानाच समजला. खूपच भारी झाले वडे. काकुंचे संस्कार खूप चांगले आहेत. शुभ दिपावली 👍

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 2 ปีที่แล้ว +1

    अशी स्वच्छता पाहिजे प्रमाण योग्य आहे आमच्या सारख्या साध्या माणसांठी भाषा आमच्या सारखी एकदमच छान भपकेबाज काही नाही एकदम साधंसुधं आवडलं आम्हाला

  • @sushmasawant5716
    @sushmasawant5716 2 ปีที่แล้ว +6

    खूप मस्तं! वडापाव म्हटलं की, थोडी पोटात जागा असतेच, काकी खूप छान!
    खूप छान बोलता तुम्ही ऐकत रहावसं वाटतं,
    मला माझ्या आईची खूप आठवण येते,
    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

  • @rssn8940
    @rssn8940 2 ปีที่แล้ว +6

    Ek dum first class recipe 💥 came out supereb 👌 looks good 😋 i will definitely try it ♥️ thanks for sharing the recipe 🙏.. Happy diwali ✨️⭐️

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 2 ปีที่แล้ว +1

    ताई, तुमच्या रेसिपी फारच छानं असतात त्याबद्दल शंकाच नाही, परंतु मला सर्वात जास्त आवडते ती तुमची रसरशीत पेटलेली चुल,आणि तुमच तिघांच ही लाघवी बोलणं.चुल पाहील्यावर फार छानं वाटत.

  • @anitaanant92
    @anitaanant92 2 ปีที่แล้ว +1

    माझा आवडता पदार्थ वडापाव कितीही मोठ्या हॉटेल मध्ये कितीही चांगला महाग असलेला खाल्ला तरीही माझ्या तोंडून एकच वाक्य या पेक्षा वडापाव खाल्ला असता तर बरं झालं असतं. एवढा माझा आवडता वडापाव. तुमच्या रेसीपी छानच होतात मी वडापाव घरीसुद्धा करते पण तुमचे प्रमाण आणि टिप्स वापरून नक्कीच करणार

  • @sandhyashetty4063
    @sandhyashetty4063 2 ปีที่แล้ว +3

    So lovingly your mother explains the recipe.

  • @shubha768
    @shubha768 2 ปีที่แล้ว +3

    कोणाकोणाला वाटत आहे की ताई चे 1M subscribe झाले पाहिजे

  • @aishwaryamhatre427
    @aishwaryamhatre427 2 ปีที่แล้ว +2

    Evdhi perfect recipe ahe. Ekdam mast ahe. Mi nakki try karen. Abhi ani krushnai tumhi dogha pan khup chan ahat.Ani aai tar best ahe❤ Tumche recipes evdhe easy ani perfect astat. Ani tumhi evdha vyavastit explain karta.kharach tula khup yash milo.

  • @sakshinagvekar5364
    @sakshinagvekar5364 2 ปีที่แล้ว +1

    वडापाव म्हटल की सगळ्याच्या आवडीचा विषय त्यात तुमच्या सारखी प्रेमल माणसे समजून सांगणारी असली की त्याची शाहान अधिकच वाढणार वहिनीच्या व अभिच्या हातचा वडापाव नादच करातचा नाय बघूनच तोडला पाणी सुटले पाहिजे मस्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती करत जा दिदी तुला भरपूर यश मिळुते ही देवाकडे प्रार्थना

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 2 ปีที่แล้ว +6

    मस्त एक नंबर वडा पाव आणि काकी हात किती पटपट चालतो वडा पाव तुमच्या गाडीवर छान भेटतो मी आणलाय एकदा खूप खुप छान रेसिपी आणि भरपूर यश मिळो अशीच प्रगती होऊ दे

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 ปีที่แล้ว +4

    Abhi tai, n krushnai aaj kharach mast vada pav maharashtrachi shan aslela garib shrimantacha aavdata asa man milalela padartha dakhvilat khup khup dhanyawad. Sadhi soppi sahaj jamel ashi banvaychi tighanchihi paddhat khup bhavto.👌👍🙏

    • @shobhanaparelkar4142
      @shobhanaparelkar4142 2 ปีที่แล้ว +4

      खुप छान दाखवलेत.तुमचा साधेपणा आवडला.इतरासारखे आगाऊपणा नाही.उगाच आवाज काढून हसणं.नाटकिपणा व्हिडिओ पाहण कठिण आहे.असेच पुढे जात रहा.

