खेड्यामधले घर कौलारु - ऊन पाऊस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • आशा भोसले
    ग दि माडगूळकर
    सुधीर फडके
    गायिका अभिनेत्री शांता भास्कर मोडक ऊर्फ बिंबा मोडक यांचा आज जन्मदिवस

ความคิดเห็น • 96

  • @sachinkamble2090
    @sachinkamble2090 2 ปีที่แล้ว +43

    सारं काही बदलून गेले आहे, आता ती कौलारू घरे राहिली नाहीत आणि प्रेमळ माणसेही राहिली नाहीत, उरल्या फक्त आठवणी आणि सिमेंटची जंगले. 😭

    • @mrinalvad9915
      @mrinalvad9915 2 หลายเดือนก่อน +2

      Khara aahe

    • @rajeshgaikwad3658
      @rajeshgaikwad3658 2 หลายเดือนก่อน

      कालाय तस्मै नमः

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 ปีที่แล้ว +12

    ही पिढी खूप समाधानी होती. पैसा नसेल पण माणुसकी होती.

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 ปีที่แล้ว +15

    माझे आजी चे आवडते आणि अधून मधून गुणगुणत असताना ऐकलेले सुदंर गीत फक्त गीत नाही, बालपणी जगलेले जीवन आणि सुंदर क्षण. जे पुन्हा येणार नाहीत पण स्मृतीतून श्वास असे पर्यन्त विसरले जाणार नाहीत.

    • @sunitasane6551
      @sunitasane6551 ปีที่แล้ว

      खरंच गोड गाणे व आपली स्मृती हृदयस्पर्शी

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आजोबांचे होते कौलारू सुंदर घर...आणि आमच्या येणा ची वाट बघणारे आजी- आजोबांचे डोळे...आजही आठवतात ते लहानपणच्या मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीचे दिवस

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183 ปีที่แล้ว +10

    हे गाणे माझे फार आवडते गाणे.
    आता ती कौलारू घरे नाहीत. चौसोपी वाडे नाहीत . माज घर नाही झोपाळे नाहीत . मिणमिण उजेड नाही. वृद्ध काकणांची किणकिण नाही. अभंग नाहीत. कड्यांची किरकिर नाही. अंगण नाही.पाऊलवाटा नाहीत. आमचे भाग्य म्हणून आम्ही हे सर्व अनुभवले . आता राहिल्या त्या फक्त आठवणी.गाणे ऐकून मन भूतकाळात रमुन गेले.
    आता तशी गाणीही नाहीत.

    • @suhasarondekar3899
      @suhasarondekar3899 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे आपण म्हणता तसें आता काहींच ऊरले नाही फक्त आठवणीच आठवणी आई नाही (मीच आत्ता 76 चा ) त्या बरोबर पत्नीही नाही. ऊर भरून येतो.

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 3 ปีที่แล้ว +41

    घरातील एखादी जुनी ट्रंक उघडावी मग आजीआजोबांचे कपडे हाताळताना अत्तराच्या दरवळाने मन फुलून जावे तशी ही अवीट मधुर गीते. तो काळ तर केव्हाच सरला. ती माणसे ही काळाच्या पडद्याआड गेली. पण स्मृतीगंध अजून दरवळतोय.
    सुंदर गीत व संगीत.सुमधुर सुस्वर. धन्यवाद.

    • @neelprabhakulkarni7347
      @neelprabhakulkarni7347 3 ปีที่แล้ว +5

      विश्वजीत ने अभिप्राय खूप सुंदर दिलाय.अगदी खरं आहे.अशी सुमधूर, अर्थपूर्ण गाणी आता ऐकायला मिळत नाहीत.पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात.एकत्र बसून गाण्याचा आनंद घेण्याचा काळ पडद्याआड गेला.आता वेळच नसतो कुणाला.६० वर्षे झाली तरी गाणं अजूनही बकुळ फुलासारखं सुगंधीत आहे.

  • @swanandbodas8176
    @swanandbodas8176 ปีที่แล้ว +5

    प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी गदिमांच्या शब्दांमुळे दाटून येतात. बाबूजींच्या चालींबद्दल शब्दच अपुरे. आशाताईंचा स्पष्ट उच्चार, प्रेमळ पण बारीक आवाज यामुळे ही आवृत्ती जास्त भावते.

