Varkari Kakda bhajan with lyrics Part 1 । वारकरी काकडा भजन लिखित स्वरूपात भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • !!श्री विठ्ठला!!🌼
    वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा हे वारकऱ्यांचे आराध्य दैवत मानले आहे, आणि समस्त वारकऱ्यांची ही त्या दैवता बद्दलची निष्ठा तेवडीच दृढ आहे हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही,वारकरी आणि श्री विठ्ठल हे समीकरण अनादी काळापासून आहे मानवाच्या देहात आल्यावर प्रत्येक जीवाने ईश्वर प्राप्ती करिताच आपलं जीवन व्यतीत करावं असा शास्त्राचा आणि संत वांग्म़याचा अठ्ठहास दिसून येतो, आणि जीवनच खरंखुर उद्धिष्ट सुद्धा तेच आहे, याच विचाराचे खरे पाईक कोण असतील तर ते वारकरी आहेत,
    देवाच्या प्राप्तिच्या साधनाबद्धल वेदांनी, शास्त्रानि, पुराणांनी जरी भिन्न भिन्न मत व्यक्त केली असली तरी वारकर्यांनी मात्र त्याच्या प्राप्तिकरिता संतांच्या मान्यतेचाच स्वीकार केल्याचे दिसते, याकरिता संतांनी शब्दाच जे भांडार उभं केलं त्यामध्ये प्रामुख्याने संतांचे अभंग,भारुड गौळणी,नाट,बालक्रीडा,आंधळा,पांगुळा, मुका,बहिरा,जोगी असे अनेक प्रकार जरी असले तरी सगळ्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे . काकडाआरती वारकरी हे जास्त प्रमाणावर रममाण होताना दिसतात ते पांडुरंगाच्या काकडआरती..!! मध्ये, आणि म्हणून समस्त वारकऱ्यांच्या आवडीचा आणि प्रेमाचा विषय म्हणजे "काकडा आरती" हीच काकड आरती वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणाऱ्या खूप जुन्या आणि सांप्रदायिक(पारंपरिक)अश्या चालीमध्ये श्रवणाकरीत,आणि लिखित अश्या दोन्हीं गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राचे खूप मोठे गायक श्री ह.भ.प महादेव महाराज मोरे यांच्या सुमधुर आवाजमध्ये भाग 1 आणि भाग 2 अश्या दोन भागात श्री महाकैवल्यतेजा या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून आम्ही संप्रदायाच्या सेवेसाठी सादर करत आहोत,याचा सर्वांनी खूप खूप लाभ घ्या,
    अश्याच संप्रदायिक विडिओ पहाण्यासाठी श्री महाकैवल्यतेजा चॅनलला subscribe करा,आणि कृपा करून आपल्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका
    संकल्पना-श्री स्वागत रमेश महिते व अरुण महाराज यादव
    काकड आरतीच्या लिंक खलील प्रमाणे
    काकड आरती भाग १
    • Varkari Kakda bhajan w...
    काकड आरती भाग २
    • Varkari Kakda bhajan w...

ความคิดเห็น • 446