  • @swatinikam3411
    @swatinikam3411 2 ปีที่แล้ว +1

    Tujhi aai kiti sundar diste ..boln pan kiti premal niragas ahe .khup lucky ahes tu . Recipe khup chan .

  • @dhanashripatil1555
    @dhanashripatil1555 2 ปีที่แล้ว +2

    वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ, क्रूष्णाई तु आणि काकु अतिशय सुंदर पद्धतीने कोणत्याही पदार्थाची माहिती देता, त्यामुळे आम्हाला रेसीपी करणे खुपच सोपे झाले आहे, वडापाव देखील तुम्ही आज अशाच प्रकारे सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगितला आहे, अभी दादाची कांदा आणि मिरची कापण्याची स्टाईल तर खुपच सुंदर आहे👌👌👌😍आणि काकुंचे मधुर गोड बोलणे मनाला खूप आनंद देऊन जाते, आजचा वडापाव पाहुन तर तोंडाला अगदी पाणी सुटले आहे, 🥰😋😍 तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏 happy diwali🥰😍😊

  • @mangalgaikar5642
    @mangalgaikar5642 2 ปีที่แล้ว +5

    Khup chan recipe ahe thanku soo much happy diwali to you and your family nehmi khush rha

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 ปีที่แล้ว +8

    अवि चे वडापाव आणि भजी बघून लय भारी वाटते

  • @pansare9941
    @pansare9941 2 ปีที่แล้ว +1

    वडा पाव ची रेसिपी खूप च छान होती आमच्या कडे नासिक ला कुष्णाई वडा पाव सेंटर खूप प्रसिद्ध आहे आणि या वडा पाव ला पण आम्ही रत्नागिरी चा कुष्णाई वडा पाव म्हणु शकतो हो आणि आम्ही तुमच्या सर्व रेसिपी करून बघतोच कालच तुम्ही दाखवलेल्या छोले ची रेसिपी आम्ही चिकन मध्ये करु बघीतली अप्रतिम अशी झाली होती व छोले हि आधी केले होते तेही एक नंबर झाला होते 👌👌👌तुमच्या सर्व रेसिपी आम्हाला खूप आवडतात साध्य सोप्या व सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध होतात मस्त
    तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा व तुमचे एक लाख सबस्कायबर लवकरात लवकर पूर्ण होवोत हिच आमची सदिच्छा
    💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐💐

  • @BBreactor09
    @BBreactor09 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि जबरदस्त व्हिडिओ... वडा पाव तर खुप स्वादिष्ट बनवला.. आम्ही पण बनवुन बघू.. फक्त व्हॉइस कडे लक्ष दया व्हिडिओ आणि साऊंड मागे पुढे होत आहे... बाकी तर मावशीने इतकं सविस्तर समजून सांगितलं जबरदस्त.... 👌🏻👍🏻🙏🏻💐

  • @aayushimainkar1722
    @aayushimainkar1722 2 ปีที่แล้ว +16

    Amazing recipe🙌🏻My mom recommended me to watch your channel... Also she makes delicious food by following your recipes❤💯

    • @sunitagengaje1218
      @sunitagengaje1218 2 ปีที่แล้ว +1

      खुप काही शिकायला मिळालं कांदा भजी आणि बटाटा वडा फारच छान.साधे सोपे पदार्थ तयार करून दाखवता खुप छान वाटत.

  • @sukanyak8719
    @sukanyak8719 2 ปีที่แล้ว +9

    Hi Krushnaai keep it up..
    तुमची साधी राहणी आणि पदार्थ खूप छान आहेत..

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/qnDQ6IJ1EJI/w-d-xo.html

    • @sudhaayachit151
      @sudhaayachit151 2 ปีที่แล้ว

      Vada pav receipe khup sunder Aapulkine receipe dakhvali Thank you Happy Diwali all of you

  • @prakash2260
    @prakash2260 2 ปีที่แล้ว +2

    ताई खुप छान फेमिली आहे ताई तुमची 👍🏻👍🏻
    आई चा स्वभाव खूप छान आहे 👌👌🙏
    आणि अभि दादा खुप छान आहेत आपले बहिणीला की सपोर्ट करतात दादा 👍🏻👍🏻👍🏻
    खूप छान फेमिली आहे तूंमची सगळे मिळून मिसळून राहतात आई , दादा, ताई 👍🏻👍🏻👍🏻

  • @shailabhatavdekar9591
    @shailabhatavdekar9591 2 ปีที่แล้ว +1

    Wow.किती मस्त वडे।न खाताच,कळतय की किती चमचमीत असतील ते.तुमची सांगण्याची पद्धत पण खूपच छान असते.आणि रेसीपी बरोबरच इतर माहिती पण खूप छान देता.मी रत्नागिरीला आल्यावर अभीच्या गाडीवर नक्की येणार

  • @neelimamahadik9011
    @neelimamahadik9011 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan family.Down 2 earth.faltugiri nahi.konasarkhi kalale na?