  • @avadhootsadamate2134
    @avadhootsadamate2134 4 หลายเดือนก่อน +3

    😢गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही गाणी ऐकने हा एकच पर्याय आहे ❤🎉

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 6 หลายเดือนก่อน

    मी हे गाणे लहानपणी मालतीबाई पांडे यांचे मूळ गाजलेले गाणे खूप वेळा ऐकले आहे ,फारच छान आहे.अगदी मनावर कोरले गेले आहे,

  • @JyotiDeshpande-q2o
    @JyotiDeshpande-q2o ปีที่แล้ว +4

    माझे ही आजोळ चिपळुण चे होते , ऐकताना डोळे भरुन येतातच😢

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 ปีที่แล้ว +6

    आजपर्यंत हजारो वेळा अतिशय सुश्राव्य व हृदय हेलावणारे हे गीत वारंवार ऐकले तरीही तृप्ती होत नाही..

  • @sandeepdamle5226
    @sandeepdamle5226 3 หลายเดือนก่อน +2

    परांजपे आजोबा, माडगूळकर आजोबा, गुप्ते आजी, सगळ्या सगळ्या थोर व्यक्तींनी परत एकदा जन्म घ्यावा....❤❤❤❤❤❤
    किती काय काय अमूल्य ठेवा ठेवून गेलेत 😊
    खूप खूप आभार अपलोड करणाऱ्या व्यक्तींचे...
    द्वारा ----संदीप मनीषा दत्तात्रय दामले (अंबरनाथ )

  • @s.ykulkarni9198
    @s.ykulkarni9198 2 ปีที่แล้ว +8

    या गाण्यात वर्णन केलेले घर मी काही वर्षांपूर्वी कोकणात पाहिले होते.

  • @swatibhangale753
    @swatibhangale753 3 ปีที่แล้ว +10

    1967 chya junya aathawanina ujala milala ,❤ Doley panawaley.Miiss my Grandperents.😥Khup sundar ganey.Asha taincha Makhmali awaaj.Surekh sangam.❤❤❤

  • @shailajadeshpande.9122
    @shailajadeshpande.9122 2 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर गाणं,आशाजींचा मधूर आवाज,खेड्याचे वर्णन, अगदी रमून गेले मी.राजा परांजपे,सुमती गुप्ते,जुने कलाकार पाहून गहिवरूनच आले.

    • @girishchavan8212
      @girishchavan8212 2 ปีที่แล้ว

      आशा भोसलेंचा आवाज नाही हा या मालती पांडे आहेत

    • @smitabhagwat13
      @smitabhagwat13 11 หลายเดือนก่อน +1

      @@girishchavan8212आशा भोसलेच आहेत गायिका

    • @archanaayachit1632
      @archanaayachit1632 6 หลายเดือนก่อน

      मालती पांडे आहेत

    • @archanaayachit1632
      @archanaayachit1632 6 หลายเดือนก่อน

      मालती पांडे आहेत

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 ปีที่แล้ว +30

    खेड्यातील ती आई वडिलांच्या आठवणी ,गाव सारे नजरेत समोर उभे राहते आठवणींना उजाळा मिळतो.डोळे पाणवतात.

  • @shashikantlagwankar6756
    @shashikantlagwankar6756 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुरेख शब्द, मनाला भिडणारे... तशीच सुरेख चाल आणि सुरेल गायन!

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 ปีที่แล้ว

    ग दि मा, आशाताई , सुधीर फडके मस्त सुंदर, धन्यवाद राजाध्यक्ष.

  • @leenab1328
    @leenab1328 3 ปีที่แล้ว +10

    Missing my grandmother always ..its so emotional, lovable heart touching song
    I adore old classical song always coz of my grand parents ..they use to listen always
    Blessed era .wish I was born dat time
    Shri Raja Paranjape ...true legend actor
    My fav
    Thank you for this beautiful song 🥰🌹🙏

  • @surekhapatil4914
    @surekhapatil4914 2 ปีที่แล้ว +3

    ही गीते म्हणजे बकुळीच्या अत्तराच्या कुपी सारखीच आहेत.

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 3 หลายเดือนก่อน

    जुन्या गाण्यांचा सुंगध सदैव दरवळच राहिलं!

