👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : ५ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *TH-cam channel ची लिंक* th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *आंबा लागवड पूर्व तयारी* 🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 *जमीनीची लागवड पूर्व* *मशागत व पूर्व नियोजन* 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 लेख क्रमांक १ : *जमीनीची निवड कशी करावी ?* लेख क्रमांक २ : *पाणी व्यवस्थापन पूर्व नियोजन* लेख क्रमांक ३ : *आंबा लागवड कधी करावी ?* लेख क्रमांक ४ : *जमीनीची लागवड पूर्वमशागत व पूर्व नियोजन* वरील चार ही लेख *काळजीपूर्वक वाचावेत .* 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *आंबा लागवडीसाठी खड्डे मार्किंग केल्यानंतर खड्डे किंवा चर कशी काढावी व खड्डे कसे भरावेत ?* 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 १) आंबा लागवड ही खड्डे काढून किंवा चर काढूनही करता येते. २)आंबा लागवडीसाठी खड्डे काढताना 3×3×3 फुट ही पध्दत आदर्श मानली जाते. ३)जेसीबीच्या सहाय्याने खड्डे काढल्यास खड्ड्याचे पोट निघत नाहीत म्हणून हे खड्डे ३×३×३ फुट अंतराने तासून घ्यावेत. ४)अती मुरमाड व कठीण दगड असणाऱ्या जमीनीत लागवड करने टाळावे . ५) लागवड करावयाची झाल्यास खड्डे थोडे अधिक खोल ४/५ फुटा पर्यंत काढावेत. ६) खड्डे साधारणपणे एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात काढावेत . ७) खड्डे काढून झाल्यावर किमान एक महिना ते ४० दिवस कडक उन्हात तापतील याची काळजी घ्यावी. ८) महिन्याभरात खड्ड्यात पडलेली माती काढून खड्ड्याच्या आतील पाच बाजुने बुरशी नाशक व कीटकनाशक फवारणी करुन घ्यावी. ९)तळाशी कठीण मुरुम असल्यास खड्डे काढल्यानंतर वेळोवेळी खड्ड्यात पाणी ओतावे जेणेकरून तळाशी असणारा मुरुम मउ होइल व प्रखर सुर्यप्रकाशात तापल्याने त्याचे विदारण व्हायला सुरुवात होइल. १०) पर्जन्यमानाच्या वितरणानुसार मे चा शेवटचा आठवडा किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात आंबा रोपांची लागवड/रोपन करावे. ११) खड्डा काढल्यानंतर साधारणपणे एका महिन्यानंतर खड्डे माती +लेंडी खत+शेणखत +गांडूळखत +कंपोस्ट खत +पालापाचोळा+बायो सेंद्रिय खत +लिंबोळी पेंड यांच्या सयुक्त मिश्रणाने भरावा. 🔸सिंगल सुपर फोस्फेट चा आवश्यक असल्यास वापर करावा मुळांची वाढ चांगली होते.🔸 १२)3×3×3 फुट चा खड्डा भरण्यासाठी साधारणपणे ३५ ते ४० पाटी/घमेली सुपीक माती व सेंद्रिय खते यांचे सयुक्त मिश्रण लागते. १३)खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी किमान पाऊण फुट उंचीचा पालापाचोळा किंवा वाळके काष्ट यांचा थर द्यावा. 🔹त्यापूर्वी थायमेट किंवा इतर बुरशी-वाळवी नाशक तळाशी टाकावेत.🔹 १४) खड्ड्याच्या मध्यभागी झाडाला आधार देणारी मानगा/बांबू ची काठी उभी करुनच खड्डा भरावा म्हणजे पुन्हा आधार देण्यासाठी काठी ठोकत बसावे लागत नाही व मुळाना इजा ही होत नाही . १५) पाण्याची सुविधा उत्तम असल्यास भारतीय उपखंडात मे च्या शेवटी ही लागवड करता येते. १६) जून च्या पहील्या आठवड्यात मान्सुन चा अंदाज घेउन आंबा रोपांची लागवड करावी. १७) रोप लावल्या नंतर लगेच त्याला किमान १०/१५ लिटर पाणी झारीच्या साहाय्याने द्यावे .अती उष्णता असल्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे रोपे रुजण्यास फायदा होतो . १८) लावलेल्या रोपास सुतळी किंवा काथ्या चा वापर करुन जमिनीत लावलेल्या काठीला बांधून आधार द्यावा.