  • @atharvugale
    @atharvugale 2 ปีที่แล้ว +6

    ohh really good and in exact measurements every ingredients given thanks for this video

  • @janetdmello7131
    @janetdmello7131 2 ปีที่แล้ว +2

    Such nice recipe of Vada, every one's favourite Vada pav, Abhi,babe and your mom all three are so simple and easy going people down to earth, love you all ❤️❤️ And Abhi your recipe of kandha bhaji is become a hit and favourite in our family..❤️❤️❤️

  • @samarth1155
    @samarth1155 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचे व्हिडिओ पाहिले, खुप शिक्षण्या सारखे आहे. छान, मी हॉटेलमध्ये काम करत आहे. गोपाळपूर, पंढरपूर. धन्यवाद,🙏🙏🙏😀

  • @rohhitnage2208
    @rohhitnage2208 2 ปีที่แล้ว +10

    Kashmir pasun te kanyakumari paryant... Apli krushnai gazane... World famous...
    Lavkr ch 100k...👍👍👍
    Me Baramatikar MH -42...

  • @mansvikorde4411
    @mansvikorde4411 2 ปีที่แล้ว +5

    Hi Krushnai Vadapav is a comfort food of Maharashtra. Happy Diwali and keep sharing new recepie videos. All the best and once again Happy Diwali.

    • @meenalpradhan53
      @meenalpradhan53 2 ปีที่แล้ว

      गरिबांचे खाणे आहे. पण सर्वांचे आवडते
      आहे. चविष्ट स्वादिष्ट आणि उत्कृष्ट. श्रीमंत
      हि आणि गरीबही आवडीने खातात.

  • @aditikhot5125
    @aditikhot5125 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे. पदार्थांची माहिती समजावून सांगण्याची पद्धत साधी सरळ सोपी आहे.त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला खूप आवडतात.व तुम्ही दिलेल्या माहितीनुसार केलेले पदार्थ खुप छान चविष्ट लागतात.व तुमच्या चांगल्या स्वभावाची चव केलेल्या पदार्थांमध्ये उतरते.त्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @kirandhote5184
    @kirandhote5184 2 ปีที่แล้ว +1

    साध्या सरळ सोप्याभाषेत छान कृती दाखविली धन्यवाद. लवकरच दुसरा पदार्थ दाखवा ताई.

  • @loveyourlife6955
    @loveyourlife6955 2 ปีที่แล้ว +4

    khup chan recipe in detail with some ideas ,,, very good

  • @shantakenkre4727
    @shantakenkre4727 2 ปีที่แล้ว +5

    दिवाळीच्या हादिॅक शुभेच्छा 🌹🙏🙏🌹

  • @sushamapotdar3760
    @sushamapotdar3760 2 ปีที่แล้ว

    अतिशय नेमक्या शब्दात, आणि हातचं कुठलंही न राखता वडापावची रेसिपी शेअर केलीत खुप आवडलं... तुमची उत्तम प्रगती होत राहो हिच सदिच्छा

  • @sanjaygiri5474
    @sanjaygiri5474 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई तुम्ही वडे बनवलेला vdoपाहीला आणि तेच पाहून आज घरी वडे बनवले खूप छान झाले धन्यवाद ताई 👌👌👌

  • @helenfigueredo1382
    @helenfigueredo1382 2 ปีที่แล้ว +13

    Mouthwatering and a Humdinger all the way . The best vada paav recipe ever , traditional and with a great spice level . Thank you Aunty ! You are a blue - ribbon class , sterling cook . I learn a lot from all your recipes . Loads of Love and Hugs from Pune . God bless you for being a teacher par excellence .

  • @diptinigudkar9763
    @diptinigudkar9763 2 ปีที่แล้ว +8

    Thank you for the recipe I had asked so many times for this.