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 ปีที่แล้ว +9

    ह्यात आजी - आजोबांचे काम करणारे कलाकार आहेत सुमती गुप्ते व राजा परांजपे .

  • @snehamohite663
    @snehamohite663 10 หลายเดือนก่อน

    माझे अतिशय आवडती गाणे! आई वडिलांच्या आठवणी ni मन गहिवरून येते. 😢

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +2

    Mazya vadilnace Aase Ghar hote Vartan ATI uttam chan

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 3 ปีที่แล้ว +17

    सुवर्ण काळ पुन्हा एकदा यावा अशी मधुर गीत व्हावीत अशी आशा करुया नमस्कार

    • @anantbedekar3017
      @anantbedekar3017 ปีที่แล้ว +1

      शब्दप्रभू गदिमांचे सुंदर शब्द आणि आशाजींचा मधुर स्वर!
      विशेषत: "माजघरातिल‌ उजेड मिणमिण ........." -अप्रतीम!

  • @leenab1328
    @leenab1328 3 ปีที่แล้ว +5

    Shanta modak ...khup sunder abhinetri
    Natural beauty 💖🍃🥀
    Wishing a very happy birthday Mam🙏💐

    • @anantjoshi1304
      @anantjoshi1304 3 ปีที่แล้ว +1

      मला प्रश्न पडला होता की ही अभिनेत्री कोण आहे. त्यांचे आणि काही चित्रपट आहेत का?

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर..
    अजरामर गाणे !

  • @narayanshastri7418
    @narayanshastri7418 6 หลายเดือนก่อน

    Extremely moving. Superb direction.

  • @PrashantDhumal-wf6gr
    @PrashantDhumal-wf6gr 4 หลายเดือนก่อน

    ऊन पाऊस या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले खेड्या मधलं एक घरा मधलं समाधान दाखवणारे खूप सुंदर गाणे

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 3 ปีที่แล้ว +2

    अशी मधुर गीते ऐकत राहावीशी वाटतात

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 3 ปีที่แล้ว +3

    Excellent Marathi devotional song beautifully tuned and equally well sung by Asha .

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 5 หลายเดือนก่อน

    Kitti chhan divas hote .nahi ka..

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 22 วันที่ผ่านมา

    माझ्या आईचे आवडते गाणे ती नेहमीच गुंगुनायची v मला म्हणायला सांगायची

  • @anantjoshi1304
    @anantjoshi1304 3 ปีที่แล้ว +5

    ह्या चित्रित गाण्यातील पहिलं कडवं अनोळखी वाटलं. आणि एक ओळखीचं कडवं - आयुष्याच्या पाऊलवाटा किती तुडवल्या येता जाता - ह्यात नाही.
    आभार ह्याबद्दल.

    • @sl-sd7mk
      @sl-sd7mk 3 ปีที่แล้ว +1

      परी आईची आठवण येता मनी वादळे होती सुरू

    • @satyajitparab399
      @satyajitparab399 2 ปีที่แล้ว +1

      हे गाणे दोन गायिकांच्या आवाजात असून कडवी वेगवेगळी आहेत. हे गाणे आशाताईंनी गायले असून दुसरे गाणे मालती पांडेंनी गायले आहे. गीतकार आहेत महाकवी ग. दि. माडगूळकर तर संगीतकार आहेत सुधीर फडके. चित्रपट: ऊन पाऊस.

    • @gajarpungi
      @gajarpungi 2 ปีที่แล้ว

      या गाण्याच्या दोन आवृत्ती आहेत. एक मालती पांडे यांनी म्हटलं आहे आणि दुसरं आशा भोसले यांनी . . दोन्हीत ओळी वेग वेगळ्या आहेत.

    • @akashkuldharan7593
      @akashkuldharan7593 2 ปีที่แล้ว +1

      ते कडव ज्यात आहे ती कविता आहे
      अनिल भरती यांची

  • @AvinashYadav-d8u
    @AvinashYadav-d8u 2 หลายเดือนก่อน +1

    Singer is Malti pande

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 5 หลายเดือนก่อน +1

    Jam aathvan yete aaji chi ,kothe geli hi manse ?sunder gaani 😅

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 3 ปีที่แล้ว +1

    Kai sangu. Khedya madhle ghar kovlaru.