आधार दिल्यामुळे वारा / वादळ यापासून रोपाचे संरक्षण होते . १९) रोपाचे कलम केलेली जागा जमीनीत मुजनार नाही याची काळजी घ्यावी. २०) चर काढून लागवड करणार असल्यास मार्किंग केलेल्या जागी रोपे लावुन वरील प्रमाणे खते टाकावीत व शिल्लक राहीलेला चरीचा भाग मुजवुन घेवुन समतल करावा . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *खड्डा भरताना कोणती* *खते टाकावीत ?* *सिंगल सुपर फोस्फेट* - १०० ग्रॅम *हुमिक ॲसिड*- ३०० मिली *रिजेंट*- ५० gr *मिथिल पॅरिथिॲन* - (फंगिसाइड )- 100 gr *लिंबोळी पेंड* -२ घमेले (२० किलो ) *लेंडी खत* -२ घमेली (२० किलो ) *शेणखत* -६ घमेली (६० किलो ) *गांडूळखत* -१ घमेले (१० किलो ) *कंपोस्ट खत* - १ घमेले (१० किलो ) पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट *मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य)*-५० gr व *सुपिक माती यांचे एकत्र केलेले मिश्रण* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 लिंक : १) *खड्डा कसा काढावा व कसा भरावा : नावीन्यपूर्ण पध्दत* th-cam.com/video/wmBN98gUtUE/w-d-xo.html *(Vedio No .८४)* २) *आधाराची काठी कशी लावावी ?* th-cam.com/video/4_rQFPEweeo/w-d-xo.html *(Video No.13)* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *श्री.राहुल खैरमोडे सर* *
Nice
Thanks
Amba June madhe lavaycha aslyas kiti machine adhi khadda khodava
th-cam.com/video/EwBiblDjz6Y/w-d-xo.html
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : ५ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*TH-cam channel ची लिंक*
th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
*आंबा लागवड पूर्व तयारी*
🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
*जमीनीची लागवड पूर्व*
*मशागत व पूर्व नियोजन*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
लेख क्रमांक १ :
*जमीनीची निवड कशी करावी ?*
लेख क्रमांक २ :
*पाणी व्यवस्थापन पूर्व नियोजन*
लेख क्रमांक ३ :
*आंबा लागवड कधी करावी ?*
लेख क्रमांक ४ :
*जमीनीची लागवड पूर्वमशागत व पूर्व नियोजन*
वरील चार ही लेख
*काळजीपूर्वक वाचावेत .*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*आंबा लागवडीसाठी खड्डे मार्किंग केल्यानंतर खड्डे किंवा चर कशी काढावी व खड्डे कसे भरावेत ?*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
१) आंबा लागवड ही खड्डे काढून किंवा चर काढूनही करता येते.
२)आंबा लागवडीसाठी खड्डे काढताना 3×3×3 फुट ही पध्दत आदर्श मानली जाते.
३)जेसीबीच्या सहाय्याने खड्डे काढल्यास खड्ड्याचे पोट निघत नाहीत म्हणून हे खड्डे ३×३×३ फुट अंतराने तासून घ्यावेत.
४)अती मुरमाड व कठीण दगड असणाऱ्या जमीनीत लागवड करने टाळावे .
५) लागवड करावयाची झाल्यास खड्डे थोडे अधिक खोल ४/५ फुटा पर्यंत काढावेत.
६) खड्डे साधारणपणे एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात काढावेत .
७) खड्डे काढून झाल्यावर किमान एक महिना ते ४० दिवस कडक उन्हात तापतील याची काळजी घ्यावी.
८) महिन्याभरात खड्ड्यात पडलेली माती काढून खड्ड्याच्या आतील पाच बाजुने बुरशी नाशक व कीटकनाशक फवारणी करुन घ्यावी.
९)तळाशी कठीण मुरुम असल्यास खड्डे काढल्यानंतर वेळोवेळी खड्ड्यात पाणी ओतावे जेणेकरून तळाशी असणारा मुरुम मउ होइल व प्रखर सुर्यप्रकाशात तापल्याने त्याचे विदारण व्हायला सुरुवात होइल.