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 2 ปีที่แล้ว

    तुझ्या पहिल्या व्हिडिओ पासून ते आताचे सर्वच व्हिडिओ मी पाहते त्यात सर्वात जास्त तुमचा साधे पणा आणि बोलण्याची पद्धत खूपच आवडते तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. तुमच्या रेसिपी तर खूपच सुंदर असतात ज्या की घरगुती जिन्नस असतात.त्यामुळे कोण ही सहज बनवतील.आणि पारंपरिक सुधा. Giveaway sathi nahi comment केली .तुम्ही आवडता म्हणून केली आहे या आधी मी बोली होती तुझी रेसिपी आली की आधी लाईक आणि मग मेस करते.आणि नंतर व्हिडिओ पाहते

  • @vijayhivarkar5286
    @vijayhivarkar5286 2 ปีที่แล้ว +2

    Step by step explained in simple and easy way. Appreciate the sincerity in honestly giving all the details.

  • @ashishkotwalkar3597
    @ashishkotwalkar3597 2 ปีที่แล้ว +3

    Krushna E, ek chote khani hotel ani hya sarwa resipi asleyley menu card.
    Lovkar suru ho u de re mharaja.
    Me - ashishcha dad

  • @shrutiraorane8075
    @shrutiraorane8075 2 ปีที่แล้ว +4

    Tuze 100k subscribe kadhihoti yachi aaturta &silver play button tula lavakar milo

  • @sayliapte299
    @sayliapte299 2 ปีที่แล้ว

    Thank u so much🙏 mazi khuprequest hoti hya recipe sathi. Tumhi lakshat theun hi recipe dakhwli. Start to end tumhi with all secret hi recipe dakhwli. Saglech ase secret ingredients sangat nahit. Khup khup Abhari ahe🙏 Happy Diwali💥💥

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 2 ปีที่แล้ว +1

    तुमची खासीयत आहे वडापाव ची, खुप प्रयत्न करून आम्हाला एईल असा वडापाव बनवायला. पण नक्की करणार असे वडापाव

  • @alkaranadive1255
    @alkaranadive1255 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान सांगीतल👌👍

  • @muktamodak8328
    @muktamodak8328 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान आहे वडापाव 👌 दिपावलीच्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 ปีที่แล้ว

    दिवाळीचा फराळ, दसऱ्याची श्रीखंड पुरी
    पण
    वडापाव खाण्याची लज्जतच न्यारी
    क्रुष्णाई गजनेचे व्हिडीओ भारी
    मस्तच ताई एकदम छान

  • @ashokkadam5917
    @ashokkadam5917 2 ปีที่แล้ว +1

    आई किती छान बोलता तुम्ही रेसिपी बाजूला तुमचं बोलणं ऐकून पोट भरत असच छान छान रेसिपी दाखवा 🙏🙏

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 2 ปีที่แล้ว +8

    Wow Krushnai mouth watering recipe made by your Mom. I just love it. Happy Diwali to your family. Such a wonderful family explaining the recipes so well in detail. God bless you all. Always keep smiling.

  • @vijaykakade3371
    @vijaykakade3371 2 ปีที่แล้ว +4

    एवढं सुंदर आणि प्रामाणिकपणे 👌👌🙏

  • @stan_8338
    @stan_8338 2 ปีที่แล้ว +1

    वडा पाव खूप छान आहे रेसिपी छान समजून सांगता तुम्ही सगळे चागले आहेत दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा

  • @Pankajkamble505
    @Pankajkamble505 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती दिली.
    यन खुश झाले. आणि आपली रेसीपी अप्रतिम चवदार आहे.

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 2 ปีที่แล้ว +3

    Kharch khup chan Banvla VadaPav,, tyat ch tumchi Mehant disun yetei, Happy Diwali Mavshi, Abhi, N Babe..... Love u all.

    • @priyanavalkar7144
      @priyanavalkar7144 2 ปีที่แล้ว

      Kharach khup chan banavla vada pav mavshi abhi n babe Happy diwali

  • @girinair474
    @girinair474 2 ปีที่แล้ว +5

    Burger is nothing compared to our our own traditional Vada Pav

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही तीघई खुप हुषार आहात .तुमचे सगळे व्हीडिओ खूपच सुदर ,चवीस्ट आहेत .तुम्हाला तीघांना खूप,खूप शुभेच्छा .मेहनत खूप आहे .खूप बोलाव लागते .वेवस्थित शिकवीत आहात .नवीन लोकांना फायद्याचे आहे .तुम्हा तीघांना भगवान दिर्घ आयुष्य ,निरामय स्वास्थ देओ .😊😊😊😊😊

  • @janhavisagvekar1825
    @janhavisagvekar1825 2 ปีที่แล้ว

    खूप छान.कांदाभजी मी खूपवेळा ट्राय केली पण जमली नव्हती,पण तुमच्या रेसिपी प्रमाणे केल्यावर लगेच छान जमली.आई खूप छान समजावून सांगतात.धन्यवाद.

  • @harshpatil5098
    @harshpatil5098 2 ปีที่แล้ว +15

    Shubhangi keer papu👎🏼 cha video bogas zaly aahet tumacha video ek no aahet ❤❤🙏🏻🙏🏻

    • @harshpatil5098
      @harshpatil5098 2 ปีที่แล้ว +3

      @@shwetakunkalienkar9031 right 👍🏻

    • @reshmamayekar3738
      @reshmamayekar3738 2 ปีที่แล้ว +1

      @@shwetakunkalienkar9031 khra ka Mala mahit ny

    • @reshmamayekar3738
      @reshmamayekar3738 2 ปีที่แล้ว +1

      @@shwetakunkalienkar9031 tai pan aply la ja ny patat tyacha var apan cament karto

    • @somankanchan3266
      @somankanchan3266 2 ปีที่แล้ว +4

      परवा एका विडिओ मध्ये तो म्हणला ती म्हाताऱया सारखं खाते असं म्हणायचं अवकाश लोकांनी इतके कंमेंट केले ''तुला तिच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे इथपासून ते खाताना तुझा आवाज ऐकू येतो इथपर्यंत'' पण त्यातून काही शिकेल असं वाटत नाही, त्याच विडिओ मध्ये ती बेड वर बसलीये आणि तो तिचा एकच पाय ओढतोय, ते तर काय होतं हे समजलं नाही, त्यानंतर रेसिपी बनवताना पीठ सांडलं होतं ते तसंच जमिनीवर राहिलेलं तिनी त्याला दाखवलं आणि मग हा जाऊन त्या सांडलेल्या पिठात स्केटिंग करून आला, लग्न ठरल्यावर मुलं मुली वेगळ्याच दुनियेत असतात हे मान्य पण असं अवकलेलं पहिल्यांदाच बघितलं,

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 2 ปีที่แล้ว +2

      @@somankanchan3266 sarvach aakrit aahe. Keer aajji tr bapre kiti hasu ni kiti nako as zalay. Kuthehi kay bugu bugu. Kiv yete. Pn ak mi observed kel aahe ki kajalchi aai hya keer aajji peksha hushar practical, swacchatapriy nitnetki aahe. Recipes sudha chan kartat tya. Sarv jithalya tithe ghar aahe. Tyashivay tyana vatat tech kartana distat. Pn he maz mt br ka.

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 2 ปีที่แล้ว

    मस्त पहिल्यांदाच असा विडीओ पाहिला एवढ मनापासुन उत्साहाने कोणी नाही शिकवत वडा अप्रतिम झाला चटकन खावा अस वाटल खुप मनापासुन धन्यवाद नक्की बनवणार

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 ปีที่แล้ว

    किती सुंदर वडे पण बाबे अभि तूझी आई किती समजून सांगते आणि चेहरा हसरा व्हिडीओ बघायला मजा वाटते

  • @priyasarmahale8821
    @priyasarmahale8821 ปีที่แล้ว

    तुमचे पदार्थ दाखवायची पद्धत खूप छान आहे. तुम्ही तिघेही किती मिळून एक दुसऱ्याला मदत करून छान काम करता ते बघायला खूप मस्त वाटतं

  • @SmilingGirl_Shruti
    @SmilingGirl_Shruti 2 ปีที่แล้ว +2

    Thanks for this vedio.. waiting since long..me tumche khoop recepies try krley infact me khoop change kele mazya cooking madhe n very happy with your suggestions..

  • @kashinathchavan3728
    @kashinathchavan3728 2 ปีที่แล้ว

    काकू, मी वडापाव बनविण्याच्या रेसिपी भरपूर पहिल्या youtube वर, परंतु तुम्ही वडापाव कसा बनवायचा हे अगदी सोप्या आणि खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं, खूप खूप धन्यवाद काकू, आणि Krushnai Gazane या चॅनेलचे आभार

  • @kalyaninagvekar2671
    @kalyaninagvekar2671 2 ปีที่แล้ว

    खुपच छान रेसिपी मी उद्याच बनवणार आहे आणि मला खात्री आहे ते छानच होतील कारण तुमची प्रत्येक रेसिपी मी पाहते आणि बनवते आणि घरचे माझे खुप कौतुक करतात त्यामुळे तुम्हाला खुप खुप धन्यवाद!!!