  • @samitashah4595
    @samitashah4595 หลายเดือนก่อน

    Very nice song 👌👌

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 3 ปีที่แล้ว +1

    One of the very melodious song which every marathian would fall in love with Very beautifully tuned by Maestro.Sudhir Phadke.who is also.our Babuji.

    • @neelprabhakulkarni7347
      @neelprabhakulkarni7347 2 ปีที่แล้ว

      अतिशय भावपूर्ण मधूर गीत.ग.दि.मां.चे भावपूर्ण शब्द, सुंदर संगीत,आशाताईंचा मधूर आवाजातले हे गीत ऐकतच रहावे वाटते.खरच आताती प्रेमळ माणसे,ते खेड्यातले वर्णन,तो चौसोपी वाडा सारे काळाच्या पडद्यावर गेले.राहिल्या त्या भावपूर्ण आठवणी.

  • @PrasannaKulkarni-q3g
    @PrasannaKulkarni-q3g 3 หลายเดือนก่อน

    गेले ते दिन गेले..उरलेत फक्त आठवणी

  • @swareshthakur9290
    @swareshthakur9290 ปีที่แล้ว +1

    खरच डोळे भरून आले

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 10 หลายเดือนก่อน

    June to sone. Mag ti manse asot ki ghare.❤

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @thimmaiahsharadammathimmai4548
    @thimmaiahsharadammathimmai4548 9 หลายเดือนก่อน

    Good singing old is gold black and white wonderful movie 🎉😊

  • @ganeshgayakwad8370
    @ganeshgayakwad8370 ปีที่แล้ว +1

    Old is gold super

  • @chhayashinde3601
    @chhayashinde3601 3 ปีที่แล้ว +2

    हे गीत ऐकतांना माझ्या आजीची आठवण होते

  • @suhanegeet
    @suhanegeet 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर गाणं आहे. जुन्या आठवणी जागा झाल्या .

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 ปีที่แล้ว

    खूप सुंदर ❤

  • @SheetalPulate
    @SheetalPulate 5 หลายเดือนก่อน

    Superr

  • @MadhavBelsare
    @MadhavBelsare 2 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @PrashantDhumal-wf6gr
    @PrashantDhumal-wf6gr 4 หลายเดือนก่อน

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 10 หลายเดือนก่อน

    Old is real gold....

  • @rajatbadade20
    @rajatbadade20 ปีที่แล้ว

    anyone from 2009-2010 batch who had this song as poem in syllabus

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या वडिलांचे आवडते गाणे

    • @yashwantrambhajani9239
      @yashwantrambhajani9239 3 ปีที่แล้ว

      जुने ते सोने .असे जुन्या ( संस्कारी ) वळणाचे घर आता दिसत नाही .

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 8 หลายเดือนก่อน

    Kharech june lok pahile ki dole bharun yetat. Ti gani sangeet aavvaj aata nahi honar.. kaularu gharat gharbharun manse premane rahhat hoti..aata flat chya band gharat .hum do hamara ek.. kuth gele te divas..ytil ka partuni 😢😢😢

  • @py7316
    @py7316 2 หลายเดือนก่อน

    Shanta Modak alias Bimba acted in some Marathi movies in 1950s. She was a good singer rather than a successful actress.

  • @ravibhushankulkarni5398
    @ravibhushankulkarni5398 5 หลายเดือนก่อน

    सुरेख

  • @yamininatekar2493
    @yamininatekar2493 6 หลายเดือนก่อน

    ❤👍👍👍

  • @sameerkadu8495
    @sameerkadu8495 4 หลายเดือนก่อน

    बालपण आठवले

  • @mumbaimusicgroup3778
    @mumbaimusicgroup3778 3 ปีที่แล้ว +1

    Liked👍 & SUBSCRIBED--Shekhar Rajadhyax
    (MUMBAI MUSIC GROUP)

  • @anuradhakathole3914
    @anuradhakathole3914 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर वा

  • @sameerranade6018
    @sameerranade6018 3 ปีที่แล้ว

    माझे आवडते गाणे

  • @pramodkamble6546
    @pramodkamble6546 2 ปีที่แล้ว

    Old is gold

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 ปีที่แล้ว

    जुने ते सोने.