१०) पर्जन्यमानाच्या वितरणानुसार मे चा शेवटचा आठवडा किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात आंबा रोपांची लागवड/रोपन करावे.
११) खड्डा काढल्यानंतर साधारणपणे एका महिन्यानंतर खड्डे माती +लेंडी खत+शेणखत +गांडूळखत +कंपोस्ट खत +पालापाचोळा+बायो सेंद्रिय खत +लिंबोळी पेंड यांच्या सयुक्त मिश्रणाने
भरावा.
🔸सिंगल सुपर फोस्फेट चा आवश्यक असल्यास वापर करावा मुळांची वाढ चांगली होते.🔸
१२)3×3×3 फुट चा खड्डा भरण्यासाठी साधारणपणे ३५ ते ४० पाटी/घमेली सुपीक माती व सेंद्रिय खते यांचे सयुक्त मिश्रण लागते.
१३)खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी किमान पाऊण फुट उंचीचा पालापाचोळा किंवा वाळके काष्ट यांचा थर द्यावा.
🔹त्यापूर्वी थायमेट किंवा इतर बुरशी-वाळवी नाशक तळाशी टाकावेत.🔹
१४) खड्ड्याच्या मध्यभागी झाडाला आधार देणारी मानगा/बांबू ची काठी उभी करुनच खड्डा भरावा म्हणजे पुन्हा आधार देण्यासाठी काठी ठोकत बसावे लागत नाही व मुळाना इजा ही होत नाही .
१५) पाण्याची सुविधा उत्तम असल्यास भारतीय उपखंडात मे च्या शेवटी ही लागवड करता येते.
१६) जून च्या पहील्या आठवड्यात मान्सुन चा अंदाज घेउन आंबा रोपांची लागवड करावी.
१७) रोप लावल्या नंतर लगेच त्याला किमान १०/१५ लिटर पाणी झारीच्या साहाय्याने द्यावे .अती उष्णता असल्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे रोपे रुजण्यास फायदा होतो .
१८) लावलेल्या रोपास सुतळी किंवा काथ्या चा वापर करुन जमिनीत लावलेल्या काठीला बांधून आधार द्यावा.आधार दिल्यामुळे वारा / वादळ यापासून रोपाचे संरक्षण होते .
१९) रोपाचे कलम केलेली जागा जमीनीत मुजनार नाही याची काळजी घ्यावी.
२०) चर काढून लागवड करणार असल्यास मार्किंग केलेल्या जागी रोपे लावुन वरील प्रमाणे खते टाकावीत व शिल्लक राहीलेला चरीचा भाग मुजवुन घेवुन समतल करावा .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*खड्डा भरताना कोणती*
*खते टाकावीत ?*
*सिंगल सुपर फोस्फेट* - १०० ग्रॅम
*हुमिक ॲसिड*- ३०० मिली
*रिजेंट*- ५० gr
*मिथिल पॅरिथिॲन*
- (फंगिसाइड )- 100 gr
*लिंबोळी पेंड* -२ घमेले (२० किलो )
*लेंडी खत* -२ घमेली (२० किलो )
*शेणखत* -६ घमेली (६० किलो )
*गांडूळखत* -१ घमेले (१० किलो )
*कंपोस्ट खत* - १ घमेले (१० किलो )
पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
*मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य)*-५० gr
व *सुपिक माती यांचे एकत्र केलेले मिश्रण*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
लिंक :
१) *खड्डा कसा काढावा व कसा भरावा : नावीन्यपूर्ण पध्दत*
th-cam.com/video/wmBN98gUtUE/w-d-xo.html
*(Vedio No .८४)*
२) *आधाराची काठी कशी लावावी ?*
th-cam.com/video/4_rQFPEweeo/w-d-xo.html
*(Video No.13)*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*श्री.राहुल खैरमोडे सर*
*
Temprature 30 35 chalel ka
राहुल सर नमस्कार,
आंबा बागेच्या आजूबाजूला जर वीटभट्टी असतील तर त्या भट्टयांच्या धुराचा आंब्यावर काय परिणाम होऊ शकतो ? आणि त्यावर काय उपाय करावा लागेल?
call me 88 55 900 300
2.5 years hapus kalam lavayla khadda kiti khodava lagel ???
3×3×3 फुट