  • @SangitaDhumal-vj8zo
    @SangitaDhumal-vj8zo ปีที่แล้ว +1

    This song is very popular every word has pecular meaning it increases natural beauty pure realation between son and mother

  • @swatishankarjoshi5832
    @swatishankarjoshi5832 2 ปีที่แล้ว +1

    घर असावे घरा सारखे नको त नुसत्या भिती

  • @mariopubg9885
    @mariopubg9885 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @vidyaji5535
    @vidyaji5535 3 ปีที่แล้ว

    🙏👍

  • @sunitakakade4978
    @sunitakakade4978 2 ปีที่แล้ว

    गोष्टी घराकडील वदतागडयारेहीकविताहवीआहे

    • @vijaymahajan3835
      @vijaymahajan3835 หลายเดือนก่อน

      गोष्टी घराकडील मी वदतां गडया
      गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
      झालें पहा कितिक हें विपरीत सारे !--
      आहे घरासचि असें गमतें मनांस,
      ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !
      ही देख म्हैस पडवैमधिं बांधलेली
      रोमथभाग हळु चावित बैसलेली.
      मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे
      मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे !
      डोळयांत बोट जरि घालूनि पाह्‍शील
      अंधार तो अधिकची तुजला दिसेल ! --
      अंधार-- जो फलक होत असे अम्हांस
      चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास !
      आवाज ’ किरं ’ रजनी वदतेच आहे,
      ’घों घों ’ असा पवन नादहि बोलताहे;
      ऐके पलीकडुनि बेडुक शेतभातीं
      पर्जन्यसूक्त सगळे मनमोख्त गाती ?
      हीं चारपांच चढूनी हळु पायठाणें
      या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
      हें ऐक रे ’ टकटका ’ करितें घडयाळ
      या शान्ततेंत गमतें कुटितेंच टाळ !
      डावीस हा बघ निरेखूनि एक माचा
      निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझ्या.
      त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोनें !
      तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें !
      तातास या बघुनि या ह्रदयांत खातें,
      होऊन हें ह्रदय विव्हळ सर्व जातें !
      त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
      नाणूं तयास मग कां वद आंसवांनीं ?
      ताताचिया बघ गडया उजवे कडेला
      बापू असे तिथ बेरें अमुचा निजेला,
      अज्ञान तो चपलधी परि बाल आहे
      त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे !
      बापू ! गडया ! ध्वज उभा करशील काय ?
      तूं देशकारण करूं झटशील काय ?
      बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
      स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?
      मित्र ! घरीं सुदुढ हस्त मदीय फार,
      दारास आडसर घट्ट असेल थोर,
      दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं,
      सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊं !
      मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
      येथें हवा मधुर, निश्वबनांत येई,
      नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
      वाटेवरी चतुरशिंगिचिया न तैशी !
      मित्रा ! असा हळूच ये उजवे
      खोली पहा पघळ ही किती ऐसपैस,
      निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
      हर्षाचिया न उकळया फुटती कुणास
      ती एक खाट अवलोक समोर आतां
      आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता,
      तीचे कुशींत निजली दिसते मदीय
      भीमा स्वसा, बधुनि ती मज हर्ष होय,
      मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
      आलीस तूं खचित गे असशील माते !--
      मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते
      जातील का फिटूनियां तव पुत्रहस्तें ?
      खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या,
      गोष्टी जयांस कथितां न पुर्‍याच झाल्या !
      ती कोण दूर दिसते ?-- निजली असूनी
      जी श्वास टाकित असे मधूनीमधूनी !
      कान्ताच ही मम ! -- अहा ! सखये ! मदीय
      स्वप्नें अंता तुज गडे ! दिसतात काय ?--
      आतां असो ! पण पुढें तुजला दिसेत
      स्वप्ने तुझीं मग समग्र तुला पुसेन !
      मागील दारीं सखया ! तुळशीस आतां
      वन्दूं, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
      सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें !
      येऊं घरा परत खासगिवालियाचे !

  • @tusharmore4529
    @tusharmore4529 3 ปีที่แล้ว

    हि कविता पण होती शाळेत

  • @milindchaubal62
    @milindchaubal62 2 ปีที่แล้ว

    खुपच मधुर, पण यात एक कडवं कमी आहे.

  • @kasturidalvi2885
    @kasturidalvi2885 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान